Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग १०

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग १०


हे बंध रेशमाचे भाग १०

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का
प्रीत लपवूनी  लपेल का? ।।
    राधा जरा खुशीतच गाणं गुणगुणत होती...
तिला असं खुष बघून आईने विचारलंच....

राधाची आई: काय ग? आज स्वारी जरा जास्तच खुशीत दिसतीये???

राधा( जरा गडबडतच उत्तर देते):अं नाही...ते म्हणजे... आमचं अँकरिंग खूप छान झालं ना मग जोशी मॅडमनी आणि बाकी सगळ्यांनी कौतुक केल आमचं म्हणून जरा आनंद झालाय बाकी काही नाही....

राधाची आई: अरे वा छानच..... पण आता संपले ना सगळे इव्हेंट्स?? म्हणजे आता काही रोज तुला तिथे थांबावे लागणार नाही....

आई असं म्हणाली आणि राधाच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम गायब झालं...

राधा (मनातल्या मनात): अरे खरंच की, आता कशी भेट होणार आमची??? मी जरा जास्तच विचार करतेय का नीलचा?? त्याला तर माझी आठवणही नसेल. त्यालाही माझ्याबद्दल असच वाटत असेल का?? त्याच्या इतक्या साऱ्या मैत्रिणी आहेत आणि त्याही श्रीमंत घरातल्या, सुंदर....पण मग त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी दिसणारी काळजी??? हे सगळं काय आहे??? आज त्यानी प्रेरणाला छान दिसते असं म्हटल्यावर प्रेरणा लाजली... याचा अर्थ तिचं त्याच्यावर प्रेम आहे का? नील चं ही तिच्यावर प्रेम असेल का?  काहीच कळत नाहीये मला खूप गोंधळ उडालाय माझा... जर तिचं त्याच्यावर प्रेम असेल तर ...
                    ********

   इकडे नील घरी गेला तसं आरशात बघून सारखं राधाचं वाक्य आठवत होता. थोड्यावेळाने त्याने जाऊन त्याच्या माॅमला विचारलंच.

नील: मॉम, माझं नाक असं का आहे ग?

मॉम: हा काय प्रश्न आहे? आणि असं म्हणजे? चांगलं तर आहे की...

नील: नाही गं... म्हशीने पाय दिल्यासारखं असं नकटंं का आहे??

हे ऐकल्यावर आईलाही हसू आवरेना.???

आई: काहीही हं तुझं. आणि हा साक्षात्कार कसा झाला तुला? कोण म्हणालं का तुला असं??

नील: हो ते मला ही आपली..

मॉम: प्रेरणा?? तीच म्हणाली असेल... मग काय पुन्हा भांडलास का तिच्याशी?? तुमचं म्हणजे ना, तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना असं आहे‌. पण फार गोड आहे रे ती.. सारखा भांडत नको जाऊ तिच्याशी‌‌... कळलं का??

त्याची मॉम ईकडे बडबडत होती,  पण नीलचं मात्र  तिकडे लक्षच नव्हतं.  तो तर राधाच्या विचारात हरवलेला होता.

       रात्री बेडवर पडल्या पडल्या सुद्धा राधाचे फोटो बघत तिचाच विचार करत होता.  आज ती  त्याला cool आणि handsome दिसतोय असं म्हटली ते त्याला आठवलं आणि तोही चक्क लाजला....   तिचं साधं, सोज्वळ, निरागस सौंदर्य त्याला वेड लावत होतं.हसताना तिच्या गालावर पडणारी खळी, तिच्यात तो तासनतास हरवून जात होता. असं काय होतं  तिच्यात ज्यामुळे त्याच्याही नकळत तो  तिच्याकडे ओढला जात होता.त्याचं त्यालाही हे कळत नव्हतं..... नेहमीप्रमाणे त्याने तिला message  केला. इकडे ती पण त्याच्या message चीच वाट बघत होती. बराच वेळ त्यांचं chatting चालू होतं....

      cultural week संपला आणि प्रत्येक जण assignments ,submissions च्या तयारीला लागला होता, कारण University च्या final exams पण तोंडावर आल्या होत्या. त्यामुळे राधा आणि नीलची निवांत अशी भेट होतच नव्हती. पण प्रेरणा आणि नील मात्र बऱ्याचदा भेटायचे कधी नीलच्या घरी तर कधी प्रेरणा च्या घरी एकत्र अभ्यासही करायचे. अभ्यासातला कुठला टॉपिक समजला नाही,तर प्रेरणा नेहमीच  नील कडून तो  समजून घ्यायची पण आताशा त्याच्या समजवण्यापेक्षा तिचं लक्ष नील कडेच असायचं. नीलला  मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती...  तो नेहमी सारखं प्रेरणा बरोबर चेष्टा मस्करी करायचा....

     आताशा प्रेरणा ला नील बद्दल वेगळीच ओढ वाटायला लागली होती. प्रेरणा च्या आईला ही तिच्या वागण्यातला बदल जाणवत होता. एरवी function ला  ही कधी साडी न नेसणारी प्रेरणा यावेळेस cultural event ला आपण होऊन साडी नेसायला तयार झाली यामुळे तिच्या आईला जरा आश्चर्यच वाटलं होतं. नील बरोबरचं तिचं वागणं , त्याच्याशी नजर चोरत बोलणं हे तिच्या आईच्या नजरेतून काही सुटलं नव्हतं. असच एके दिवशी नील तिच्याकडे अभ्यासाला येणार होता आणि तो यायच्या काहीवेळ आधी प्रेरणा किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होती.... आईने बघितलं तशी आई तिला विचारायला आली....

प्रेरणा ची आई: काय ग काय करतेस?

प्रेरणा: गुलाबजाम

प्रेरणा चीआई: काय??? ? ? पण तुला स्वतःलाच आवडत नाहीत ना!! मग तरीही करतेस?

प्रेरणा: (मनातल्या मनात) पण माझ्या नीलला आवडतात  ना!!! त्याच्यासाठी करतेय..
आणि गालातल्या गालात हसत असते.


प्रेरणा ची आई: अगं हसतेस काय ??बोल ना?

प्रेरणा: अं? असंच वाटलं करावे.

प्रेरणा ची आई: बरं कर. पण काही मदत लागली तर सांग.

ती गुलाबजाम बनवत असते आणि तेवढ्यात नील येतो. प्रेरणा आत kitchen मध्येच असते.

प्रेरणा ची आई: काय नील बेटा, कसा आहेस???

नील: मी मस्त.... तुम्ही कशा आहात aunty??

प्रेरणा ची आई: मी पण मजेत...

असं म्हणून त्या प्रेरणा ला आवाज देतात

प्रेरणा: अरे नील, तू कधी आलास?

नील: आताच आलो....

प्रेरणा ची  आई (प्रेरणा कडे बघत): अग त्याला गुलाबजाम  देना तू बनवलेले...

नील: गुलाबजाम आणि हिने केलेत? बापरे? आज तू चक्क kitchen मध्ये काम करतेय?? सूर्य कुठे उगवला बघायला हवं!!! (मुद्दाम चिडवल्यासारखं बोलतो)

प्रेरणा: अरे खा ना .तुझ्यासाठीच तर...( बोलता बोलता ती एकदम थांबते)

नील( गुलाबजाम तोंडात टाकल्या टाकल्या):ummmm .... yummy... तुला इतके छान गुलाबजाम बनवता येतात हे ठाऊक नव्हतं मला... ? ? ? खूप भारी झालेत....

प्रेरणाला खूप आनंद होतो ती गालातल्या गालात हसत/ लाजत असते. हे तिच्या आईच्या नजरेतून  सुटत नाही...

थोडा वेळ अभ्यास करून नील निघतो...

नील: चल bye  मी निघतो... bye aunty...

प्रेरणा ची आई: bye बेटा... ये परत.

नील: हो aunty ....

प्रेरणा ची आई: मला पण दे की तू बनवलेले  गुलाबजाम...

प्रेरणा: हो आणतेच.

असं म्हणत ती आतून गुलाबजाम घेऊन येते...

प्रेरणा:  अग आई, पण तू खाल्ले का नाहीस इतक्या वेळात मी पण विसरले  तुला द्यायची...

असं म्हणत गुलाबजामची वाटी आईला देते.

प्रेरणा ची आई: हो म्हटलं special व्यक्तीसाठी बनवलेत... आधी त्या व्यक्तीला खाऊ देत....

प्रेरणा: special?? असं काही नाहीये सहज बनवले मी.. मी.. काही नीलसाठी नाही बनवले....
प्रेरणा जरा गडबडत उत्तर देते....

प्रेरणा ची आई: मी कुठे म्हटलं तू नीलसाठी बनवले???  मी तर म्हणत होते तू पप्पांसाठी बनवले असतील...

असं म्हणत तिच्याकडे बघून हसतात...??

प्रेरणा: हो हो म्हणजे ते मी.... तू खाल्ले नाही अजून??  खा ना??
तशी प्रेरणा जीभ चावते....?

प्रेरणा ची आई( गुलाबजाम खाऊन झाल्यावर): व्वा!!!  मस्त ... गुलाबजाम तर छानच आहेत... अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळताएत... पण नक्की पप्पांसाठीच बनवलेस ना कि  नील साठी ??? 

असं म्हटल्यावर प्रेरणा एकदम चमकून आईकडे बघते.

   प्रेरणा: म्हणजे?

प्रेरणा ची आई: म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि तुझं अन् नीलचं लग्न सावधान!!!! काय बरोबर ना?

असं म्हणल्यावर प्रेरणा लाजून आईच्या कुशीत शिरते... ?

प्रेरणा: आई, तू पण ना!!!( प्रेरणा लाजत होती.)

प्रेरणा ची आई: आवडतो ना तुला नील?? चांगली आहे choice..... खूपच गुणी मुलगा आहे...

प्रेरणा: पण आई, मला माहित नाही गं त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे की नाही?? त्याचं दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर??

प्रेरणा ची आई: ए वेडाबाई, अगं असं काय बोलतेस?? आणि तू त्याची best friend आहेस ना???

प्रेरणा मानेनेच हो म्हणते ...

प्रेरणा ची आई : मग अशी कोणी त्याला आवडत असती तर त्याने  तुला सांगितलंच असतं ना?  त्यादिवशी पण competition वरून आल्यानंतर तो तुला  समजावत होता तेव्हा गॅलरीतून बघितलं मी.... तो काय बोलत होता ते मला कळलं नाही.... पण तुझ्या रडणाऱ्या चेहऱ्यावर क्षणात हसू  फुललं त्याच्या बोलण्याने हे मात्र नक्की कळलं.... मला तर वाटतं की त्याचंही तुझ्यावर प्रेम असेल....

प्रेरणा: खरचं आई?? I love u आई...

प्रेरणा ची आई: हम्म...त्याला म्हण आता हे लवकरात लवकर...

असं  म्हणल्यावर प्रेरणा गोड लाजते...

प्रेरणा ची आई: मग कधी सांगणार आहेस त्याला?

प्रेरणा: आता final exams आहेत. त्या झाल्यावर  सांगीन....
   
   
    क्रमशः

©® केतकी ❤️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now