प्रेम! एका अनामिक वळणावरचं...

कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल. आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे.
कथेच्या शीर्षकावरून या कथेचं सार प्रत्ययास येईलही.. मात्र याहुनही पलीकडच्या वळणावर ही कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. जिथे प्रेम, भावना, मन आणि विश्वास यासारखे अनेक महत्वाचे पैलू हळूवारपणे आपल्या जीवनावर प्रभाव पाडून जातील. यातून या सर्व गोष्टींची मानवी जीवनात होणारी जडणघडण प्रकर्षाने जाणवेल.
आणि कथेबद्दल सांगायचं म्हणलं तर ही कथा आजकालच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी आहे. जिथे एक भावनाहीन पोकळ मनाची मुलगी आणि तिच्या प्रेमात पडलेला पूर्णपणे तिच्यावरूद्ध असलेला मुलगा यांच्यात आकार घेणारी ही प्रेमकथा आहे. चला तर मग आपणही या दोघांत फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होऊया...
◾️◾️◾️

भाग-१
  
वेळ रात्री ११:३० च्या सुमारास....
  " Hello , सार्थक अरे मित्रा कुठे आहेस तू आणि किती उशीर लावतोय यार ये ना पटकन" पलीकडून फोन रिसिव्ह झाल्या झाल्या करण नाराजीनेच म्हणाला.
" जरा दम तरी खात जाना रे बोलताना, ? on the way आहे. येतोय मी आणि  असले कसले  destination ठरवता  रे एखाद्या restaurant मध्ये वगैरे जागा मिळाली नाही का तुम्हाला
" बस का भाई, अरे येऊन तर बघ काय भारी नजारा आहे इथला.... इथून सगळ्या शहराचं झगमगातं दर्शन होईल तुला. तू आ तो सही पहले ?
" ते शहराचं दर्शन ठेव बाजूला आधी आपल्याला एकमेकांचं दर्शन तरी होतं की नाही याचा भरोसा वाटत नाहीये मला. दूर दूर पर्यंत अंधाराशिवाय काहीच दिसत नाहीये मला. इतक्या रात्री एखाद्या हडळेने मला गिळलं तर पंचाईत व्हायची ? " सार्थक वैतागून म्हणाला.
" हाहाहा गुड जोकिंग हा ?बाय द वे तू टेकडीच्या मागच्या बाजूने येत आहेस का ?तिथे जरा वर्दळ कमी असते आणि तिथून.,." करणचं बोलणं अर्धवट तोडतच सार्थक परत सुरू झाला.
" काही काय बरळतोय बे, इथे साधी मुंगी पण नसेल आणि वर्दळ कमी आहे म्हणे..? I swear मी तिथे आल्यावर ना तुला आधी त्या सो कॉल्ड टेकडीवरून खाली फेकेन ?
"  तू आल्यावर ठरवू ते फेकायचं वगैरे? आता ऐक तिथून पुढे राइट साईड ला येऊन तिथून लेफ्ट मार आणि तिथून...... करण त्याला सांगतच होता की तेवढ्यात फोन कट झाला तसा त्याने परत ट्राय केला पण SWITCH OFF येत होता.
" तिथून कुठे बोल फास्ट चार्जिंग संपत आली माझ्या मोबाइलमधली.....hey man...शीट बंद झाला शेवटी मोबाईल ?

काय राव या चार्जिंग ला पण आताच संपायचं होतं का..?
असं म्हणत त्याने एकवार बंद झालेल्या मोबाईल कडे पाहिलं आणि दुसर्या क्षणी तो मोबाईल खिशात टाकून गाडीला किक मारली. अंधारातून वाट काढत तो पुढे निघाला. थोडे अंतर पार केल्यानंतर त्याला समोरच्या रस्त्यावर कार आणि दुचाकी दिसल्या. एकवेळ त्याच्या मनात विचार चमकून गेला की त्यांचा तर फक्त चौघांचा तिथे येण्याचा प्लान ठरलेला मग इथे एवढ्या गाड्या कशा काय ? जाऊदे असतील दुसरे पण पर्यटक असं म्हणत त्याने मनातला मघाशीचा विचार झटकला.
आणि परत निघालाच होता की अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचते. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक sarcastic smile झळकते.?अजून थोडा पुढे जाऊन तिथेच एका आडोश्याला बाईक लावतो आणि त्या दिशेने जात बुटांचा आवाज न करता तो तिथल्या एका कारच्या मागे लपून हळूच डोकावून समोर पाहतो तर.......
  ते पाहून आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती अन् गोंधळलेल्याचे संमिश्र भाव उमटतात.
त्याच्या मित्रांना सरप्राइज द्यायच्या इराद्याने तिथे लपून आलेला तो मात्र समोरचं दृश्य पाहून स्वत: सरप्राइज होतो. ?
समोर ७-८ माणसं तोंडावर मास्क लावून उभी असतात. सर्वात पुढे एक माणूस एका तरूणीच्या दिशेने बंदूक रोखून उभारलेला असतो. आता त्याचे हात पाय लटलटायला लागले काय करायचं सूचत नव्हतं.जीव कंठाशी आलेला....तो तसाच तिथून परत फिरण्याच्या तयारीत होता की तेवढ्यात
" ते एवढे सगळे माणसं शिवाय त्यांच्याकडे हत्यारही आहेत. ती तरूणी एकटी आहे. त्यांनी तिचं खरंच काही बरं वाईट केलं तर एका निष्पाप जीवाचा अंत होईल." त्याच्या मनाने त्याला सावध केलं.
" पण मी एकटा काय करू शकतो "
काहीही कर पण तुला तिची मदत करावीच लागेल. एक Doctor म्हणून जीव रूग्णाचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. पण..
No no विचार करत बसण्याची वेळ नाहीये ही, Dr.Sarthak you can do it. Come on sarthak let's do it. त्याने त्याच्या अंतर्मनाची हाक ऐकली. स्वत:ला encourage केलं आणि त्या लोकांकडे पाहिलं.
पण एक गोष्ट त्याने नोटीस केली होती ती म्हणजे घाबरून आरडाओरडा किंवा मदतीसाठी हाका मारत नव्हती.साधं झूरळ दिसलं तरी जीवाच्या आकांताने ओरडणार्या मुली अशा कंडीशन मध्ये इतक्या शांत कशा राहू शकतात.
" Stop this nonsense sarthak , इथे अशा सुनसान रस्त्यावर हाक मारली तरी ऐकायला कोण आहे किंवा भीतीने तिच्या तोंडून शब्द फूटत नसतील. Save her.."त्याच्या मनाने कौल दिला आणि त्यालाही तो पटला.

आता तो गाडीच्या दुसऱ्या बाजूने जरासा पुढे आला. त्या साइडला अंधार असल्याने तो कुणाला दिसू शकणार नव्हता. पण त्याला आता तिथून जरासं नीट दिसत होतं.चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी हालचाली जाणवत होत्या.
" इथे मी तुझ्याशी डील करायला आलेलो नाहीये.गपगुमान ती पेन ड्राईव्ह मला दे नाहीतर....जीवाला मुकशील" तो बंदूकधारी माणूस मोठ्या आवाजात म्हणाला.
" पेन ड्राईव्ह माय फूट" तीही तितक्याच उपरोधिकपणे बोलली.

उंच सडपातळ बांधा, केसांची हाय पोनी टेल, मान-पाठ-कंबर एका सरळ रेषेत, इन केलेला प्लेन शर्ट, दोन्ही हात जीन्सच्या खिशात घालून एक पाय स्ट्रेट तर दूसरा त्या पायापासून समोर गुडघ्यातून जरा आडव्या रेषेत दुमडून ती मात्र स्थिर नजर ठेवत challenging attitude मध्ये उभी होती. तिच्या एकूण एक बिहावेअर वरून तिच्या वागण्या-बोलण्यात भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.
इतक्या वेळ तिचं निरीक्षण करण्यात व्यग्र असलेला सार्थक त्या माणसाच्या ओरडण्याने भानावर आला.
" एए कुटय ती पेन ड्राईव्ह...च..चल काढ लवकर बाहेर" तो माणूस कातर आवाजात म्हणाला.
" देणार नाही." ती बेफीकिरपणे म्हणाली.
" मरायचय वाटतं तुला थांब दाखवतो." तो माणूस ट्रिगर लोड करत बोलला.
" तुझ्यासारख्याच्या हातून मरण्याएवढी मी मृत्यूवर उधार झालेली नाही." त्याच्या धमकीनंतर सुद्धा किंचितही न हलता ती परत त्याच टोनमध्ये म्हणाली.
"मग मर आता"

ती मात्र अजूनही त्याच पोझिशन मध्ये तिथे उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नसेल.
अन् गोळी झाडल्याचा आवाज झाला. क्षणभर कुणालाच कळलं नाही काय झालं ते....

" नाही.......... " सार्थक कानावर दोन्ही हात ठेवून जोरात ओरडला.

***

तिकडे टेकडीवर २ तास होऊन गेले तरी सार्थकचा पत्ता नाही हे पाहून त्याचे मित्र अतीव काळजीत पडलेले.ते तिघेही त्याला शोधण्यासाठी टेकडी मागच्या रस्त्यावर निघाले.
" करण, ती बघ सार्थकची बाईक " करणच्या बाईकवर मागे बसलेला आदित्य एका दिशेला हात करत म्हणाला तसा करणने गाडीला करकचून ब्रेक दाबला. 

ते सगळे बाईकच्या दिशेने पळाले. तिथे सगळीकडे बघितलं पण सार्थक कुठेच दिसत नव्हता.

तेवढ्यात करणच्या मोबाईल वर एका अननोन नंबर वरून फोन आला.
" What ...... okay okay आम्ही आलोच " त्याने फोन ठेवला आणि लगबगीने निघाले.


क्रमशः
काय झालं असेल सार्थकला? आणि ती तरूणी व तिच्या जीवावर उठलेली ती माणसं कोण असतील? प्रश्न पडलेत ना... मिळतील मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

©️®️ अबोली डोंगरे.

🎭 Series Post

View all