Login

प्रेम: कधीही न संपणारे : भाग 2

Love Story
मागच्या भागात आपण बघितले आकाश अन्वी ची फ्रेंड request accept करतो. पुढे बघुया काय होते....


आकाश आणि अन्वी रोज वेळ मिळेल तसा फेसबुक वर बोलत असतात.
ती मुंबई मध्ये नवीन असल्याकारणाने कोणी मित्र मैत्रिणी ही तिला नसतात. त्यामुळे ती रिकामा  वेळ  फेसबुक वर घालवत असते. रोज फ्रेंड लिस्ट मध्ये कोण ना कोण गावाकडचे ओळखीचे add होत असतात.
आकाश पण तिचा गावाजवळ च्या एका गावा मधला मुलगा असतो. परंतु जन्मापासून तो मुंबई मध्ये राहिलेला असतो. दिवसामागून दिवस जात असतात. आकाश आणि अन्वी पण as a फ्रेंड म्हणून बोलत असतात. आकाश ला तिचे ते समंजसपणे बोलणे. प्रत्येक प्रश्नाचे चांगल्या पद्धतीने उत्तर देणे त्याला आवडू लागले होते .

असेच एक दिवस बोलता बोलता तो तिला बोलतो की तुझे बोलणे मला खूप आवडते आणि तू पण मला आवडली आहेस. ती विचारात पडते या मुलाने आपल्याला बघितले नाही मग कशी आवडू शकते मी.
ती त्याला बोलते पण तू माझा फोटो नाही बघितला तरी पण मी कशी आवडले तुला तर तो बोलतो तुझे बोलणे मला खूप आवडते. त्यामुळे तू पण सुंदरच असणार. अन्वी ला पण त्या न कळत्या वयात कोणीतरी केलेली आपली तारीफ खूप आवडते. ती पण मनातल्या मनात खूप लाजते.
        असेच बोलत असताना आकाश एक दिवस तिला प्रपोज करतो. ती थोडा विचार करते पण दुसऱ्या दिवशी त्याला हो बोलते. याआधी दोघांनी पण एक मेकांना बागितले पण नाही होते. तो बोलतो तुझा एखादा फोटो पाठव . ती पण काही विचार न करता त्याला तिचा बारावी मधला कॉलेज मधला सिंपल ड्रेस वरचा फोटो send करते.
    त्याला फोटो बघून ती खूप आवडते. असच बोलत बोलत खूप दिवस जातात. ते दोघं फोन नंबर्स एक मेकांना देतात. व आता त्यांचे फोन वर बोलणे चालू होते. ती घराबाहेर असेल तर त्यांच्याजवळ फोन वर बोलत असे व घरी असल्यावर फेसबुक वर.

🎭 Series Post

View all