भाग 2
डॉक्टर डॉक्टर दील के डॉक्टर...... लुक एट मी........समीरचा टेबल नोक करते.....
काय हो डॉक्टर मी इथे आलेली सगळ्यांना कळतं तुम्हालाच कसं काय कळत नाही..... आज्ञा
मी रिकामा नाही आहे कोण येतं ते बघायला..... मला काम असते....... समीर डोक्यावर आठ्या पाडतच बोलला
बोला मिस ......काय झालं.....?
मिस आज्ञा.... माझं नाव आज्ञा आहे....., तुमच्या कसं काय लक्षात नाही हो ,मी रोज तुम्हाला माझं नाव सांगते आहे.... आज्ञा
कामाचं बोलूया......? काय त्रास होत आहे....?.... समीर
हे इथे दुखतय....... परत आज्ञा हृदयकडे बोट करत बोलली...
समीरने परत तीचा बेसिक चेकप केला....... आज्ञा तोंडाने सिटी वाजवत त्याच्याकडे मिश्कील भावाने बघत होती...
त्याला तिचं असं वागणं आवडलं नव्हतं .......पण त्याने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते.
त्याने तिला परत एक प्रिस्क्रिप्शन लिहून तिच्या हातात दिले.......
आज शेवटचा दिवस ना कॅम्प चा....... खूप काम करता हो तुम्ही..... आणि काम करत असताना तर तुम्ही फारच हॉट दिसता..... ते त्याला एक डोळा मारत बोलली... आणि मागे फिरून जायला निघाली...
सगळेजण रॅप अप .. करण्यात बिझी होते..... तेवढ्यात जोरदार कोणाला तरी मारायचा आवाज आला आणि ती व्यक्ती धाडकन खाली पडली.....
सगळ्यांचे लक्ष गेले तर तिथे नर्सच्या कपड्यांमध्ये एक मुलगी गालाला हात लावत खाली पडली होती....
काय झालं म्हणून बघायला सगळे तिथे धावत आले..... त्या मुलीच्या गालावर आज्ञा चे पाचही बोट उमटलेले होते आणि ती रागाने त्या मुलीकडे बघत होती.....
सगळे धावत येत असताना बघून त्या मुलीने तिथून पळ काढला .....आज्ञा ने डोळ्यांच्या इशाऱ्याने कुणाला काहीतरी खुणावले.....
काय झालं ...?कोण होती ती .....?तिला का मारलं .....?समीर
काय डॉक्टर .....कितीवेळा सांगितलं असे हॉट-शॉट बनून फिरत नका जाऊ..... या ब्लॅक शर्ट मध्ये ही तुम्ही कमालीचे हँडसम दिसून राहिले...... या बटन लावत जा वाईट नजरेने बघतात लोक ......म्हणत तिने परत त्याच्या शर्टच्या वरच्या बटन लावल्या.....
त्याने तिचा हात झटकला....... का मारलं तिला?.... समीर
ती तुमच्याकडे बघत होती....... आज्ञा
एवढ्यासाठी मारलं....... समीर थोडा रागातच बोलला
तुमच्याकडे कोणी नजर वर करून बघितलेला मला जमायचं नाही........आज्ञा
हे काय दादागिरी लावली आहे ....मला हे असलं मारामारी अजिबात खपणार नाही...... समीर थोडा आवाज मोठा करत बोलला
म्हणून म्हणते थोडं आजूबाजूला बघावं........ तुम्हाला माहिती आहे का ती पूर्ण पाच दिवस पाळत ठेवून होती तुमच्यावर.......... आणि तुम्हाला कळलं सुद्धा नाही.... आज्ञा
तू पण नाही आहेस का इथे पाच दिवसापासून....... टवाळेगिरी करते आहेस....... समीर
तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्यावर डॉक्टर..... तुम्ही वन पीस असे हॉट शॉट राहिले पाहिजेत..... आज्ञा
कोणी दिली तुला माझी रेस्पोंसिबिलिटी..... समीर
हा काय प्रश्न डॉक्टर...... अहो मीच दिली ना तुमची रिस्पॉन्सिबिलिटी मला............ बरं काळजी घ्या..... निघा लवकर.....
आणि हो थँक्यू फॉर दिस प्रिस्क्रिप्शन..... म्हणत तिने त्याला फ्लाईंग किस दिला नी तीच्या रॉयल एनफिल्ड वर जाऊन बसली.... डोक्यावर हेल्मेट घातलं नी वेगाने गाडी पळवली.....
समीरने डोक्यावर हात मारून घेतला....
******
एका जुन्या पडक्या गोडाउन मध्ये एका मुलीला चेअर बांधून ठेवलं होतं........
बोल कोणी पाठवलं होतं......?.... आज्ञा
माहित नाही........?... ती मुलगी
आज्ञानी जोराने तिच्या गालावर पाच-सहा झापडा मारल्या आता तिच्या नाकातून रक्त सुद्धा यायला लागलं होतं.....
सांगते की अजून पाहिजे....... आज्ञा रागात बोलत होती, तिचे डोळे रागाने लाल झाले होते.... तिने तिचे केस आपल्या मुठीत पकडून जोराने ओढले.... ते कळवळली
माणिक हॉस्पिटल च्या मालकाने ......ती घाबरतच बोलली
डॉक्टरच्या आजूबाजूलाही फिरकायच नाही .....चल जा इथून.... आज्ञा तिचा तोंड पकडत बोलली.... तशी ती मुलगी बाहेर पळाली.....
*******
मला माहित होतं तू इथेच भेटशील माणिक....... आज्ञा आपल्या हाताच्या मुठी आवळत बोलली....
माणिक एक बार मध्ये पेग रिचवत बसला होता.....
ये तू कोण आणि इथे काय करतेस आणि मला एकेरी आवाजाने हाक मारायची तुझी हिम्मत कशी झाली..... तसे दोन बॉडीगार्ड त्याच्या पुढे येऊन उभे राहिले...
त्या दोघांना बघून आज्ञा गालात हसली...
का पाळत ठेवत आहेस डॉक्टर समीर वर..... आज्ञा राग ओकत बोलली
त्याला मारायला.......? माणिक
डॉक्टरच्या दूर राहायचा हा..... त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये....... आज्ञा
काय करशील ....? स्वतःकडे बघ आधी.....एका झापडीत खाली पडशील....माणिक
जेवढ सांगितलं ना तेवढ ऐकायचं..... मनात तिने त्याचा डावा हात पकडला आणि जोरदार मुरगळला....
माणिक जोराने ओरडला त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता...
तिला मानिकच्या जवळ गेलेले पाहून त्याचे बॉडीगार्ड तिच्यावर धावून आले..... आज्ञा चे पण दोन बॉडी कट मागे उभे होते ते पण तसे समोर आले.... तिने त्यांना हाताने थांबायला सांगितले.... आणि दोघांवर आडवी होऊन तुटून पडली..... एका बॉडीगार्ड ची मान आपल्या दोन्ही पायात अडकाऊन तिने वाकडी केली तसा तो जमिनीवर पडला... दुसऱ्याच्या मानेवर कीक मारली तो पण जमिनीवर जाऊन पडला.... माणिक विव्हळत बसला होता....
ही लास्ट वॉर्निंग तुला, डॉक्टरच्या दूर राहायचं...... आज्ञा कपडे झटकत बाहेर पडली......
********
समीर खूप इमानदारीने त्याचं हॉस्पिटल चालवत होता...... गरिबांना मोफत ट्रीटमेंट देत होता..... त्यामुळे बऱ्याच लोकांचे हॉस्पिटल बसायला लागले होते..... त्यामुळे समीर चे बरेच दुश्मन निर्माण झाले होते त्यातलाच हा एक माणिक होता.....
********
आज्ञा तिच्या फ्लॅटवर निघून आली.... तिने एकदा समीरच्या रूम कडे बघितलं..... समीरच्या रूमचा लाईट सुरु होता ..... समीर काहीतरी काम करत बसला होता... त्याला घरी सुखरूप बघून तिला बरे वाटले...... फ्रेश होऊन जेवण करून ते झोपायला गेले.....
काय डॉक्टर इतकं चांगलं कोणी असतंय का...... हसत च ती झोपी गेली....
********
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा