Love ... Sky Is Not The Limit

Sameer aadnya

नमस्कार मित्रांनो


           योग्य व्यक्तीवर आणि खऱ्या प्रेमात फक्त आपली उन्नती होते , अधोगती नाही . उन्नती म्हणजे फक्त पैशाने अथवा बिजनेस नाही तर उन्नती आपल्या विचारांची , आपल्या कर्तृत्वाची , आपल्या स्वप्नांची .... जर प्रेमात ,नात्यात आपली अधोगती होत असेल तर आपण चुकीच्या नात्यात आहोत , समजून जावे .... म्हणूनच म्हणतात इश्काचा नाद लय भारी .... असे इश्क होणे सोपं काम नाही . 


            तू मिळाला / मिळाली नाही म्हणून जीव देतोय अथवा जीव घेतोय , तू माझी नाही तर कोणाची नाही , म्हणून ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यावरच हल्ला करणे , कधी एसिड फेकून तर कधी जिवे मारून .... हे प्रेम नाही मित्रांनो , ही विकृत , राक्षसी मानसिकता आहे . अश्या गोष्टींना प्रेमाचे नाव देऊन प्रेम सारख्या पवित्र बंधननाला दूषित करू नका ..... 


         प्रेम जर खऱ्या व्यक्तीवर झाले तर प्रेम काय काय शिकवते आणि माणूस कसा बदलतो..... हीच आपल्या कथेची थीम असणार आहे.           कथा पूर्णतः काल्पनिक आहे. व्यक्ती , स्थळ , system इत्यादी कशासोबत कथेचा संबंध नाही . त्यामुळे कथेचा संबंध कुठल्याच गोष्टी सोबत जोडू नका. कथेचा उद्देश मनोरंजन करणे येवढाच आहे. कुठलीही चुकीची माहिती पोहचवण्याचा काही उद्देश नाही. 

        Love … sky is not limit , नावावरूनच कळते की प्रेमाला बांधता येत नाही , त्याची खोली सुद्धा मोजता येत नाही . एकदा प्रेम झाले की माणूस ते मिळायला काहीही करू शकते. आता ते प्रेम कुठलंही असू द्या माणसावर चे असो वा कामावरचे .... की आणखी काही .... हे तर कथा वाचल्यावर समजणार.... 
कथा कशी वाटते नक्की कळवत चला... ?


----------------------- 
भाग 1

"काय रापचीक माल आहे यार.."


"क्या बॉडी है...."


"कसला हॉट दिसतोय त्या व्हाईट शर्टमध्ये , सगळे मसल्स उठून दिसत आहे"


" बास sss … एक शब्द बोलायचं नाही आता. तो आपला माल हे लक्षात ठेवायचं. तो तुमचा होणारा जिजा आहे . नजर वर करून बघायचं नाही हा....नाहीतर गाठ माझ्याशी आहे" , एक करारी आवाज जोराने कडाडला....


             चार-पाच मुलींचा ग्रुप तिथे बसून टवाळकी करत होता. त्यातली एक , जी आत्ताच गरजली होती त्याला वरपासून खालपर्यंत ताडत खुर्चीवर पाय लांब फोल्ड करून एकटक बघत खुर्चीवर रेलून बसली होती आणि बाकीच्या मुली तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या. 


           तर ही रावडी आज्ञा देशमुखपाटील. देशमुखवाडीच्या आमदारांची एकुलती एक बिघडलेली कन्या. वय वर्ष 19, 

, 5.6 उंची, जिम करून कमावलेला मजबूत पण कमनीय बांधा, गोरा गुलाबी रंग, मोठे काळेभोर कोरीव डोळे, पाठीपर्यंत लांब केस, नाजूक नाक, गुलाबाच्या पाकळ्यांचा सारखे कोमल ओठ,स्वभाव हट्टी ,तापट , आगाऊ आणि गर्विष्ठ... जे हवं ते काही करून मिळवणारी.... मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट.... मारामारी करणं आवडतं काम.,.. पण उगाचच कधी कोणाला त्रास न देणारी....


शिक्षणात अजिबात इंटरेस्ट नसलेली,... बारावी झाल्यानंतर शिकायचं म्हणून इकडे शहरात येऊन बीकॉमला ऍडमिशन घेतले होते.... वेगवेगळ्या गाड्या चालवण्याची भारी हाऊस..... तिला ट्रक पासून ते बाईक पर्यंत सगळ्या गाड्या चालवता येत होत्या. एक विमान/प्रायव्हेट जेट काय ते चालवायचं राहिले होते, ते पण तिला चालवायचं होते पण अजुन तिला त्यासाठी लायसेन्स मिळाले नव्हते, त्यातही तिची धडपड सुरू होती. 


         एक्झरसाइज आणि जिम करायची मनापासून आवड होती. मुली मध्ये हवा तसा एकही गुण तिच्या मध्ये नव्हता फक्त एक सोडून..... डान्स करायला तिला खूप आवडायचे , त्यात ती स्वतःचे भान हरपून डान्स करायची... जसं काही तिचं पहिलं प्रेम होतं ' डान्स ' . 


        तर इथे शहरात आल्यापासून एका मुलाच्या मागे तीन महिन्यांपासून हात धुऊन पडलेली होती.... तिला तो खूप आवडत होता..... अट्ट्रॅक्शन आहे की प्रेम , हे तिला कळले नव्हतं पण तिला तो हवा होता ....


       वडगाव नावाच्या खेड्याजवळ एका मोठ्या मैदानावर दोन दिवसांपासून एक मेडिकल कॅम्प आयोजित केला होता, जिथे फ्री मध्ये लोकांचा चेकअप सुरू होता, जो पाच दिवस चालणार होता..... त्यांच्याच विरुद्ध दिशेला हा मुलींचा टवाळक्या ग्रुप बसला होता , आणि तिथल्या एका डॉक्टर बद्दल त्या बोलत होत्या......


        डॉक्टर समीर धर्माधिकारी , MD , आणि आता DM in cardiology ला appear झाला होता आणि मोठमोठ्या सर्जनला असिस्ट करत होता , त्याला हार्ट स्पेशालिस्ट बनायचे त्याचं स्वप्न होते. , सहा फूट उंची, रंग गव्हाळ गोरा , बारीक सिल्की केस जेलने सेट केलेले... धारदार नाक,.. ब्राऊन डोळे..... आत्मविश्वासाने भरलेला चेहरा..... नियमित व्यायामाने करून कमावलेला सुदृढ बांधा.... डोळ्यांवर फ्रेमलेस चष्मा..... लहान वयातच नावाला आलेला.....खूप हुशार , शांत, समजदार, खूप हार्ड वर्कर.... प्रामाणिकपणे आपले काम करणारा..... सरळमार्गी चालणारा... डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला मुलगा..


        डॉक्टर समीरचे वडील सुद्धा डॉक्टर होते, त्यांचे एक हॉस्पिटल होते ... दोन वर्षापुर्वी हार्ट अटॅकने त्याचे वडील गेले होते.... हॉस्पिटलला खूप मोठ्या मल्टीस्पेालिटी हॉस्पिटल मध्ये बदलण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांचं होतं , गरिबांना जमेल तितकी फ्री सेवा द्यायचं त्यांचं स्वप्न होतं . दोन तीन वर्षात डॉक्टर समीरने खूप मेहनत घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं होतं..... आज त्याचं ते छोटसं हॉस्पिटल चार मजली असं मोठं झालं होतं तिथे सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध होत्या.... तिथे चांगले चांगले डॉक्टर्स काम करत होते . SMH... समीर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आज देशात ओळखलं जात होतं....


        हॉस्पिटलच्या मागे त्याचा बंगलो होता... घरी आई, आजी , आजोबा आणि एक छोटी बहिण होती. 


       समीर आज्ञाच्या कॉलेजमध्ये एका मेडिकल टॉपिक वर लेक्चर घ्यायला गेला होता, तेव्हाच आज्ञाने त्याला पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला बघून पुरतीच घायाळ झाली होती. मुलांमध्ये अजिबात इंटरेस्ट नसलेली, पहिल्यांदाच समीरला बघून त्याच्या प्रेमात पडली होती, हा पण ते प्रेम आहे की आणखी काही हे तिला अजून कळले नव्हते , पण तो मला हवाय एवढेच तिच्या डोक्याने पक्क केलं होते, तेव्हापासून तिने त्याचा पिच्छा पुरवला होता... 


          आता ती त्याच्या बंगलोच्या अपोझिट फ्लॅटमध्ये राहायला गेली होती.... जिथून तिला त्याचे हॉस्पिटल आणि घर दोन्ही इझीली दिसत होते.... ती बाल्कनीतून नेहमी हॉस्पिटल आणि घराकडे बघत असायची.... तिने दोन तीन गडीमाणसं ठेवले होते जे तिला समीरची माहिती पुरवायचे.... तो जिथे जायचे तिथे मॅडम आधीच टपकलेल्या असायच्या...


       आता हे समीरच्या पण लक्षात आले होते....


       त्याच्या हॉस्पिटलचा फ्री कॅम्प सुरू होता तिथे पण दोन दिवसापासून मॅडम ठाण मांडून बसल्या होत्या...


        समीरचं 1-1 पेशंटला चेक करण्याचे काम सुरू होतं....आता उन थोडं डोक्यावर आलं होतं , म्हणून त्याने त्याचा डॉक्टरचा कोट काढून ठेवला होता.....आज त्याने व्हाइट शर्ट घातला होता , कॉलरची दोन बटने उघडी होती ... हाताच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या... ज्यामुळे त्याचे बायसेप्स मसल्स दिसत होते...... जे बघून बाकीच्या मुली कमेंट करत होत्या....


          " चला पेशंट संपत आले ,आपली जायची वेळ झाली "..... म्हणत आज्ञा आपल्या जागेवरून उठली, तिने आज ब्लू रेड चेकचा शर्ट ,खाली स्किन टाइट डार्क ब्लू जीन्स , त्यावर लेदरचे ब्लॅक शूज, डोळ्यांवर काळा गॉगल आणि केसांची मागे करून बांधलेली पोनी....... ती भलतीच हॉट दिसत होती. 


           दोन पेशंट उरले होते , आज्ञा त्यांच्या मागे जाऊन लाईन मध्ये उभी राहिली..... कॅम्प सुरू झाल्यापासून तिचं हे रोजचंच सुरू होतं , पेशंट संपत आले की ती चेकअपसाठी त्यांच्या मागे जाऊन उभी राहायची... आता तिथे चेकअप साठी असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांना सुद्धा आज्ञा प्रकरण माहित झालं होतं.... कोणीही तिला अडवत नव्हतं कारण सगळ्यांना माहिती होतं की ती एक आमदाराची कन्या आहे आणि ती कोणीही मध्ये आलं की त्यांना हाणून पाडायची....." घ्या डॉक्टर साहेब , तुमची मरीज आली ..... परमनंट काय ते औषध द्या काही मॅडम ला , बिचाऱ्या रोज आपल्यामागे चक्कर मारत असते " ......... डॉक्टर राज समीरला डोळा मारत हसत म्हणाला...


" बिचाऱ्या ?म्हणायला नाही पाहिजे पण एखाद्या चुडेल पेक्षा काही कमी नाही "....तिला बघून समीरच्या डोक्यावर आठ्या पडल्या, त्याला ती एक उद्धट, वाया गेलेली आणि मग्रूर अशी मुलगी वाटायची... त्याला तिच्यामध्ये काडीमात्र ही इंटरेस्ट नव्हता...


       त्याचं बोलणं ऐकून राजला खूप हसू आले होते... त्याला माहिती होते ती समीरला थोडी सुद्धा आवडत नाही , ती आजूबाजूला असली तरी तो uncomfortable होतो , आणि हाच डाव साधून तो समीरला त्रास द्यायचा. 


       डॉक्टर राज समीरच्या हॉस्पिटल मध्ये काम करत होता, समीरचा कॉलेज पासूनचा चांगला मित्र होता. त्याला समीर चे हॉस्पिटल बाबत चे स्वप्न माहिती होते. राजने सुद्धा आपल्या जिवाचं रान केले होते त्यासाठी. राज एकदम जॉली स्वभावाचा अगदी समीरच्या विरुद्ध. सतत हसत मस्करी करत असायचा. वातावरण हलकेफुलक असायचे त्याचामुळे. 


" चुडेल इतनी हसीन असेल तर आपल्याला अशी चुडेल सुद्धा चालेल "..... राज 


" घेऊन घे तू ..".... समीर कसेतरी तोंड करत बोललात्याला बघून राज खळखळून हसायला लागला.


" Have a happy hot shot time ".... आज्ञा जवळ येताना दिसली तसा राज तिथून निसटला.आज्ञा त्याच्यासमोर खुर्चीत जाऊन बसली..... समीरने तिच्याकडे लक्ष नसल्याचे दाखविले....


" डॉक्टर डॉक्टर दिलं के डॉक्टर ! " .... ती बाईक ची key टेबलावर ठोकत बोलली.....ती त्याला जेव्हा पण भेटायचे तेव्हा अशीच आवाज द्यायची....


" ह.......बोला मिस.." ...समीर डोक्यावर आठ्या पाढतच बोलला..


" मिस आज्ञा.... आज्ञा नाव आहे माझं.." ...आज्ञा


" काय झालं?" ........... समीर


" इथे दुखतय..".......... आपल्या हृदयाकडे बोट दाखवत आज्ञा बोलली..


समीरने तिचा बेसिक चेकअप केले आणि प्रिस्क्रिप्शन मध्ये पेपर वर काहीतरी लिहून तिच्या हातात दिलं......


तो तिचा चेकअप करत असताना ती त्याला एकटक बघत होती.......त्याचा तो होणारा स्पर्श, तिच्या अंगावर शहारे आणत होता....ती तेवढयातच खुश होती....


तिने प्रिस्क्रिप्शन घेतले आणि परत जायला वळली......


तिला जाताना बघून त्याने मोकळा श्वास घेतला...


काहीतरी आठवण यासारखा करत ती परत त्याच्याकडे आली...... तो परत श्वास रोखून तिच्याकडे बघत होता..." डॉक्टर दोन गोष्टी करायच्या.." ...... एक हात कमरेवर ठेवत दुसऱ्या हाताने दोन बोट दाखवत आज्ञा बोलली....


तो फक्त नजर रोखून तिच्याकडे बघत होता....


" एक ....हा व्हाईट शर्ट कधीच घालायचा नाही..... मी असताना माझ्यासमोर घातला तर चालेल....आणि ..."..... आज्ञा 


" आणि...?" .... समीर


" दुसरं .......या दोन बटन नेहमी बंद ठेवायच्या " ........म्हणत तिने त्याच्या शर्टाच्या वरच्या दोन बटन लावयाला गेली ..... त्याला तिचे असे जवळ येणे अजिबात आवडलेले नव्हते. 


" आणि मी का म्हणून तुमचं ऐकायचं?" ......समीर खूप राग आला होता , चेहरा शांत ठेवत तो बोलला.....


" हे बघा , मी प्रामाणिकपणे सांगते आहे....... तर ते ऐकायचं" .....आज्ञा


" नाहीतर?" ........समीर


" हे बघा, तुम्हाला असं बघितलं तर माझी नजर विचलीत होते , मनात भलते सलते नको ते विचार येतात...... काही वाईट झालं तर मला बोलायचं नाही.."...म्हणत ती गालात हसत एक डोळा त्याला मारत निघून गेली....


" काय मुलगी आहे ,कशाचीच भीती नाही" ........तो आवासुन तिच्याकडे बघत राहिला...**********


क्रमशः
🎭 Series Post

View all