Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ८

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ८


    हे बंध रेशमाचे भाग ८

    राधा घरी आली...  Competition जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तिला 3rd prize  मिळालं यापेक्षाही नीलला 1st prize मिळाल्याचा आनंदच तिला जास्त होता. आई-बाबांना trophy दाखवून आणि मिळालेले पैसे देवापुढे ठेवून ती खोलीत झोपायला गेली. photos बघता-बघता तीही नीलचाच  विचार करत होती. पायर्‍या चढताना नीलने अचानक तिला हाताला धरून जवळ ओढलेलं  तिला आठवलं आणि तिच्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला. पण लगेच तिला आज प्रेरणा अशी अचानक का चिडली असेल असा विचारही मनात आला .. आज तिच्या नजरेत मला जे जाणवलं ते नील साठीचं प्रेम होतं का? पण मग मला जे नील बद्दल वाटतंय ते काय आहे? मला नीलचा सहवास का हवाहवासा वाटतोय? का त्याच्याबद्दल ओढ वाटतेय? का त्याला भेटावं, त्याच्याशी बोलावं वाटतयं? त्यालाही माझ्याबद्दल असंच वाटत असेल का??  ह्या सगळ्या विचारातच तिला झोप लागली...
        दुसऱ्या दिवशी College मध्ये cake cut करून celebration केलं. कालच्या प्रेरणा च्या वागण्यामुळे राधा जास्त कुणाशीच बोलत  नव्हती...
पण तिच्या वागण्यामुळे प्रेरणा दुखावली गेली आहे, म्हणून ती प्रेरणाची माफी मागायला गेली.

राधा: प्रेरणा, i m really sorry for yesterday.... माझं चुकलंच...
please मला माफ करशील ना???

राधा डोळ्यात पाणी आणून तिला विचारते.?

प्रेरणा: राधा, अगं वेडी आहेस का तू?? खरंतर मी तुला सॉरी म्हणायला हवं... मला कळलंच नाही ग मी का अशी चिडले ते.... ते मी तुला माझ्या जागेवर बसलेलं बघितलं आणि ... really sorry

राधाच्या डोळ्यातलं पाणी बघून
प्रेरणाच्याही डोळ्यात पाणी येतं.??

राधा: ए वेडाबाई ... अगं रडतेस काय ??? आणि एक सांगू तुला??? नीलच्या मनातली तुझी जी जागा आहे ना, ती कधीच कुणीच घेऊ शकत नाही... अशा कोणाच्याही येण्याने तुमच्या मैत्रीत कधीच काहीच फरक पडणार नाही...
    असं म्हणल्यावर प्रेरणाने तिला एकदम मिठीच मारली...

राधा: बास आता रडू नकोस ...
असं म्हणत राधा  प्रेरणाचे डोळे पुसते...

प्रेरणा: राधा ,खरंतर चूक माझी होती पण तू कोणताही ego न ठेवता आपण होऊन sorry म्हणालीस.... कसं जमतं गं तुला  इतकं समजूतदारपणे वागणं??

राधा: प्रेरणा, जाऊ देत ना आता ते सगळं....कसं असतं ना, आपण आपल्या नात्यापेक्षा ego मोठा करतो. मीच आधी का बोलायचं हा प्रश्न मनात आला की नातं तुटायला सुरुवात होते. आणि मला आपल्यातली मैत्री कधीही तुटू द्यायची नाहीये... कळलं?? हस बघू आता...

असं म्हणल्यावर, एखाद्या लहान मुलीसारखी प्रेरणा खुद्कन हसते.?नील तिथेच उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याला राधाचं खूप कौतुक वाटलं. दोघांची नजरानजर होताच नीलने  नजरेनेच तिला thanks म्हणलं. ??काहीही न बोलता बरंच काही बोलून गेली त्याची नजर....

दोघींनीही एकमेकींना  cake भरवला आणि मोठ्या मनाने  माफही केलं...Celebration तर जोरदार झालं होतं. थोड्यावेळ गप्पा मारून राधा तिथून निघाली...

    घरी गेल्यावर मात्र तिला करमत नव्हतं. 

राधा( मनातल्या मनात): महिनाभर रोज college, practical आणि मग practice अस एकदम busy schedule होतं. आजपासून practice नाही तर relax वाटायला हवं...पण उलट खूपच चुकल्या चुकल्या सारखं वाटतयं.  मनातून निराश वाटतय? पण practice नाही म्हणून? की नील भेटणार नाही म्हणून?
    इकडे नीलही  बऱ्याच दिवसांनी लवकर घरी गेला होता... गेल्या काही दिवसातल्या अनेक गोष्टी त्याला आठवत होत्या. accident मुळे झालेली राधा ची पहिली भेट, competition च्या निमित्ताने झालेली त्यांची मैत्री, राधाचा हसरा चेहरा, तिच्या गालावरच्या खळ्या आठवताच त्याच्या चेहऱ्यावर एक छानशी smile आली. पण लगेचच त्याला वाईटही वाटलं कारण आता राधा रोज भेटणार नव्हती.
   दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हतं... सवय झाली होती, की प्रेम होतं हे मात्र कळत नव्हतं ...जवळपास रोजच त्यांचं messages वर  बोलणं व्हायचं. रोजची सकाळ नीलच्या good morning message ने आणि रात्र राधाच्या good night message शिवाय होत नव्हती...
   असेच काही दिवस गेले.. अधून मधून कॉलेजमध्ये त्यांची भेट व्हायची. Christmas असल्यामुळे राधाचे दादा वहिनी सुद्धा आले होते. त्यामुळे तिचा बराचसा वेळ त्यांच्याबरोबर फिरण्यात जात होता. एके दिवशी असाच तिला प्रेरणा चा फोन आला. आणि तिच्याशी बोलल्यानंतर राधाला खूपच आनंद झाला. कारण पुढच्याच आठवड्यात 2nd Jan ला नील चा वाढदिवस होता. आणि वाढदिवसाचाच plan ठरवण्यासाठी प्रेरणाने तिला फोन केला होता. राधा तर खूपच excited होती. नवीन वर्षापेक्षा नीलच्या वाढदिवसाचा उत्साह जरा जास्तच होता.
               
                   ********
  नीलच्या  birthday चा दिवस उजाडला. त्यांची practice असायची त्याच hall मध्ये सगळे नीलची वाट बघत होते. नील येताच त्यांच्या group  मधल्या आदित्यने guitar वर happy birthday to u वाजवून त्याला birthday wish केलं. एकेक करून सगळेजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते.

राधा:  Happy birthday नील...

तिने असं म्हणल्यावर नील ने तिच्याकडे बघितलं... दोघांची नजरा नजर होताच दोघेही पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवले....

तेवढ्यात प्रेरणा म्हणाली..

प्रेरणा: चला, आता  cake cut  करुयात...

सगळे: हो हो...चल नील, cake cut  कर...


असं म्हणल्यावर नीलने तिथे ठेवलेला केकचा बॉक्स उघडला आणि तो केक कडे बघतच राहिला.खूप सुंदर music theme based cake? होता तो.

harmonium  सारख्या काळ्या पांढऱ्या पट्टयांचं आणि गाण्याच्या notation चं design असलेला , cream चा Mike असलेला खूपच सुंदर cake होता तो.

नील:  woow कसला मस्त आहे हा cake... एवढा सुंदर आहे की त्याच्याकडे बघतच रहावसं वाटतंय...cut करून खावासा वाटतच नाहीये...

प्रेरणा: ठीक आहे ..तू नको खाऊस आम्ही खातो....

असं म्हणल्यावर सगळे हसायला लागतात.??

नील  cake cut करतो. आधी प्रेरणा त्याला केक  भरवते. मग बाकीचेही सगळे त्याला केक भरवतात ... नील राधाला डोळ्यानेच त्याला केक भरवण्यासाठी खुणावतो... तशी राधा  कोणाचं लक्ष नाहीये हे बघून केकचा एक छोटासा तुकडा त्याला भरवते. नीलही मग तिला केक भरवतो. केक खाल्ल्या बरोबर नील म्हणतो.

नील: प्रेरणा, कसला मस्त केक आहे... कुठून आणलास???

प्रेरणा: राधा केक शॉप मधून....

नील: नवीन आहे का?? कुठे आहे?? पहिल्यांदाच ऐकतोय नाव!!!

असं म्हणल्यावर ती आणि राधा जोरात हसायला लागतात. ??

प्रेरणा: तुला खरच कळलं नाही??? अरे वेडू, राधाने बनवलाय तुझ्यासाठी खास.‌..

हे ऐकल्यावर तर नील आश्चर्याने राधाकडे बघायलाच लागला....दरवर्षी त्याचा वाढदिवस college मध्ये नेहमीच त्याचे फ्रेंड्स celebrate करायचे. पण आज खास त्याच्यासाठी म्हणून राधाने cake बनवून आणला होता हे ऐकून तर त्याला खूपच special feel झालं. 

नील: काय??? ?? खरंच???

राधा: हो.. actually वहिनीने बरीच help केली.. आणि main म्हणजे music theme घेऊन cake करायचा ही idea प्रेरणा ची होती... so बरचसं credit तिला पण आहे...

नील: thanks राधा.... खरंच खूप छान आहे cake....

तेवढ्यात सगळे नील कडे बघून party party  असं ओरडायला लागतात..

नील: हो हो... party तर करुच आपण. पण त्याआधी सगळ्यांना खूप खूप  thanks... खरं तर दरवर्षी माझा birthday छानच celebrate होतो. यावर्षी तो अजून जास्त special झाला ते या special cake मुळे....

असं म्हणताना तो मुद्दाम राधाकडे बघतो.

त्यासाठी खरंच पुन्हा एकदा thank u so much.... आणि हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली.

    २५ जानेवारी पासून college चा  cultural week सुरू होणार आहे. त्यात कोणत्या competitions असतील कोणते days असतील, कोण कोण काय काय जबाबदारी घेईल याबद्दल discussion करण्यासाठी उद्या जोशी मॅडमनी(cultural head) meeting ठेवलेली आहे सकाळी ११ वा. तेव्हा सगळ्यांनी न विसरता यायचयं. तसा मी group वर message करतोच.

  नील चं  बोलून झाल्यावर सगळे त्याला बाय करून निघतात. तशी राधा त्याच्याशी बोलायला जाते.

राधा: नील, माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटसं
gift .... असं म्हणून राधाने त्याला, एक छानसं greeting आणि एक  perfume दिला.

नील: अगं पण ह्याची काय गरज  होती??
आधीच एवढा छान केक बनवून आणलास तू माझ्यासाठी... अजून वेगळं गिफ्ट द्यायची काय
गरज आहे???

राधा: मी मनापासून आणलंय तुझ्यासाठी.... आणि तसही फार काही मोठं नाहीये. please घे  ना....

नील:  thank u so much... आणि छोटं असो वा मोठं ते तू आणलयसं त्यामुळे ते खूप  special आहे माझ्यासाठी... आणि संध्याकाळी घरी छोटीशी पार्टी आहे,  जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी. नक्की ये...

राधा: अरे खरंच सॉरी, पण दादा वहिनी आले आहेत, ते संध्याकाळी जाणार आहेत ना मग नाही जमणार...

नील (थोडासा नाराजीनेच): ठीक आहे... पण तू आलीस तर मला खूप आनंद होईल... बघ जमलं तर... पण उद्या ११ वा. ये नक्की... विसरु नकोस.. बाय..
नीलला  बाय म्हणून ती घरी येते...

    खरं तर ती त्याच्या वाढदिवसासाठी घरी येणार नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं, पण तिने खास त्याच्यासाठी इतका सुंदर केक बनवून आणला म्हणून तो खूप खुश असतो...

क्रमशः 

©® केतकी 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now