Login

लव ट्रँगल भाग १४

पाच वर्षानंतर....
पाच वर्षानंतर..............


             ब्लॅक रंगाची मर्सिडीज, भल्या मोठ्या गेट मधून आत प्रवेश करत एका बिल्डिंग समोर येवून थांबते. दोन गार्डस धावतच कारजवळ येवून उभे राहतात. त्यातला एक गार्ड कारचा दरवाजा उघडतो. ....'राईज विथ द सन'......  बिल्डिंग वरती असलेल नाव ठसठशीत दिसत होत. कंपनी होती ती...पुण्यातील अ‍ॅग्रीकल्चर फील्ड मधील एक नामांकित कंपनी.... देशातील लाखो शेतकर्‍यांना मदत करणारी....नवनवीन प्रयोग करणारी...शेतकर्‍यांच्या समस्या सोडवणारी....प्रोत्साहन देणारी.....
               कारमधून अठ्ठावीस- एकोणतीस वर्षाचा एक इसम बाहेर येतो. रेड चीफ कंपनीचे ब्लॅक शूज... काळ्या रंगाची पँट...पांढर्‍या रंगाचा फुल स्लीवस कॉटन शर्ट....त्यावर फुल स्लीवस काळ्या रंगाच जॅकेट चढवलेल.... चॉकलेटी रंगाची टाईट  नेकटाय....उजळ रंग....परफेक्ट शेप केलेली बिअर्ड....डाव्या बाजूने उजवीकडे सेट केलेले केस.... चेहर्‍यावर कठोरतेचे भाव .... पण पण हृदय तितकच प्रेमळ...डोळ्यावर चढवलेला ब्लॅक गॉगल... पण त्याच्या आड लपलेल्या डोळ्यात निराशेचे भाव....
   
               आजचा तो दिवस..ज्या दिवशी कंपनी उभारली होती. आज तीन वर्षे पूर्ण झाली होती. आणि थोड्याच कालावधीत फेमसही झाली होती. म्हणून कंपनीच्या यशस्वी हॅट्रीक बद्दल कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ***** कारमधून उतरलेला तो इसम बुटांचा खट खट आवाज करत केबिन च्या दिशेने गेला. तोच तो इसम... कंपनीचा मालक... कार्यक्रमाचा प्रमुख ... कंपनीच्या यशाचा सर्वासर्वे.....
     " मे आय कम इन सर.." दिपक केबिनचा दरवाजा उघडून आत येण्याची परवानगी मागतो. दिपक म्हणजे त्याच कंपनीत कार्यरत असलेला एक ॲसिस्टंट.
"येस कम इन..." आतून एक भारदस्त आवाज दिपक च्या कानी पडतो तसा तो आतमध्ये जाऊन ' त्या ' व्यक्ती पुढे उभा राहतो.
  "बोल दिपक...झाली तयारी? अँड  प्लीज फर्स्ट सीट हिअर.."  'ती' व्यक्ति दिपकला बोलते.
  "हो सर... तयारी झालीच आहे. आता फक्त सगळेजण तुमचीच वाट पहात आहेत."— दिपक.
   "अरे नको म्हंटल होत मी हे सगळ...उगाच मला देखावा करायला नाही आवडत. पण तुम्ही मात्र सगळे एका जिद्दीवर अडलेले...बर काही अडचण वगेरे..."—'ती'व्यक्ती.
    "नाही सर, काही अडचण नाही. आम्ही सर्वांनी खुप छान हॅन्डल केल आहे." — दिपक.
    "ओके ओके ...कामातून एक दिवस असावाच एन्जॉय करायला. मी येईलच. तू चल पुढे. "—'ती' व्यक्ती. अस म्हणताच दिपक तिथून निघून जातो.
------------------------------------------------------

            कंपनीच्या प्रशस्त अश्या सार्वजनिक हॉलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मोठमोठे उद्योगपती सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार होते. हॉल मधील आयताकार स्टेजवर एक भलेमोठे टेबल लावले होते. त्याला लागूनच चार पाच खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यातील दोन खुर्च्या व्हीआयपी होत्या.  बाजूलाच माईक उभा होता. स्टेज समोर पूर्ण हॉल मध्ये तशाच खुर्च्या एका रांगेत व्यवस्थित लावल्या होत्या. त्या खुर्च्या कंपनी मधील असिस्टंट, कर्मचारी, गार्डस, आणि बाहेरून आलेले इतर लोकांसाठी होत्या. आणि त्या खुर्च्यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या चॅनेल्स चे रिपोर्टर उभे होते.
  "लेडीज अँड जेंंन्ट्लमन..." 'गरिमा' च्या गोड आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले जाते. गरिमा ही कंपनीतीलच एक होतकरू असिस्टंट. एव्हाना सगळा हॉल गच्च भरला होता. काही उद्योगपती, जे प्रमुख पाहुणे म्हणून होते ते ही आले होते.
    "तुम्हाला कल्पना असेलच, आपण ईथे कशासाठी एकत्र आलो आहोत. आज कंपनीचा बर्थडे...म्हणजेच 'राईज विथ द सन' नामांकित कंपनी उभारण्यात आली. आणि ही कंपनी यशस्वीरित्या इथं पोहोचू शकली ती केवळ...
मिस्टर. 'नील सुभाषराव सरतापे...'  यांच्यामुळे... वेलकम सर... " गरिमाने अस म्हणताच टाळ्यांचा कडकडाट होतो.  आणि तोच इसम बुटांचा आवाज करत स्टेजवर येतो. तोच...जो कार मधून खाली उतरला....जो केबिन मध्ये दिपकशी बोलला. 'राईज विथ द सन' कंपनीचा मालक...नील सरतापे...आपला नील.....
        
         नील समोरील खुर्चीत येवून बसतो. त्याच्या नजरेत एक प्रकारची जरब दिसत होती. त्याच भारदस्त व्यक्तिमत्त्व सर्वानाच भुरळ घालत होत. सर्वांच्याच डोळ्यात त्याच्या बद्दल आदर दिसत होता.
" सर आजच्या या सुमधूर प्रसंगी तुम्ही काही बोलू शकाल." गरिमा अदबीने नीलला विचारते.
     "येस...व्हाय नॉट...अवश्य बोलेन त्याआधी मला या दोन व्हीआयपी खुर्च्या भरायच्या आहेत." अस म्हणून नील खुर्चीवरून माईक जवळ येतो.
   "कंपनीच्या यशामागे....प्रेरणेमागे ज्यांचा हात, आशीर्वाद आहे असे माझे प्रिय आई-बाबा...प्लीज कम अँड सीट ऑन धिस व्हीआयपी चेअर्स..." नील ने अस म्हणताच सुशीलाबाई आणि सुभाषराव स्टेजच्या  पाठीमागून येवून त्या व्हीआयपी खुर्चीत बसतात. आणि दोघीही कौतुकाने नीलकडे पहात असतात. आज सर्वार्थाने ते माय-बाप धन्य झाले होते. पोटच लेकरू जेव्हा यशाच शिखर गाठते तेव्हा जन्मदात्याचा आनंद
शब्दात मांडणे कठीणच.
------------------------------------------------------
               
                                            क्रमशः..........

( आतापर्यंतचे भाग जितके रटाळवाने होते तितकेच पुढील भाग इंटरेस्टिंग असतील. कथा पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनेशी, पात्राशी अथवा कोणत्याही स्थळाशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि कथेला पूर्णपणे एन्जॉय करावे. )
            


🎭 Series Post

View all