प्रेमपत्र

i wrote a letter to my GF

प्रिय सखी ,

     हा माझा दुसरा प्रेमपत्र आहे . पहिल्यांदा प्रेमपत्र लिहिल्यानंतर तू खूप हसली होतीस . पण काय करणार ? माझ्या मनातील भावना सांगण्यासाठी दुसरा पर्याय नव्हताच . आपलं भूतकाळ आठवल ना तर एक कथेशिवाय वेगळी वाटत नाही . तुला आठवत का आपण पहिल्यांदा कस भेटलो होतो ? कॉलेजमध्ये फक्त एका वहीसाठी मी तुला भेटायला आलो होतो . वही फक्त कारण होत . मला तर फक्त तुझ्याशी बोलायचं होत . त्यानंतर कधी आपल्यात मैत्रीची संबंध उठून आले ते कळलच नाही . 

    त्यानंतर दररोज आपण कॉलेज मध्ये भेटणं दोघेमिळून अभ्यास करणे . लिखाण करताना इअरफोनच एक कॉर्ड तू घालत असे आणि दुसर मला देत असे . दोघेही गाणे ऐकत लिखाण करत गार्डनमध्ये बसत होतो . त्या क्षणी तू वापरत असलेली डियो मला खूप आवडत असे . कोणतं डियो वापरती तू ? अस विचारल्यावर तू पुन्हा हसत असे . त्या हसूवर तर मी पार घायाळ होत होतो . त्यानंतर तू माझ्यासाठी जास्तीच टिफिन आणणे आणि आपण तो मोकळ्या वेळेत एकत्र खाणे . या सगळ्या वेळेत मी फक्त तुझीच सहवास अनुभवत होतो . 

     तुला आठवत का माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय झालं होत ? 8 फेब्रुवारी .. माझा वाढदिवस . त्या दिवशी प्रपोज डे सुद्धा असत . मी तेंव्हाच तुला माझ्या मनातील भावना सांगणार होतो . पण तूच समोरून मला सरप्राईझ पार्टी देत चकित केलीस . तेंव्हा फक्त माझा तो दिवस चांगला जाण्यासाठी तू खूप काही प्लॅन केली होतीस . त्या दिवशी तुझी ती आटापिटा बघून मी माझ्या भावना प्रकट केलो नाही .

     मग आला तुझा वाढदिवसाचा दिवस . त्या दिवशी मी काहीतरी स्पेसिअल करावं म्हणून कॉलेज आलो तर तू तुझ्या मैत्रिणीसोबत फिरत होती . खर तर मला माझ्या मनातील भावना तुला सांगायचं होत . पण हिम्मत होत नव्हती . म्हणून तुझ्या वहीत प्रेमपत्र लिहून तुझ्या मैत्रिणीकडून तुला देऊ केलो . पण तू त्यावर हसून माझी इज्जत काढलीस आणि म्हणाली ' एवढं उशीर का केलास ?' मी तर तेंव्हा स्वर्गात असल्यासारखं वाटत होत . संध्याकाळी आपण दोघे एकत्र बाहेर गेलो होतो . तेंव्हा खर म्हणजे तुझा वाढदिवस होता , पण दिवस माझा चांगला जात होता . शेवटी घरी जाताना गुड बाय हग  दिलीस . ते माझ्या आयुष्यभर तर विसरणार नाही .  

       रिलेशनशिप  मध्ये येऊन सुद्धा तू बदलली नव्हतीस .काहीही न मागणारी गर्लफ्रेंड होतीस . पण माझी काळजी मात्र तू घ्यायची . आपण कधी थिएटरला सिनेमा बघण्यासाठी गेलो नाही . ना कुठे बाहेर मॉल मध्ये गेलो . तरीही आपल्यामध्ये खूप आठवणी होत्या . 

        तुला आठवत आपल्यात भांडण झालं होत . एका मुलीने तुला माझा नंबर मागितली होती . त्यावरून तू माझ्यावर भडकली होतीस . पण खरंच त्यात माझी काहीच चुकी नव्हती . मी तर तिला ओळखत हि नव्हतो . तिने तुलाच माझा मोबाइल नंबर मागितली . कदाचित तिला आपल्या दोघांबद्दल माहिती नव्हती . त्यानंतर तू माझ्याशी 13 दिवस बोलली नाहीस . मी तुला किती मेसेज केलो , कॉल केलो त्यालाही काही रिप्लाय तू दिली नाहीस . पण अचानक तू कॉलेज मध्ये येऊन माझ्या मिठीत पडलीस . तेंव्हा मला कळाल कि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते ? असो ..

      कॉलेज संपल्यावर आपण दोघांनी ठरवलो कि आधी आपलं कॅरियर बघायचं , त्यानंतर पुढचं पाऊल टाकायचं . त्याच एका स्वप्नासाठी मी झटत आहे . तुला मी चंद्र तारे आणून देईन अस वचन देणार नाही . पण एक मात्र आहे तुला कधी दुःख नाही देणार . आज तू हे पत्र वाचत असशील . माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप आभारी आहे . तुला पाहून आधी माझं हृदय जस धडकत होत , तसच आजही धडकत आहे . 

                                                सदैव तुझाच 

                                                   ऋषी