मिलन
ती तप्त धरणी... तो तिला केव्हाही मिठीत घेण्यासाठी आसुसलेला पाऊस...
त्याच्या मनातील प्रेमभावनांनी दाटून आलेले ढग...
आणि तिच्या मनात चाललेली तगमग...
विजेच्या कडकडाटाने तो तिला देऊ पाहत होता त्याच्या येण्याची चाहूल...
त्याच्या मिठीत जाण्यासाठी ती ही होती आसूस...
कित्येक महिन्यांच्या कालावधीने तो आज तिला भेटणार होता...
तो क्षण हळू हळू जवळ येऊ पाहत होता...
तो तिच्या दिशेने येण्याचा अवकाश...
आणि आता तिने ही त्याच्या दिशेने केलेले मोकळे तिचे बाहुपाश...
तो तिला मिठीत घेऊन बरसू लागला...
तप्त असलेली ती ही त्याच्या स्पर्शाने शांत होऊ लागली...
तो तिच्यावर भरभरून प्रेम करू लागला....
आणि ती त्याला तिच्या मिठीत सावरण्याचा प्रयत्न करु लागली...
दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात न्हाऊन निघत होते...
विजेचा आवाज हळूहळू कमी होत होता आणि मंदगार सुटणारा
वारा त्यांना स्पर्श करत होता...
जणू तो त्यांच्या प्रेमाची ग्वाही जगाला देत होता...
दोघेही आता शांत होत होते...
त्याच्या प्रेमाने ती मोहरुन निघाली होती... तिचा हिरवा रंग तिची शोभा वाढवू पाहत होता...
त्यांच्या प्रेमाचा गंध मातीत मिसळून गेला होता...
तिच्या मिठीत असलेला तो आता हळूहळू जायची वेळ झाली म्हणून सांगू लागला...
रुसलेल्या तिला मनवण्याचा प्रयत्न करु लागला...
पुन्हा उद्या नक्की येईन म्हणून तिची प्रेमळ समजूत घालू लागला...
तिने ही मग हळूवार कबूल केलं बोलणं त्याचं लाजून..
तो ही मग तिच्या अशा वागण्याने गेला पुन्हा तिच्यात हरवून...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा