Love Sky Is Not The Limit 30

Sameer Aadnya
Loave : sky is not the limit

भाग 30

आतापर्यंत कथा संक्षिप्त :
आज्ञा एक नेत्याची मुलगी, कॉलेज मध्ये शिकते. त्या कॉलेजमध्ये तरुण डॉक्टर समीर काही सेमिनार घ्यायला जातो. तिथे त्याला बघून आज्ञा समीरच्या प्रेमात पडते आणि तेव्हा पासून त्याच्या पाठपुरावा करणे सुरू करते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे, हे पण त्याला सांगते पण तो नकार देतो. त्याचा नकार होकार मध्ये परिवर्तित करण्यासाठी तिचे खूप प्रयत्न सुरू असतात. तो जिथे जाईल तिथे ती आधीच पोहचलेली असते. समीर ची लहान बहीण आज्ञाच्याच कॉलेजमध्ये शिकत असते. समीरच्या घरा पर्यंत पोहचायला आज्ञा सायली सोबग मैत्री करते. मात्र समीर आहे की अजूनही आज्ञाचे प्रेम स्वीकार करायला तयार नाही.


पूर्वार्ध:

आज्ञाचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला असतो. समीर तिला त्याच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी घेऊन जातो. अपघात तसा तर अगदीच किरकोळ असतो पण हॉस्पिटल मध्ये जास्तीत जास्त दिवस राहता यावे म्हणून दुर्गा एक एक नाटक करत असते.

आता पुढे..

"मिस, कुठे बघताय.." समीर हातात कधीचा घास पकडुन ठेवला होता, तो हात खुणावत म्हणाला.

"विथ स्पेक्टस् ऑर विथॉउट स्पेक्टस्..?" आज्ञा विचार करत असण्याचे नाटक करत म्हणाली.

"काय?" समीर.

"विथ स्पेक्टस् ऑर विथॉउट स्पेक्टस्..? जास्त कशात क्यूट दिसतात, तो विचार करत होते." आज्ञा त्याचा मनगटाला पकडत घास खात म्हणाली. त्याने हीचं काही नाही होऊ शकत या विचार करत आपली मान खिडकीकडे वळवली. आज्ञाला त्याला बघून हसू येत होते.

राजच्या फोनची बीप वाजली, तर त्याने बघितले आज्ञाचा मेसेज होता. "डॉक्टर खाऊ घालताना आमचा फोटो क्लिक करा."

"सायलीला आणत होतो तर येऊ नाही दिले, आता मी का ऐकायचं?" राजने रिप्लाय केला.

"अहो, तिच्या सोबत आणखी बरच काही आले असते..मग तर डॉक्टरांना डोकं पण दाबून द्यावे लागले असते." आज्ञाने मेसेज सोबत एक फनी इमोजी पण पाठवला.

ते वाचून राजला हसू आले.

"प्लीज फोटो काढून द्या.. असे योग वारंवार येत नाही.. अन् डॉक्टर कसे आहेत तुम्हाला तर माहितीच.. पण मी असे योग आणेलच म्हणा..पण तरी आता क्लिक कराल आहात.." आज्ञा.


"एका अटीवर.." राजने रिप्लाय केला.

"काय?" परत आज्ञाचा फोन वाजला.

"तुम्हाला एक महिन्याचा वेळ आहे, समीर कडून तुमच्या प्रती त्याचे प्रेम आहे आहे कबूल करवून घ्या. एका महिन्यात त्याने ते स्वीकारले नाही तर प्लीज त्याच्या आयुष्यातून निघून जा आणि तुमच्या लाईफवर, करीअरवर फोकस करा. इट्स रिक्वेस्ट.." राजने मेसेज केला.

"पूर्ण आयुष्याचा निर्णय एका महिन्यात घ्यायचा? ये तो बडी नाईंसाफी हैं.. बरे ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड.. लक्षात असू द्या आज्ञा कधीच हारत नाही. आणि मी जर जिंकले तर तुम्ही सर्वांना तुमच्या आणि सायलीच्या नात्याबद्दल सांगायचे.." आज्ञाने रिप्लाय केला.

"व्हॉट? तुम्ही सुधारणार नाही ना?" त्याचा रिप्लाय गेला.

"नो, नेवर. आणि प्यार किया तो डरना क्या.. प्रेम घाबरून करायची गोष्ट आहे का? डंके की चोट पे खडे होकर, चिल्लाते आणा चाहिए.. हा मैने भी प्यार किया है.." आज्ञाने रिप्लाय केला.

"देवा.." राज.

"आता प्लीज तुम्ही आमचे फोटो काढा.. डॉक्टरांना काहीच कळायला नको.." आज्ञाने रिप्लाय केला.

"हात दुखत आहे म्हणून जेवता येत नाही ना?" तिचे फोनवर काहीतरी मेसेजिंग सुरू आहे बघून समीर म्हणाला.

"ते मैत्रिणीचा मेसेज होता.. एक्झाम आहे तर नोट्स आणि डाऊट विचारत होत्या.. आणि आपले दुःख बाजूला ठेवून, अभ्यासात कोणाला मदत करणे खूप पुण्याचे काम आहे, असे सायली धर्माधिकारी म्हणते." आज्ञा बिचारासा चेहरा करत म्हणाली.

ते ऐकून समीरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ते बघून राजला खुप हसू येत होते.

"तुमचे फ्रेंड्स तुम्हाला डाऊट विचारत आहेत, हे पण खूप कौतुकास्पद आहे.." राज स्वतःच्या हसण्यावर कंट्रोल ठेवत म्हणाला.

"हो ना.. अडला हरी… आणखी काय.." आज्ञा.

समीर आळीपाळीने दोघांकडे बघत होता.

"तू नको जास्त विचार करू.. तू जेवण भरव.." राज हसत म्हणाला.

"फोटो?" तिने परत हळूच राजला मेसेज केला.

राजने डन म्हणून तिला रिप्लाय पाठवला.

बऱ्यापैकी पूर्ण जेवण तिने समीर कडून भरवून घेतले होते.

"मिस आता तुम्ही परफेक्टली फाईन आहात. अंग कदाचित थोडे दुखेल, पण त्यासाठी डॉक्टरांनी औषध दिले आहे, ते घेतले की बरे वाटेल. उद्या तुम्हाला डिस्चार्ज मिळेल." समीर नॅपकिनने आपला हात पुसत म्हणाला.

"अच्छा.." उत्तर देत आज्ञाने उशीवर डोकं ठेवले.

"टेक केअर.. good night!" राज म्हणाला.
दोघेही रूम बाहेर जाऊ लागले.

"उद्या परत काही कांड नाही केलेत म्हणजे मिळविले.." राज समीर जवळ जात म्हणाला. ते ऐकून समीरच्या कपाळावर तीन चार आठ्या पडल्या.

*****
नेहमीप्रमाणे सकाळी नर्स आज्ञाच्या रूममध्ये चेकप करायचा गेली तर तिला आज्ञा तिथे कुठेच दिसली नाही.

"सर, मिस आज्ञा रूम मध्ये नाही." नर्स आज्ञाची ट्रीटमेंट करणारे डॉक्टर शंकरच्या कॅबिनमध्ये येत म्हणाली.

" असतील इथेच कुठे.. सकाळचा चेकप झाला आहे." डॉक्टर शंकर.

"हो, त्यांचे समान रूम मध्येच आहे अजून..' नर्स.

"मग इथेच असतील कुठे, तसे पण त्यांचे डिस्चार्ज पेपर्स तयार होत आहेत, त्या आता ठीक आहेत. फक्त कुठे आहेत, ते बघून ठेवा. डॉक्टर समीर त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत, सो डोन्ट वरी. " डॉक्टर शंकर.

"ओके.. बघते." म्हणत नर्स आज्ञाला शोधायला गेली.

"डॉक्टर राज, मिस आज्ञा त्यांच्या रूम मध्ये नाही." नर्स राजच्या केबिनमध्ये जात म्हणाली. समीर पण तिथेच बसला होता.

"असेल तिथेच कुठे.." समीर.

"नाही आहे.." नर्स

"बाथरूम वगैरे कुठे गेल्या असतील." समीर.

"नाही आहे. मी बघितलं." नर्स.

"आजूबाजूला कुठल्या बाथरूममध्ये असेल." समीर.

"पण आपल्या रूमचे बाथरूम सोडून दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये काय करायला गेल्या असतील?" राज प्रश्नार्थक नजरेने समीरकडे बघत म्हणाला. नर्सला तर काही समजले नव्हते.

" जोपर्यंत डॉक्टर समीर इथे आहेत, मिस आज्ञा हॉस्पिटल सोडून कुठेच जाणार नाही, सो डोन्ट वरी." राज समीरला चिडवत म्हणाला.

"खाली सिक्युरिटीकडे जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा, कळेलच.. आणि हा, एकदा डॉक्टर समीरचे केबिन पण चेक करा." राज.

"ओके सर." म्हणत नर्स निघून गेली.

"कूछ तो नया कांड होनेवाला दिखरा भाई.. तयार हो जा मेरे दोस्त.. " राज आळोखे पिळोखे देत म्हणाला.

"असे बिसे काही नाही." समीर.

"वरती तुझ्याच खोलीत तर लपून बसल्या नसेल? आज इथून जायचं म्हणून नक्कीच काही प्लॅन केला असेल.." राज आळस झटकत म्हणाला.

" काहीही.. तू उगीच घाबरवू नको.." समीर टेन्शनमध्ये येत म्हणाला.

"किती घाबरतो तू त्यांना.. स्वतःचा चेहरा बघ जरा आरशात.." राज त्याला चिडवत होता. अधुनमधून आळस देत होता.

"रात्रभर काय करत होतास?" समीर.

"अभ्यास परीक्षेचा.." राज झटकन बोलून गेला.

"कोणती परीक्षा?" समीर प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होता.

"ते पुढे निघणार आहेत ना..ते मला तो एक कोर्स करायचा आहे.. त्याची एक्साम होईलच कधीतरी, तर त्याचा अभ्यास करत होतो.." राज.

"नक्की रात्रभर कुणासोबत बोलत बसला असशील.." समीर.

"हा खडूस.. नाही तिथे डोकं लावतो.. देवा आज्ञाकडून लवकरात लवकर हा पटू देत रे बाबा.." समीरकडे बघत राज मनोमन बोलत होता.

" काय विचारतोय?" समीर.

"तू जा ना.. तुझे पेशंट वाट बघत असतील.. तो कालचा डॉन, त्याच्या नातेवाईक तुझ्या वाटेवरच बसले आहेत.. आणि ते झाले की जा तुझी मेनका शोध.. कमी कामं आहेत का तुला? जा कामं कर थोडे.." राजची बडबड सुरू झाली.

"जातोय, पण लक्षात असू दे तू डॉक्टर आहेस.. रात्री नीट आराम होणार नाही तर कामात पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही." म्हणत तो आपल्या कामासाठी निघून गेला.

"प्रेमात पडशील ना, तेव्हा कळेल.. देवा याला लवकर प्रेमात पाड.. मलाच काही नवस बोलवा लागेल.." त्याला जातांना बघून राज देवाची प्रार्थना करत होता.

आज सुट्टी होणार म्हणून आज्ञा हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त कसे राहता येईल, याचा विचार करत होती. खूप वेळ विचार करुनही तिला काहीच सुचले नव्हते. काही आयडिया मिळते काय म्हणून ती रूमच्या बाहेर पडली होती. आधी ती सरळ समीरच्या कॅबिन मध्ये गेली होती, पण तिथे तिला तो दिसला नव्हता. तो चेकप राऊंडवर असेल म्हणून मग ती असेच हॉस्पिटलला फेरफटका मारत होती. फिरता फिरता ती कॅन्सर वॉर्ड मध्ये आली होती. ती तिथे कधी पोहचली हे तिला सुद्धा कळले नव्हते. ती आतमध्ये गेली. समीर त्याच्या राऊंडवरून येत होता, तिला तिथे बघून तो तिथेच थबकला.

"कांड…." तिला तिथे बघून राजचे शब्द त्याच्या डोक्यात फिरू लागले.

*****

क्रमशः🎭 Series Post

View all