नमिता - विक्रम ( ऑफिस मधली प्रेम कथा )

Love Chapter

नमिता चा आज ऑफिस मधला पहिला दिवस होता. .मि. डेविड तिचे बॉस, त्यांनी नमिता ची सगळ्यांशी ओळख करून दिली, बहुतेकांनी तिचं स्वागत खूप प्रेमाने केलं. तिच्या टीम मध्ये रेवा, प्रिया अंकुश , आणि तो खडूस विक्रम ...विक्रम वगळता त्या तिघांनी तिला गराडा घातला आणि तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली,  त्या सगळ्यांनी तिला नवीन ऑफिस मध्ये रुळायला खूप मदत केली,

मि. डेविड तर खूपच चांगले होते, एक विक्रम वगळता सगळ्यांनी तिला पटकन आपलंस केलं, त्यामुळे आपण घरापासून दूर आहोत याचा तिला त्रास झाला नाही. पहिल्याच आठवड्यात मिटिंग मध्ये तिचा आणि विक्रम चा एका प्रश्नावरून मोठा वाद झाला, दोघंही आपापल्या मुद्द्यांवरून हटायला तयार नव्हते. नमिता तशी शांत असली तरी तिला जे योग्य वाटते ते ती दुसऱ्यांना पटवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करायची, समोर कोण आहे याचा तिच्यावर कधीही दबाव यायचा नाही, विक्रम ही तसाच तिच्याच सारखा होता....दोघंही मागे हटायला तयार नाहीत, मि. डेविड नि बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या कामाला निघून जायला सांगितले आणि त्यांनी या दोघांचा वाद लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली...दोघंही समोरासमोर बसून स्वतःचे मुद्दे पटवून देत होते आणि मि. डेविड त्यातील महत्वाच्या गोष्टी टिपून घेत होते....साधारण दोन तासानंतर त्यांनी या दोघांना थांबवले आणि स्वतःचा त्या प्रश्नावर निर्णय दिला आणि त्या दोघांना जागेवर जायला सांगितले, एकमेकांकडे रागाचा कटाक्ष टाकून ते दोघे आपापल्या जागेवर गेले.....त्यानंतर हे नित्याचेच झाले,

कुठल्याही प्रश्नावर नमिता आणि विक्रम चे एकमत होत नसे....सगळ्या टीम ने त्यांच्यातला वाद संपावा या साठी खूप प्रयत्न केले, इतर वेळी ते दोघे ठीक असत पण मिटिंग मध्ये वाद सुरु झाला कि काही खरे नसे...अर्थात दोघेही प्रचंड हुशार होते त्यामुळे तो वाद खरोखरच ऐकणाऱ्याच्या ज्ञानात भर टाकत असे त्यामुळे मि. डेविड खूप खुश होते, या दोघांच्या वादामुळे त्यांना कंपनीचा भरपूर फायदा करून देता येत होता...त्या दिवशी बुधवार होता त्या दिवशी नमिता आणि विक्रम दोन तास भांडत होते, कहरच झाला होता, कधी नव्हे ते मि डेविड ही वैतागले होते...रेवा, प्रिया, आणि अंकुश ने त्या दोघांना समजवायला सुरुवात केली...गंभीर पणे त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या नमिता आणि विक्रम ची एका क्षणी नजरानजर झाली आणि नमिता च्या हृदयाचा ठोका चुकला...पटकन तिची नजर खाली झुकली,  मान झटकून तिने तो विचार झटकून टाकला आणि मोकळ हसून विक्रम ची चक्क माफी मागितली...सगळे पहातच राहिले आणि लक्षात आल्यावर एकच जल्लोष केला आणि मग त्या सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या...तिथून निघाल्यावर मात्र नमिता आपण माघार का घेतली त्याचा विचार करू लागली पण मग उगाच ऑफिस चे वातावरण का बिघडवायचे? त्यामुळे आपला निर्णय योग्य होता हे तिने स्वतःला बजावले...आणि तिला खूप हलक वाटत आहे हे तिलाही जाणवलं, मनावरचा ताण कमी झाल्यामुळे असेल कदाचित...असं तिने मनाशी म्हटलं खर...पण विक्रम शी झालेली नजरानजर तिला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली...काय होत बरं त्या नजरेत? तिच्याही नकळत ती विचार करू लागली. कुठेतरी खूप सुखावून त्या क्षणी तिला तरंगल्या सारख वाटलं होत....  त्या दिवशी ऑफिस मधून निघताना विक्रम ने पण सगळ्यांसमोर तिची माफी मागितली आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हाही तिने त्याची नजर हसून टाळली...

सोमवारी नमिता ऑफिस मध्ये आली तेव्हा तिच्या नजरेने विक्रम ला ला शोधलं पण तिला तो कुठेही दिसला नाही, तेवढ्यात मि. डेविड नी तिला हाक मारली आणि आजच्या आज तिला पुण्याच्या ऑफिसला जायला सांगितलं, दहा दिवस तिथे राहून तिथलं काम संपवून परत ये म्हणून तिच्या हातात तिकीट ठेवलं..नमिता गडबडीने घरी आली आणि सामान आवरून ती पुण्याला निघाली ...त्या सगळ्या गडबडीत ती विक्रम ला  विसरूनच गेली.

विक्रम नमिता पुण्याला गेली त्या दिवशी थोडा उशीराच ऑफिसला पोहोचला, सकाळीच मि.डेविड नी त्याला फोन करून येताना एक काम आटपून यायला सांगितले ते करूनच तो ऑफिसला आला, नकळत त्याची नजर नमिता च्या जागेवर गेली, सीट रिकामी पाहून त्याला काळजी वाटली, कुठे बरं गेली ही? उशिरा तर येत नाही कधी, का तिलाही काही काम दिलं असेल मि डेविड नी? पण मग अंकुश म्हणाला कि नमिता आजच पुण्याला ला गेली तेव्हा विक्रम अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याच मनच ऑफिस मध्ये लागेना...गेले दोन दिवस तो नमिता चा च विचार करत होता..परवा जेव्हा त्यांची नजरानजर झाली तेव्हा तिचे लाल झालेले गाल त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याच्याही नकळत त्याच हृदय हवेत तरंगलं होत...आजही विक्रम ला ती भावना हवीहवीशी वाटून गेली...नंतर मिटिंग मध्ये मि डेविड जेव्हा विक्रम कडे रोखून पाहत म्हणाले कि नमिता दहा दिवस पुण्याला  राहणार आहे तेव्हा नकळत विक्रम चा चेहेरा कसानुसा झाला...तुला काही प्रोब्लेम नाही न विक्रम ? या मि डेविड च्या प्रश्नाला विक्रम ने  नकारार्थी मान हलवली खरी पण त्याला नमिता शिवाय चैन पडेना ...पुढच्या मिटिंग मध्ये त्याचे लक्षच लागेना पण मि. डेविड काही त्याला सोडायला तयार नव्हते, ते विक्रम ला प्रश्न विचारून भंडावून सोडत होते, थोड्याच वेळात विक्रम वाद घालू लागला पण मग त्याला परत जाणवले "नमिता नाही तर वाद घालण्यात काहीच मजा नाही........."नमिता नाही तर वाद घालण्यात काही मजा नाही न?" या मि.डेविड प्रश्नावर विक्रम एकदम दचकला, त्याने मि. डेविड कडे रोखून पहिले, यांना माझ्या मनातलं कसं कळलं? त्याने संशयाने मि. डेविड कडे पहिले, मिश्कीलपणे हसणाऱ्या मि.डेविड नां पाहून विक्रम अजूनच बुचकळ्यात पडला. हे आपल्याला काय होत आहे? आजपर्यंत नमिता दिसली कि रागाने तिच्याकडे पाहणारा मी ती नाही तर इतका बेचैन का होतो आहे? तेव्हा राग येणारे तिचे सगळे मुद्दे आज अचानक मला पटायला लागले आहेत अस का वाटत आहे? संध्याकाळपर्यंत विक्रम खूपच उदास झाला...अजून नऊ दिवस....एक सुस्कारा टाकून तो ऑफिस मधून निघाला.....

आपल्या केबिन मधून विक्रम कडे पाहणाऱ्या मि.डेविड ना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या...नमिता आणि विक्रम यांच्या भांडणावर काहीतरी उपाय काढायलाच हवा होता हे मि. डेविड ना सारख जाणवत होतं. ते एक हुशार बॉस होते, त्यामुळे आपल्या स्टाफ ने ऑफिसच वातावरण चांगल राखायला हवं असं त्यांना नेहेमी वाटे.......पण त्यांचे वाद कमी कसे करावेत हेच त्यांना कळत नव्हते..बुधवारी तर कहर झाला होता, विक्रम आणि नमिता कडे हताश पणे बघत बसलेल्या मि. डेविड ना अचानक राग आला, त्याच वेळी त्याचं लक्ष भांडणाऱ्या त्या दोघांकडे गेलं आणि त्यांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली...ते त्या दोघांना खूप रागावले, मि.डेविड चिडलेले पाहून नमिता आणि विक्रम एकमेकांकडे अपराधी नजरेने पाहू लागले, आणि शांत होत त्या दोघांनी मि. डेविड ची माफी मागितली, एकमेकांकडे सौम्य कटाक्ष टाकून ते आपापल्या जागेवर गेले.

पहिल्यांदाच एकमेकांबद्दल रागा व्यतिरिक्त वेगळी भावना जागृत झालेली मि. डेविड ना जाणवली आणि  त्यांच्या मनात विचाराची चक्रे वेगाने फिरली....त्यांनी नमिता ला  पुण्याच्या ऑफिसला पाठवायचे ठरवले आणि त्यांना दोघांना भेटता येऊ नये म्हणून विक्रम ला नमिता जाईपर्यंत ऑफिस च्या बाहेर पाठवले....या दोघांमधला - विरह आपले काम चोख बजावणार याची त्यांना खात्री होती...नमिता चा गोंधळलेला चेहेरा आणि विक्रम ची ही हरवलेली मनःस्थिती....  या बद्दल त्यांनी स्वतःची पाठ थोपटली...

चार दिवस झाले, विक्रम कडे मि डेविड ना पाहवेना, नमिता शी ते रोज फोन वर बोलत होते आणि तिचीही अवस्था त्यांना कळून चुकली होती....आता दुसरा वार करायला हवा होता...त्यांनी विक्रम ला अचानक पुण्याला जायला सांगितले, मनातला आनंद विक्रम ला लपवता आला नाही....तिथल्या ऑफिस मध्ये तो पोहोचला तेव्हा संध्याकाळी 5 वाजून गेले होते, बरचसं ऑफिस रिकाम होत आल होतं...त्याला समोरच बसलेली नमिता दिसली आणि स्वतःवर ताबा मिळवत तो तिच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला, समोर अचानक विक्रम ला बघून नमिता उभी राहिली आणि भान विसरून त्याच्या मिठीत शिरली....रोज इतक्या शब्दांनी एकमेकांवर वार करणाऱ्या विक्रम आणि नमिता कडचे सगळे शब्द आज संपले होते...नमिता भानावर आली आणि चटकन मिठीतून बाजूला होत तिने विक्रम ची नजर चुकवली, ऑफिस मधल्याना विक्रम ची ओळख करून देत तिने कामाला सुरुवात केली, संध्याकाळी 7 वाजता ते दोघे हॉटेल वर परत आले, डिनरला भेटू असं म्हणतं नमिता तिच्या रूमवर निघून गेली....एवढा वेळ तिचा उडालेला गोंधळ विक्रम च्या नजरेतून सुटला नव्हता आणि थोडया वेळाने तयार होऊन विक्रम डिनर टेबल पाशी नमिता ची वाट पाहत बसला.. तेवढ्यात नमिता  आली, आकाशी ड्रेस मधली नमिता खूपच गोड दिसत होती, तिला पाहताच विक्रम आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तिचं स्वागत केलं.  आणि  पटकन म्हणाला मला तू खूप आवडतेस," ..नमिता ने लाजून मान खाली घातली आणि हसली ..नंतर मात्र त्यांच्या राहिलेल्या गप्पा सुरु झाल्या...गप्पा मारताना तिने सहज त्याला इथे येण्याचे कारण विचारले, आणि कारण शोधताना त्यांच्या लक्षात आले कि इथे तर काही महत्वाचे काम नव्हते मग आपल्याला दोघानाही इथे पाठवायचे कारण काय? मि.डेविड चा डाव त्या दोघांच्याही लक्षात आला आणि आपल्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट पाहून त्यांना फार आनंद झाला...

दुसऱ्या दिवशी मिटिंग रूम मध्ये शिरणाऱ्या नमिता आणि विक्रम कडे सगळे  अगदी टक लावून पाहत होते, स्वतःच्या करामती बद्दल मि डेविड नि सगळ्यांना सांगितलं होतं. नमिता - विक्रम काही न बोलता आपापल्या जागेवर बसले आणि मिटिंग ला सुरुवात झाली....गाडी एका प्रश्नाकडे वळली आणि नमिता आणि विक्रम चे जोरजोरात वाद सुरु झाले, सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले, काय होतं आहे हे कुणालाही कळेना, सगळे डोक्याला हात लावून बसले, त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतंच काही घडत होतं...मि. डेविड चेहेरा पडला, त्यांनी सहकाऱ्यांची नजर टाळली आणि त्यांचा चेहेरा दुःखाने भरून गेला....मग मात्र नमिता आणि विक्रम ला राहवेना, ते दोघे जोरजोरात हसू लागले, सगळे माना वर करून आश्चर्याने पाहू लागले...त्यांचे नाटक लक्षात येताच मात्र सगळे त्यांच्या हसण्यात सामील झाले..... .वातावरण एकदम मस्त होऊन गेलं...................

नमस्कार. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )..