Dec 01, 2021
कथामालिका

Love ... Sky is not the limit 7

Read Later
Love ... Sky is not the limit 7

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

 

 

भाग 7 

 

           आज्ञाचा कॉलेजमध्ये ठरल्याप्रमाणे सोलो डान्स कॉम्पिटिशन झाल्या. बेस्ट डान्सर म्हणून आज्ञा पहिली आली. मग सायली आणि तिची फ्रेंड प्रगती यांची निवड झाली.

 

            Duel dance competition च्या निवडीच्या दिवशी अचानकपणे प्रगतीचा पाय मुरगळला (ओबविअसली यात शंभर टक्के प्रियाचा हात होता) आणि त्यामुळे कॉलेजच्या परीक्षक पॅनेलने सायली आणि आज्ञाची जोडी बनवली. 

 

             सायलीला आज्ञा सोबत जोडी बनवायची नव्हती पण कॉलेजने तसे डिसिजन घेतल्यामुळे तिला नाही म्हणता आले नाही. रोज कॉलेजचे लेक्चर्स झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजताची वेळ प्रॅक्टिससाठी फिक्स झाली होती. 

 

             आज्ञा सायली सोबत बोलण्याचा , मैत्री करण्याचा प्रयत्न करत होती, पण सायली मात्र कामाव्यतिरिक्त जास्ती काही बोलायची नाही. प्रॅक्टिस करायची आणि निघून जायची. 

 

 

              सायलीचे आज एक्स्ट्रा लेक्चर असल्यामुळे तिचा क्लास उशिरा सुटला. आज्ञा तिची प्रॅक्टिस हॉलमध्ये वाट बघत बसली होती.. 

 

" यार या डॉक्टरांमुळे सगळ्यांचे नखरे झेलत बसावे लागत आहे, नाहीतर ही आज्ञा कोणाच्या बापाला सुद्धा भाव देत नाही. आजपर्यंत कुणासाठी वाट बघत ही आज्ञा कधीच थांबली नाही आहे. तिकडे डॉक्टर वाट बघायला लावतात, इकडे या त्यांच्या बहिणाबाई. चला हे पण सही. प्रेमामध्ये काय काय करावं लागतं!" , आज्ञा स्वतःशी बडबड करत बसली होती.

 

" मैं तेरे प्यार में क्या क्या ना बनी डॉक्टर ...

कभी बनी डान्सर तो कभी गेट कीपर . " , आज्ञा समोर दारा जवळ बसून आपलीच स्वतःची करमणूक करत होती . 

 

 

" सॉरी आज्ञा , आज एक्स्ट्रा लेक्चर होतं त्यामुळे उशीर झाला", सायली तिथे येत बोलली. 

 

" इट्स ओके डियर! " , आज्ञा

 

"पण एक चांगली गोष्ट आहे , या दोघेही बहीण-भावांचा चूक असली की लगेच सॉरी बोलतात, मग त्यात कोण लहान-मोठे हे बघत नाही. क्युट आहे तशी माझी सिस्टर- इं- लॉ" ..... आज्ञा तिच्याकडे बघत मनातच बोलत होती..

 

" आज सगळे निघून गेले, आपण दोघेच आहोत. चल मग थोड्यावेळ प्रॅक्टीस करूयात आणि निघुयात", आज्ञा

 

" ओके", सायली

 

          दोघींनी मिळून जवळपास एक तास प्रॅक्टिस केली. आज दोघीच असल्यामुळे दोघींमध्ये रोज पेक्षा थोडे जास्ती बोलणं झालं होतं.

 

       एकमेकींना बाय करून दोघी कॉलेज मधून निघाल्या. 

 

         आज्ञा तिची बाईक घ्यायला कॉलेजच्या पार्किंग एरिया मध्ये गेली. तिला काही फोन आला तर ती तिथे थोडा वेळ बोलत होती. 

