Dec 01, 2021
कथामालिका

Love ... Sky is not the limit 6

Read Later
Love ... Sky is not the limit 6

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 6

 

" आज्ञा उठ" , प्रिया तिला उठवत होती..

 

 

" प्रिया झोपू दे ना , एवढा मध्यरात्री उठवायला काय झालं?" , आज्ञा झोपेतच बोलली....

 

" अग मध्यरात्र कुठे, सकाळ होत आली आहे, पाच वाजले आहेत" , प्रिया 

 

"अगं हो, पण तू का उठली एवढ्या सकाळी ? तू पण झोप" , आज्ञा

 

" अगं वेळेत नाही उठवले तर तू मलाच मारशील ".... प्रिया

 

" यार प्रिया, डिस्टर्ब नको करू , डॉक्टर स्वप्नात आले आहे. रोमान्स करू दे यार थोडा, रियल लाईफमध्ये तर थोडासा सुद्धा भाव देत नाही ते" , आज्ञा झोपेतच हाथ झटकत बोलत होती...

 

" अग उठ ना,, स्वप्नच बघत बसशिल, तर डॉक्टर निघून जातील मॉर्निंग वॉकला" .... प्रिया 

 

" काय......? आज इतक्या लवकर निघालेत…? यार हे डॉक्टर पण ना , एक वेळ ती कोणती ठेवत नाही फिरायला जायची, रोज वेळा चेंज करतात. मी तर म्हणते या डॉक्टरांच्या मेंदूची टेस्ट करायला हवी" .......... आज्ञा झोपेतून खडबडून जागी होत बडबडत फ्रेश व्हायला निघून गेली....

 

" प्रिया sssss, डॉक्टरांनी कोणत्या कलरचा ट्रॅक सूट घातला आहे?".... बाथरूम मधूनच आज्ञा ओरडत बोलली

 

" बहुतेक इंडिगो ब्लू" ... प्रिया

 

आज्ञाने सुद्धा तिचा इंडीगो ब्ल्यू ट्रॅक सूट घातला ...केसांची पोनीटेल बांधली... शुज घातले आणि हातात पाण्याची बॉटल घेऊन बाहेर पडली...

 

 

*******

 

समीर ग्राउंड मध्ये रनिंग करत राऊंड मारत होता...

 

" गुड मॉssssssर्निंग डॉक्टर" ...... आज्ञा ओरडतच समीर जवळ रनिंग करत आली.....

 

            समीरने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि बॅक टर्न होऊन रनिंग करू लागला. आज्ञा रनिंग करतच त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. तो पुढे पुढे जात होता आज्ञा त्याच्यासमोरच त्याच्या कडे बघत बॅक रनिंग करत होती. त्याने परत बॅक टर्न केले. आज्ञा परत त्याच्यापुढे येऊन उभी राहिली. असे दोन-तीन दा झालं. टर्न होऊन काही फायदा नाही समजून. त्याने आपलं रनिंग कंटिन्यू केलं...

 

" आज इतक्या मध्यरात्री, आय मिन सकाळी सकाळी, कसे काय आलात हो डॉक्टर तुम्ही?" .... आज्ञा

 

     त्याने एक भुवई उंच करून तिच्याकडे बघितले.. आणि काहीच न बोलता रनिंग कंटिन्यू केले....

 

" म्हणजे रोजचा सेम टाइम ठेवायचा ना? तुम्हाला एक्ससाइज करण्याचे रुल्स नाही माहित का हो? म्हणजे मी पण हेल्थ कॉन्शिअस आहे, मला पण exercise रोज करायला आवडतं आणि तुमच्यासारखी हॉट कंपनी असल्यावर मग काय बघावे लागते, म्हणून म्हटलं एक काय तो टाईम फिक्स करा" ....आज्ञा..

 

" या मॅडम काही इथून जाणार नाहीत" ..... मनातच विचार करत समीर खाली बघत जॉगिंग करत होता....

 

        थोड्यावेळ जॉगिंग केल्यानंतर आज्ञाला तहान लागली म्हणून ती एका जागेवर उभी राहून पाण्याची बॉटल उघडत होती, पण उभी मात्र समीरच्या रस्त्यातच होती. समीर आपला खाली बघून जॉगिंग करत होता. त्याच्या लक्षातच आले नाही की आज्ञा समोर उभी आहे आणि पळता पळता तो तिच्यावर जाऊन धडकला. अनपेक्षितपणे धडक लागल्याने आज्ञाचा हातातली पाण्याची बॉटल वरती उडाली आणि आज्ञा समीर दोघेही खाली जमिनीवर पडले . अचानक धडक लागल्याने समीरने तिच्या मानेजवळ पकडले होते आणि तसाच तिला पकडत तो खाली पडला होता. आज्ञा खाली आणि तो तिच्या वर... त्याच्या हात मात्र तिच्या मानेखाली होता. ते दोघं एकदम जवळ होते. 

 

        आज्ञाला तर थोड्या वेळासाठी काय झाले आहे ते काही कळलेच नाही. नंतर मात्र समीरला आपल्या इतक्या जवळ बघून , त्याचा स्पर्श अनुभवताना तिला खूप आनंद झाला. ती एकटक समीरच्या डोळ्यात बघत होती. तिच्या तशा बघण्याने समीर पण नकळतपणे तिच्या डोळ्यात हरवायला लागला होता. पाण्याची बॉटल वरती उडून बाजूला येऊन पडली , त्यातलं पाण्याचे थेंब दोघांच्या अंगावर पडले , तशी आज्ञा भानावर आले. समीर मात्र अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता. समीरला असं हरवलेलं बघून आता आज्ञाला हसू येत होते. ती गालातच हसत होती. 

 

 

" वो गिर पडे हम पर , इसमे मे रब की ही कोई ख्वाईश लगती है

कभी हम उनकी आँखोमे , तो कभी उनके होटोंमें खोए राहते है " 

 

  आज्ञा त्याच्या चेहऱ्याला ... डोळ्यांना... ओठांना बघत बोलली....

 

    तिच्या बोलण्याने समीरची तंद्री तुटली आणि तो भानावर आला....

 

" काय.....?" ..... समीर प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता. 

 

हेच की.....

" आपके ओंठ है या गुलाब की पंखुडीया

वाह वाह.. 

आपके ओंठ है या गुलाब की पंखुडीया

लड्डू या जलेबिया...टेस्ट करून बघूया? .." 

 

आज्ञा त्याला डोळा मारतच बोलली. तो मात्र गडबडला. 

 

" डॉक्टर समीर, माती खाल्ली आज तुम्ही, काय विचार करेल या मॅडम आता ? यांना तर तू स्वतःहून चान्स दिला" ...तो मनातच बोलत होता ... त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तिच्याकडे तो एकटक खाऊ की गिळू नजरेने बघत होता...

 

"डॉक्टर , मला आवडेल असं आजन्म जन्म तुमच्या बाहुपाशात राहायला , स्वर्ग भासतो तुमच्या मिठीत मला. पब्लिक प्लेस आहे, तुम्हाला चालत असेल तर मला पण चालेल", आज्ञा समीरकडे बघत भुवया उंचावत बोलत होती. 

 

        तेव्हा समीरच्या लक्षात आलं की तो तिच्या अंगावर पडला आहे. त्याने आपली मान वळवली. तो उठायला गेला , पण त्याचा हात तिच्या मानेखाली होता, उठताउठता तो परत तिच्या अंगावर पडला आणि बॅलेंस गेल्याने तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या गालांना झाला . अचानकपणे झालेल्या त्या स्पर्शाने अंगातून करंट गेल्यासारखे त्याला जाणवले. आज्ञाच्या सुद्धा अंगावर शिरशिरी आली . आता तिला बोलायला काहीच सुचत नव्हते. तिचं डोकं पूर्ण ब्लँक झालं होतं. ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती आणि त्याला अनुभवत होती. 

 

" मिस, तुमच डोकं वरती करा, मला हात काढता येत नाही आहे", समीर

 

         आज्ञाला डोकं अद्धरपणे वर करता येईना..२-३ दा प्रयत्न केला तरी तिचं डोकं खाली पडत होते.. तिने त्याला दोन्ही हातानी हग केल्यासारखं त्याच्या पाठीवरून मानेजवळ घट्ट पकडत निमूटपणे तिच डोकं वरती केलं , तिच्या गालांचा तो मुलायम स्पर्श त्याच्या मानेला होत होता, आता दोघांना पण एकमेकांचे heart beats चांगलेच जाणवत होत....

 

            समीरचे तर हृदय जोऱ्याने धडधडत होते. त्याला असे वाटत होते की आता त्याचे हार्ट ❤️ बाहेरच जम्प करेल. तो आधी कधीच कुठल्या मुलीच्या इतक्या जवळ नव्हता गेला , पहिल्यांदा एका मुलीचा स्पर्श तो अनुभवत होता. समीरने अलगदपणे तिच्या डोक्यात घालून आपला हात काढला आणि तिचं डोकं अलगदपणे खाली ठेवले. तो बाजूला होत जागेवर उभा झाला. आज्ञा पण कपडे झटकत उभी झाली..

 

" सॉरी मिस , ते चुकून झालं" , समीर स्वतःचे कपडे झटकत बोलला. 

 

" कोई बात नही डॉक्टर , ऐसी गलतीया बार-बार हो हरबार हो , हर रोज हो , भगवान से बस येही हम दुवा मांगते है" , वरती आकाशाकडे हात जोडत आज्ञा मिश्किलपणे बोलत होती. 

 

" ये बिन मौसम बरसात कहा से हुई भाई, वो भी सवेरे सवेरे?", राज हळूहळू त्यांच्या जवळ चालत येत त्या दोघांचे ओले कपडे बघत बोलला. 

 

" तुम्हा लोकांना वेड लागतं का रे सकाळी सकाळी, शायरियां , कविता करायचे?", समीर त्रासिक होत बोलला. 

 

          आज्ञा त्याच्या डायलॉग वर गालातल्या गालात हसायला लागली...

 

" अरे तुम्ही दोघं ओले दिसलात म्हणून असंच बोललो थोडं" , राजने सांभाळून घेतलं. 

 

" हॅलो मिस आज्ञा, काय म्हणते सकाळ? आज मॅचींग मॅचींग?", राज मिश्किलपणे हसत बोलला, त्याने दुरून या दोघांना एकमेकांवर पडलेले बघितलं होतं. 

 

" व्हेरी हॉट मॉर्निंग डॉक्टर राज आणि हमने जनम ही डॉक्टर सहाब को मॅच करणे के लिये लिया है. आज कपडे मॅच हुये है , कल दिल मॅच होंगे , डॉक्टर डॉक्टर दिलं के डॉक्टर , बरोबर ना ? ", आज्ञा समीरकडे बघत डोळा मारत बोलली. 

 

            आज्ञाच्या वाक्याने राजला हसू अनावर झाले . तो भुवया उंचावत समीरकडे बघत होता. समीरने त्याचे डोळे मोठे केले, तसे टॉपिक चेंज करत राज बोलला..

 

" समीर तू काय नेहमी हे पार्कमध्ये येण्याचे टाइमिंग चेंज करत असतोस?" ..... राज

 

" मी पण तेच म्हणत होते , काय रोज रोज टाईमिंग चेंज करता , आम्हाला दुर्बिन घेऊन पाळत ठेवावी लागते डॉक्टरांवर. बाय द वे टाईमिंग चेंज करून काही फायदा नाही डॉक्टर" , आज्ञा मिश्किलपणे म्हणाली..

 

" ओह , आता कळले समीरचे रोज जॉगिंगच्या वेळा का बदलतात ते ? ", राज 

 

" बदलू देत , पण यांच्यासोबत यांचे टायमिंग मीच मॅच करणार आणि शेअर पण करणार ", आज्ञा 

 

" बरं मी निघते, तुम्ही करा कंटिन्यू" , आज्ञा

 

" अरे लवकर?", राज

 

" हो, आज देवासमोर नारळ फोडून येते" , आज्ञा

 

" एनीथींग स्पेशल मिस?" , राज

 

" आज लगता हैं मै हवा मे हू...

आज इतनी खुशी मिली है.....

 

धनक का रंग है निखारे मेरे दुपटे पे

सारी खुशबू मेरी बाहोमे सीमट आयी है

पाव पडते नाही जमीन पे मेरे 

मुझ्पे अजीब सी मस्ती येह उमड आयी है

आज लगता हैं मै हवा मे हू...

आज इतनी खुशी मिली है.....

आज बस मे नही है मन मेरा

आज इतनी खुशी मिली है" ........आज्ञा

 

" काय?" , राज

 

" म्हणजे , मी आज स्वर्गात होते, ना ना स्वर्ग जमिनीवर अवतरला होता " , आज्ञा दोन्ही हाथ कंबरेवर ठेवत भुवया उंचावात समीर कडे बघत बोलत होती. 

 

" Have a beautiful day sweetheart" , समीरला फ्लाईंग किस करत स्वतःतच नाचत आज्ञा निघून गेली. 

 

"काय बोलले त्यां मिस? ... रंग? दुपट्टा? त्या तर ट्रॅक सूट घालून होत्या. काय बोलत होत्या काही कळलं नाही. हवेतच असतात नेहमी, नाही समीर?" , राज समीरची उडवत बोलला

 

" त्यांचं डोकं ठिकाणावर असतेच कधी. त्यांचं बोलणं तर नेहमीच माझ्या डोक्यावरून जात असते" , समीर कपाळावर आठ्या पाडत ती जात होती त्या दिशेने बघत बोलला..

 

" बट शी इज क्यूट रे. मी म्हणतो अशी देवसेना तुला भेटायची नाही" , राज 

 

" ओ रियली? शी इज नॉट माय टाइप गर्ल" ....समीर

 

 

" खरंच....? मग इथे पब्लिक प्लेसमध्ये काय रोमान्स सुरू होता तुमच्या दोघांचा? आणि मला म्हणतो सगळं डोक्यावरून जातं. सगळं बघितला मी , तुम्ही एकमेकांत हरवला होतात ते" ... राज

 

" त्या मिस डोक्यांनी जड आहेत आणि मला पण पागल करून सोडतील . चल एक्ससाइज करूया" .... समीर

 

 

******

 

" आज्ञा..... आज्ञा ......गुड न्यूज" ..... प्रिया धावतच आज्ञा जवळ येत बोलली..

 

" अगं हळू , पडशील ...काय झालं ओरडायला? एवढी काय एक्साईट होत आहेस?"... आज्ञा

 

"अगं नोटीस बोर्डवर इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशन नोटीस लागला आहे" ....... प्रिया

 

"तर मला का सांगतेस हे?तुला तर माहिती आहे ना मला त्या कॉम्पिटिशन मध्ये काही इंटरेस्ट नाही" , आज्ञा

 

" अगं त्यामध्ये सायली , डॉक्टरांची सिस्टर... तिने पार्टिसिपेट केलं आहे", प्रिया

 

" हा तर मग करू दे ना" आज्ञा

 

" अग तुला तिच्याशी मैत्री करायची होती ना?", प्रिया

 

"हो मग त्याचा आणि याचा काय संबंध?", आज्ञा

 

" अगं ते duel डान्स कॉम्पिटिशन आहे , म्हणजे दोघांनी मिळून डान्स करायचा आहे. दोघांचा ग्रुप आहे त्यात , तर सायली आणि सायलीच्या फ्रेंडने पार्टिसिपेट केले आहे" , प्रिया एक एक माहिती पुरवत होती. 

 

" हो पण मग माझा काय संबंध तिकडे?" , आज्ञा

 

" अगं डंबो , तू आणि सायली जर दोघांनी मिळून कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केले , तर तुम्ही ट्रॉफी सुद्धा जिंकाल आणि तुमची फ्रेंडशिप सुद्धा होईल. अजून एक महिना आहे कॉम्पिटिशन साठी. प्रॅक्टिस करताना तुमची छान मैत्री होईल. कळतंय का मी काय म्हणते ते?" , प्रिया

 

"अग पण तिची पार्टनर आहे ना ऑलरेडी, तिच्या सोबत मी कशी काय तिथे जाणार?", आज्ञा

 

" अगं आता ऑडिशन होणार आहेत , त्यातूनच जे बेस्ट डान्सर असतील, त्यांना सिलेक्ट करणार आहे आणि तिच्या पार्टनरचे म्हणशील तर वेळेवर काहीपण होऊ शकता ना, पाय मुरगळू शकतो... पडू शकते" , प्रिया डोळे उडवत बोलत होती....." आणि तुझ्यासारखी बेस्ट डान्सर तर इथे कोणीच नाही, तुझं सिलेक्शन तर होणारच होणार आहे आणि मी ऐकलंय सायली सुद्धा खूप चांगली डान्सर आहे, मग तुमची जोडी बनायला कोण अडवते?", प्रिया आज्ञाला डोळा मारत बोलली...

 

" अरे हा, हे तर मस्तच आयडिया. एकदा जर का सायली माझी चांगली फ्रेंड झाली, तर त्यांच्या घरी जाणारा रस्ता मला मोकळा" , आज्ञा खुशीतच प्रियाला हाय-फाय देत बोलली. 

 

********

 

 

क्रमशः 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "