Jan 22, 2022
Poem

प्रेम म्हणजे..

Read Later
प्रेम म्हणजे..

प्रेम म्हणजे गालातलं हसू
प्रेम म्हणजे डोळ्यातलं आसू

प्रेम म्हणजे अलवार तरंग
प्रेम म्हणजे लालगुलाबी रंग

प्रेम म्हणजे वाट पहाणं
प्रेम म्हणजे स्वप्नात रंगणं

प्रेम म्हणजे हवासा सहवास
प्रेम म्हणजे धुंद मधुमास

प्रेम म्हणजे निस्वार्थी मिलन
प्रेम म्हणजेच तर असतं जीवन

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now