Dec 01, 2021
कथामालिका

Love ... Sky Is Not The Limit 2

Read Later
Love ... Sky Is Not The Limit 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..भाग 2
" डॉक्टर डॉक्टर दील के डॉक्टर...... लुक एट मी" ........आज्ञा समीरचा टेबलवर नॉक करते..... समीर दुर्लक्ष करतो.

" काय हो डॉक्टर, मी इथे आलेली सगळ्यांना कळतं , तुम्हालाच कसं काय नाही कळत राव ? " ..... आज्ञा

" मी रिकामा नाही आहे कोण येतं ते बघायला, मला काम असतात" ....... समीर डोक्यावर आठ्या पाडतच बोलला.

" Oh God ! कसले हॉट दिसता रागात असले की "..... आज्ञा

" बोला मिस , काय झालं.....?".... समीर

" मिस..? आज्ञा.... माझं नाव आज्ञा आहे....., तुमच्या कसं काय लक्षात नाही राहत हो ? मी रोज तुम्हाला माझं नाव सांगते आहे , तरी तुम्ही विसरता ?"...... आज्ञा

" कामाचं बोलूया......? काय त्रास होत आहे....?" .... समीर

" हे इथे दुखतय" ....... परत आज्ञा हृदयकडे बोट करत बोलली...

समीरने परत तिचा बेसिक चेकप केला… आज्ञा तोंडाने सिटी वाजवत त्याच्याकडे मिश्कीलपणे बघत होती..

त्याला तिचं असं वागणं आवडलं नव्हतं .......पण त्याने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते.

त्याने तिला परत एक प्रिस्क्रिप्शन लिहून तिच्या हातात दिले.......

" आज शेवटचा दिवस ना कॅम्पचा.? ...... खूप काम करता हो तुम्ही आणि काम करत असताना तर तुम्ही फारच हॉट दिसता" ..... ती त्याला एक डोळा मारत बोलली आणि मागे फिरून जायला निघाली...

सगळेजण कॅम्प चे समान पॅक करण्यात बिझी होते. तेवढ्यात जोरदार कोणाला तरी मारायचा आवाज आला आणि ती व्यक्ती धाडकन खाली पडली..

सगळ्यांचे लक्ष गेले तर तिथे नर्सच्या कपड्यांमध्ये एक मुलगी गालाला हात लावत खाली जमिनीवर पडली होती.

काय झालं म्हणून बघायला सगळे तिथे धावत आले...त्या मुलीच्या गालावर आज्ञाचे पाचही बोट उमटलेले होते आणि ती रागाने त्या मुलीकडे बघत होती.....

सगळे इकडे धावत येत असताना बघून त्या मुलीने तिथून पळ काढला .....आज्ञाने डोळ्यांच्या इशाऱ्याने कुणाला काहीतरी खुणावले.....


" काय झालं ...?कोण होती ती .....?तिला का मारलं .....?"....समीर आज्ञा एक एक करत प्रश्नावर प्रश्न विचारत होता .


" काय डॉक्टर .....कितीवेळा सांगितलं असे हॉट-शॉट बनून फिरत नका जाऊ... या ब्लॅक शर्ट मध्ये ही तुम्ही कमालीचे हँडसम दिसत आहात . या शर्ट क्या वरच्या बटन लावत जा , वाईट नजरेने बघतात लोकं " ......म्हणत तिने परत त्याच्या शर्टच्या वरच्या बटन लावल्या..

त्याने तिचा हात झटकला....... " का मारलं तिला?." ... समीर

" ती तुमच्याकडे बघत होती" ....... आज्ञा

" एवढ्यासाठी मारलं?" ....... समीर थोडा रागातच बोलला

" तुमच्याकडे कोणी नजर वर करून बघितलेले मला जमायचं नाही" ........आज्ञा

" ही काय दादागिरी चालवली आहे ? ....मला हे असलं मारामारी अजिबात खपणार नाही" ...... समीर थोडा आवाज मोठा करत बोलला

" म्हणून म्हणते , थोडं आजूबाजूला बघावं........ तुम्हाला माहिती आहे का ती पूर्ण पाच दिवस पाळत ठेवून होती तुमच्यावर आणि तुम्हाला कळलं सुद्धा नाही" .... आज्ञा

" तुम्ही पण आहात ना इथे , पाच दिवसापासून....... टवाळेगिरी करत" ...... समीर

" तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्यावर डॉक्टर..... तुम्ही वन पीस असे हॉट शॉट राहिले पाहिजेत" ..... आज्ञा

" कोणी दिली तुम्हाला माझी रेस्पोंसिबिलिटी.?" .... समीर

" हा काय प्रश्न डॉक्टर? ...... अहो मीच दिली ना तुमची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःला ! बरं काळजी घ्या..... निघा लवकर.....!".... आज्ञा

" आणि हो थँक्यू फॉर दिस प्रिस्क्रिप्शन." .... म्हणत तिने समीरला फ्लाईंग किस दिले आणि तिच्या रॉयल एनफिल्डवर जाऊन बसली.... डोक्यावर हेल्मेट घातलं आणि वेगाने गाडी पळवली.....

समीरने डोक्यावर हात मारून घेतला....

******


एका जुन्या पडक्या गोडाउन मध्ये एका मुलीला चेअरवर बांधून ठेवलं होतं........

" बोल कोणी पाठवलं होतं......?" .... आज्ञा

" माहित नाही........?" ... ती मुलगी

आज्ञानी जोराने तिच्या कानशिलात एक जोरदार ठेऊन दिली , आता तिच्या ओठातून रक्त सुद्धा यायला लागलं होतं.....

" सांगते की अजून पाहिजे?" ...... आज्ञा रागात बोलत होती, तिचे डोळे रागाने लाल झाले होते.... आज्ञाने तिचे केस आपल्या मुठीत पकडून जोराने ओढले.... तशी ती कळवळली.

" माणिक हॉस्पिटलच्या मालकाने" ......ती घाबरतच बोलली

" डॉक्टरच्या आजूबाजूलाही फिरकायच नाही .....चल जा इथून" .... आज्ञा तिचे तोंड पकडत बोलली.... तशी ती मुलगी बाहेर पळाली.....

*******

" मला माहित होतं तू इथेच भेटशील माणिक." ...... आज्ञा आपल्या हाताच्या मुठी आवळत बोलली....

माणिक एक बार मध्ये पेग रिचवत बसला होता.....

" ये तू कोण? इथे काय करतेस आणि मला एकेरी आवाजाने हाक मारायची तुझी हिम्मत कशी झाली? " .....माणिक
मानिकच्या इशाऱ्याने दोन बॉडीगार्ड त्याच्या पुढे येऊन उभे राहिले...

त्या दोघांना बघून आज्ञा गालात हसली...

" का पाळत ठेवत आहेस डॉक्टर समीर वर?" ..... आज्ञा राग ओकत बोलली

" त्याला मारायला......." .... माणिक

" डॉक्टरच्या दूर राहायचा हा..... त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये." ...... आज्ञा

" काय करशील ....? स्वतःकडे बघ आधी.....एका झापडीत खाली पडशील" ....माणिक

" जेवढ सांगितलं ना तेवढ ऐकायचं!" ..... म्हणत तिने त्याचा डावा हात पकडला आणि जोरदार मुरगळला....

माणिक जोराने ओरडला , त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता...

आज्ञाला मानिकच्या जवळ गेलेले पाहून त्याचे बॉडीगार्ड तिच्यावर धावून आले... आज्ञा चे पण दोन बॉडीगार्ड तिच्या मागे उभे होते , तिच्यावर हमला झालेला बघून ते पण तसे समोर आले आणि त्या दोंघांवर तुटून पडले. तिने त्यांना हाताने थांबायला सांगितले.... आणि दोघांवर आडवी होऊन तुटून पडली..... एका बॉडीगार्डची मान आपल्या दोन्ही पायात अडकाऊन तिने वाकडी केली तसा तो जमिनीवर पडला... दुसऱ्याच्या मानेवर कीक मारली तो पण जमिनीवर जाऊन पडला.... माणिक आपला हात पकडून विव्हळत बसला होता....

" ही लास्ट वॉर्निंग तुला, डॉक्टरच्या दूर राहायचं." ..... आज्ञा कपडे झटकत बाहेर पडली......

********

समीर खूप इमानदारीने त्याचं हॉस्पिटल चालवत होता...... गरिबांना मोफत ट्रीटमेंट देत होता..... त्यामुळे बऱ्याच लोकांचे हॉस्पिटलचा बिजनेस बसायला लागले होते..... त्यामुळे समीरचे बरेच दुश्मन निर्माण झाले होते, त्यातलाच हा एक माणिक होता..


आज्ञाने तिची माणसं समीरच्या मागे लावली होती. त्यामुळे जर त्याचा जीवाला काही धोका असला की तिला लगेच माहिती मिळायची. आणि प्रकरण समीर पर्यंत पोहचायचे आधीच आज्ञा ते निपटवून मोकळी व्हायची .

********

आज्ञा तिच्या फ्लॅटवर निघून आली. तिने एकदा समीरच्या रूमकडे बघितलं, समीरच्या रूमचा लाईट सुरु होता , समीर काहीतरी काम करत बसला होता... त्याला घरी सुखरूप बघून तिला बरे वाटले...... फ्रेश होऊन, जेवण करून ती झोपायला गेली ..

" काय डॉक्टर इतकं चांगलं कोणी असतंय का? डॉक्टर डॉक्टर , दिल के डॉक्टर , चला आता स्वप्नात भेटूया , रोमान्स करूयात ! " ..... समीरच्या खिडकी कडे बघत फ्लायिंक किस करत , हसतच ती झोपी गेली.

********
क्रमशः


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "