Login

लव ट्रँगल भाग ३

तरी सांगत होतो, नको म्हणून... पण ऐकतय कोण माझं
इतक बोलून नील सरळ कॅन्टीन बाहेर पडतो. समीरही त्याच्या मागोमाग जातो. ऋतू, राधा आणि राजा तेथेच कॅन्टीनमध्ये बसतात......
------------------------------------------------------  
पुढे....................

                "तरी सांगत होते, नको म्हणून.. पण ऐकतय कोण माझं." ऋतू वाकड तोंड करून राधाला बोलत होती.
            "मग काय करणार, किती दिवस मनात ठेवणार. सांगुन टाकलं बरं झालं. नाहीतर पुन्हा मलाच त्रास झाला असता." राधा म्हणाली.
           "ती बरोबर बोलतेय ऋतू...त्यात तिची काहीही चुकी नाही. तिच्या मनात नील बद्दल ज्या भावना होत्या त्या तिने व्यक्त केल्या आहेत.. सो.. तू तिला बोलण बंद कर." राजा ऋतूला समजावत होता.


                  "कूल डाऊन नील.... येवढा राग का यावा तुला?....ती फक्त तिच्या तुझ्याबद्दलच्या फिलिंग व्यक्त करत होती."  ईकडे समीर नीलला समजावत होता.
           "नाही समीर...फिलिंग नाही तर डायरेक्ट तिने मला प्रपोजच केल होत. हो मला मान्य आहे की ती सुंदर आहे, मनमिळाऊ आहे, श्रीमंत घरची आहे पण मला जशी मुलगी हवी आहे, त्या समीकरणात ती मुळीच बसत नाही. आणि एका चांगल्या मैत्रिणीला प्रेयसी म्हणून पाहण मुळीच माझ्या कल्पनेबाहेर आहे." नील म्हणाला.
------------------------------------------------------
              "उगीच मज्जा म्हणून कॉलेज करतय, नायतर काय ढेकळं पण येत नसतील...त्यापेक्षा दे सोडून कॉलेज अन शेतात मदत करू लाग आम्हांस्नि..." 'सुभाषराव' म्हणजेच नील चे वडील नीलला ओरडत होते.
          "गप्प बसा हो तुम्ही, लहान हाय अजुन...आता नाही हौस करायची तर मग कधी?..." 'सुशीलाबाई' म्हणजे आपल्या नीलची आई सुभाषरावांना म्हणाली. या दोघांचही बोलण नील ऐकत होता. नीलच आणि सुभाषरावांच जास्त पटत नव्हत. त्यामुळे ते काय बोलतात या कडे दुर्लक्ष करून नील कॉलेजची तयारी करत होता. आज परीक्षा सुरू झाली होती म्हणून तो जरा घाईतच निघाला होता. "आई निघू मी?"नील आईला विचारून सायकल वर जाऊन बसला. "हो हो आणि जाताना सोयराबाई ना माझ बोलावन सांग." आईने अस म्हणेपर्यंत नील कधीचाच निघुन गेलेला असतो.

------------------------------------------------------
               

            आज ग्रुप कॅन्टीनमध्ये नाही तर लायब्ररी मधे जमला होता. ऋतू आणि राधा अभ्यासात मग्न होत्या.पण राजा आणि समीरच मात्र अभ्यासात लक्ष नव्हत. त्यांच आपल टिंगल टवाळक्या करन चालूच होत.
     " नय्यो नय्यो लगता.. दिल नय्यो लगता.. अभ्यास में दिल नय्यो लगता..." राजा भसाड्या आवाजात गाण  म्हणत होता आणि समीर टेबलावर हाताने वाजवत होता.
          "गप्प बसा रे.... काय चाललंय काय हा?...एकतर स्वतःही अभ्यास करत नाही आणि दुसर्‍यालाही करू देत नाही. उठा इथून....नालायक कुठले..." ऋतू दोघांवरही ओरडली तसं दोघेही गप्प बसले. तेव्हाच नील दारातून आत येत असतो.
  "गुड मॉर्निंग नील" राजा हसून नीलला बोलतो.
"गुड मॉर्निंग फ्रेंड्स" नीलने ही रिप्लाय दिला आणि तो ही त्यांच्या घोळक्यात येवून बसला. नेहमीप्रमाणेच आजही तो खूप हँडसम दिसत होता. ब्लॅक कलरची जीन्स त्यावर स्काय ब्लू कलरचा टी-शर्ट...शूज...वॉच...आणि त्यात भर म्हणून  कपड्यावर दरवळणार्‍या 'स्प्रे' चा सुगंध, त्याच्या येण्याच अस्तित्व सांगायचा....
             "सॉरी राधा. काल मी जरा जास्तच ओव्हर अ‍ॅक्ट केले. आय होप, तू समजून घेशील."राधा बोलत नाही हे पाहून नील तिला म्हणाला.
         "सॉरी तर मला, तुला म्हणायला हव. तुझं मत न विचारता मी तुला तसं बोलले, परिणामी मी एक चांगला मित्र गमावला असता. आय एम रिअली सॉरी नील" राधा हळू आवाजात बोलत होती. नील ने तिच्यापुढे हात केला आणि म्हणाला "फ्रेंडस...बी अलवेज फ्रेंड्स?" त्यान अस म्हणताच राधाने ही त्याच्या हातात हात देऊन "फ्रेंड्स"... अस म्हणाली.
       "चला...चला आता पेपरची वेळ झाली आहे."समीर म्हणाला आणि सगळेजण  एकमेकांना 'बेस्ट ऑफ लक' करून आजचा पेपर
देण्यासाठी निघुन गेले.

------------------------------------------------------


           बघता बघता परीक्षा कधी संपली हे कळलंच नाही. शेवटचा पेपर देऊन सगळेजण पुन्हा कॅन्टीनमध्ये जमले होते. परीक्षा संपल्यानंतर सर्वांनी एक सुटकेचा श्वास सोडला होता. मध्यंतरी कुणाचही जास्त बोलणं झालं नव्हत. त्यामुळे आज सर्वांनी ठरवल होत की, खूप वेळ गप्पा मारत बसायचं. आता ते नंतर कधी भेटतील की नाही हे सांगता येत नव्हत. त्यामुळे परीक्षा संपल्याचा आनंद आणि पुन्हा न भेटण्याच दुःख मनात ठेवून ते सर्वजण तिथे आले होते.
          "गायझ...कसे गेले पेपर?.."नीलने सर्वांना विचारल.
           "मस्त! खूप छान!... ऋतू आणि राधा उत्तरल्या.
            "आणि तुम्हाला?"नीलने समीर आणि राजा कडे पाहून विचारले.
              "आला तसे गेले" हाऽऽ हाऽ हाऽ समीर हसून म्हणाला. राजानेही तशीच प्रतिक्रिया दिली.
         "तुला कसे गेले, नील? ऋतूने विचारले.
     "हो, गेले बर्‍यापैकी..बघु निकाल काय म्हणतो."-नील.
     "बर राधा आणि ऋतू तुम्ही तुमच्या गावी जाणार आहात का?"समीरने दोघींना विचारल. कारण उद्या पासून सुट्ट्या लागणार होत्या. सुट्ट्याच काय तिथे त्यांच कॉलेजच आयुष्यच संपणार होत. त्या दोघी आणि राजा बाहेरून पुण्यातील एका नामांकित कॉलेज मधे शिकायला आले होते. आणि  तिघेही होस्टेल वरच रहायचे. समीर आणि नील मात्र तिथलेच होते त्यामुळे त्यांचा कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता.
          "जाऊ 2-3 दिवसाने" समीरच्या प्रश्नावर ऋतू ने उत्तर दिले.
    त्यावर समीर लगेच म्हणाला "मग फ्रेंड्स...या चार दिवसाच्या सुट्टीत तुम्हाला यायच आहे माझ्यासोबत एका इव्हेंटला"......बी रेडी....

------------------------------------------------------
काय असेल इव्हेंट????......नीलसाठी स्पेशल असेल का???....कुणी येईल नीलच्या आयुष्यात ????...जाणून घेऊया पुढच्या भागात....


                                          क्रमशः.................
       


🎭 Series Post

View all