Dec 01, 2021
कथामालिका

Love ... Sky is not the limit 5

Read Later
Love ... Sky is not the limit 5

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग ५

 

 

" शुक.... शुक... आज्ञा ss...आज्ञा ss.... " 

आज्ञाची फ्रेंड रिया तिला क्लासच्या बाहेरून हळू आवाजात हातवारे करत आवाज देत होती. आज्ञा आतमध्ये क्लास अटेंड करत होती, तिचं लक्ष बाहेर रिया कडे गेलं, आणि तिने हातानेच काय म्हणून विचारलं..

 

"डॉक्टर!" ...... रिया हळू आवाजात सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण आज्ञाला काहीच आवाज येत नव्हता. 

 

"काय?"..... आज्ञा

 

" अगं डॉक्टर आलेत खाली" ...... रिया डॉक्टर सारख्या खुणा करत हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करत होती ....

 

"डॉक्टर !" ........ आज्ञा तिच्या जागेवरून उठत , डोळे मोठे करत मोठ्याने बोलली. क्लास मधले सगळे तिच्याकडे बघायला लागले..

 

" आज्ञा, काय आहे? हा क्लास आहे , तुम्ही इतक्या जोराने कसे काय ओरडू शकता?" ....... मिस देसाई बोलल्या. 

 

" मॅम , ते मला वॉशरूमला जायचं" ..... आज्ञा

 

" काय ? तुम्ही काय आता लहान आहेत काय , असे एस्क्युज सांगायला?" .... मॅम

 

" मॅम , प्लीजsss इमर्जन्सी आहे , सॉरी मॅम पण मी जाते आहे" ...... म्हणत तिने आपली बॅग बुक उचलली आणि पळतच क्लास रूमच्या बाहेर गेली.. 

 

" हा बोल काय झालं?" काय म्हणत होती डॉक्टरचे? " .... आज्ञा रिया जवळ येत बोलली.

 

" अगं खाली डॉक्टर आले आहेत , रॉकीचा काही मॅटर झाला आहे बहुतेक, कॉलेजच्या बाहेर त्याच्याशी बोलत आहेत" ..... रिया

 

 

        आज समीर काही कामाने कॉलेजमध्ये आला होता , प्रिन्सिपल सोबत भेटून तो परत चालला होता की त्याला मुलांचा एक घोळका दिसला, तेथून जाणाऱ्या एका मुलीला बघून त्यातला एक मुलगा कमेंट पास करत होता, शिट्या मारत होते.... त्यांना बघून समीर त्यांच्या जवळ गेला.....

 

" काय मुलांनो, काही क्लासेस वगैरे नसतात वाटते तुम्हाला? इथे टवाळगिरी करत बसला आहात?" ..... समीर

 

" ओsss तुम्ही आपल्या रस्त्याने व्हा , आम्ही काय करायचे आम्हाला सांगायचं नाही" ..... रॉकी

 

" बरं तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो मग !", , समीर त्याच्या शर्टच्या हाताच्या बाह्या फोल्ड करत बोलला...

 

 

           आज्ञा आणि रिया पळत पळतच तिथे येऊन थोड्या दूरच थांबल्या. 

 

" Wow! , डॉक्टर काय मस्त दिसत आहे अँग्री लूक मध्ये, हाय मै मर्जावा . मारतात की काय या रॉकीला ? जोरदार पडते बहुतेक आज रॉकी वर" ........ आज्ञा

 

" पडली पाहिजे , जास्तीच उडत होता" ..... रिया  

 

" पण काय ग , काय झालं? काय केलं त्या रॉकीने?" .... आज्ञा

 

" काल त्याने एका मुलीला त्रास दिला होता , बहुतेक ती डॉक्टरांचीची बहिण आहे. आज ते मला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये पण दिसले" .....रिया

 

" अरे हे तर आपले डिपार्टमेंट आहे ...मी कुठे होते तेव्हा?" ....आज्ञा

 

" अगं काल तू नाही का लवकर गेली होतीस , त्यानंतर झालं हे सगळं" .....रिया

 

" हो अच्छा, तरीच" ....आज्ञा

 

" अरे हे काय , तो रॉकी तर त्यांचे पाया पडतो आहे , हात जोडतो आहे" .......रिया

 

