Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ३

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ३






हे बंध रेशमाचे भाग 3

     घरी पोहोचताच  तिने आनंदाने आईला मिठीच मारली.
राधाची आई:  काय??? झालं ना selection?

राधा: हो ऽऽऽ मी खूप खुश आहे...

राधाची आई: अग तुझ्या चेहऱ्यावरच दिसतय ते...

राधा: मला खरंच खूप आनंद झालाय... कॉलेजने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मला सार्थ करायचा आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे माझी आमच्या कल्चरल सेक्रेटरीशी ओळख झाली... आणि u know आई .. world is so small...तो दुसरा-तिसरा कोणी नको नसून तोच आहे....  त्या दिवशी मला ज्याची माफी मागायची होती ना? तोच..बाप्पाने खरचं माझा ऐकलं  आणि आमची पुन्हा भेट झाली... आणि हो ...अगं त्याने मला लगेच माफ पण केलं...

राधाची आई: अरे वा !! बरंच झालं की मग.... नाव काय गं त्याचं???

राधा: नील.... नील शहा. MBA  first year ला आहे.

राधाची आई: चला म्हणजे तुझा कृष्ण तुला भेटला तर??

राधा: काय गं आई....तुझं पुन्हा सुरू झालं.... ??

राधाची आई: अगं..गंमत करतीये....

आईने गंमतच केली होती पण का कुणास ठाऊक राधाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू पसरलं...???

             *********
       रात्री बेडवर पडल्या पडल्याही ती आजच्या ऑडिशनचाच विचार करत होती.... तेवढ्यात फोनवर नोटिफिकेशन आलं म्हणून तिने फोन बघितला.... प्रेरणा ने तिला कल्चरल कट्टा या ग्रुप मध्ये ऍड केलं होतं... परवापासून रोज 3-5 practice आहे असा मेसेजही केला होता... woow I m so excited!!! ??
परवा पासून प्रॅक्टिस सुरू होणार!!!   असं मनातल्या मनात विचार करतच तिला झोप लागली....
    इकडे नीलही  दिवसभरातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होता... कसली निरागस आहे ही राधा.... ती राधा आणि मी तिचा कृष्ण.... एकदम असा विचार त्याच्या मनात आला आणि एक क्युट स्माईल त्याच्या चेहऱ्यावर झळकली....
हे  काय विचार करतोय मी ??? आत्ता तर कुठे आमची भेट झाली आहे‌... असं म्हणत त्याने तो विचार झटकला  आणि निद्रादेवीच्या अधीन झाला....

              ********
    राधा: आईऽऽ, आजपासून आमची रोज ३-५  प्रॅक्टिस आहे बर का!!! त्यामुळे मला घरी यायला रोज ५:३०  वाजतील....
असं म्हणून राधा घरातून बाहेर पडली.
दिवसभर lecture आणि practical झाल्यावर ती 3 वाजता हॉलमध्ये पोहोचली...
       राधा ,प्रेरणा आणि नील यांचे तर on stage performances असल्या मुळे backstage मदतीसाठी अक्षय, पूर्वा,आदित्य, सई अशी ७/८ जणांची team ठरली... प्रॅक्टिस सुरू व्हायच्या आधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत असं म्हणून नील बोलायला लागला....

नील:  तर friends, आजपासून रोज आपली 3-5 practice असेल. सगळ्यांनी प्लीज वेळेवर येत चला. जेमतेम एक महिना आहे आपल्या हातात.त्यात प्रत्येक शनिवारी मी नसणार आहे , त्यामुळे तुमची तुम्हालाच प्रॅक्टिस करायची आहे... जर कोणाला जमणार नसेल, उशीर होणार असेल तर तसं प्लीज कळवत चला... आणि रोज ३-५  मधे seriously practice होईल timepass चालणार नाही.... i hope everything is clear now??? चला आता गाणी फायनल करूया....

    थोड्याफार चर्चेनंतर गाणीही फायनल झाली. राधा आणि प्रेरणा चं duet होतं ( कजरा मोहब्बत वाला...) आणि नीलचं  solo गाणं होतं ... पापा कहते है बडा नाम करेगा | आणि याप्रमाणे रोज त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली...
    
     एव्हाना प्रेरणा आणि राधाची खूप छान मैत्री झाली होती. त्यांच्या बोलण्यात बऱ्याचदा नीलचाच विषय असायचा... त्यांच्या बोलण्यावरून तिला नील बद्दल अनेक गोष्टी कळल्या. नील शहा हा नाशिक मधील  शहा textile industry चे  सर्वेसर्वा  मुकुंद शहा यांचा एकुलता एक सुपुत्र.. नाशिक आणि मुंबई दोन्हीकडे त्यांचा बिझनेस होता. आणि प्रेरणा त्याची लहानपणापासूनची मैत्रीण... एकाच गल्लीत दोघं लहानाचे मोठे झाले...एकमेकांच्या घरी ही कायम येणे-जाणे असायचे. शालेय शिक्षण आणि आता कॉलेजला ही दोघं एकत्र होते... त्या मुळे नील आणि प्रेरणा ची मैत्रीपण काही वेगळीच होती.... अशा बऱ्याच गोष्टी तिने दोघांबद्दल जाणून घेतल्या होत्या. त्या दिवशी शनिवार  असल्याने नील प्रॅक्टिसला आला नव्हता...

राधा: काय गं प्रेरणा??  नील असं का म्हणाला की प्रत्येक  शनिवारी तो नसेल???

प्रेरणा: अगं...actually आपल्या कॉलेजमधली tybba ची काही मुलं आहेत खूप हुशार आहेत पण परिस्थितीमुळे त्यांना job करून शिकायला लागतयं...त्यांना पुढे MBA करायचं आहे पण, CET चा class लावायची परिस्थिती ही नाही आणि वेळही नाही म्हणून मग नील, प्रत्येक शनिवार, रविवार २  तास तरी त्यांना guidance करत असतो. आणि job  मुळे त्यांचे lecture  पण miss  होतात ना!! मग accounts , taxation चे काही  doubts  असतील तर तेही solve  करतो...

राधा:  अरे व्वा ... ग्रेट...

   प्रेरणाने सांगितलेलं ऐकून तर तिच्या मनात नील बद्दलचा आदर अजूनच वाढला एरवी अबोल असणारी, मुलांशीच काय पण मुलींशी ही पटकन मैत्री न करणारी राधा, पण नील बद्दल जाणून घ्यायला मात्र फार उत्सुक होती...

राधा: (मनातल्या मनात)  एवढ्या श्रीमंत घरातला मुलगा, पण बोलण्याची, वागण्याची त्याची पद्धत खूपच नम्र आणि प्रत्येकाला आपलंसं करणारी आहे. पैशाचा कुठलाही माज नाही.... खरंच! जरा वेगळाच आहे ना नील!!!

प्रेरणा: चल गं घरी नाही जायचं का तुला??

असं प्रेरणाने विचारल्यावर तिची विचारशृंखला तुटली....
          ********

   एव्हाना प्रॅक्टीस सुरू होऊन 15 दिवस झाले होते. त्यांचा सगळ्यांचा छान ग्रुप तयार झाला होता. कोणी Bcom, Bba ,Mba , Bsc असे वेगवेगळ्या course चे विद्यार्थी होते. पण त्यांच्यामध्ये एक common  धागा होता...तो म्हणजे संगीत...

    नील, राधा आणि प्रेरणा ची तर खूपच छान मैत्री झाली होती. गाण्याची प्रॅक्टिस करताना काही चुकलं तर शांतपणे समजाऊन सांगणं, आवाजाची काळजी घे असं सांगणं राधाला आवडू लागलं होतं.... तर राधाला भेटता येणार नाही म्हणून नीलला सुद्धा शनिवार रविवार नकोसा वाटायला लागला होता. रोजच प्रॅक्टिस संपल्यावर कधी नीलची आवडती कॉफी, तर कधी राधाचा आवडता टपरीवरचा चहा प्यायचा असा एक अलिखित नियमच झाला होता जणू!!!

            ********
       अशीच एक दिवस राधा सकाळी कॉलेजला आली. रोज 3 तास कॉलेज त्यानंतर 3 तास प्रॅक्टिकल आणि पुन्हा 2 तास practice आणि हे  schedule  सतत गेल्या 15 दिवसांपासून चालू होतं त्यामुळे तिला  रोजच खूप दमायला होत होतं... आणि त्यादिवशी तर तिला  अंगात जरा कणकण  वाटत होती. खरंतर प्रॅक्टिसला जायचे त्राणच नव्हते तिच्यात... पण  थोडावेळ थांबून नीलला सांगून निघुयात असा विचार करून ती प्रॅक्टिसला गेली, तर नील फोनवर जरा चिडूनच कोणाशी तरी बोलत होता. तो फोन ठेऊन परत आला तसं प्रेरणांनी त्याला विचारलं...

प्रेरणा: काय रे?? काय झालं ?कुणाचा फोन होता?? आणि एवढं का चिडलायस??

नील: चिडू नको तर काय करू??? ज्याच्याकडून ही म्युझिक सिस्टिम प्रॅक्टिस साठी rent वर आणली आहे त्याला ती परत हवी आहे....

प्रेरणा: अरे पण आपण rent alredy pay केलय ना??? मग असं कसं म्हणू शकतो तो??

नील: बघ ना यार!!! मला म्हणतोय पैसे परत देतो पण मला आजच्या आज म्युझिक सिस्टिम परत हवीये....useless  माणूस....

प्रेरणाने कसाबसा त्याचा राग शांत करायचा प्रयत्न केला...राधा नीलला आज पहिल्यांदाच एवढं चिडलेलं बघत होती ....

राधा( मनातल्या मनात): आधीच हा चिडलाय, परत मी लवकर जायचंय म्हणून सांगितलं तर  अजून चिडेल... जाऊ देत नकोच सांगायला...

नील: (राधाकडे बघत): चला, प्रॅक्टिस सुरू करूयात...

असं म्हटल्यावर त्या दोघीही प्रॅक्टिस ला सुरुवात करतात.... पण दमल्यामुळे आणि बरं नसल्यामुळे राधा कडून सारख्या चुका होत असतात...२/३ वेळा नील शांतपणे तिला सांगतो, पण आधीच वैतागलेला असल्यामुळे एका क्षणी तो चिडून बोलतो....

नील: काय चाललंय राधा तुझं??? तीन तीन वेळा सांगूनही तू पुन्हा त्याच चुका करतेयस!!! लक्ष  कुठेय तुझं??? जरा लक्ष दे मी काय सांगतोय याकडे??

राधा: सॉरी नील...

नील: काय सॉरी अगं???  १५ दिवस झालेत प्रॅक्टीस सुरू होऊन... आणि इतक्या बेसिक चुका जर अजूनही होत असतील तर कसं होणार आपलं??? जरा चिडूनच तो बोलतो....

राधा: sorry नील ते actually  आज मला...

तिचं बोलणं मध्येच तोडत...

नील: please  यार,  काहीतरी कारणं सांगू नकोस....
    आधीच राधाला बरं वाटत नव्हतं, त्यात सगळयांसमोर नील जरा जास्तच चिडून बोलत होता त्यामुळे तिच्या डोळ्यात लगेचच पाणी आलं....????
ते पाहून नील अजूनच बोलायला लागला...

नील: झाऽऽऽलं.... एक बरं असतं ना तुम्हा मुलींचं? जरा काही बोललं की गंगा जमुना व्हायलाच लागतात....

    खरंतर प्रेरणाला त्याच्या अशा बोलण्याचा खूप राग येत होता. पण आता काही बोलायला गेलं तर भांडण होईल म्हणून ती गप्प बसली... त्याचा राग शांत झाला की बोलावं असं तिने ठरवलं....

नील: शिट् यार... आणि त्या माणसाने डोकं फिरवलं आणि आता....

असं म्हणत त्याने राधाकडे बघितलं...

प्रेरणा: तू जरा शांत होतोस का आता???

नील: माझा मूड गेलाय सगळा... आपण पॅकअप करूया उद्या करू प्रॅक्टिस....
असं म्हणून त्याने सगळ्यांना जायला सांगितलं...
राधा ही बिचारी डोळे पुसत काही न बोलता तिथून निघाली...
            घरी आल्यावर मी जरा दमलेय थोडावेळ झोपते असं आईला सांगून राधा तिच्या रूम मध्ये गेली.... नील च्या बोलण्याने जरा दुखावली गेली होती ती... तेवढ्यात फोन वाजला... कुठल्यातरी कंपनीचा कुठल्यातरी पॉलिसीसाठी माहिती सांगायला फोन होता... वैतागून तिने फोन कट केला आणि स्वीच ऑफ करून रडत रडतच  झोपून गेली....
       जेवणासाठी म्हणून तिला उठवायला आई तिच्या खोलीत आली....

राधाची आई: राधे, अगं उठ ....जेवायचं नाही का??? नऊ वाजलेत... जेवून परत झोप...

असं म्हणून त्या तिचा हात धरुन तिला उठवायला लागल्या.... आणि त्यांच्या लक्षात आलं की तिला चांगलाच ताप भरलाय....

राधाची आई: अगं... ताप भरलाय बाळा तुला??
चल बघू थोडसं काहीतरी खाऊन घे ... मी crocin देते ती घे मग झोप शांतपणे....

राधा: नकोय ग मला काहीं...

असं म्हणून पुन्हा झोपायला लागली...
शेवटी आईच्या आग्रहामुळे थोडासा वरणभात तिने खाल्ला आणि गोळी घेऊन झोपून गेली....

    इकडे प्रेरणा घरी जाताना  नील बरोबर एक शब्दही बोलली नाही. कारण तिला माहीत होतं त्याचा राग शांत झाला की आपणहून त्याला त्याची चूक कळेल...


     इकडे नीलही जेवण झाल्यावर डोळे मिटून बेडवर पडला होता... आणि विचार करता करता अचानक त्याच्या डोळ्यासमोर राधाचा रडवेला चेहरा आला. तसं त्याला कसंतरीच झालं. 


क्रमश: 

©®केतकी 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now