....आता त्यानेही ठरवल होत, योग्य वेळ आल्याशिवाय लग्न नाही करायच....
------------------------------------------------------
पुढे.......

का कुणास ठाऊक, पण नीलला आणि कुटुंबीयांना सुद्धा सोयराबाईच्या वागण्यात एक वेगळाच बदल जाणवत होता. आपुलकीची जागा आता मत्सराने घेतली होती. स्वताच्या भावाची मुलगी आपला मुलगा समीरला सोडून तो कवडीचा नील त्याच्या पाठीमागे लागली आहे, हेच मुख्य त्यांना रुचत नव्हत. सुशिक्षितपणातही खालच्या पातळीचे विचार आता डोक्यावर चढत होते. मुकुंदराव आणि भावना ते तर आशूचे आई वडील. त्यांच्यापासून हे कस लपून राहू शकेल. आणि त्यांच्याजवळ याची वाच्यताही सोयराबाईनीच केली होती. त्यामुळेच मुकुंदराव तातडीने आशू आणि नमू ला घेऊन जाण्यासाठी मुंबईहुन पुण्याला आले होते.
------------------------------------------------------
------------------------------------------------------
आज निकाल जाहीर होणार होता. नील आणि समीर अजूनही ऋतू, राजा आणि राधाची वाट पाहत होते. इतर वेळी गजबजलेल कॉलेजच प्रशस्त आवार सुनसानच दिसत होत. चार दोन शिक्षकांची आणि थोड्याफार विद्यार्थ्यांची रेलचेल चालू होती. सहसा रिजल्ट घ्यायला कुणी आल नव्हत. कदाचित त्यांनी तो ऑनलाईन ही बघितला असावा. पण नील आणि समीरने मात्र बघितला नव्हता कारण पास झालो, नापास झालो त्यांना काहीच फरक पडणार नव्हता. केवळ राजाची भेट होईल या हेतूनेच ते कॉलेज ला आले होते. समीर हा श्रीमंत घरातील असल्याने भविष्यात त्याची कुठेही, कशीही व्यवस्था होऊ शकत होती. आणि नीलची शेती, जमीन-जुमला ईतका होता की आयुष्यभर बसुन खाल्ल तरी त्याला सरणार नव्हत. परंतु त्यांच्या साधेपणात श्रीमंतीचा कुठे लवलेश ही नव्हता. शिवाय दोघेही वारसदार म्हणून आई वडिलांना एकुलते एक होते. त्यामुळे भविष्याची चिंता नव्हती.
---‐----------------------------------‐‐-----‐-‐------ "हॅलो मित्रांनो"....पाठमोर्या असणार्या समीर आणि नीलला राजा अचानक आवाज देतो. तस दोघेही वळून बघतात.
"अरे आलास... केव्हाची वाट पाहतोय...कसा आहेस" नील राजाची गळाभेट घेवून विचारतो.
"मी मस्त तुम्हीच सांगा....कुठपर्यंत आलय मॅटर... आशू म्हणायच की वहिनी? सांगितल नाहीस अजुन" राजा नीलला हळूच डोळा मारून बोलतो तस नील हळूच लाजून बोलतो.. "वहिनीच म्हणायच." पण समीरच लक्ष मात्र दोघांच्याही बोलण्याकडे नव्हत.
"हे भगवान.... रेहम कर...समीर माकडा..अरे लक्ष कुठे आहे तुझं?..इतक्या दिवसातून जिवासारखा जिवलग मित्र भेटलाय, आनंद नाही झाला वाटत तुला..." राजा उगाच समीरला खेचत होता.
"हो...हो..झालाय आनंद..पण ती ऋतू आणि राधा कुठे दिसत नाहीत रे..म्हणजे आल्या तर आहेत ना?.." समीर राजाला विचारतो.
"तरी मला वाटलच....कायतर गोची आहे. तरच तोंड इतक कसनुसं केलय"—राजा आणि नील दोघेही हसू लागतात. समीर मात्र दोघांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत असतो. समीरचा पडलेला चेहरा बघून दोघेही गप्प बसतात.
"त्या दोघी नाही आल्या. त्यांचा रिजल्ट त्यांनी ऑनलाईनच बघितला आहे आणि दोघीही चांगल्या मार्क्सने पास आहेत." राजा म्हणाला.
"एवढा जीव लावून अभ्यास केला म्हणल्यावर पास होणारच ना. पण आम्हालाच जीव लावायच त्यांना जमल नाही." समीर राधाला उद्देशून बोलत होता.
"अरे ती नाही तर नाही.. दुसरी कुणीतरी भेटलच की तुला जीव लावणारी.. आयुष्य अजुन खुप मोठ आहे मित्रा. सो...टेंशन नको घेऊ" नील समीरला समजावत बोलतो.
"हा हा चल समजल...पण तुझ्यावर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुला पण कळेल. मला सांग आशूला सोडून तू दुसर्या कुणाचा विचार करशील का? मग माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ ना " —समीर.
"तुला जर राग किंवा त्रास झाला असेल तर आय एम रिअली सॉरी समीर...मला तुला दुखवायचं नव्हत."—नील.
"ए.. काय हे चालू केलय हा...आपण आलोय कशासाठी आणि तुम्ही बोलताय काय...रिजल्ट बघा...रिजल्ट...समीर साहेब तुम्ही फेल आहात, आणि आम्ही पण तुमच्याच रांगेत आहोत...तर मिस्टर नील तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून, भरपूर अभ्यास करून आमच्या मैत्रीचा घात केलाय. तुमच्या यशाच गुपित कृपया आम्हाला पण सांगाल.." राजा नीलकडे वळून विचारतो.
"गप्प बस... कायतरीच काय...चला रिजल्ट बघूयात" अस म्हणून तिघेही रिजल्ट घेण्यासाठी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये निघून जातात.
-----------------------------------------------------
राजा आणि समीर दोघेही एक दोन विषयाने फेल झाले होते. होणारच...नील चांगल्या मार्कांनी नाही पण पास तर झाला होता. ऋतू, राधाही चांगल्या मार्क्सनी पास झाल्या होत्या. तिकडे आशू आणि नमूने फर्स्ट रॅन्कच लावली होती. पोरगा पास तरी झाला याचा आनंद सुभाषराव आणि सुशीलाबाईना झाला होता. पण ईकडे कुणाचातरी जळफळाट होत होता.
------------------------------------------------------
क्रमशः.........
( भेटुयात पुढील भागात पाच वर्षांच्या लीप नंतर)

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा