Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ९

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ९


हे बंध रेशमाचे भाग ९

     घरी गेल्यावरही संध्याकाळी नीलच्या birthday च celebration झालं. पण त्या सगळ्या celebration पेक्षाही राधा भेटल्याचा आणि त्यातूनही तिने इतका सुंदर cake त्याच्यासाठी बनवून आणल्याचा त्याला जास्त आनंद होत होता. या सगळ्या विचारातच त्याला झोप लागली.

                    *********        
      दुसऱ्या दिवशी सकाळी cultural commitee च्या meeting  मध्ये 25  जानेवारी पासून सुरू होणाऱ्या  cultural week  बद्दल discussion होणार होतं.  त्यात कोणत्या competitions असतील कोणते days असतील, कोण कोण काय काय जबाबदारी घेईल याबद्दल discussion होणार होतं. नीलने आणि जोशी madam ने सगळ्या गोष्टी discuss करायला सुरुवात केली आणि थोड्याफार चर्चा, suggestions नंतर सगळ्या गोष्टी  ठरल्यावर जोशी मॅडम निघून गेल्या आणि नीलने बोलायला सुरुवात केली....

  नील: so guys , आता पुन्हा आपल्याला या सगळ्या competition च्या तयारीसाठी 2 तास इथेच भेटावं लागेल. हे बोलताना त्याने हेतूपूर्वक  राधाकडे बघितलं तशी तीही त्याच्याकडे बघुन गोड हसली. राधा आणि प्रेरणा prize Distribution च्या anchoring ची जबाबदारी घेतील. So friends, यावर्षी group day, chocolate day, mismatch day traditional and rose day असे 5 days celebrate होतील. कोणाला कोणत्या  competition conduct करायच्या आहेत हे आपण उद्या ठरवूयात. त्यांनी त्या competition  ची पूर्ण responsibility घ्यायची. ठीक आहे तर मग... आता उद्यापासून आपण रोज दुपारी इथे भेटणार आहोत.

    राधाला खूप आनंद झाला होता. prize distribution च anchoring करायला मिळणार म्हणून. पण त्याचबरोबर tension ही आलं होतं anchoring चं.... तिच्या चेहऱ्यावरच tension बघून  नील तिच्याशी बोलायला आला. 

नील: काय ग? काय झालं??

राधा: नील, अरे ऐक ना...

नील: ऐकव ...काय ऐकवतेस? असं म्हणून हसायला लागला. ?

राधा: हसू नको रे. मला जरा भीती वाटतेय... नाही म्हणजे मी Anchoring केलयं या आधी पण हा program खूप महत्त्वाचा आहे कॉलेज साठी. आणि यात काही चूक व्हायला नको माझ्याकडून. so जरा tension आलयं.. जमेल ना मला??

नील: अगं Don\"t worry.  आपण व्यवस्थित Script ready करू.  तू  काही काळजी करू नकोस.  मला खात्री आहे, तू आणि प्रेरणा अगदी व्यवस्थित anchoring कराल.आणि काही लागलच तर बंदा आपकी खिदमत मे हाजिर है... राणी एलिझाबेथ ??

राधा (त्याला हलकेच चापटी मारत):  तू पण ना कसला नौटंकी आहेस रे....

नील: आणि तू वेडूच आहेस... उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचं tension घेतेस.... असं म्हणत हलकेच तिच्या डोक्यात मारतो...
राधाला त्याचं असं वेडू म्हणणं फार आवडायचं.

चंद्रशेखर गोखले यांनी म्हणलंच आहे  ना...

कुणीतरी लागतं
आपल्याला वेडू म्हणणारं,
अन् वेडू म्हणताना
आपल्यातलं शहाणपण जाणणारं।।

                   *******
  राधा तर खूपच जास्त excited  होती. कारण गेल्या वर्षी तिची आज्जी आजारी असल्यामुळे तिला कोणतेच cutural events/days enjoy  करता आले नव्हते. अखेर सगळ्यांचीच उत्सुकता संपली आणिdays सुरू झाले. days सुरू झाले तसं नील cultural secretary असल्यामुळे बराच busy होता, आणि प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या  competition ची जबाबदारी होतीच. आज cultural week चा शेवटचा दिवस असल्याने prize distribution होतं आणि त्याचबरोबर rose Day आणि traditional day पण होता. Prize distribution चं anchoring राधा आणि प्रेरणा करणार होत्या. संध्याकाळी 6 वाजता Prize Distribution होतं. राधा छान तयार होऊन college ला आली. college च्या hall मध्ये आल्यावर तिची नजर नील लाच शोधत होती... तो तिला दिसला पण,  program च्या सगळ्या arrangements व्यवस्थित झाल्या आहेत का हे बघण्यात तो busy होता. काहीतरी निमित्त काढून ती त्याच्याशी बोलायला गेली. तीने त्याला आवाज दिला. त्याने मागे वळून पाहिलं आणि तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला...


    आज  traditional day असल्यामुळे राधाने तिच्या आजीची छानशी जरी काठाची नऊवारी नेसली होती. कपाळावर चंद्रकोर, गळ्यात फक्त एकच चिंचपेटी, केसांचा छानसा खोपा, त्यावर अंबाड्याला लावतात तसं फुल, हातात  काचेच्या बांगड्या, नाकात नथ, कानात मोत्याच्या कुड्या आणि ह्या सगळ्या साज शृंगाराला जणू चार चांद लावणारा ओठा  जवळ असलेला  beauty spot (तीळ)... एरवी काहीही साजशृंगार नसतानासुद्धा ती खुप सूंदर दिसायची आणि आज तर जणू काही पेशवेकालीन एखाद्या घरंदाज स्त्री सारखी दिसत होती. आणि ह्या सौंदर्यात तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि सोज्वळता अजुनच भर घालत होती.... नील तर भान हरपून तीच्याकडे बघतच राहिला. तो असं एकटक बघतोय म्हणून राधालाही लाजल्यासारखं  झालं. शेवटी तिने त्याच्या समोर चुटकी वाजवून त्याला भानावर आणलं.

राधा: hello ??? अरे कुठे हरवलास?

नील: तुझ्या डोळ्यांत (हळूच तो पुटपुटला.. पण तरीही राधाने ते ऐकलंच)

राधा: अं?  काही म्हणालास का?

नील: काही नाही तू बोल ना!!

खरंतर नील तिला काही  compliment देईल असं तिला वाटलं, पण तो तर तिचं सौंदर्य न्याहाळण्यातच इतका हरवला होता की, काही बोलावं हे पण त्याला सुचलं नाही.. नील सुद्धा खूप handsome दिसत होता. म्हणजे मुळातच  handsome असलेल्या नील ने black कुर्ता आणि off white पजामा घातला होता. त्याच्या गोऱ्या रंगावर काळा रंग तर कमालीचा खुलून दिसत होता. त्यामुळे राधालाही काही क्षण ती काय बोलायला आली होती याचाही विसर पडला. तेवढ्यात प्रेरणा तिकडे आली.

प्रेरणा (राधा कडे बघत): अग ए, तू इथे आहेस? आणि मी तुला तिकडे शोधतेय. चल ना एकदा परत practice करूयात anchoring ची program सुरू व्हायच्या आधी.
असं म्हणत ती राधाला ओढतच घेऊन गेली.
    program खूप छान पार पडला. दोघींचं anchoring तर कमाल झालं. सगळे त्यांचं कौतुक करत होते. भरपूर photo session झालं. सगळेच एकमेकांना छान दिसतेस/दिसतोयस  म्हणून compliments देत होते. राधाचही सगळे जण कौतुक करत होते. पण ज्याच्या compliment साठी ती वाट बघत होती तो मात्र अजूनही busy च होता.
     photo session संपलं. नील ने  राधा, प्रेरणाचे खूप photos काढले त्यांचे group photos पण काढले. तिघेही घरी जायला निघाले. चालता-चालता प्रेरणा फोटो बघत होती. आणि म्हणाली.

प्रेरणा: राधा, यार कसली gorgeous दिसतेस तू traditional look मध्ये. खरं तर आधीच सांगायचं होतं पण busy होतो so सांगायचं पण सुचलं नाही.

तिने असं म्हटल्यावर राधाने हळूच नील कडे बघितलं...तो ही चोरून तिच्याकडेच बघत होता..

राधा: thanks u so much... तू पण खूप गोड  दिसतेस ह्या गुजराती style साडीत.

नील: छान कसली? बुजगावणं दिसतीये! (मुद्दाम प्रेरणाला चिडवायला तो म्हणाला) शेतात उभी राहिलीस ना  तर पक्षी नक्कीच घाबरून उडून जातील. असं म्हणून तो जोरात हसायला लागला.??

प्रेरणा: तू गप रे! समजतोस कोण रे तू स्वतःला??

नील:  cultural secretary..
असं म्हणून जोरजोरात हसायला लागला...?

प्रेरणा: हो ना?  मग कामं कर जरा... तसंही तुला कोणी विचारलं पण नाहीये. कळलं ना? ?

असं म्हणून ती रागारागात college च्या parking  पर्यंत गेली.

राधा: काय रे असं छळतोस तिला?? mood off केलास ना तिचा?

नील: असंच मज्जा येते...

राधा: जा आता  mood ठिक कर तिचा.

नील: जो आज्ञा राणी सरकार...sorry  राणी एलिझाबेथ( असं म्हणून मुजरा केल्याची acting करत तो गेला.)

राधा: वेडूच आहे हा...( मनातल्या मनात ती म्हणाली.)
खरंतर वेडू म्हणायची सवय नील ची होती. पण आता राधाला ही त्याची सवय लागली होती.

नील ने  कशी बशी प्रेरणाची  समजूत  काढली.
राधाही त्याच्या मागोमाग तिथे पोहोचली.

नील: ए चिडका बिब्बा... राग तर अगदी नाकावर असतो तुझ्या!!

प्रेरणा: मग? कसं बोललास तू मला? आणि नाकाचं म्हणशील तर माझं नाक ते कसं आहे गं राधा?? तू म्हणतेस ना?

तशी राधा हसते आणि म्हणते...

राधा: अगं ज्छान चाफेकळी सारखं आहे तुझं नाक....

प्रेरणा: बघ, चाफेकळी सारखं आहे माझं नाक... तुझ्या नाका सारखं नाहीये.

नील: काय झालं माझ्या नाकाला?
असं म्हणत स्वत:च्या नाकाला हात लावत तो विचारतो...

प्रेरणा: मग काय? तुझं नाक ते राधा म्हणते तसं आहे.. काय म्हणतेस ग राधा तू??

नील: काय म्हणते ही माझ्या बद्दल?? ??

तशी राधा तोंड लपवत.. ??(मनातल्या मनात)अरे यार, काय मुलगी आहे ही!!! कुठे काय बोलावं ना.ohh god.. वाचव मला...

नील : राधा कडे बघत.. काय ग काय म्हणतेस तू माझ्या नाकाला??
थोड्याशा रागातच तो विचारतो...

राधा: अरे काही नाही... ते ती उगाच...

नील पासून नजर चुकवत इकडे तिकडे बघत ती म्हणते...

प्रेरणा: हां आठवलं... तुझं नाक असं नकटंं आहे ना...तर राधा म्हणते म्हशीने पाय दिल्या मुळे ते असं नकटं झालयं... हो ना ग राधा? असंच म्हणालीस ना तू त्या दिवशी?

राधाला अजूनच कसंनुसं झालं.

नील: काय?????

राधा: अरे नाही म्हणजे ते  असं नव्हतं म्हणायचं मला.. ते मी सहजच.( प्रेरणा कडे बघत तुला बघतेच. अशी मारायची ?action करत ती बोलत होती.)

नीलला खरंतर ऐकून हसू आवरत नव्हतं. पण उगाच चिडल्याचं नाटक करत तो राधाला म्हणाला,  ठीक आहे तुला बघतो मी राधा नंतर..

नील( प्रेरणा कडे बघत): ए वेडाबाई...  अगं चिडतेस काय ? मी गंमत केली तुझी.. तू छानच आहेस.. आणि आज तर खूपच छान दिसत होतीस.

प्रेरणा: हे ऐकताच तिची कळी खुलली... really?? thank u so much dear..
नीलने compliment दिल्यावर ती जराशी लाजली. कारण त्याच्यासाठीच तर ती आज नटून आली होती.
तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं...

प्रेरणा: एऽऽ, मी माझी purse hall मध्येच विसरले थांबा मी आलेच घेऊन पटकन. असं म्हणून प्रेरणा तिथून निघाली.

आता राधा आणि नील दोघेच तिथे होते.

राधा: चल मी पण निघते.
म्हणत राधाही निघायला लागली....

नील: थांब. (तिच्याजवळ जात)  so miss राधा काय म्हणत होतीस तू? माझं नाक काय?

राधा: नाही ते मी..  sorry

तिला वाटलं ह्याला राग आलाय म्हणून ती अगदी काकुळतीला येऊन sorry म्हणत होती.

नील: चूक झाली आहे तर शिक्षा पण भोगायला लागणारच...

राधा: शिक्षा? ?

नील: हो मग! हात पुढे कर...

राधा:( मनातल्या मनात): आता काय हा छड्या मारणार की काय? राधा मॅडम, छड्या खायला तयार राहा....

ती हात पुढे करते आणि डोळे मिटून घेते....

नील ला तिच्याकडे बघून जरा हसू येतं... तो कारमधून एक फुलांची पुडी काढून तिच्या हातात ठेवतो....

तशी ती डोळे उघडते आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघते....?
नील: बघ ना उघडून....

ती उघडून पाहते आणि एकदम खुश होते..

राधा: woow  चाफा? मला खुप आवडतात ही फुलं...
ती चाफ्याचा वास घेत असतांना
नील तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो...

नील:  Happy Rose day राधा.
गुलाबासारख्या सदा टवटवीत असणाऱ्या माझ्या या सुंदर मैत्रिणी साठी ह्या  फुलांपेक्षा दुसरी छान भेट कुठली असू शकते का??

असं म्हटल्यावर ती खूप गोड लाजते. तो एकटक तिच्याचकडे बघत होता. त्याच्या बघण्याने ती लाजून मान वरही न करता  thanks म्हणाली आणि जायला लागली.  ती निघणार तेवढ्यात नीलने तिचा हात धरला.

पुन्हा एकदा त्याचा स्पर्श... आणि ती मोहरून गेली.

नील: राधा, anchoring खरचं खूप छान झालं. तू बोलत असतांना तर ऐकतच राहावं असं वाटत होतं. आणि...

राधा: आणि काय?

नील: तू खरच खूपच सुंदर दिसतेयस... माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत....

राधा: thank u so much नील.
ती अजूनही नजर वर न  करताच त्याच्याशी बोलत असते....

नील: अरे very bad... जेव्हा कोणी आपल्याला compliment देतो तेव्हा समोरच्यालाही compliment ची अपेक्षा असते. मी कसा दिसत होतो ते तू सांगितलंच नाहीस.

राधा काहीच बोलत नाही हे बघून तिच्या हातातून हात काढून घेत  तो रुसून पुढे जायला लागतो....
पण ती त्याचा हात अजूनच घट्ट धरते... त्याच्याजवळ जात त्याच्या कानात म्हणते..

राधा:तू तर  नेहमीसारखाच दिसत होतास cool and handsome...
असं म्हणल्यावर नील पटकन तिच्याकडे बघतो आणि दोघांची नजरानजर होते....

तेवढ्यात राधाला समोरून प्रेरणा येताना दिसते, आणि ती झटकन त्याच्या हातातून हात काढून घेते.

नील (प्रेरणा कडे बघत): चला निघुयात?  मिळाली पर्स?

प्रेरणा: हो. राधा चल तू पण.हा करेल ना तुला  drop ....

राधा:  हो.

आज मात्र ती मागच्या seat वर बसते. नील रेडिओ लावतो. रेडीओवर गाणं सुरू होतं.

तेरा मुझसे है पहले का नाता कोई
युही नही दिल लुभाता कोई
जाने तू, या जाने ना 

तो mirror मधून राधाकडे बघत होता. राधा मात्र  नीलने  दिलेल्या चाफ्याच्या फुलातच  हरवली होती तर प्रेरणाला वाटत होतं हे गाणं जणू काही आपल्यासाठीच लावलयं.

      घरी गेल्यावरही राधा  नीलचाच विचार करत होती. त्याचं तिच्याकडे असं रोखून बघणं, हात धरणं, त्या स्पर्शाने शहारणं, त्याच्या डोळ्यात हरवणं हे सगळं आठवून ती आरशात बघत एकटीच हसत/लाजत होती. तेवढ्यात आई तिला आवाज देत तिच्या खोलीत आली. खोलीत आल्या आल्या आईला चाफ्याचा सुंदर वास आला. आईने तिला विचारले.
आई: अगं चाफ्याचा वास कुठून येतोय???
ती काहीतरी थाप मारणार तेवढ्यात आईला तिच्या पर्समध्ये चाफ्याची फुलं दिसली.

आई: अग राधे, ही चाफ्याची फुलं कुठून आणलीस?

राधा ( मनातल्या मनात):  ohh shit.. आता काय सांगू?
मग काहीतरी आठवल्यासारखं करत ती म्हणते..

अगं ते actually function च्या इथे सरस्वती पूजन साठी आणलेली पण चुकून माझ्या पर्समध्येच राहिली.
thank god सुचलं काहीतरी असं हळूच पुटपुटली.

आई: काय सुचलं??

राधा: काही नाही कुठे काय.. पण तुला अगदी लगेच वास आला चाफ्याचा!

आई: मग त्याचा सुगंध असतोच तसा... लपवून थोडी लपणारे? बर चल आता लवकर change करुन खायला ये.

राधा: हो आलेच...

असं म्हणून आरशात बघून ती गाणं गुणगुणायला लागली....

लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवूनी लपेल का?

क्रमशः

©® केतकी ❤️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now