 

         सायलीची स्कूटर खराब झाल्यामुळे आज तिला समीरने कॉलेजमध्ये सोडले होते आणि परत घ्यायला यायच्या वेळ कॉल कर म्हणून सांगितले होते , मात्र एक्स्ट्रा लेक्चर आणि डान्सच्या प्रॅक्टिसमध्ये ती सगळं विसरली होती. ती समोर रस्त्यावर ऑटोसाठी जाऊन उभी होती. अंधार पडत चालला होता , रस्ता सुद्धा बराच सामसूम झाला होता. तेवढ्यात सायलीला ४-५ मुले तिच्याकडे येताना. ते तिच्या दिशेने येत होते. त्यांना बघून तिला आता थोडी भीती वाटायला लागली होती. 

 

" जानेमन , अकेले अकेले क्या कर रहे हो?", एक वात्रट मुलगा बोलला

 

" काय मिस , आज एकट्याच का ? म्हणाल तर लिफ्ट देऊ काय? ", त्यातील एक दुसरा मुलगा तिच्या अगदी जवळ येत बोलला. 

 

          सायली त्यांना इग्नोर करत होती, मात्र तिथे कोणीच नसल्यामुळे त्या मुलांची हिम्मत फार वाढली आणि ते सायलीच्या अगदी जवळ येत तिला त्रास देत होते. 

 

" हे बघा , तुम्ही दूर राहा , नाहीतर....... ", सायली

 

" नाहीतर काय? रॉकी सारखी आमची पण कंप्लेंट करशील काय आपल्या भावाजवळ? आम्ही रॉकी नाय की कोणाच्या बापाला घाबरत नाही " .....त्यातला एक मुलगा अरेरावी करत समोर येत बोलला आणि तिची ओढणी ओढायला लागला.. 

 

" ओढणी सोडा माझी" , सायली आपली ओढणी त्यांच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. 

 

" नाही सोडणार, काय करशील." .....

 

" ए ssss , ओढणी सोड तिची आणि गपगुमान आपल्या रस्त्याने लागायचं" , आज्ञा तिच्या गाडीला पार्क करत सायली जवळ येत ओरडली. 

 

" नाही सोडणार, काय करशील? अरे वा आज मजा आहे, दोघी दोघी भेटल्या" .....

 

त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच आज्ञाने जोरदार एक पंच त्याच्या तोंडावर नाकावर देऊन मारला. आज्ञाचा मार इतका जबरदस्त होता की तो मुलगा खाली पडला आणि त्याच्या नाकातून रक्त यायला लागले. 

 

" अरे बघता काय , मारा हिला सालीला , रॉनी वर हात उचलते काय? तुला माहित नाही हा रॉनी काय चीज आहे ते…" 

 

सगळे आज्ञावर धावून आले..

 

             आज्ञाने एक हाय जम्प करून , गोल फिरून एका किक मध्ये दोघांना खाली पाडले आणि तिची त्या पाच जणांसोबत फाईट सुरू झाली. एका तरबेज फायटर सारखी ती त्यांना मारत होती. आज्ञाला असं लढतांना बघून आता सायलीला सुद्धा बरीच हिम्मत आली होती. तिने इकडेतिकडे बघितलं तर तिला तिथे एक काठी पडलेली दिसली, तिने ती काठी उचलली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. दोघींनी मिळून त्या मुलांना चांगलं झोडून काढलं . त्या दोघींचा हा अवतार बघून ते मुलं पडत उठत लंगडत कसेतरी तिथून पळाले.

 

" तू रॉनी सोबत पंगा घेतलाय , हे बरोबर नाही केले" ... त्यातला एक मुलगा तिला धमकावत होता. 

 

" अरे हट, खूप बघितले तुझ्यासारखे, चल निघ ! " , आज्ञा हात झटकत बोलली , तसा तो त्याचे बाकीचे मित्र पळतांना बघून तिथून पळाला. 

 

दोघींनी उड्या मारतच एकमेकींना हाय-फाय केले. 

 

" तू ठिक तर आहेस ना?" .... आज्ञा

 

" हो... थँक्यू "... सायली 

 

आज्ञाने स्मायल केले . 

 

" फ्रेंड्स.....?", सायलीने फ्रेंडशिपसाठी तिच्यापुढे हात केला

 

" Yeah, of course darling! " , म्हणत आज्ञाने सायलीला हग केले...

 

" तू खूप भारी आहेस हा , तुझ्याबद्दल आतापर्यंत फक्त ऐकून होती . आज बघितले सुद्धा , सो ड्याशिंग यु आर! " , सायली

 

" अगं स्वतःचं संरक्षण करता येण्यापुरते तरी थोडाफार हे सगळं यायला हवं!" , आज्ञा

 

" हो, ॲग्री वीथ यु , मला पण शिकायचं.", सायली

 

" दॅट्स ग्रेट ! , बरं घरी निघाली होतीस काय? चल मी तुला सोडते? मी तिथेच राहते तुझ्या घराजवळ! ", आज्ञा

 

" ठीक आहे , चालेल! ", म्हणत दोघीजणी गाडीवर बसल्या आणि घरी जायला निघाल्या. आज्ञाने बाईक सायलीच्या घरासमोर आणून थांबवली...

 

" चल आतमध्ये , सोबत कॉफी घेऊया! ", सायली

 

" असू दे , नंतर कधी येईल! ", आज्ञा

 

" अगं चल ना , घरी सगळ्यांसोबत तुझी ओळख करुन देते" , सायली

 

" बरं चल ! " , दोघी घरात गेल्या.... 

 

" आज खूप उशीर केला बाळा?", . सायलीची आई तिच्याजवळ येत बोलली...

 

" हो आई, आज एकस्ट्रा लेक्चर होतं आणि त्यानंतर डान्स प्रॅक्टिस , म्हणून थोडा उशीर झाला. ही बघ ही माझी फ्रेंड आज्ञा , तिनेच आज मला घरी ड्रॉप केले ..", सायली 

 

        तेवढ्यात तिथे सायलीचे आजी-आजोबा सुद्धा आले. 

 

" आज्ञा, हे माझे लविंग आजोबा आणि ही माझी गुडली आजी !" , सायलीने आज्ञाला सगळ्यांशी ओळख करून दिली....

" आणि आजी-आजोबा , ही माझी फ्रेंड आज्ञा, इथे पुढेच राहते...."

 

   आज्ञाने हात जोडून सगळ्यांना हॅलो केले. 

 

" बस बेटा , मी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते".... आई बोलत किचनमध्ये निघून गेली. 

 

" हाये मला बेटा म्हणाल्या , डॉक्टरांची आई किती गोड आहेत , म्हणूनच डॉक्टर इतके गोड आहेत ", आज्ञा स्वतःशीच मनात बोलत होती. 

 

           सायलीने आजोबांना आज घडलेल्या प्रकार आणि त्यांनी त्या मुलांची केलेली पिटाई , सगळं सांगितलं. 

 

" अरे वा! बहादूर म्हणावी आज्ञा. स्वतःचं संरक्षण करत करता यायला हवं. सायली तुला पण हिच्या सारखं धीट बनायला हवं , तू पण हे सगळं शिकून घे ." , आजोबा

 

" हो आजोबा, मी तिला आत्ताच बोलले की मी पण हे सगळं शिकणार आहे . " , सायली

 

" आजोबा , मी करेल मदत " , आज्ञा

 

          आज्ञा घराचे निरीक्षण करण्यात मग्न झाली. 

     घर आतमधून साधं सिंपल पण अगदी attractive अरेंज केलं होतं. बघता बघता तिचे लक्ष एका वॉलवर गेलं, तिथे खूप साऱ्या ट्रॉफी ठेवल्या होत्या, आज्ञा त्यावरचे नाव वाचण्यात गर्क झाली. 

 

 

" या सगळ्या माझ्या दादूच्या ट्रॉफी आहेत, तो त्याचा कॉलेज टायमिंगचा ऑलराऊंडर स्टूडेंट होता. तेव्हा त्याला खेळांमध्ये मध्ये खूप ट्रॉफी मिळाल्या आहे. आता त्याला बेस्ट यनगेस्ट डॉक्टर्सच्या पण बऱ्याच ट्रॉफी मिळाल्या आहेत . 

 

" आणि ही ? ही तर काही तरी सिंगिंगची ट्रॉफी दिसत आहे ?" , तिथे ठेवलेल्या एका ट्रॉफीला हात लावत आज्ञा बोलली. 

 

" हो , अगं माझा दादा खूप छान गाणं म्हणतो. कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये त्याला ही ट्रॉफी मिळाली होती, पण आता कामाच्या व्यापामुळे त्याला त्याच्या हॉबिजसाठी वेळ काही मिळत नाही...", सायली 

 

" Very smart personality , interesting ! " , आज्ञा 

 

" हो ऑसम आहे तो , तू भेटशील ना त्याला , तुला पण खूप आवडेल तो ", सायली 

 

" अरे आवडेल काय , माझे तर जीव की प्राण होऊन बसले आहे डॉक्टर ! ", आज्ञा मनातच बोलत होती.  

 

 

" हो ना , तूच इतकी गोड आहेस , तुझा भाऊ पण छानच असेल ! ", आज्ञा , इकडे तिकडे बघत होती. 

 

          आज्ञाचे बघता-बघता एका वॉलकडे लक्ष गेलं, त्यावर सायलीचे खूप सारे फॅमिली फोटो लावले होते. त्यात एक समीरचा सिंगल फोटो होता, आज्ञा एकटक फोटोकडे बघत होती. 

 

" या फोटोमध्ये पण कसले हॉट दिसतात हे , तिथे जाऊन एक किस करायची इच्छा होते आहे " , आज्ञा त्या फोटोत गुंतली होती. 

 

" हा....कोण? बघितल्या सारखं वाटते आहे ? ", आज्ञा ( न कळल्यासारखी दाखवत होती ) 

 

" अगं , हाच माझा दादा , ज्याचा बद्दल मी आता बोलत होती ." , सायली

 

" ओह....अच्छा..... ग्रेट." , आज्ञा...

 

 

" अरे हो तुला सांगायचेच विसरली , माझा दादा , आपल्या कॉलेजमध्ये आला होता बघ , मेडिकल सब्जेक्टवर लेक्चर घ्यायला " , सायली तिला आठवण करून देत म्हणाली. 

 

" हो आठवलं , डॉक्टर समीर धर्माधिकारी . काय सॉलिड लेक्चर दिले होते यांनी . " , आज्ञा ( मनातच आज्ञा : मी कसे विसरेल डार्लिंग , हाच तर तो दिवस , तो क्षण होता , जेव्हा मी डॉक्टरांच्या प्रेमात पडले ) 

 

" हा तोच, तोच माझा दादा , माय केअरिंग अंड चार्मिंग ब्रदर...", सायली 

 

       आज्ञा तिला समीरबद्दल काही माहित नसल्यासारखे दाखवत होती. 

 

 

         आईने सर्वांसाठी कॉफी आणली. गप्पागोष्टी करत सगळ्यांनी कॉफी संपवली.

 

" बरं, मी निघते आता" , आज्ञा

 

" आपलंच घर समजायचं , येत राहा बाळा", आजी बोलली..

 

          आज्ञाने हसून होकारार्थी मान हलवली आणि ती घरी जायला निघाली. बाईक स्टार्ट केली आणि ती घरासाठी वळली तेवढ्यात समीर आपली गाडी घेऊन दारातून आत मध्ये गेला.. त्याचे लक्ष पाठमोर्‍या आज्ञाकडे गेले.. 

 

" या मिस ? आपल्या घरी आल्या होत्या? नाही त्या इथे काय करणार? दुसरे कोणी असेल , समीर तुला पण ना वेडावून ठेवलाय त्या मुलीने , सगळीकडे आजकाल दिसायला लागली" , समीर स्वतःशीच बडबडत होता. 

 

******

 

क्रमशः

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "