Login

Love ... Sky is not the limit 9

Sameer Aadnya

भाग 9




" कसली भारी दिसते यार ती ".... राज 


" तुझं डोकं खराब झाले आहे ...".... समीर


" ती खरंच खूप गोड आहे " ... राज 


" सगळे पागल माझ्याच राशीला "..... समीर 


" कसली क्यूट दिसते हसली की , गालावर किती छान खळी पडते " ... राज 



            समीर आणि राज समीरच्या रूमच्या बाल्कनी मध्ये उभे आज्ञा आणि सायलीला बघत होते. राज सायली बद्दल बोलत होता आणि समीरला वाटत होते आज्ञा बद्दल बोलतोय . 


            समीरने बघितले तर खरंच आज्ञाच्या गालावर खळी पडली होती , राजचे भाग्य चांगले म्हणावं की आज्ञाचा पण गालावर खळी पडत होती नाहीतर आता तो पुरताच पकडल्या गेला असता. 


" राज , are you mad , जास्ती बघू नकोस , डोक्यावर बसतील त्या "..... समीर थोडा मोठ्याने बोलला. तसा राज भानावर आला.


" बापरे , काय करत होतो मी , राज बेटा control yourself "..... राज भानावर आला. 


" Are you feeling jealous ?".... राज मस्करीच्या सुरात बोलला. 


" मी कशाला जेलस होणार , मी जस्ट सांगत होतो तुला , she is not our type girl "..... समीर 



" तुझं कॉलेज पासून असेच आहे , ही आपल्या टाईपची नाही , ती आपल्या टाईप ची नाही, असे करत तू मला आतापर्यंत ब्रम्हचारी ठेवलेस "..... राज  


" कुठल्याही मुलीच्या मागे जायचा तू ! ".... समीर 


" आपल्या टाईपची नाही म्हणजे काय , तुला काय उलट्या पायांची हवी काय ?" .... राज 


" चेटकीण बरी त्यांच्या पेक्षा ".... समीर 


" हे भगवान , कोणत्या मुहूर्तावर तू माझ्या आयुष्यात आलास , देवा वाचव मला " ..... राज देवाला हात जोडत बोलला. 


" मी तर म्हणतो देवा , या मॅडम लिहूनच टाक तू या डॉक्टरच्या आयुष्यात ".... राज 


" काय ?" .... समीर 


" मग काय , यांच्या शिवाय तुझी बोलती कोणीच बंद नाही करू शकत ".... राज 


          ही दोघं बोलतच होती की तेवढयात खळखळून हसण्याच्या आवाज आला आणि दोघांचं लक्ष परत समोर गेले. 


          आज्ञा आणि सायली हसत होत्या, हसतांना दोघीही खूप सुंदर आणि निरागस दिसत होत्या. 


आज्ञाने डोक्यावर हेल्मेट चढवले , बाईकला किक मारली , सायली तिच्या मागे बसत होती त्या वेळेचा फायदा घेत आज्ञाने समीरला बघून फ्लायिंग किस केले .


" ओह गॉड , यांना कळले मी इथे उभा आहे ते , म्हणजे परत व्राँग सिग्नल गेले असणार !"..... समीर आज्ञाकडे बघत मनातच बोलला. 


           आज्ञाने समीरला बघून बत्तिशी दाखवली आणि दोघीही कॉलेजसाठी निघाल्या. गप्पागोष्टी करत दोघीही कॉलेजला पोहचल्या. 


" सायली , तू पण किती हुशार आहेस , मग तू का डॉक्टर नाही झाली ?".... आज्ञा 


" नाही ग , दादाचं लाईफ बघतेय ना , वेळेचा काही ताळमेळ नसतो , हॉस्पिटल मधून फोन आला की हातातला घास सोडून लगेच पळतो , इतकं dedication लागते , खूप प्रेम करतो तो आपल्या कामावर , मला नसते जमले असे काही. आणि लहानपणा पासून प्रोफेसर व्हायचं माझं स्वप्न आहे " ... सायली 


" Good ".... आज्ञा 


" आज्ञा , तू पण कर ना बाई थोडा फोकस अभ्यासावर! "..... सायली 


" करतेच की , पास होते ना दरवर्षी "..... आज्ञा 


" तसे नाही ग , असं आपलं काहीतरी आयुष्यात बनण्याचे ध्येय असायला हवे , स्वप्न असायला हवे , जे मिळवण्यासाठी आपण काहीपण करू शकतो, कितीही मेहनत घेऊ शकतो, असे काहीतरी "..... सायली 


" आहे ना "..... आज्ञा


" काय ?".... सायली 


" लग्न "....आज्ञा 


" व्हॉट ? आज्ञा जीवन एकदाच मिळते , असे गमतीत नसते घ्यायचे "..... सायली 


" नो नो , I am serious , माझा तर सात जन्माचा प्लॅन आहे , सात जन्मासाठी माझं ध्येय ठरले आहे , आणि पुढे पण रीनिव होतो काय ते पण बघायचं आहे "...... आज्ञा


" हे भगवान , मी पण कोणाला सांगते आहे "....आज्ञाच्या गप्पा ऐकून सायलीने डोक्यावर हात मारला. 


" You are tooooooooooo cute re! " .... आज्ञा 


" लग्न , कोणासोबत ?".... सायली 


" मुलासोबत " ... आज्ञा 


तिचं ऐकून सायलीने परत डोक्यावर हात मारून घेतला . 



" येह सायली , breakfast साठी thank you , खूप दिवसांनी असा मस्त नाश्ता झाला आहे ".... आज्ञा 


" ये काही काय , आपण फ्रेंड्स आहोत "... सायली 


" हो ग , तरी पण "....आज्ञा 


" आता दादाचा पण मित्र येतो , तो तर हक्काने येतो , तो काय thank you वगैरे नसतो बोलत , सरळ ऑर्डर सोडतो ".... सायली 


" तो तर जावईच आहे "..... आज्ञा तोंडातल्या तोंडात पुटपुटली 


" काय ?".... सायली


" काही नाही , ये तुझ्या दादाचं लग्न ठरतंय काय? "...... आज्ञा 


" सध्यातरी नाही , पण आता होईलच लवकर , आईला सूनबाई आणायची खूप घाई झाली आहे , रोजच कुठला ना कुठला फोटो दादाला दाखवत असते . ".... सायली 


" मग केली काय तुझ्या दादाने कुठली मुलगी पसंत ?".... आज्ञा एक आढावा घेत होती, जेव्हापासून समीरच्या लग्नाचं त्याचा आईने विषय काढला , तिचा जीव मुठीत आला होता.  


" नाही ग "..... सायली 


आज्ञाने सुटकेचा श्वास सोडला. 


" तो पण खूप हट्टी आहे , नाही म्हणतो सद्ध्या लग्न करायचं , पण आई आहे ना करेलच बघ त्याला तयार "..... सायली 


ते ऐकून आज्ञाला परत टेन्शन आले. 



" बरं , चल कॉलेज झाल्यावर डान्स प्रॅक्टिस साठी भेटू , बाय ".... आज्ञा 


" हो , बाय "..... सायली. 


दोघीही आपापल्या क्लास मध्ये निघून आल्या. 


..........


आज्ञाच्या मोबाईलची बीप वाजली . 


" ओह गॉड, कोण आहे , रविवारी सुद्धा सोडत नाहीत "..... आज्ञाने मोबाईल हातात घेतला. 


तिला फोनवर काही मिस कॉल दिसले . काही मेसेज सुद्धा आलेले दिसत होते. 


 आज्ञाने मोबाईल हातात घेत मेसेज वाचला आणि डोक्यावर हात मारून घेतला..


" यार असे कोण वागते , इतकी छान रविवारची दुपार , आठवड्यातून एक दिवस मिळतो दुपारी झोपायला, पण नाही आमच्या डॉक्टरांना ते पण बघावल्या जात नाही .... " आज्ञा स्वतःशीच बडबड करत उठली , होती त्या अवतरताच थोडे केस वगैरे ठीक करत आपली बाईकची किल्ली घेतली. 


" चलो बुलावत आया है , डॉक्टर ने बुलाया है "....... काही मिनिटातच ती निश्चित स्थळी ( मोबाईल मध्ये जो ॲड्रेस होता तिथे ) पोहचली. 


" Library !", समोरचे ठळक अक्षरात लिहिलेले नाव आज्ञाने मोठ्याने वाचले , डोक्यावरचे हेल्मेट काढत बुलेटच्या मागच्या भागात अडकवले.


 " चलो आज थोडा पढा जाये ! " , बाईक च्या आरश्यात बघत अज्ञाने केस नीट केले नी ती सज्ज झाली पुढली कारवाई करायला. 


            तर तुम्हाला आता कळलेच असेल की आपले समीरराव लायब्ररीमध्ये आले होते आणि आज्ञाला तसा मेसेज आला होता. तर प्रत्येक मुलीला प्रिय अशी झोप सोडून madam नेहमी प्रमाणे साहेब होते तिथे पोहचल्या होत्या... चला तर बघू काय होते पुढे . 


            आज्ञा पळतच वरती लायब्ररी मध्ये आली . लायब्ररी तशी खूप मोठी होती . आज्ञा समीर कुठे दिसतोय बघत लायब्ररीवर चौफेर नजर फिरवत होती . आणि फायनली एकदाचा समीर तिला दिसला. तो लायब्ररी मध्ये सगळ्यात शेवटी एका कॉर्नर मध्ये खिडकीजवळ टेबलवर काही पुस्तकं वाचत बसला होता. 


" Oh god , he is killing me ! " ... आज्ञा मनातच त्याला बघत बोलत होती , समीर दिसत सुद्धा तसाच होता .. एकदम कॅज्यूअल लूक मध्ये होता तो , खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे त्याचे केस थोडे कपाळावर आले होते , डोळ्यांवर क्यूटसा चष्मा ,नजर पुस्तकात , आणि आज्ञाने कितीही वॉरनिंग दिली असली तरी तो ती कधीच ऐकायचा नाही , त्याच्या शर्टच्या वरच्या दोन बटन नेहमी ओपन असायच्या . जसे आज्ञाचे लक्ष गेले त्याच्या शर्ट कडे , आज्ञा तडक जाऊन त्याचा पुढ्यात बसली. 


" इतका छान Sunday, कधीतरी स्वत:साठी वेळ मिळतो , पण नाही या मिस ला ते बघावल्या जात नाही ".....समीर मनातच बोलत होता . आज्ञा तिथे येऊन बसलेली त्याचा लक्षात आले होते पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही , वाचण्यात गुंग आहे असे दाखवले . 


" डॉक्टर डॉक्टर ...."... हळूवार आवाज देत तिने गाडीची किल्ली बेंच वर थोडी ठकठकली...


        त्याने एकदा तिच्याकडे बघितले, आणि परत बुक मध्ये लक्ष केंद्रित केले. 


तिने परत सेम , टेबल वर किल्ली ठोकली... 


" Sh ssss ......"...... लायब्ररीयनने इशारा केला , ते बघून आज्ञाने तोंड वाकडे केले . पण तरी तिची चुळबूळ सुरू होती . 



" हॅलो मॅडम, तुम्ही इथे ......".... लायब्ररीयन


" मी यांच्या सोबत आहे "..... आज्ञा समीरकडे इशारा करत 


" नाही ".....समीर 


      समीरच्या उत्तराने ती त्याच्याकडे नाक गाल फुगवून बघत होती. 


" मॅडम इथे फक्त रिडिंग करण्यासाठी बसता येते ".. .. लायब्ररीयनने तिथे असलेला बोर्ड कडे इशारा करत दाखवले.


" हा तर मी जातच होते पुस्तक आणायला...."...आज्ञा , आणि जागेवरून उठून बुक आणायला गेली. बुक्स आणि आज्ञाचे तर दूर दूर पर्यंत काही नाते नव्हते , ती बुक शेल्फ जवळ जात बुक्स बघत होती... 


" बापरे , लोकं काय काय वाचता…. किती जाडी बुक्स आहेत इथे , उचलायला पण भारी " आज्ञा स्वतःशीच बडबड करत शेवटी तिने एक पुस्तक काढले आणि समीर बसला होता तिथे येत होती..


" समीर ……...लोहचुंबक .....", राज आज्ञाना तिथे येताना बघून समीरच्या कानात कुजबुजला . 


" माहिती आहे . ".... समीर 


" काय ? ... म्हणजे तुम्ही प्लॅनिंग करून आला आहात ? ... मग तू मला का आणले सोबत ?" .... राज 


" बकवास नको करू ".... समीर 


" वाह ! आम्ही काय तर बकवास करतो , अन् तुम्ही प्लॅनिंग करता त्याचं काय ?"..... राज 


" शट अप राज "....समीर 


" मग ती इथे कशी ?".... राज 


" हे नवीन आहे काय ?"....समीर 


" ते ही आहेच म्हणा.... but she loves you lot re ... काय काय करते बिचारी तुझ्यासाठी "..... राज



" This is not love "..... समीर


" तुला कसे माहिती ?".... राज 


" प्रेम असे नसते ..."....समीर 


" मग कसे असते ?".... राज 


" I don't know आणि मला या फालतू गोष्टींसाठी वेळ पण नाही आहे "..... समीर 


" परफेक्ट मुलगी पाठवली आहे मग देवाने तुझ्यासाठी , हीच तुला प्रेमाचा अर्थ समजवेल "..... राज समीर ला चिडवत होता. 


" राज चूप हा !"..... समीरने राज कडे रागाने बघितले. 


" पण तुला माहिती होते ही इथे येणार आहे तर मला का घेतले तू सोबत ? ".... राजचे प्रश्न काय संपेना . 


" म्हणूनच घेतले ...".....समीर 


" ही ही ही , तू घाबरतो तिला !".... राज 


"हॅलो आज्ञा , what a pleasant surprise "..... राज 


" जहा पिया , वहा मै ...... पण तुम्ही आहातच काय इथे ? ".... आज्ञा 


" काय करावं, तुमच्यामुळे रहावच लागते , तुम्ही पिच्छा करणे सोडा , म्हणजे मला पण फ्रीली जगता येईल हो "..... राज 



" ही ही ही , डॉक्टर घाबरतात मला, good progress .....Healthy relationship ची सगळ्यात इंपॉर्टन्ट गोष्ट , चला एक एक पाऊल पुढे पडत आहे . बाप्पा तूच रे तूच, तुलाच माझी काळजी ! ", आज्ञा वरती बघत नमस्कार करत बोलली . 


ते ऐकून राजला तर खूप हसू येत होते . 


" काहीच होणार नाही माहिती असूनही जबरदस्त positive राहता तुम्ही .... भारीच आवडला मला तुमचा हा गुण !" ..... राज हसतच कौतुकानं बोलला. 


" सगळी डॉक्टरांची कृपा ! "..... आज्ञा 


           समीर खाली बघत बुक वाचत होता, पण या दोघांच्या सुरू असलेल्या खुसुरपुसुर मुळे बराच डिस्टर्ब होत होता. कितीही लक्ष द्यायचे नाही म्हटले तरी आज्ञाचे शब्द त्याचे लक्ष विचलित करत होते. 



" तुम्हाला पण वाचनाची आवड दिसतेय?"....राज 


" तोच तर प्रॉब्लेम आहे , देवा तू आमची जोडी तर बनावलीस , छत्तीस नाही पण एकतरी गुण आमचा मिळवायला हवा होता तू , चलो कोई गल नी , आपण मिळवून घेऊ ".....आज्ञा 


              ' जोडी ' शब्द ऐकून समीरने कसनुसा चेहरा करत आज्ञाकडे बघितले . राजला तर तो खूपच बिचारा वाटत होता, त्याला जाम मजा येत होती, समीरने त्याचा Sunday बोर केला होता लायब्ररी मध्ये आणून, तर आता राज फुल ऑन एन्जॉय करत होता . 



" बापरे , किती पुस्तकी किडे आहेत इथे , यांच्यामुळेच आपले भविष्य उज्वल आहे "..... आज्ञा समीरकडे बघत बोलत होती. 


" खरं आहे आणि यांच्यामुळे आम्हाला पण रिडिंग करावं लागते ".... राज त्याच्यावर किती जबरदस्ती होते असे दाखवत होता. 


" काय रीड करत आहात ?"....आज्ञा


" Love story ! ".... राज 


" Love story, Wow " ..... आज्ञा जरा मोठ्याने ओरडली 


" Sh ssss "..... लायब्ररीयन 


" Sorry Sorry "..... आज्ञा 


" डॉक्टरांना द्या ते वाचायला , त्यांना फक्त चिरफाड , हार्ट चे पंपिंग जंपिंग कळतं , हे बूक वाचून ॲक्चूअल मध्ये दिल धडकने काय असते ते तरी कळेल डॉक्टर डॉक्टर दिल के डॉक्टरांना ".... आज्ञा 


        समीरने बारीक डोळे करत तिच्या कडे बघतील, आणि मान हलवत परत बुकमध्ये लक्ष केंद्रित केले. 


" मिस, तुम्ही हे काय लहान मुलांचे पुस्तक घेऊन बसले आहेत? "... ...राज


" अहो आमच्या झंपू टंपूला काय psychology, hemoglobin, pathalogy , angioplasty च्या गोष्टी सांगू काय , दोघांपैकी कोणाला तरी नॉर्मल वागावं लागेल ना..! "..... आज्ञा 


( आज्ञा रिड करायला बुक आणायला गेली तेव्हा तिला सुचत नव्हते कुठले बुक घेऊ आणि तिथे एकही पुस्तक तिच्या ओळखीचे दिसले नव्हते , तर तिने छोट्या मुलांच्या गोष्टीचे पुस्तक आणले होते. )


" झंपू टंपू ?" .... राज 


" आमची होणारी मुलं ".....आज्ञा


" मी झंपू टंपू चा काका .."..... राज तोंड दाबून हसायला लागला . 



" अहो पण इथे तो तुम्हाला शत्रू सुद्धा बनवायला तयार नाही , आणि तुम्ही तर डायरेक्ट लग्न, मुलांवर पोहचला "..... राज 


" You know Dr Raj , most successful Love story starts on this hate note only ! तुम्ही बघा आमची लव्ह स्टोरी अजरामर होईल , अगदी हीररांझा , लैलामजनू, रोमिओ ज्युलियट , तशीच समीराज्ञा ची लव्हस्टोरी !"....आज्ञा 


ते ऐकून समीरने डोक्यावर हात मारून घेतला. 


" तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर बाहेर जावा.... You two are disturbing me and others too ".... समीर थोडा वैतागत राजाकडे बघत बोलला. 


" Disturbing or distracting doctor , clear yourself "..... आज्ञा भुवया उडवत बोलली. 


" Shsss!! ".... लायब्ररीअन


        तिघही चुपचाप वाचत होते. आज्ञा मात्र समीरचा चेहरा वाचण्यात बिझी होती. 


" You are very hot ! ".... आज्ञाने एका पेपर लिहिले आणि ते समीरच्या बुक वर ठेवले ... त्याने बुकचे पान पालटले..



( समीरची इच्छा तर पेपर फाडून फेकायचा होत होता, पण जर फाडला तर आज्ञाला पुन्हा चेव येईल, सो त्याने काही केले नाही, तिच्या हरकती तो दुर्लक्षित करत होता. )


"You are looking very dash dash dash ! "..... आज्ञाने परत एका पेपरवर लिहिले आणि हळूच समीरच्या बुक मध्ये ठेवले...त्याने परत पान टर्न केले. 


" I love you ❤️".... परत तिने सेम केले. त्याने पण बघून न बघितलेल्या सारखे केले.. 


" मिस आज्ञा , असे गपचुप तर कोणी ही करते, खुलेआम म्हणून दाखवा ! ".. .... राजला बोर होत होते, त्याचा करामती डोक्याला परत मस्ती सुचत होती. 


" डॉक्टर राज, चॅलेंज ?"....आज्ञा 


" हो , atleast समीरच्या घरातील एका व्यक्ती पुढे रेड रोज घेऊन म्हणून दाखवा ! ".... राज


"Okay, आणि मी जिंकले तर ?"....आज्ञा 


" तुम्ही म्हणाल ते "..... राज 


" ठीक आहे मग तुम्ही जिच्यावर प्रेम करता तिला प्रपोज करायचं ! ".... आज्ञा 


" व्हॉट?".... राज 


" ठीक आहे मग हार माना , आताच "..... आज्ञा 


" आणि तुम्ही हरला तर ?".... राज


" तुम्ही म्हणाल ते"...आज्ञा 


" समीरचा नाद सोडायचा, त्याचा मागे येणं बंद करायचं ! ".... राज 


" हराल तुम्ही, डॉक्टर समीर माझा जीव की प्राण आहे , माझं स्वप्न आहे, माझं एकुलते एक स्वप्न , ते मी पूर्ण करणारच" .... आज्ञा 


" Let's see ! ".... राज 


" Wait and watch, येईलच लवकर ही वेळ ... "....आज्ञा 


" मिस, आणि राज, फालतूपणा करू नका ".....समोर थोडा रागात बोलला , त्याला शंभर टक्के माहिती होते आज्ञा जे बोलते आहे ते करूनच दाखवेल, आणि यांच्या बेट मध्ये त्याला टेन्शन आले होते. 


*****


क्रमशः 



Hello friends , 


समीर आज्ञा आवडतात आहे काय ? कथा कशी वाटते आहे , नक्की सांगा. 


लाईक्स आणि कॉमेंट्स साठी खूप खूप धन्यवाद ! 


Keep smiling ! 



🎭 Series Post

View all