१०.बाबा

for a father who is backbone of family but sometimes kids not understand his role ,his priorities as they were not with him like they spend time with their mother,hence I tried something to write about father ,hope u people liked it.

आईसारखा बाबा कधी लेकरांना कळतच नाही, 
त्याचं ही मन झुरत असतं मायेने हे लेकराला बऱ्याचदा समजतच नाही. 
त्याच्याही आत असतो एक मायेचा समुद्र पण सारेच हळवे झाले तर माझं लेकरू कसं कणखर होईल या विचाराने कणखर होऊन थेंब ही ढळू द्यायचा नाही पापणी बाहेर हा नियम त्याने बाप होताच स्वतः शी असतो आखलेला. 
आई घरात नसली कि सारं घर खरंच ओसाड असतं पडलेलं, पण बाबाला यायला जरा जरी उशीर झाला तरी त्याचं घराचं छप्पर असतं बिथरलेलं.
जितक्या आतुरतेने तिने बघितली असते नऊ महिने वाट, तितकंच त्याचं ही काळीज असतं आतुरलेलं, जरासं घाबरलेलं कारण त्याला वाटूनही share नसतं करता आलेलं आपल्याच रक्ताच्या गोळ्याला आपल्यात रुजवणं अन घडवणं. 
आई इतकंच तो ही असतो आतुरलेला लेकराचं पहिलं पाऊल अन पहिली हाक ऐकायला, पण बाबा नावाच्या जवाबदारीनं त्याला नौकरी नावाच्या गराड्यात असतं अडकवून ठेवलेलं. 
आई दिसत राहते सतत डोळ्यासमोर तो मात्र तितका दिसत नाही म्हणून बालपणी कैकदा मन असतं त्याच्यावर रुसलेलं मोठं झाल्यावर कळतं आपल्याच लेकरासाठी आपल्याच पिल्लापासून दूर राहून त्याचं ही मन नक्कीच असेल झुरलेलं. 
लाख येवोत अडचणी, लाख अडवेल नियती वाटा आता कसलीच वाटत नाही भीती कारण बाबा नावाचं एक भला मोठा हिमालय कायम माझ्यासाठी वादळा समोर असतो उभा. 
#तेरी लाडकी में छोडुंगी ना तेरा हाथ #