" अरे यार ! डॉक्टरांची फायटिंग बघायला मिळेल असं वाटलं होतं , तरीच वाटलं होतं हे डॉक्टर काही मारायचे नाही" ....... आज्ञा

 

" हो ना , पण काही न करताच हा कसा काय जमिनीवर आला?" .....रिया

 

" डॉक्टरांनी रॉकीला किडनी वगैरे काढून घ्यायचे धमकी दिली की काय? " ...आज्ञा

   

     त्यांच्या या गोष्टी ऐकून समोर त्यांना पाठमोरा उभा असलेल्या मुलाला खूप हसायला आले आणि तो हसायला लागला....

 

आज्ञचे लक्ष त्याच्याकडे गेलं .. 

 

" ओ हाय डॉक्टर राज !" .... तिने हात हलवत त्याला हाय केलं, त्याचा रिप्लाय बघण्यात वेळ न घालवता तिने परत डॉक्टर वर आपले लक्ष कॉन्सन्ट्रेट करत होती.......

 

" ही इस द ग्रेट डॉक्टर समीर, त्याला हात लावायची गरज नाही पडत" ....... राज हसत बोलला. 

 

आज्ञाने त्याच्याकडे बघून स्माईल केलं आणि परत समीरकडे बघायला लागली....

 

 

" आता लक्षात ठेवायचं , कुठल्याच मुलीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही , सायलीच काय इथल्या सगळ्या मुली मला माझ्या बहिणी सारख्या आहेत , त्यामुळे सांभाळून राहायचं" .... समीर रॉकीला खडासावत होता. 

 

" एक मिनिट........ एक मिनिट....." .. आज्ञा काहीतरी आठवून समोर त्यांच्याजवळ गेली...

 

" काय बोललात , इथल्या सगळ्या मुली तुमच्या बहिणी? मला मान्य नाही , मला नको आहे ही पदवी. मला नाही बनायचं तुमची बहीण वगैरे, मी माझं संरक्षण स्वतः करू शकते. तेवढी ती लाईन वापस घ्या डॉक्टर. मी सोडून सगळ्यांना बहिणी बोला. इनफॅक्ट सगळ्यांना बहीण बनवूनच टाका. मला काही प्रॉब्लेम नाही. पण मी काही तुमची बहीण वगैरे नाही" ........ आज्ञा तावातावामध्ये येऊन बोलत होती...

 

   ते ऐकून राजला हसू फुटलं , पण त्याने त्याचं हसने कंट्रोल केले , रियाने पण डोक्यावर हात मारून घेतला. 

 

      समीरने वळून तिच्याकडे एक भुवई उंच करत बघितलं. " ही, इथे पण ..."...असे चेहऱ्यावर बोर एक्सप्रेशन्स दिली...

 

" ये काय रे रॉकी , तुला त्यादिवशी पडलेली कमी झाली वाटतं. काल मी लवकर काय गेले तुझ्या तर आंगात आले? पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवायाचं, गाठ माझ्याशी आहे. चल निघ इथून" .... आज्ञा त्याची कॉलर पकडत बोलली,... तसा तो निघून गेला

 

 

समीर परत जाण्यासाठी वळला...

 

" डॉक्टर , काय सॉलिड दिसत होते तुम्ही , अँग्री लूक मध्ये. आज तो तुस्सी हमारे दिल को घायल कर दित्ता" ...... आज्ञा फ्लाईंग किस करत बोलली. 

 

" बाय द वे डॉक्टर, त्याला मी हॅण्डल करून घेईल, तुम्ही त्याची किडनी वगैरे नका काढू , तसा बरा मुलगा आहे, समजवलं की समजून जातो" ....... आज्ञा समीरला सांगत होती. 

 

" काय?" ...... समीर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. 

 

" अरे तू नाही का त्याला समजवलं, तो तुझ्या पाया पडत होता, हात जोडत होता" ..... ते बोलते आहे मिस आज्ञा" .... राज हसत बोलला

 

" हा बरोबर ...".... आज्ञा 

 

 

" बरं , मी आलोच , तू हो पुढे, बस कार मध्ये" .... म्हणत राज पुढे निघून गेला..

 

तेथे जमलेल्या सगळ्या मुलींची नजर समीरवर होती...

 

" काय बघताय? लेक्चर्स नाहीत का तुम्हाला? चला जा क्लासमध्ये ! " ......आज्ञा कमरेवर हात ठेवत त्या मुलींना ओरडली , तशा त्या मुली निघून गेल्या..... 

 

" डॉक्टर, ते.... आता ते शर्ट स्लिवसचे फोल्ड काढून घ्या" .......आज्ञा

 

समीरने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितले....

 

" अहो म्हणजे माझ्याकडून भलते सलते असे काही घडायला नको म्हणून म्हणते आहे" ....... आज्ञा त्याला एक डोळा मारत बोलली.....

 

     समीर तिच्याकडे दुर्लक्ष करत कारमध्ये जाऊन बसला...

 

        आज्ञा समीर ला बाय करत , परत वळून क्लासकडे जायला निघाली, तर रस्त्यात तिला रॉकी दिसला , त्याच्यावर 2...4 पडल्या सारख्या दिसत होत्या, डोळा सुजला दिसत होता… तिला समोरून राज येताना दिसला....

 

" इंटरेस्टिंग डॉक्टर राज, तो ये मामला हैं ! " ..... आज्ञा त्याला चिडवत त्याच्याजवळ आली. 

 

" कोणता मामला?" ..... राज न समजल्या सारखा बोलला. 

 

" ये लव शोव वाला अँगल" ...... आज्ञा त्याला भुवया उडवत विचारत होती ..

 

" काय लव?"..... राज परत न कळल्यासारखा बोलला. 

 

" रॉकीला का मारलं? ...... ह्म्म?" ...... आज्ञा दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे मिश्कीलपणे हसत विचारत होती. 

 

" ते .......ते काही नाही , समीरचे बोलणं त्याच्या लक्षात राहिले पाहिजे म्हणून थोडं सांगून आलो" ....राज हात झटकत बोलला. 

 

" त्या दिवशी भावा सोबतच डेट वर जावं , तरी म्हटलं एवढा रविवार, सुट्टीचा दिवस , इथे हॉटेल मध्ये काय करतात दोघं ? पण आवडलं आपल्याला, आयडीया चांगली दिली, पहिले भाई को पटाव, देन सिस्टर को....... मान गये डॉक्टर राज आपको" ......... आज्ञा हसत बोलली. 

 

राजने तिची समोर हात जोडले....." मॅडम भारी आहात आपण, यातले काही बोलू नका तुमच्या डॉक्टरांना, नाहीतर काही सुरू व्हायच्या आधीच सगळं संपयचं" ....... राज

 

" किती घाबरता हो तुम्ही डॉक्टरांना? किती क्युट आहे ते....... !", आज्ञा 

 

" क्यूट ?", राज बिचाऱ्या नजरेने तिला बघत होता . 

 

" बरं कोणालाच काही नाही सांगणार, पण एका अटीवर !" ........ आज्ञा

 

"यू ब्लॅकमेलिंग मी , मिस " ......राज

 

" नाही नाही ब्लॅकमेल वगैरे नाही, प्रेमाची किंमत कळते हो आम्हाला डॉक्टर राज. गरज पडेल तेव्हा छोटीशी मदत करा, बस एवढच काय ते, बाकी काही नाही" .........आज्ञा

 

" छोटीशी मदत? तुमच्या डॉक्टरला माहिती पडलं ना , कच्चा खाईल तो मला" ..........राज

 

" काय मस्करी करता तुम्ही , डॉक्टर व्हेजिटेरियन आहेत" ........ आज्ञा हसत बोलली

 

" आणि तसं पण तुम्हाला माझ्या मैत्रिणी जवळ काम पडेलच ना , तेव्हा मी पण तुम्हाला मदत करेल" ....आज्ञा

 

" तुमची मैत्रीण? माझं काय काम असणार आहे तुमच्या मैत्रिणी जवळ ?" .....राज

 

" सायली, आता डॉक्टरांचे सिस्टर म्हणजे माझी मैत्रीण होणारच ना? तुम्हीच तर दिली आता आयडिया" .... आज्ञा डोळा मारत बोलली. 

 

राजने डोक्यावर हात मारून घेतला........

" बरं येतो आता , समीर वाट बघत असेल" .....राज

 

" अहो डॉक्टर तुमचा नंबर द्या , गरज पडेल ना" ....आज्ञा

 

" समीरचा तर नंबर नाही मागितलं तुम्ही कधी, त्याचा नंबर बरोबर आहे तुमच्या जवळ? " .........राज

 

" वो तो अपना दिल है , उनका सब कुछ है अपने पास..... तुम्ही तुमचा नंबर द्या ?" ...आज्ञा

 

तसा दोघांनी आपापले नंबर एक्सचेंज केले आणि राज तिथून निघून गेला....

 

 

" चला आज्ञा मॅडम, नेक्स्ट मिशन..... सिस्टर पटाव ! " .... आज्ञा मनातच बोलत क्लास अटेंड करायला निघून गेली.

 

समीरची लहान बहीण सायली आज्ञाचा कॉलेजमध्ये सायन्स ग्रुपला शिकत होती. आणि रॉकीने तिला दोन-तीनदा त्रास दिला होता म्हणून आज समीर प्रिन्सिपल सोबत बोलायला कॉलेज मध्ये आला होता...

 

******

 

" हॅलो डॅडा.. कसा आहेस...?" ..... आज्ञा तिच्या वडिलांचा फोन उचलत बोलली

 

" किती फोन केले , आता उचलते आहेस...कुठे होती?" ......डॅडी

 

" अरे कॉलेज असते माझं, तू फोन केला तेव्हा मी कॉलेजमध्ये होती" .....आज्ञा

 

" बरं बरं , कसा सुरू आहे अभ्यास...? "...डॅडी

 

" तु मला बोर करायला फोन केला आहेस काय?" .....आज्ञा

 

" एका मंत्र्यांच्या मुलाचं स्थळ सांगून आले आहे तुला लग्नासाठी" ........ डॅडी

 

" मंत्र्याचा मुलगा? म्हणजे मारपीट करणारा असेल. मला असे मारापीटी करणारी मुलं अजिबात आवडत नाही. . आणि हे काय माझं लग्नाचं वय आहे का ? अजून तरी चार पाच वर्षे मला लग्न करायचं नाही आहे" .....आज्ञा

 

" काय मारपीट करणारी मुलं नाही आवडत? कोण सांगतय जी स्वतः मारामारी करत असते ती?" ....... डॅडी

 

" मी कुठे मारामारी करते, मी इतकी सालस सोज्वळ मुलगी. आणि मला असा साधा, सभ्य, शिकलेला, गुणी मुलगा हवा आहे , हे असं कोणी मंत्री-संत्री नको. डॅडा तू माझी काळजी करू नकोस , मी माझ्यासाठी मला आवडणारा मुलगा बघून घेईल" .........आज्ञा

 

" आमची नजर आहे तुमच्यावर." ...... डॅडी

 

" यार बाबा , आता तू मला बोर नको करू प्लीजss , मी सांगितलं ना मला तीन-चार वर्ष तरी लग्नाचा विषय नको आहे. माझं वय किती आहे ओन्ली नाईंटीन,कोणी इतक्या लवकर लग्न करतं का?" .......आज्ञा

 

" बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी. पण जास्त आदळाआपट , मारामारी करू नको, माझं पूर्ण लक्ष आहे तुझ्याकडे" .... डॅडी

 

" ओके"..... आज्ञा 

 

" बरं कधी येते आहेस इकडे?" ...... डॅडी

 

" काय.... तुझा सुखी संसार सुरू आहे ना तिकडे , उगाच कशाला तुला माझी ते लुडबुड हवी आहे? तुझी बायको किती कुरकुर करत असते मी असले की तिकडे " .....आज्ञा

 

" तुझी आई आहे ती" .... डॅडी

 

" नाही , तुमची बायको आहे , सावत्र आई आहे ती" ....आज्ञा

 

" बरं जाऊ द्या ना , मी येईल कधीतरी . आदित्य कसा आहे ?अभ्यास वगैरे कसा सुरु आहे त्याचा?" ....आज्ञा

 

" तो ठीक आहे, तुझी आठवण काढत असतो ,येऊन जा कधीतरी" ..... डॅडी

 

" हो ठीक आहे" .....आज्ञा

 

" काळजी घे.... ठेवतो फोन" ... डॅडी

 

 

*******

 

"यार रीया , हा खूपच पढकू ग्रुप दिसत आहे, आपले कसे जमायचं यांच्यासोबत?" .......आज्ञा

 

" आपलं नाही तुझं" ....रिया

 

" हो ना यार , डॉक्टरांसाठी काय काय करावं लागतं. ठीक आहे , चल त्यांच्याशी पण फ्रेंडशिप करूया!" ....आज्ञा

 

      आज्ञा आणि आज्ञाचा ग्रुप समोर असलेल्या सायलीच्या ग्रुप बद्दल डिस्कस करत होता. सायली ही अतिशय हुशार , अभ्यासू मुलगी होती, तितकीच दिसायला सुद्धा खूप गोड. तिचा बाकी ग्रुप पण तिच्यासारखं हुशार होता , अभ्यास एके अभ्यास असं त्यांचं काम होतं......

 

 

" हाय गर्ल्स! " ...... आज्ञा सायलीच्या ग्रुप जवळ येऊन बोलली

 

सायलीच्या ग्रुपने सुद्धा हॅलो केलं...

 

" काल तुझा दादा आला होता ना? काही त्रास झाला का सायली तुला? तू आम्हाला सांगू शकतेस, आम्ही बघितलं असतं त्या रॉकीला?" .....रिया

 

" केले सगळं सोर्टआउट, रोकी सॉरी बोलून गेला, आता नाही पडणार गरज ! " ......सायली

 

" भावा सारखेच एटीट्यूडवाली दिसते ही ".....आज्ञा मनातच बोलली....

 

" चला छान झालं, पुढे काही गरज लागली तर सांगा, आम्ही आहोत तुमच्या फ्रेंड्स !" ....... रीता

 

" फ्रेंड्स...?" म्हणत आज्ञाने हात समोर केला. सायलीच्या बाकी फ्रेंड्स हात समोर केला मात्र सायलीने केला नाही.....

 

" तुमचा मारामारीचा ग्रुप आहे, आम्ही आपले दूर राहिलेले बरे! " ...... सायली

 

" ओके , एज यु विश ! " ..... म्हणत आज्ञा आणि ग्रुप निघून गेला..

 

 

" यार ही तिच्या भावासारखे खुप भारी आहे, फुल ऑफ एटीट्यूड. बट आय लाईक इट...... क्युट आहे मुलगी. हिची बेस्ट फ्रेंड तर आता बनणारच, हिला आपली sister-in-law बनवणारच" .........आज्ञा

 

******

 

क्रमशः

 

*******

 

हॅलो फ्रेंड्स 

 

लाईक , comments साठी खूप खूप thank you ❤️

 

      एक छान कॉमेंट आली की जर मुलगा असे आज्ञासारखा वागेल तर आपण ते खपवून घेणार काय ? तर मुलगा असो वा मुलगी असे वागणे नक्कीच चांगले नाही, वेळीच त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे नाही तर असे प्रकरण जीवावर बेतू शकतं , एकतर्फी प्रेमातून किती भयानक कृत्य झाले आहे हे आपण न्यूज मधून बघितलेच आहे . पण हे प्रेम नाही विकृत मानसिकता आहे . 

 

         आज्ञा चे प्रेम समीर मान्य करेल, की नाही करेल , नाही करेल तर आज्ञा काय करेल ? ती असेच चुकीचे पाऊल उचलते काय ? ती समोर सोबत काही वाईट करते काय ? की त्याला मिळवण्यासाठी आणखी काही करते ? हे सगळं पुढे कथेतून कळलेच. माझ्या आधीच्या कथा प्रमाणे यातून सुद्धां काहीतरी चांगलच सांगायचा प्रयत्न असेल. प्रेमाची एक नवीन परिभाषा असेल. 

 

     कुठल्याच चुकीचा गोष्टींचा प्रसार करणे अथवा त्याचे समर्थन करणे कथेचा हेतू नाही आहे. कथा केवळ मनोरंजन म्हणून घ्यावी हीच विनंती. 

 

    कथेतून काही अयोग्य अथवा नाही आवडले तर नक्कीच कॉमेंट्स मधून कळवा , मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. Thank you. 

 

     आणखी एक , ही कथा subscription मध्ये नाही आहे , फ्री आहे . 

 

Thank you 

Happy reading ❤️ 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "