Dec 01, 2021
विनोदी

Love ... Sky is not the limit 8

Read Later
Love ... Sky is not the limit 8

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

भाग 8

 

 

 

" ते डॉक्टरच आहेत ना, इकडे येत आहेत ते ?", आज्ञा

" मला ना आजकाल सगळीकडे डॉक्टरच दिसतात" , आज्ञा

 

" हो , अग ते डॉक्टरच आहेत , आपल्याकडेच येत आहेत"....शिल्पा 

 

" क......काय? खरंच?" , आज्ञा बसल्या जागेवरुन उठत आश्चर्यचकित होत डोळे मोठे करत बघत होती. 

 

 

             समीरच्या हॉस्पिटल समोर रोडच्या अपोझिट साईडला एक मोठं गार्डन होते, सगळा आजूबाजूचा परिसर मोकळा होता. मॉर्निंग ईवेनिंग वॉक साठी वगैरे लोकं तिथे यायचे . तिथेच बाजूला एक छोटीशी चहाची टपरी होती. मोकळा वेळ असला की आज्ञा आणि ग्रुप तिथे आपलं ठाण मांडून बसत , तिथून हॉस्पिटल ही दिसायचं , आणि येता जाताना डॉक्टर सुद्धा. म्हणून आज्ञाची ती आवडती जागा होती. 

 

            समीरचे केबिन काचेचे बनले असल्यामुळे समीरच्या केबिन मधून समोरचे गार्डन स्पष्ट दिसायचे. त्याच्या ऑलमोस्ट सगळ्या अपॉइंटमेंट संपल्या होत्या. पार्क जवळ त्याला आज्ञाचा ग्रुप दिसला. तसे त्याला तिथे आज्ञा रोजच दिसायची. पण आज्ञाला मात्र माहिती नव्हते की तिथे समीरची केबिन आहे आणि त्याच्या केबिन मधून बाहेरच सगळे दिसते. 

 

          तर आजसुद्धा आज्ञा आणि बाकी सगळ्या तिथे बसून टवाळकी करत होत्या . तर अचानक समीर त्यांना त्यांच्याकडे येताना दिसत होता. आज्ञा मात्र त्याला डोळे फाडून बघत होती . तिला विश्वासच बसत नव्हता की समीर स्वतःहून त्यांच्याकडे येतो आहे.

 

" हॅलो गर्ल्स ! ", समीर तिथे असणाऱ्या सगळ्या मुलींनीला ग्रीट करत बोलला. तेवढ्यात आज्ञा डोक्याला हात लावत तिथे चक्कर येऊन चेअरवर बसली. 

 

" मॅडमची नौटंकी परत सुरू झाली ! ", समीर डोक्यावर आठ्या पाडत तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.

 

"आज्ञा.... आज्ञा...उठ.. काय झालं?", रिया तिला हलवत बोलत होती. 

 

" डोन्ट वरी, त्यांना काही नसेल झालं , त्या गंमत करत असतील " , आज्ञाच्या नेहमीच्चे वागणे लक्षात घेत तो बोलला. 

 

" अहो नाही डॉक्टर , खरंच चक्कर आली आहे, नाटक नाही करत आहे बहुतेक यावेळेस ती, बघा , तुम्ही एकदा आज्ञाला चेक करा" , शिल्पा

 

          ती उठत नाही बघून आता मात्र तिच्या मैत्रिणी काळजीत पडल्या होत्या. 

 

" डोन्ट बी पॅनिक, लेट मी चेक ! " , त्याने तिचा हात हातात घेऊन तिचे पल्स चेक केले. 

 

" डोन्ट वरी, शी इज ऑल राईट, विकनेस किंवा काही शॉकमुळे चक्करआली आहे, प्लीज पाणी देता काय?" , समीर

 

                शिल्पाने त्याला बाजूच्या टपरी वरून पाणी आणून दिले. समीरने थोडे पाणी हातात घेऊन तिच्या चेहऱ्यावर मारले. पाण्याच्या थेंबाच्या स्पर्शाने तिला शुद्ध आली . डोळे उघडून बघते तर अगदी डोळ्यासमोर तिला समीर दिसला. 

 

" डॉक्टर! तुम्ही खरंच येथे आला आहात? आय कान्ट बिलिव, तुम्ही स्वतःहून येथे आला आहात?" , ती शॉक लागल्या सारखी त्याच्याकडे बघत होती. 

 

" आज्ञा , डॉक्टरच आहेत , त्यांनीच तुला शुद्धीत आणले ", शिल्पा 

 

" बहारो फुल बरसाओ

मेरा मेहबूब आया है...

मेरा मेहबूब आया है " , म्हणत आशेभरल्या नजरेने आज्ञा त्याला बघत होती. 

 

           तिची ओरिजनल आत्मा जागी झालेले बघून, त्याने डोक्यावर हात मारून घेतला. तिला चक्कर आलेली बघून थोड्यावेळासाठी तो सुद्धा घाबरला होता.

 

" थँक्यू डॉक्टर , आज्ञा नॉर्मल वाटते आहे आता", तिचे गाणे ऐकत तिच्या मैत्रिणी खुश होत बोलल्या. 

 

          तिच्या मैत्रिणींचे बोलणे ऐकून समीरला हसू आले. पण त्याने त्याचे हसू कंट्रोल केले. उगाच हसलो तर समोरच्याला चुकीचे सिग्नल जायचे आणि भलताच काय तो अर्थ काढायचे. आणि आज्ञा तर त्यात चांगलीच एक्सपर्ट आहे , हे त्याला माहिती होतं. म्हणून तो शांत उभा होता. 

 

" मिस, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं?", समीर आज्ञाकडे बघत बोलला

 

" क......काय....?" , जागेवरून उभी होत परत डोक्यावर हात लावत ती चक्कर आल्यासारखं नाटक करत खुर्चीवर बसली. 

 

" झाले यांचं परत नाटक सुरू. " , समीर मान हलवत स्वतःशीच विचार करत होता आणि आज्ञाकडे बघत होता. 

 

"आज्ञा , डॉक्टरांना तुझ्यासोबत बोलायचे आहे, अशी काय करतेय तू? तू नेहमी तर त्यांच्या सोबत बोलायला तडफडत असते आणि आज ते स्वतःहून तुझ्यासोबत बोलायला आले तर, तू हे काय वेगळीच बिहेव करत आहे? ", रिया

 

" अगं हो, तेच ना.... डॉक्टर............. डॉक्टर.. स्वतःहून मला भेटायला आलेत, माझ्याशी बोलायचं म्हणतात आहे. अगं मला हे काहीच पचत नाही आहे. मला हर्षवायू झाल्यासारखे वाटत आहे. डॉक्टर , प्लीज दोन मिनिटं द्याल मला , काहीच सुचत नाही आहे , बहुतेक माझी तब्येत खराब होते आहे", आज्ञा

 

"बरं , मग मी परत जातो " , समीर

 

" अरे नाही नाही नाही, बसा इथे , बोला तुम्हाला काय बोलायचं?"...ती त्यांच्याकडे चेअर सरकवत बोलली. 

 

" ए…..एक मिनिट, तुम्ही मला प्रपोज तर करायला नाही आलात? मला विश्वास होता की , एक ना एक दिवस माझं प्रेम नक्कीच जिंकेल, आणि तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार कराल. एक दिन मेरी तपास्या जरूर रंग लायेगी , मुझे पता था... मुझे पता था...... थँक्यू देवा श्रीगणेशा, तू माझी सगळी मनोकामना पूर्ण केली. आता मला ह्या आयुष्यात अजुन काहीच नको आहे. आता मला मरण आले तरी चालेल. मला जे माझ्या आयुष्यात पाहिजे होतं , ते सगळं भेटले आहे. माझी आत्मा तृप्त झाली आहे", आज्ञा आकाशाकडे बघत हात जोडत बडबड करत होती. 

 

         समीर कसनुस तोंड करत तिची बडबड ऐकत होता. तिच्या मैत्रिणींना मात्र तिचं असं वागणं बघून हसायला येत होतं , पण आज्ञा आपल्यावर ओरडेल म्हणून त्या गालातल्या गालात हसू दाबत होत्या. 

 

" मिस , मी काही बोलू काय? तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो होतो", समीर

 

"आपका थँक्यू भी हमारे लिए आय लव यु के बराबर है डॉक्टर. आपका थँक्यू सिरआखोपर " , ती त्याच्याच पुढे थोडे झुकून प्रधना सारखा हात हलवत बोलत होती..

 

" पण थँक्यू कशासाठी?", आज्ञा विचार करत त्याच्याकडे बघत बोलली

 

"ते तुम्ही काल माझ्या बहिणीला सायलीला गुंड्यांपासून पासून वाचवले आणि तिची मदत केली . काल मला ते कळले म्हणून मी तुम्हाला थँक्यू बोलायला आलो होतो...", समीर 

 

" नो नीड टू से थँक्यू डॉक्टर. ते तर माझं कर्तव्य होतं. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आता आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझी होणारी सिस्टर-इं-लॉ आहे सायली . तिचे रक्षण करायचं माझे तर कर्तव्यच आहे " , आज्ञा

 

          समीरने डोक्यावर आठ्या पाडत डोळे बंद केले, कुठून आज्ञाला थँक्यू म्हणायची बुद्धी झाली होती असं त्याला वाटत होते. 

 

" थँक्यू तर मी तुमचं एक्सेप्ट करणार नाही. हा पण एक गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करू शकता", आज्ञा

 

         समीर आता ही काय मागेल याचा विचार करत बसला होता. 

 

" डॉक्टर डॉक्टर दिल के डॉक्टर !" , त्याला विचारात गढलेले बघून आज्ञा त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत बोलली. 

 

" काय डॉक्टर , किती विचार करता, तुमचा नक्कीच जीव नाही मागणार मी. आप तो हमारी जान हो" , आज्ञा

 

" बोला काय?" , बराच विचार करून समीर बोलला.

 

" एक गरम चाय की प्याली हो, कोई बस साथ देने वाला हो...... हे इथले टपरीवाले काका खूप छान चहा बनवतात. एक एक होऊन जाऊ द्या", आज्ञा भुवया उंचावत उंचावत बोलत होती

 

" क..... काय?......चहा?...आणि इथला? तुम्हाला माहिती आहे ना मी एक डॉक्टर आहे. कोणाला मी हे असं अनहायजेनिक काही खाताना पिताना दिसेल तर , बाकीचे काय विचार करतील माझ्याबद्दल? मी माझ्या पेशंटला बाहेरचं खायला प्यायला मनाई करत असतो आणि ते जर मला असे ते बघतील, तर माझं किती ऐकतील ते?" , समीर

 

" काय हो डॉक्टर, इतकी छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. कधी तरी जगाला विसरून जावा..स्वतःसाठी जगावं. जाऊ द्या मग, आपले थँक्यू पण आपल्या सोबत घेऊन जावा " , आज्ञा

 

" ठीक आहे! " , समीर बराच विचार करून बोलला. 

 

" येsssssss.....yipieesssssss" , आज्ञा उड्या मारतच ओरडत होती. 

 

" शिल्पा , जा दोन चहा घेऊन ये आमच्यासाठी",आज्ञा म्हणाली आणि हातानेच इशाऱ्याने बाकीच्यांना तिथून निघायला सांगत होती. तिचा इशारा समजून सगळ्याजणी काही ना काही कारण सांगून तिथून निसटल्या. 

 

            शिल्पाने त्या दोघांना चहा आणून दिला आणि ती सुद्धा त्यांना बाय करून तिथून निघून गेली. 

 

             समीरला आज्ञाचे तिच्या मैत्रिणींना केलेले सगळे इशारे कळत होते..... " मला माहिती आहे या मिस पागल आहे , तरी मी का आलो येथे? मी यांना चांगलाच ओळखून आहो, तरीपण माहिती नाही माझी बुद्धी कुठे भ्रष्ट झाली होती , की मी यांना थँक्यू म्हणायला आलो..", समीरचे मनोमन स्वतःलाच दोष देणे सुरू होते. 

 

" डॉक्टर, घ्या चहा , खूप छान असतो हा . तुम्हाला खूप फ्रेश वाटेल", म्हणत तिने एक चहाचा ग्लास डॉक्टर समोर ठेवला. 

 

              समीर हातात ग्लास घेत, हळूहळू चहा पीत होता. आज्ञा मात्र चहा पिता पिता एकटक समीरला न्याहळत होती, तिची नजर त्याच्यावरच थांबली होती . तिच्या असे बघण्याने त्याला खूप अक्वर्ड फील होत होते तो चहा पिता पिता आजूबाजूला बघत होता. 

 

" कितना सोना तुझे रब ने बनाया 

जी करे देखती रहूँ , हो 

कितना सोना तुझे रब ने बनाया

जी करे देखती रहूँ हो.

 

कितना सीधा, कितना सच्चा

मेरा डॉक्टर कितना अच्छा

उड़ता बादल बहता पानी बोले रुत मस्तानी

सबसे प्यारा मेरा यारा डॉक्टर हिन्दुस्तानी 

हो कितना प्यारा तुझे रब ने बनाया 

जी करे देखती रहूँ हो "....

 

 

समीरला बघत आज्ञा गाणं गुणगुणत होती...

 

" हे हाय , फ्री बर्डस् ! " , राज तिथे येत बोलला

 

" हे हाय मिस्टर राज, इट्स लव्ह बर्ड्स नॉट फ्री बर्ड्स" , आज्ञा समीरला बघत राजला डोळा मारत बोलली. 

 

" हा हा हा हा..... इट्स नॉट पॉसिबल मिस", राज

 

"इट विल टेक टाईम बडी , बट इट्स नॉट इम्पॉसिबल, डॉक्टर राज", आज्ञा

 

" विल सी मिस आज्ञा", राज

 

" डोन्ट चॅलेंज मी, मिस्टर राज" , आज्ञा

 

" तुम्ही यांना एकटे नाही सोडत ना...? हे जिकडे , तिकडे तुम्ही, व्हाट्स अ प्लॅन मॅन?", आज्ञा राजला चिडवत डोळे उडवत बोलली..

 

         राज तिला इथे काही बोलू नको म्हणून डोळ्यांनीच खुणावत होता. 

 

" डोन्ट वरी , तुम्ही हुंड्यामध्ये त्यांच्यासोबत आलात तरी चालेल मला ! ", आज्ञा राजकडे बघून हसत बोलली. 

 

" हे राज , कम जॉईन मी" , समीरने राजला स्वतः जवळ बसवून घेतले , राज आल्यामुळे त्याला थोडं हायसं वाटलं. 

 

" या या प्लीज !" , आज्ञा आणि तिने टपरीवाल्या काकांना अजून एक चहाची ऑर्डर दिली. 

 

" व्हॉट अ चेंज समीर, तू चहा पितो आहेस?" , राज समीरला चहा पिताना बघत बोलला.

 

" का ?.......काय झालं?" , आज्ञा

 

टपरीवाले काका राजला चहा देऊन गेले. 

 

" नाही , समीरला चहा आवडत नाही ,तो कधीच पित नाही", राज

 

" ओह आय सी! सी आय टोल्ड यू, नथिंग इज इम्पॉसिबल! ये हमारे प्यार की तरफ पहला कदम है मिस्टर राज "...म्हणत तिने राजला चहाचा ग्लास घेऊन चीअर्स केलं.

 

" बाय द वे, ही चहा पार्टी कशाबद्दल? आणि अशी आमच्याच हॉस्पिटल पुढे?", राज

 

" ' थँक्यू ' चे सेलिब्रेशन करतोय" , आज्ञा

 

" म्हणजे.......?", राज काही कळलं नसल्यासारखा बोलला.

 

" अरे काल यांनी सायलीला खूप मदत केली, काही मुलं तिला त्रास देत होते , म्हणून मी त्यांना थँक्यू बोलायला येथे आलो होतो", समीर

 

" काय.....?".... राज डोक्यावर आठ्या पाडत बोलला.

 

" सगळं ठीक आहे डॉक्टर राज ....डोन्ट बि सो पॅनिक !" , आज्ञा

 

         राज डोळे खाली झुकावत तिला इशाऱ्याने थँक्यू म्हणाला.  

 

" ही टी ट्रीट माझ्याकडून !" , राज चहा च्या ग्लासने तिला चिअर्स करत बोलला. 

 

               समीर प्रश्नार्थक नजरेने कसंतरी चेहरा करत त्याच्याकडे बघत होता..

 

         राजला आपली चुक कळली, " अरे म्हणजे चांगलं काम करत आहेत ना त्या, तर मी प्रोत्साहन देत होतो", राज

 

" डॉक्टर राज , प्लीज मला अहो-जाहो म्हणू नका. डॉक्टरांना किती वेळा सांगितलं तरी त्यांना कळत नाही, तुम्ही तरी प्लीज माझा ऐका , फार म्हातारे झाल्यासारखं फिलिंग येते हो !" , आज्ञा

 

" ओके आज्ञा, तु पण मला फक्त राज म्हणायचं", राज

 

" ओके डण !", आज्ञा 

 

         राज आज्ञा चे जे सुरू होते ते तर समीरच्या डोक्यावरून जात होते. 

 

 

" राज पटापट संपव तो चहा , गप्पा काय मारत बसलाय? निघूया लवकर, बराच वेळ झाला मी इथे आलो आहे" समीर त्यांच्या न संपणाऱ्या गप्पा बघून मधात बोलला. 

 

 

" थँक्यू फॉर द टी !", म्हणत समीर तिथून निसटला. 

 

"थँक्स अ लॉट आज्ञा", बोलून राज समीरच्या मागे पळाला. 

 

" डॉक्टर sssss...... थॅंक्स अ लॉट फॉर धीस ब्युटीफुल ईवेनिंग ! ", समीर परत जाताना बघून आज्ञा जोराने ओरडत बोलली

 

 

******

 

 

बाहेर बाईकच्या हॉर्नचा आवाज आला. 

 

" एवढ्या सकाळी कोण हॉर्न वाजवत आहे?", समीर

 

" बाहेर ये, मी आली आहे", तेवढ्यात सायलीच्या मोबाईलच्या मेसेजची बीप वाजली. 

 

" अरे दादा , माझी फ्रेंड आहे आज्ञा, तुला बोलले होते ना मी, इथे जवळच आपल्या बाजूला राहते. माझी स्कूटर नीट काम करत नाही आहे म्हणून आज ती मला घ्यायला आली आहे" , सायली

 

" अग सायली, तिला पण आतमध्ये बोलव , तुमचा नाश्ता व्हायचा आहे , ती पण करून घेईल तुमच्यासोबत !" , आई

 

" आतमध्ये ये, मला थोडा वेळ लागेल", सायलीने आज्ञाला मेसेज केला, तशी आज्ञा बाईक पार्क करून आतमध्ये आली. 

 

"गुड मॉर्निंग आजोबा " , आज्ञा दारात येत शूज काढत बोलली. 

 

" ये बेटा आत मध्ये", पेपर वाचत बसलेले आजोबा आज्ञाला बोलले

 

" आज्ञा इकडे ये , दादासोबत तुझी ओळख करून देते" ,सायली

 

आज्ञा त्यांच्या जवळ गेली..

 

" हा माझा ग्रेट ग्रेट दादा डॉक्टर समीर आणि हे दादाचे फ्रेंड डॉक्टर राज आणि दादा ही माझी बेस्ट फ्रेंड आज्ञा", सायली त्यांची ओळख करून देत होती. 

 

" तुफान आलंय याssss" , राज समीरचा कानात गुणगुणला . 

 

         समीरने आज्ञाला बघून स्मायल केले . राजने हॅण्डशेक करण्यासाठी हात पुढे केला. आज्ञा दोन्ही हात जोडून स्माईल करत नमस्कार म्हणाली. 

 

"बापरे किती सभ्य, अनबिलीवएबल", राज आवासून तिच्याकडे बघत समीरच्या कानाजवळ जात बोलला. 

 

"फुल्ल नौटंकी आहे",समीर राजच्या कानात बोलला

 

        चेहऱ्यावर खट्याळ हसू आणत आज्ञा दोघांना बघत होती. 

 

" आज्ञा , ये बाळा , तू पण नाश्ता करायला बस , हे सगळे आता बसणारच होते" , आई

 

सायली आईला मदत करायला किचनमध्ये गेली

 

"बाळा?", आईचे शब्द ऐकून डोळे मोठे समीर स्वतःशीच पुटपुटला. 

 

 

" नथिंग इज इम्पॉसिबल! समीर घरात येऊन पोहोचली आहे ही", राज 

 

"अब दिल का रास्ता दूर नही राज साहब, आगे आगे देखो होता है क्या", आज्ञा

 

"ये रास्ते है प्यार के..... 

ये रास्ते है प्यार के" ........आज्ञा गुणगुणत होती. 

 

             चौघेही डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसले होते. आज्ञा समीरच्या अगदी पुढे बसली होती.आई त्यांना वाढत होती. सायलीने पटापट आटोपले आणि ती वरती रूम मध्ये तयारी करायला आणि बॅग आणायला गेली.

 

"काकू , खूप छान झाला आहे नाश्ता. नशीब लागते आईच्या हातचे खायला" , आज्ञा

 

" अगं, तुला जेव्हाही काही खावसं वाटलं , तेव्हा तू कधीही ये घरी " , आई किचनमधून बोलली. 

 

" मी तर परमनेंटलीच यायचा प्लॅन करते आहे", आज्ञा समीरला डोळा मारत हळूच बोलली आणि तिथे बसल्या बसल्या त्याला फ्लायींग किस करत होती. 

 

 

           आज्ञाचे बोलणे ऐकून समीरला चांगलाच जोराचा ठसका लागला. आई लगेच येऊन त्याची पाठ थोपटत होती. आज्ञाने समोरचा पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. 

 

" Very dangerous for you, doctor sameer" , राज समीरचा कानात बोलला

 

" तू घाबरावतोय काय मला?" , समीरने राजवर एक कटाक्ष टाकला..

 

" No no, I am very much sweet......believe me , don't trust strangers! " , आज्ञा

 

" She is calling me stranger, Sameer, tell her I am your best friend " , राज

 

" बंद करा तुमचं, किती इरिटेट करताय मला" ,समीर वैतागत बोलला.

 

" एवढ्या सकाळी कोण आठवण काढत आहे माझ्या नातवाची ?", आजी पूजा आटोपून आत मध्ये आली. 

 

" असेल कोणी, जिच्या स्वप्नात हा जात येत असेल ! ", राज मस्करी करत बोलला

 

समीर कसनुस चेहरा करत बघत होता..

 

"अरे हो आई ,अहो मी तुम्हाला सांगायला विसरले , त्या प्रधान बाईंचा फोन आला होता, लग्नासाठी समीरबद्दल विचारत होत्या", आई आजीला आवाज देत बोलली

 

        आईचे बोलणे ऐकून आता आज्ञाला जोराचा ठसका लागला. राजने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.. 

 

"बोलती बंद ! ", राज हसत होता. 

 

"सायली ,चल पटकन, उशीर होतोय" , म्हणतच आज्ञा डायनिंग टेबल वरून उठत, आपली बॅग घेऊन बाहेर पळाली. 

 

        तिला असे पळतांना बघून समीर आणि राजाला खूप हसायला आले. तिला गेलेलं बघून समीर ने हुश्श केले. 

 

 

         समीरचा फोनची बीप वाजली, त्याने बघितले तर मेसेज होता, आज्ञाचा.....तो बघून त्याच हसू कुठच्या कुठे गायब झालं. 

 

"काय झालं.? हसता हसता रडवेला का झाला? आता तर तुझ्या मॅडम पण गेल्या", राज

 

"बघ ! ", फोन समोर राज कडे करत समीर बोलला.

राज ने फोन हातात घेतला, ते बघून राज भयंकर उबडा तीबडा पडून हसत होता. 

 

 

"Doctor, red t-shirt suits you a lot, U were looking damn dash dash dash " , आणि किसेस च्या गोड गोड स्मैलिझ होत्या. 

 

 

******

 

क्रमशः

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "