Dec 01, 2021
प्रेम

Love ... Sky is not the limit 4

Read Later
Love ... Sky is not the limit 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग ४

 

 

" हॅलो! " ..... समीरने रिंग होत असणारा मोबाईल उचलला. 

 

" डॉक्टर डॉक्टर दील के डॉक्टर , अवेलेबल आहेत का?" ..... आज्ञा

 

" तुम्ही.....?" , समीर फोन कट करणार तेवढ्यात

 

" डॉक्टर फोन नाही कट करायचा हा , नाहीतर मी तिथे येईल . और हम जो बोलते है वो करते है..... हे तुम्हाला पण माहिती आहे" ......आज्ञा

 

" तुम्ही असे किती नवीन नंबरने मला कॉल करणार आहात....?" ...समीर

 

" काय डॉक्टर तुम्ही पण ना , तुम्ही किती असे माझे नंबर ब्लॉक करणार आहात? मी तुम्हाला सांगते तुम्ही माझा नंबर ब्लॉक करून थकाल आहात , पण मी नवीन नंबरने आणि तुम्हाला फोन करायला मात्र नाही थकणार , आणि हे माझे प्रॉमिस आहे हा तुम्हाला . मग कशाला उगाच तुमच्या हातांना त्रास देता माझा नंबर ब्लॉक करण्या करिता ! " ......आज्ञा

 

" बोला , काय हवंय ......?"....हताशपणे समीर उत्तरला

 

" तुम्ही.......? मिळेल का? " ....... आज्ञा मस्करी करत बोलली. 

 

" मी काय वस्तु आहे काय तुम्हाला मिळायला?" .....समीर

 

" हाय हाय , नकार नाही दिला ! सो स्वीट ऑफ यू ! " 

" बरं , मग भेटणार का? " ......आज्ञा

 

" मुद्द्याचे काय ते बोला?" .....समीर

 

" अहो मुद्द्याचे तर तुम्हाला कळतच नाही" .....आज्ञा

 

" कशासाठी कॉल केला होता?" .....समीर

 

" कधी फ्री आहात...?".... आज्ञा

 

" सध्या नाही! " ......समीर

 

" अहो डॉक्टर , असे काय करता , किती दिवस झाले तुम्हाला जवळून बघितलं नाही. तुम्हाला डिनर डेट साठी इन्व्हाईट करायचा माझा विचार होता" .....आज्ञा

 

" आणि मला नसेल यायचं तर?" मला अशा फालतू गोष्टींपेक्षा पण भरपूर महत्वाचे कामं आहेत " .......समीर

 

" असे नाराज होऊन नका बोलू डॉक्टर , मी कधी तुम्हाला कशाची जबरदस्ती केली आहे काय ? थोडं हसून बोलत जावा, क्युट दिसाल. हॉट आणि हँडसम लूक तर बघितलंच आहे तुमचं , थोडं क्युट लूक पण बघू द्या ? तसे तुम्ही आपल्याला सगळ्याच लूकमध्ये भारी आवडता हा डॉक्टर" .....आज्ञा

 

" तुमच महत्त्वाचं बोलून झालं असेल तर फोन ठेवू ? मला बरीच काम आहेत" ......समीर

 

" हो हो नक्की. डॉक्टर आज लाईट ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही फारच डॅश डॅश डॅश दिसत आहात !" ... आज्ञा मस्करी करत बोलली. 

 

" हिला कसं माहित आज मी लाईट ब्लू घातलाय" ..... इकडे तिकडे बघत तो आज्ञा कुठे जवळपास आहे काय ते चेक करत होता… 

 

" इकडेतिकडे काय बघताय डॉक्टर साहेब , थोडं आपल्या हृदयात झाकून बघा की हो, तिथेच सापडेल मी "......आज्ञा

 

" ठेवतो" .......... समीरने फोन कट केला..

 

 

*******

 

" समीर , तू ही केस घेऊन चूक तर नाही करत आहेस ? एक प्रख्यात गुंड आहे तो" ...... डॉक्टर जोशी

 

 

" नाही डॉक्टर , माझ्यासाठी वाईट चांगलं काही नाहीये, माझ्यासाठी तो फक्त एक पेशंट आहे आणि मी त्याचा डॉक्टर" ......समीर

 

" As your wish , young man "...... डॉक्टर जोशी

 

           आज रविवार होता , पण एक इमर्जन्सी केस आल्यामुळे समीरने एक हार्ट सर्जरी प्लान केले होते....

 

         सर्जरी आटोपल्यावर समीर हात धूवून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला आणि नर्सेसला काही इन्स्ट्रक्शन सांगून तो त्याच्या केबिनमध्ये चालला गेला....

 

 

" हॅलो राज, बोल"....... समीरचा वाजणारा फोन उचलत समीर बोलला 

 

" कशी झाली सर्जरी?" ......राज

 

" हा , ठीक झाली ...पेशंट शुद्धीत आल्यावर कळेल डिटेल" .....समीर

 

" ओके गुड" .......राज

 

" बरं ऐक , फ्री आहेस का? जाम थकलो यार. तू फ्री असशील तर बाहेर डिनरला जायचं का? तेवढाच जरा थोडा चेंज" ....समीर

 

" हो चालेल जाऊया, मला पण तसे बोर होतंय , संध्याकाळी तयार रहा, मी तुला पिकप करेल ".....राज

 

 

 

" ओके, डन!" .... समीर

 

 

*****

 

फाईव्ह स्टार हॉटेल तथास्तु मध्ये समीर आणि राज दोघं डिनर साठी आले होते . तिथे मोकळ्या हवेत ओपन गार्डन रेस्टॉरंटमध्ये एका कॉर्नरला बसले होते. त्यांच्या नॉर्मल गप्पा सुरू होत्या.

 

" wow.... " 

"ब्युटीफूल...." 

"गॉर्जेस ..... " 

" वेरी प्रेटी....." 

 

        असे शब्द समीर आणि राजच्या कानावर पडले. तसे राज आणि समीरने entrance च्या दिशेने बघितले, आणि समीरने डोक्यावर हात मारून घेतला....

 

            समोर दरवाजात आज्ञा उभी होती. कुंकू रेड कलरचा त्यावर फ्लावर्स डिझाईन असलेला knee length वन पीस कम फ्रॉक, फ्रीलच्या स्लिव्लस, केस हायली कर्ली करून मोकळे सोडलेले होते. गळ्यात सिम्पल चेन , कानात सिंगल डायमंड , ओठांवर न्यूड कलर लिपस्टिक, डोळ्यांवर डार्क आय लाइनर., पायात हाय हिल्स , ती खुपच क्युट डॉल सारखी दिसत होती. रेस्टोरेंट मधील सगळी लोकं तिच्याकडे वळून बघत होते . पण समीर मात्र तिला बघून डोक्यावर आठ्या पाडत मेनू कार्ड मध्ये चेहरा लपवून बसला होता.

 

" विश्वामित्र , यार तुझी मेनका आली , बघ यार कसली सुंदर दिसते ! " ....... राज आज्ञाकडे बघत बोलला...

 

" अरे येssss , बघतोस काय तिच्याकडे , आधी आपला चेहरा लपव , नाहीतर इकडेच येईल! " ........समीर

 

त्याच्या बोलण्याने राजला हसू आले.. 

 

" पूर्ण रेस्टॉरंट मधले लोक तिच्याकडे बघताय आणि तू काय चेहरा लपवत बसलाय , एवढी क्युट गर्ल ज्याच्या टेबलवर बसेल , काय लकी असेल तो ..! ".... राज समीरची मस्करी करत बोलला. 

 

" हो ना , एवढी आवडली आहे तर घेऊन जा तिला दुसऱ्या टेबलावर, मला खूप इरिटेट करते ती" .....समीर

 

" मी तर कधीच रेडी आहो , पण ती आहे की तिच्या विश्वमित्राला सोडून दुसरीकडे कुठे बघतच नाही. हाय रे ये किस्मत , बघ ना यार तुझ्यापेक्षा स्मार्ट... हँडसम ....गुड लुकिंग... आहो मी , पण मॅडमचे लक्ष काही आमच्याकडे जातच नाही.....".... राज 

 

" तू आता मला इरिटेट करू नकोस , कुठे रिलॅक्स व्हायला मी इथे आलो , तर या मिस इथे येऊन टपकल्या. माझं बॅड लक सुद्धा खूप खराब आहे. तिच्या चमच्यांना मी एखादवेळी चांगला चोपून काढणार आहो" ...... समीर वैतागत बोलत होता... राजला मात्र त्याचे खूप हसू येत होतं. 

 

" किती घाबरतोस तु तिला , कुणाला न घाबरणारा तू , या एका मुलीला हँडल करू शकत नाही?" ........राज

 

" घाबरायचा प्रश्न नाही, पण मला या कुठल्याच भानगडीत पडायचे नाही. नॉर्मल मुलगी सारखी तरी वाटते काय ती? किती भयंकर आहे , दोघा चौघांना मारल्याशिवाय तर तिचं जेवण नसेल पचत. नॉर्मल लाईफ जगायची आहे मला. रोज कोणते नवीन एडवेंचर्स करायचे नाही" .............. दोघेही मेनूकार्ड आपल्या चेहऱ्यासमोर पकडत गप्पा करत होते....

 

 

" हॅलो डॉक्टर्स ! व्हॉट अ प्लीजअंट सरप्राईस!" .....आज्ञा त्या दोघांच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली आणि हसतच बोलली. 

 

" ओ , हाय मिस , आम्ही पण खूप सरप्राईज झालो " ...... कोणी बोलत नाही आहे बघून राज आपल्या चेहऱ्यासमोरचं मेनू कार्ड खाली ठेवत बोलला. 

 

" May I ? ........Thank you ! " ......म्हणत आज्ञा समीरच्या समोरची चेअर ओढून बसली. अजूनही समीरने मेनू कार्ड त्याच्या चेहऱ्या समोर धरून ठेवले होते...

 

" Hey hotty..... तुम्ही मेनू कार्ड खाली ठेवू शकता. मी तुम्हाला तुमच्या बॉडी स्मेल वरूनच ओळखते तुम्ही कुठे आहात ते" ...... आज्ञा मस्करी करत बोलली

 

तिचं बोलणं ऐकून राज गालात हसायला लागला...

 

 

"काय कसे आहेत आमचे डॉक्टर?" ... आज्ञा समीरकडे एकदा कटाक्ष टाकून , राजकडे बघून बोलली.....

 

"तुम्हीच विचारा , तुमच्या समोरच आहेत तुमचे डॉक्टर " ....राज तुमचे डॉक्टर शब्दावर जोर देत बोलला. 

 

        राजच्या तोंडून ' तुमचे डॉक्टर ' ऐकून समीरला तर राजला ' खाऊ की गिळू ' असे होत होते , पण समोर आज्ञा असल्याने त्याने स्वत:ला आवर घातला आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून राजला खुन्नस देत बघत होता . राजचे सगळे लक्ष त्याच्याकडे होते, त्याला तसे बघतांना बघून त्याला खूप हसू येत होते, येरव्ही राजला समीरला पिडायचा चांस मिळत नसे , आज्ञा असली की समीर चूप राहतो हे त्याला माहिती होते , आणि याचाच तो फायदा घ्यायचा. 

 

" ते उत्तर देणार नाही , आय गॅरेंटेड , ते मेनूकार्डच्या मागे सुद्धा गाल फुगवून बसले असतील".... आज्ञा हसत बोलली.

 

ते ऐकून समीरचे गाल आणखीच फुगले. 

 

" करा हो ते मेनू कार्ड खाली , दिसू द्या तुमचा चार्मिंग फेस आम्हाला सुद्धा " ..... त्याच्या हातातला मेनू कार्ड काढत आज्ञा बोलली.. समीरने पलीकडे आपली मान वळवली. 

 

" तुम्ही आज इथे , कसे काय?" ..... राज

 

" ते मी आज डेटवर आले आहे".... आज्ञा

 

" मग तुम्ही इथे काय करत आहेत? वाट बघत असेल ना तुमची डेट?" ..... राज 

 

" मी राईट प्लेस वरच बसले आहे डॉक्टर राज ! " ..... आज्ञा समीरकडे बघत डोळा मारत बोलली. 

 

" तुमची डेट होती आज....?".... राज डोळे मोठे करत , शॉक झाल्यासारखा समीरकडे बघू लागला...

 

"ना...नाही....मी अस काही कमिटमेंट नव्हती दिली कोणाला , मी कोणाला नव्हते बोलावले" ....समीर बिचारा चेहरा करत बोलला. 

 

" जहा पिया वहा मै....! मीच दिले होते स्वत:ला आमंत्रण! " ...आज्ञा 

 

" काय डॉक्टर, तुम्ही किती रिस्क घेता.... किती मोठा गुंड आहे तो ज्याची आज तुम्ही सर्जरी केली..... उगाच आपले दुश्मन वाढवून घेत आहात" ...आज्ञा

 

" मी डॉक्टर आहे आणि मी एक डॉक्टर असण्याचे कर्तव्य करत होतो" ... समीर

 

 

" आपकी इसी अदा पर तो सनम , हमको तो प्यार आया है " ......गुणगुणत ती समीर जवळ जात त्याला नमस्कार करायला वाकायची अक्टिंग करायला गेली..... आणि राजकडे बघून तिने डोळा मारला. 

 

" ओ मिस... हे काय करताय तुम्ही ?"....समीर बसल्या जागेवरून उठून उभा राहिला. तिच्या हरकतीकडे आजूबाजूचे बघायला लागले. समीरला खूप अवघडल्या सारखे व्हायला लागले.....

 

" तुम्ही माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हता, मग काय करणार?.....आता सगळे बघायला लागले"....ती समीरची खोडी काढत बोलली..

 

तिने आजूबाजूला बघितलं....

 

"अहो काय बघताय? थँक यु म्हणते मी त्यांना... माझ्या हार्टचे डॉक्टर आहेत ते, जीवनदान दिलं त्यांनी मला, नाहीतर हे हार्ट बंद पडणार होतं.... तर धन्यवाद करायला नको?" ..... ती आजूबाजूला बघत बोललली . तिचे बोलणे ऐकून सगळे मान हलवत आपल्या टेबलकडे वळले. ती परत आपल्या जागेवर जाऊन बसली ..समीरने डोक्यावर हात मारून घेतला. 

 

" तू कधी केली यांची सर्जरी ? मला म्हणतो इंटरेस्ट नाही, अन् हे काय लपुनछपून डायरेक्ट ऑपरेशन ऑपरेशन खेळलात ?".... राज 

 

" तुझी बकवास बंद कर , आधीच त्यांची नाटकं बघून डोकं दुखायला लागले आहे ".... समीर 

 

 

 

" Sunday.... वरून इतकं रोमँटिक वातावरण, इथे काय मस्त हवा सुटलिये आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत इथे? काय गडबड दिसतंय?....की तुम्हाला पण मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाहीये , डॉक्टर प्रमाणे?" ....आज्ञा राजची मस्करी करत बोलली…

" तुमचं काय ते असू द्या तिकडे , पण मी डॉक्टरांसोबत कोणी दुसऱ्याला खपाऊन घेणार नाही हा" ....आज्ञा 

 

"अहो मिस, हे काय बोलताय? मी असा तसा नाही आहो....तुमच्या डॉक्टरांचं बघा काय ते ?"...राज

 

" त्यांना तर मी असे तसे काय करू पण देणार नाही ".... आज्ञा 

 

"बरं, तुम्ही द्या एकमेकांना कंपनी, मी बघतो माझ्यासाठी दुसरी कंपनी" ...म्हणत राज उठत होता , तर समीरने त्याचा हाथ धरून त्याला परत जागेवर बसवले. 

 

" आपला प्लॅन आधी ठरलेला...बस इथेच..नाही तर सोबत जाऊया" ...समीर

 

"Yeah, डॉ राज तुम्ही बसा इथेच, मला काही फरक पडत नाही. माझा एकावरच Focus आहे, आणि तो कधी डगमगत नाही आणि डगमगणार सुद्धा नाही....you don't worry" ....आज्ञा

 

तेवढयात वेटर ऑर्डर घ्यायला आला....

 

"मिस, तुम्ही द्या ऑर्डर , आजचे तुम्हीच आमचे स्पेशल गेस्ट" ....राज

 

" बटर चिकन, ....".....आज्ञा ऑर्डर देत होतीच की ....

 

" समीर वेजिटरियन आहे ! " ......राज

 

" काय??....हे घासपुसवाले आहेत? बापरे...कठीण जाईल वेजिटरियन बनायला..पण काही हरकत नाही बनेल मी, घसापुसवाल्यांची घासपुसवाली ! " .....आज्ञा डोळे मोठे करत बोलली..

 

" मिस तुम्ही ऑर्डर करू शकता , मी देईल तुम्हाला कंपनी" ....राज

 

" नाही नको.....मला फक्त एकाचीच कंपनी आवडते , उनके लिये ये घासापुस क्या चीज है , सारी दुनिया छोड सकते हम.........तुम्ही द्या ऑर्डर" ....आज्ञा

 

अगर तुम मिल जाओ....

जमाना छोड देंगे हम

बिना तेरे कोई दिलकश

नज़ारा हम ना देखेंगे 

बिना तेरे कोई दिलकश

नज़ारा हम ना देखेंगे

तुम्हें ना हो पसंद उसको 

दोबारा हम ना देखेंगे

तेरी सूरत ना हो जिस में

तेरी सूरत ना हो जिस में

वो शिशा तोड़ देंगे हम.....

अगर तुम मिल जाओ.....

 

         आज्ञा समीरला एकटक बघत गान गुणगुणत होती..

       समीर मात्र टिश्यू पेपर वर काही ड्रॉइंग काढत बसला होता...

 

        त्या दोघांना बघून राजने डोक्यावर हात मारून घेतला...." यांचं काही होऊ शकत नाही" .......त्याने जेवण ऑर्डर केले...

 

" ह्यांना खरंच दिलं का डॉक्टर कोणी बनवलं हो डॉ राज?" .........आज्ञा

 

" हा हा हा.... he loves to treat hearts".... राज 

 

" seriously? मग माझ्या ❤️ ची ट्रिटमेंट का करत नाहीत हे? anyways, but he is so charming yaaar" ........ आज्ञा समीर सोबत flirt करत जेवत होती. 

 

        तिघांनी जेवण केले , जेवण करतांना मात्र आज्ञा फक्त समीरला बघत होती आणि तिच्या अस एकटक बघण्याने समीरला मात्र जेवण घशाखाली जात नव्हते...कसेबसे पाणी पीत त्याने जेवण संपवले.....

 

जेवण आटोपून तिघेही हॉटेलचा बाहेर आले . 

" एक मिनिट , आलेच !", काहीतरी आठवून आज्ञा परत आतमध्ये गेली . आणि समीर ज्या टिशू पेपर वर काही काढत बसला होता , तो शोधत होती. तो सापडत नव्हता , तर तिने अख्खा स्टाफ ते शोधायला लावला होता. तिला बाहेर यायला वेळ का लागत आहे म्हणून राज आतमध्ये बघायला गेला , आणि त्याला सुरू असलेला प्रकार लक्षात आला , ते बघून तर त्याने डोक्यावर हात मारला. आणि बाहेर आला. 

 

 

" नेक्स्ट टाईम टिश्यू टाईम पास करायचा असेल , तर तो डायरेक्ट मॅडम च्या हातात दे बाबा ! नाकीनऊ आणलंय आतमध्ये सगळ्यांना , तुझा टाइम पास त्या बीचाऱ्यांना भारी जातोय !", राज हसतच बोलला. 

 

" नौटंकी !", समीर 

 

" I bet you , तू चुकूनही कधी हरवला , तर या मिस आकाश पाताळ एक करतील. Very dangerous हा Doctor !", राज 

 

तेवढयात पळत आज्ञा बाहेर आली. 

 

" सॉरी , थोडा वेळ लागला ! पण खूप महत्वाचं होते ! ", आज्ञा त्यांच्याजवळ येत बोलली. 

 

" It's okay Miss !" , राज 

 

" थॅन्क्स फॉर द ट्रीट डॉक्टर राज" ...आज्ञा

 

" My pleasure Mis " ... त्याने हॅण्डशेक साठी हाथ पुढे केला..

 

" आज्ञा .....call me आज्ञा " ....म्हणत तिने राजला हॅण्डशेक केले...

 

         समीर त्याचे हाथ पँटच्या पॉकेटमध्ये घालून उभा इकडेतिकडे बघत होता , अजिबात त्याने आज्ञाकडे बघितले नव्हते. 

 

" तुम्ही का हे असा वागत आहात?....का तुमचा वेळ वाया घालवत आहात?" .....समीर

 

" तुमच्यासाठी, मला हे इथे जागा हवी आहे" .....त्याचा हृदयाकडे बोट दाखवत ती बोलली...

 

" इम्पॉसिबल आहे हे " ...समीर स्वतःशीच मान हलवत बोलला....

 

" मिस आज्ञा, तो खर बोलतोय....का तुम्ही त्याचा मागे तुमचा वेळ वाया घालवत आहात? तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही....मी ओळखतो त्याला" ...राज

 

" कोणीतरी म्हटले आहे....

अगर तुम किसिको पुरे शिद्दत्से पाने की कोशिश करो तो, 

पुरी कायनात तुम्हे ऊसे मिलाने की कोशिश करती है..." 

 

" मी एक पण चान्स सोडणार नाही , शेवटचा श्वास घेताना regret नको राहायला की मी का प्रयत्न केला नाही , ही मेनका या विश्वामित्रची तपस्या नक्कीच भंग करेल....." .... आज्ञा 

 

          आज्ञाचे बोलणे ऐकून समीरला तर त्याचा डोक्याला मुंग्या आल्यासारखा वाटत होत्या. 

 

" जाना sss…… गूड नाईट, टेक केअर !" .....म्हणत फ्लाईंग किस करत ती कार मध्ये जाऊन बसली आणि कार सुसाट वेगाने पळवली....

 

समीर ती गेली त्या दिशेने हताशपणे बघत उभा होता...

 

" ती बरोबर बोलली , तुला दिलं का डॉक्टर कोणी बनवले रे?" ....राज हसत होता...

 

" seriously?" ..... समीर एक भूवयी उंचावत त्याचा कडे बघत होता. 

 

" सगळच कठीण आहे डॉक्टर समीर......चला घरी" ....म्हणत राज कार घेऊन आला....

 

 

 

********

 

क्रमशः

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "