प्रेम म्हणजे....

Short Love Story
प्रेम म्हणजे....

मोहिनी दिसायला नावाप्रमाणेच समोरच्या वर सहज मोहिनी घालणारी. काळे कुळकुळीत लांबसडक दाट केस, काळे, पाणीदार नर्गीसी डोळे, गोरीपान, नाक धारदार सरळ, ओठ अगदीच गुलाबाच्या पाकळ्या, सुडौल बांधा, उंची पुरी, पापण्या दाट लांब, चालण्यात एक छान लकब, बोलण्यात माधुर्य, संस्कारी, चारित्र्यवान, उच्चशिक्षित, शिक्षणाची आवड असलेली, शिक्षणात हुशार, आई, बाबा, दादाची खुपच लाडकी....

दादाचा वाढदिवस उद्या वर आला त्याला गिफ्ट म्हणून काय द्यावे याच कन्फ्युजन मध्ये मॉल मध्ये गाडीवर निघाली. ढग दाटून आले होते कधीही पाऊस पडेल असे वातावरण. मोहिनीला पावसात भिजायला खूप आवडायचे. आता पार्किंग मध्ये गाडी लावून मॉल मध्ये निघाली. तेवढ्यात असा काही बरसला पाऊस बर्‍यापैकी मोहिनीला भिजवले. मोहिनी धावत मॉल मध्ये शिरणार. दारातच मल्हार त्याची शाॅपिंग आटपून पावसामुळे थांबला होता. गाडी, ड्राईव्हर नंदेशची वाट पाहत उभा होता. मल्हार ऊंच धिप्पाड, राजबिंडा, बॉडीबिल्डर, शेवींग करून गुळगुळीत चेहरा, गोरागोमटा, नाक सरळ, कुरळे केस, चष्मा पण साजेसा, ह्रदयशल्यविशारद (हार्ट सर्जन / हार्ट स्पेशालिस्ट) इतक्यात मोहिनी ओली झाल्याने तिचे पाय गुळगुळीत फरशीवरून सटकले ती मल्हारला धडकली आणि दोघे पडले लाल कार्पेट ( गालिचा) मॉलच्या दारात टाकलेल्यावर. मल्हारच्या अंगावर पडली उठण्याचा प्रयत्न करत होती. परत पडत होती. मल्हार आणि मोहिनीची नजरानजर झाली. मल्हार पहातच राहिला. "ए प्यार तेरी पेहली नजर को सलाम...." हार्ट स्पेशालिस्टचे हार्ट चोरीला गेले. काही कळेना. कसेबसे दोघे सावरत उठले. मोहिनी सॉरी म्हणाली. मल्हारला काही कळालेच नाही. मल्हार एकटक तिच्याकडे पहात राहिला.ओके म्हणून मोहिनी निघाली तिची ओढणी त्याच्या घड्याळात अडकली. ते काढण्याचा प्रयत्न करत होती. मल्हारला काही कळेचना मल्हार नुसता मोहिनी कडे पहात राहिला. आता मोहिनी निघणार तितक्यात विजांचा लखलखाट, कडकडाट झाला. अचानक लाईट गेली. मोहिनी घाबरून गेली मल्हारचा हात घट्ट धरला. थोडे लाईट लागले. मल्हार जरा भानावर आला. मोहिनी समोर उभी होती. मोहिनीने हात सोडला. ड्रायव्हर नंदेश आला. मल्हारच्या पायाजवळच्या शॉपिंग बॅग घेऊन गाडीत ठेवायला गेला. मल्हार त्याच्या अलिशान गाडीत बसायला गेला पण त्याच मन मोहिनी जवळ होत. मोहिनी निघाली तिनी भावासाठी शर्ट घेतला. अचानक कानाला हात लावला तर कानातले नव्हते. तिने शोधले मिळाले नाही. फारसे महाग नव्हते विषय सोडून दिला. कानातले मल्हारच्या शॉपिंग बॅग मध्ये पडले जे घरच्या पासून लपवून रात्रभर मल्हार मोहिनीची भेट आठवून कानातले हातात जपून ठेवत. आपला आपला हसत होता. मोहिनी त्याच्या कडे बघते असे त्याला वाटत होते.


सकाळी आई आली बेडरूम मध्ये मल्हारची कानातले लपवण्यात दमछाक झाली. आई अंथरूण, पांघरूण आवरत होती. उशी खाली लपवून ठेवले होते कानातले. आईने सांगितले आज सकाळी आपल्याला मुलगी बघायला जायचे आहे. लवकर आवरून तयार होऊन खाली ये. आई आणि मल्हारची बॉंडीग छानच होती. मल्हार आईचा अत्यंत लाडका. आईचा एक शब्द खाली पडु देत नव्हता. आईचे प्रेम इतके प्युअर असते. ज्याची तुलना होऊ शकत नाही. आईच्या प्रेमाची परतफेड होऊच शकत नाही.


मल्हार, आई, बाबा, त्याची बहिण रमा चौघे मुलगी पहायला गेले. त्यांच्या घरात सोफ्यावर बसले. मल्हार नुसता फरशी कडे शून्यात नजर लावून मनात मोहिनीचा विचार येत होता. मुलगी पाणी घेऊन आली मल्हार समोर उभी होती. आईने हात दाबला त्याला भानावर आणत. मल्हारने मुलीकडे बघितले अन् बघतच राहिला. मोहिनी समोर उभी होती. त्याला वाटले त्याला भास होतो आहे. मोहिनी साडीत सुंदर दिसत होती. मल्हारने मोहिनीने आणलेले पाणी थोडे त्याच्याच डोळ्यावर मारले. स्वतःला हळूच चिमटा काढून पाहिला. तो खरचं मोहिनी कडे तो आला होता. मोहिनी आणि मल्हारला दोघांना बाहेर एकट्यात बोलायला पाठवले. मल्हार, मोहिनी जवळच्या ज्युस सेंटर मध्ये गेले. मल्हारला काय बोलावे कळेना. मल्हार आकाशात आहे असे वाटत होते. मल्हार समोर मोहिनी बसली होती. पहात होती. हार्ट सर्जनचे हार्ट धडधड धडधड असे जोरात पळत होते. मोहिनी विचारत होती. तुम्ही निर्व्यसनी आहात का? मल्हार ने हो हे खरे सांगितले पण तिच्या डोळ्यातल्या नशेतच मल्हार झिंगला होता. काही बोलणार अचानक मोहिनीला चक्कर आली बेशुद्ध झाली. मल्हारने त्याच्या वैद्य आजोबा कडून नाडी परीक्षण शिकून घेतले होते. मल्हार पारंगत होता. त्याला जे कळले त्याने तो अस्वस्थ झाला. मोहिनीच ह्रदय फक्त 25% काम करत होते. त्याने डोळ्यावर पाणी मारून तिला शुध्दीवर आणले. घरी आले. मल्हारने क्षणाचा विलंब न करता होकार सगळ्यांसमोर सांगितला. सगळ्या मोठ्या माणसांना स्थळ पसंत होते. मोहिनीला विचारणा होताच मोहिनी लाजून तिच्या खोलीत पळून गेली. सगळे हसले. गुरूजीं आलेले होते. लगेच पत्रिका दाखवून पाहिल्या उत्तम जुळल्या. साखरपुडा 2 दिवसानंतर ठरला.

मोहिनीचा भाऊ रमाकांतला वाढदिवसाच्या दिवशी बहिणीच लग्न जमले आनंद हि होता आणि बहिण आता सोडून जाणार दुःख ही झाले. बहिण भावाचे प्रेम अस असते. प्रेम आईच असो, बहिण भावाच असो, नवरा - बायकोच असे प्रेमाच रूप कोणतेही असो. प्रेम आनंद देते. प्रेमात माणूस स्वतःच्या आधी दुसर्‍याचा विचार करतो. काळजी घेतो.

*" प्रेमाला उपमा नाही.. हे देवा घरचे देणे...."*


मल्हार क्लिनिक मध्ये गेला पण मोहिनीचा विचार अस्वस्थ करत होता. 2 दिवसानंतर साखरपुडा उत्तम झाला. मल्हारची फॅमिली त्यांच्या घरी आली. 15 दिवस घराच्या सगळ्याच्या संमतीने मोहिनी आणि मल्हार भेटत होते रोज.. मल्हार वेळ काढून भेटत होता. नवनवीन प्रेम खुलत होत. दोघे एकमेकांना वेळ देत होते. समजून घेत होते. पिक्चर, हॉटेलिंग, गार्डन, मंदिर, शॉपिंग त्याच मॉल मध्ये जिथे पहिली भेट झाली होती, समुद्राच्या बीच वर सगळीकडे निवांत वेळ घालवत होते. हा सुवर्ण काळ असतो. एकमेकांचा सहवास सुखावत असतो. लग्न झालेले नसते लग्नानंतरच्या जवाबदाऱ्या नसतात. पण साखरपुडा झाला म्हणून भेटण यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. साखरपुडा ते लग्न हा सुंदर काळ सोबत घालवून खुप मनाने जवळ आले होते. भेटीत ओढ होती. भेट झाली की सुखावत होते तासनतास कुठे जात होते कळत नव्हते दोघांना.


15 दिवसा नंतर मोहिनी ला अचानक त्रास सुरू झाला मल्हारच्या क्लिनिक मध्ये आणले तिच्या टेस्ट झाल्या. नवीन हार्ट सर्जरी करून बसवण्याचा पर्याय मल्हारने सांगितला. मोहिनीचे आई, बाबा, दादांना मोठा धक्का बसला. देवाचा धावा करत होते.


घरी मल्हारची आई या बातमीने हादरली आणि घरीच पायऱ्या वरून गडगडत खाली आली. आईला मल्हारच्या क्लिनिक मध्ये आणले. आई गेली. आईने तिच्या मृत्यू नंतर तिचे हार्ट डोनेट करायचा याआधीच निर्णय घेतला होता.


आईचे ह्रदय मोहिनीला बसवले मल्हारने यशस्वी सर्जरी केली. आई देवाघरी गेल्याचे दुःख, मोहिनी वाचली त्याचा आनंद, मल्हारच्या डोळ्यात आई सोडून गेल्याचे दुःख वाहत होते. मल्हार अश्रुत नाहून निघाला. आई शरीराने नसली तरी ह्रदयाने मल्हार जवळच राहिल हा पॉझिटिव्ह विचार केला. आईची उणीव भासत होती. आईची आठवण येत होती.



मल्हार आणि मोहिनीच लग्न झाले. आई हृदयाने जवळ होती. मोहिनी मल्हारच लग्न यथासांग पार पडले. हळद, सप्तपदी, कन्यादान, मंगलाष्टक,सगळे विधी उत्तम पार पडले. रूखवत सुंदर.. पाठवणी मोहिनीची झाली. लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभत होता. मोहिनी माप ओलांडून आली मल्हारच्या आयुष्यात. जागरण गोंधळ, कुलदैवत दर्शन, सगळे झाले. नववधू मोहिनी आणि मल्हार हनीमूनला गेले. दोघ तन, मनानी एकरूपच झाले. मोहिनी आणि मल्हार मेड फॉर इच अॉदर वाटत होते. सुखाचा संसार सुरू झाला. मल्हार आणि मोहिनीच प्रेमाच लग्नात रूपांतर झाले. प्रेम यशस्वी झाले. मल्हारचे लव्ह मॅरेज आणि मोहिनीचे अरेंज मॅरेज होते.



प्रेम अशी भावना आहे. ज्यांना मिळेल ते भाग्यवान आहे. आपल्यावर प्रेम करणारे मौल्यवान आहे. त्यांना जपा. प्रेमा शिवाय जग कोरड आहे. प्रेमाचे कोणतेही रूप असो. आईच प्रेम, वडीलांचे प्रेम, भावा - बहिणीच, नवरा - बायकोच , मित्र - मैत्रीणीच ते जपा, वाढवा. परमेश्वर सुध्दा प्रेमाचा, भावाचा भुकेला असतो. आपली काय कथा आपण तर माणसेच आहोत.



*©® सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
29.11.2021.


हि एक काल्पनिक कथा आहे. प्रेमकथा, लघुकथा आहे. आवडल्यास कृपया शेअर करा. हि विनंती. वाचकांना मनःपूर्वक विनंती आपला अभिप्राय द्या. एक कॉमेंटने उत्साह वाढतो.