भाग 1
"काय रापचीक माल आहे यार..."
"क्या बॉडी है....."
"कसला हॉट दिसतोय त्या व्हाईट शर्ट वर..... सगळे मसल्स उठून दिसत आहे"
बास....... एक शब्द बोलायचं नाही आता..... तो आपला माल हे लक्षात ठेवायचं..... तुमचा होणारा जिजा आहे तो... नजर वर करून बघायचं नाही हा....नाहीतर गाठ माझ्याशी आहे ........... एक आवाज जोराने कडाडला....
चार-पाच मुलींचा ग्रुप तिथे बसून टवाळकी करत होता......त्यातली एक .... जी आत्ताच गरजली होती....त्याला वरपासून खालपर्यंत बघत खुर्चीवर पाय लांब फोल्ड करून एकटक बघत खुर्चीवर रेलून बसली होती....आणि बाकीच्या मुली तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या.....
तर ही रावडी आज्ञा देशमुखपाटील.... देशमुखवाडी च्या आमदारांची एकुलती एक बिघडलेली कन्या... वय वर्ष 19...
, 5.7 उंची, जिम करून कमावलेला मजबूत पण कमनीय बांधा...... गोरा गुलाबी रंग, मोठे काळेभोर कोरीव डोळे, पाठीपर्यंत लांब केस, नाजूक नाक, गुलाबाच्या पाकळ्यांचा सारखे कोमल ओठ...... स्वभाव हट्टी ,तापट , आगाऊ आणि गर्विष्ठ... जे हवं ते काही करून मिळवणारी.... मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट.... मारामारी करणं आवडतं काम.,.. पण उगाचच कधी कोणाला त्रास न देणारी....
शिक्षणात अजिबात इंटरेस्ट नसलेली,... बारावी झाल्यानंतर शिकायचं म्हणून इकडे शहरात येऊन बी कॉमला ऍडमिशन घेतले होते.... वेगवेगळ्या गाड्या चालवण्याची भारी हाऊस..... तिला विमानापासून बाईक पर्यंत सगळ्या गाड्या चालवता येत होत्या..... एक्झरसाइज आणि जिम करायची मनापासून आवड होती...... मुली मधला हवा तसा एकही गुण तिच्या मध्ये नव्हता फक्त एक सोडून..... डान्स करायला तिला खूप आवडायचे त्या ती स्वतःचे भान हरपून डान्स करायची... जसं काही तिचं पहिलं प्रेम होतं..... डान्स
तर इथे शहरात आल्यापासून एका मुलाच्या मागे तीन महिन्यांपासून हात धुऊन पडलेली होती.... तिला तो खूप आवडत होता....आरक्षण आहे की प्रेम आहे हे तिला माहिती नव्हतं पण तिला तो हवा होता ....
वडगाव नावाच्या खेड्यात जवळ एका मोठ्या मैदानावर दोन दिवसांपासून एक मेडिकल कॅम्प अरेंज केला होता जिथे फ्री मध्ये लोकांचा चेकअप सुरू होता.... जो पाच दिवस चालणार होता..... त्यांच्याच विरुद्ध दिशेला हा मुलींचा टवाळक्या ग्रुप बसला होता , नी तिथल्या एका डॉक्टर बद्दल त्या बोलत होत्या......
डॉक्टर समीर कुलकर्णी.... हार्ट स्पेशलिस्ट..... वय वर्ष 24..... सहा फूट उंची,... रंग गव्हाळ गोरा...... बारीक सिल्की केस जेलने सेट केलेले... धारदार नाक,.. ब्राऊन डोळे..... आत्मविश्वासाने भरलेला चेहरा..... जिम करून कमावलेला सुदृढ बांधा.... डोळ्यांवर प्रेम लेस चष्मा..... लहान वयातच नावाला आलेला..... शांत, समजदार, खूप हार्ड वर्कर.... प्रामाणिकपणे आपले काम करणारा..... सरळमार्गी चालणारा... डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला मुलगा..
डॉक्टर समीर चे वडील सुद्धा डॉक्टर होते, त्यांचा एक छोट हॉस्पिटल होतं... दोन वर्षापुर्वी हार्ट अटॅक ने त्याचे वडील गेले होते.... हॉस्पिटल ला खूप मोठ्या हॉस्पिटल मध्ये बदलण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांचं होतं.... गरिबांना जमेल तितकी फ्री सेवा द्यायचं त्यांचं स्वप्न होतं... दोन वर्षात डॉक्टर समीरने खूप मेहनत घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं होतं..... आज त्याचं ते छोटसं हॉस्पिटल चार मजली असं मोठं झालं होतं तिथे सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध होत्या.... SMH... समीर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आज जगभरात ओळखलं जात होतं....
हॉस्पिटलच्या मागे त्याचा बंगलो होता... घरी आई आजी आजोबा आणि एक छोटी बहिण होती.....
समीर आज्ञा च्या कॉलेजमध्ये एका मेडिकल टॉपिक वर लेक्चर घ्यायला गेला होता, तेव्हाच आज्ञा ने त्याला पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला बघून पुरतीच घायाळ झाली होती....... मुलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नसलेली, पहिल्यांदा च समीरला बघून त्याच्या प्रेमात पडली होती.... तेव्हापासून तिने त्याचा पिच्छा पुरवला होता... आता तिने त्याच्या बंगलोरच्या अपोझिट फ्लॅटमध्ये राहायला गेली होती.... जिथून तिला त्याचा हॉस्पिटल आणि घर दोन्ही इझी ली दिसत होते.... ते बाल्कनीतून नेहमी हॉस्पिटल आणि घराकडे बघत असायची.... तिने दोन तीन गडीमाणसं ठेवले होते जे तिला समीरची माहिती पुरवायचे.... तो जिथे जायचे तिथे मॅडम आधीच टपलेल्या असायच्या...
आता हे समीरच्या पण लक्षात आले होते....
त्याच्या हॉस्पिटलचा फ्री कॅम्प सुरू होता तिथे पण दोन दिवसापासून मॅडम ठाण मांडून बसल्या होत्या...
समीरचं 1-1 पेशंटला चेक करण्याचे काम सुरू होतं....आता उन थोडा डोक्यावर आलं होतं म्हणून त्यांनी त्याचा डॉक्टरचा कोट काढून ठेवला होता.....आज त्याने व्हाइट शर्ट घातला होता , कॉलर ची दोन बटने उघडी होती ... हाताच्या बाया कोपरा वर फोल्ड केल्या होत्या... ज्यामुळे त्याचे बायसेप्स मसल्स दिसत होते...... जे बघून बाकीच्या मुली कमेंट करत होत्या....
चला पेशंट संपत आले ,आपली जायची वेळ झाली म्हणत आज्ञा आपल्या जागेवरून उठली, तिने आज ब्लू रेड चेकचा शर्ट ,खाली स्किन टाइट डार्क ब्लू जीन्स , त्यावर लेदर चे ब्लॅक शूज, डोळ्यांवर काळा गॉगल आणि केसांची मागे करून बांधलेली पोनी....... घातलं होतं
दोन पेशंट उरले होते आज्ञा त्यांच्या मागे जाऊन लाईन मध्ये उभी राहिली..... कॅम्प सुरू झाल्यापासून तिचं हे रोजचंच सुरू होतं पेशंट संपत आले किती चेकअपसाठी त्यांच्या मागे जाऊन उभी राहायची... आता तिथे चेकअप साठी असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांना सुद्धा माहित झालं होतं.... कोणीही तिला अडवत नव्हतं कारण सगळ्यांना माहिती होतं की ती एक आमदाराची कन्या आहे आणि ती कोणीही मध्ये आलं की त्यांना हाणून पाडायची.....
घ्या डॉक्टर तुमची मरीज आली ..... परमनंट काय ते मेडिसिन द्या काही बिचारी रोज आपल्यामागे चक्कर मारत असते......... डॉक्टर राज समीरला डोळा मारत हसत म्हणाला...
तिला बघून समीरच्या डोक्यावर आठ्या पडल्या, त्याला ती एक उद्धट आणि मग्रूर अशी मुलगी वाटायची... त्याला तिच्यामध्ये काडीमात्र चा ही इंटरेस्ट नव्हता...
आज्ञा त्याच्यासमोर खुर्चीत जाऊन बसली..... त्याने तिच्याकडे लक्ष नसल्याचे दाखविले....
डॉक्टर डॉक्टर दिलं के डॉक्टर..... ती बाईक ची key टेबलावर ठोकत बोलली.....ती त्याला जेव्हा पण भेटायचे तेव्हा अशीच आवाज द्यायची....
ह.......बोला मिस.....समीर डोक्यावर आठ्या पाढतच बोलला..
मिस आज्ञा.... आज्ञा नाव आहे माझं.....आज्ञा
काय झालं........... समीर
इथे दुखतय............ आपल्या हृदयाकडे बोट दाखवत आज्ञा बोलली..
समीरने तिचा बेसिक चेकअप केले आणि प्रिस्क्रिप्शन मध्ये पेपर वर काहीतरी लिहून तिच्या हातात दिलं......
तो तिचा चेकअप करत असताना ती त्याला एकटक बघत होती.......त्याचा तो होणारा स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणत होता....ती तेवढयात खुश होती....
तिने प्रिस्क्रिप्शन घेतले आणि बरं जायला वळली......
तिला जाताना बघून त्याने मोकळा श्वास घेतला...
काहीतरी आठवण यासारखा करत ती परत त्याच्याकडे आली...... तो परत श्वास रोखून तिच्याकडे बघत होता...
डॉक्टर दोन गोष्टी करायच्या........ एक हात कमरेवर ठेवत दुसऱ्या हाताने दोन बोट दाखवत आज्ञा बोलली....
तो फक्त नजर रोखून तिच्याकडे बघत होता....
एक ....हा व्हाईट शर्ट कधीच घालायचा नाही..... मी असताना माझ्यासमोर घातला तर चालेल....
आणि....... समीर
दुसरं .......या दोन बटन नेहमी बंद ठेवायच्या ........म्हणत तिने त्याच्या शर्टाच्या वरच्या दोन बटन लावल्या.....
आणि मी का म्हणून तुझं ऐकायचं......समीर खूप राग आला होता चेहरा शांत ठेवत तो बोलला.....
हे बघा मी प्रामाणिकपणे सांगते आहे....... तर ते ऐकायचं.....आज्ञा
नाहीतर........समीर
हे बघा तुम्हाला असं बघितलं तर माझी नजर विचालीत होते मनात भलते सलते विचार येतात...... काही वाईट झालं तर मला बोलायचं नाही.....म्हणत ती गालात हसत एक डोळा त्याला मारत निघून गेली....
काय पोरगी आहे ,कशाचीच भीती नाही........तो आवासुन तिच्याकडे बघत राहिला.........
**********
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा