Love... Sky Is Not The Limit 26

समीर आज्ञा

Love… Sky is not the limit


पूर्वार्ध: समीर एका हॉस्पिटल विझीट आटोपून घरी येत होता, तर रस्त्याने सामसूम जागी त्याला एका कडेला आज्ञाची बाईक उभी दिसते. काहीतरी ठीक नाहीये वाटून तो पुढे बघतो तर आज्ञा आणि चार गुंडांची मारामारी सुरू असते. क्षणाचाही विलंब न करता तो लगेच पोलिसांना फोन करून कळवतो आणि आज्ञाच्या मदतीला धावून जातो. पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो तसे सगळे गुंड पळून जातात. समीर आज्ञाला आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो.


*******


भाग 26


"डॉक्टर राज, मॅडम बघा …."


"Call Dr Sameer"... राज त्या नर्सला म्हणाला. 


     नर्स घाईघाईने समीरच्या केबिनमध्ये गेली.


"येस सिस्टर?"... समीर.


"डॉक्टर मिस आज्ञा…." 


          नर्स पुढे काही सांगत होतीच की आज्ञाचे नाव ऐकून समीर लगेच जागेवरून उठत, झपाझप पावले टाकत आज्ञाच्या रूमकडे जाऊ लागला. नर्स त्याच्या मागे मागे काय झाले ते सांगत होती, पण त्याच्या डोक्यात काल रात्रीचीच आज्ञा डोळ्यापुढे येत होती. तशी ती ठीक होती, फक्त तेव्हा ती शुद्धीत आलेली नव्हती. 


         समीर आज्ञाच्या रूमजवळ पोहचला होताच की त्याला राज तिथे रूम समोर उभा दिसला. तो आतमध्ये काय सुरू आहे हे बघत होता. राज तिथे उभा आहे म्हणजे तसे खूप काही घाबरण्यासारखे नसावे, त्याचा लक्षात आले. 


"राज…?"... समीर राजकडे बघत आतमध्ये जाणार तेवढयात, "सांभाळूनऽऽऽ", राज त्याला म्हणतच होता की समीरच्या डोक्याला फोल्ड केलेला न्यूज पेपर उडत येत आदळला. 


"आर यू ओके?".. राज.


"या फाईन! हे काय…?"...समीर आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करत राजला विचारत होता.


"देवसेनेची कमजोरी सापडली डॉक्टर, आता तुला तिला घाबरण्याची अजिबात गरज नाही."... राज हसत म्हणाला. 


"म्हणजे?"...समीर, "आणि हा एवढा गोंधळ?"


"One vs three.. लढाई सुरू आहे."... राज.


"काय? आणि तू डॉक्टर असून इथे का उभा आहेस? पेशंट आहे आतमध्ये, ते बघायचं सोडून इथे हसत उभा आहेस?"....समीर. 


"मी अजून कुवारा आहो.. पोरं करायचे मला.. मला माझा जीव खूप प्यारा आहे ..तुला लग्न, मूलबाळ याचा काही गंधही नाही, तू जा आतमध्ये."..राज.


"काय बडबडत आहे? अन् लढाई, हा काय नवीन प्रकार आहे?"...समीर.  


"हातापायी करण्यात कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असणाऱ्या, बाईक सुद्धा विमनसारखी उडवणाऱ्या, चार माणसांना मारून उरणाऱ्या देवसेना, तुझी मेनका इंजक्शनच्या त्या बारीक सुईला घाबरते. बघ जरा आतमध्ये किती मोठी जंग सुरू आहे.".... राजला सांगताना खूप हसू येत होते. 


       समीरने थोडं पुढे जाऊन बघितले. त्या रूमचे अगदी रणांगणात रूपांतर झाले होते. आधी तर त्या रूमचा तो हाल बघून त्याला प्रचंड राग आला. रूम वरून नजर फिरवत असताना त्याचे लक्ष आज्ञाकडे गेले… डोक्याभोवती गुंडाळलेली बँडेज, मोकळे केस त्यात ते थोडे विस्कटलेले, नाकावर आडवी छोटी व्हाइट चीपकलेली पट्टी, एका हाताला गुंडाळलेले क्रेप बँडेज, अंगावर हॉस्पिटलचा गावून, ती एका कॉर्नरमध्ये उभी दोन्ही हात (अगदी कराटे वाली पोझिशन) आपल्या चेहऱ्यासमोर घेत तीक्ष्ण नजरेने समोर उभ्या असलेल्या दोन नर्स आणि एक ब्रदरला बघत होती. एक नर्स तर तिला घाबरून थोडी मागेच उभी होती. 


"अब आया उंट पहाड के नीचे."...समीर म्हणाला तसे राज जोराने हसायला लागला. ते बघून समीर सुद्धा हसायला लागला. 


"बरं झालं, तू आज्ञाला इथे टॉप फ्लोअरला VIP रूम मध्ये ठेवले, नाहीतर आतापर्यंत पूर्ण हॉस्पिटल डिस्टर्ब झाले असते. इतका गोंधळ घालत आहे ती, बापरे! या बिचाऱ्या तिघी थकून गेल्या."... राज.


"हो, रात्री खालच्या फ्लोअरला रूम रेडी नव्हती, आणि माझं पण लक्ष राहील, माझी पण रूम इथेच आहे म्हणून..".. समीर.


"ह्ममममम 'माझं पण लक्ष राहील'... गूड प्रोग्रेस...नॉट बॅड!"... राज समीरला चिडवत म्हणाला. 


"तू ना…?"...समीर.


"बाबा ती चार पाच धष्टपुष्ट लोकांना एकसाथ लोळवू शकते.. हम किस खेतकी मुली हैं भैय्या? जिथे हातपाय, डोकं काम नाही करत तिथे प्रेम काम करत असतं."... राज.


समीरने त्याला एक रागावलेले लूक दिले.


"जा बाहुबली जा, जा संभालले अपनी देवसेना…".. राज.


"तुला तर नंतर बघतो.. एक एक आयटेम भेटले आहेत"...म्हणत तो रूममध्ये गेला, आणि फक्त स्तब्ध अगदी शांत उभा होता. दोन्ही हात पँटच्या खिशात आणि नजर आज्ञावर स्थिरावली होती. त्याचा पाठोपाठ राज सुद्धा आतमध्ये आला. 


            जसे समीर आतमध्ये आला आतमध्ये सुरू असलेला गोंधळ एकदम बंद झाला. प्रत्येकजण शांत चुपचाप आपापल्या जागेवर उभे होते. समीर मात्र फक्त आज्ञाला बघत होता. आज्ञाचा सुद्धा आक्रमक अवतार समीरला बघून शांत झाला. स्वतःचा बचावासाठी चेहऱ्यापुढे धरलेले तिचे हात, त्याला बघून आपोआप खाली आलेत. आणि ती एकटक समीरकडे बघत बघत आपल्या बेडवर जाऊन बसली. 

आज्ञाची भिगीबिल्ली झालेले बघून राजला गालात हसू आले. 


"बेटर!"... समीर म्हणाला आणि बाजूला उभ्या असलेल्या नर्सकडे थोडी मान वळवली. 


"सर, मॅडम इंजेक्शन नाही घेत आहेत." नर्स आज्ञाकडे बघत थोडी घाबरतच म्हणाली. 


"हे बघा, मला जर हात जरी लावला तर पाय तोडून हातात देईल."..आज्ञा नर्सला उद्देशून म्हणाली. 

     समीरने परत आज्ञावर नजर स्थिरावली.. 


"सॉरी! पण मी इंजेक्शन घेणार नाही. मला नाही आवडत. ते खूप दुखते.."..आज्ञा आता कोमल आवाजात म्हणाली. 


"आज्ञा, तुम्ही हे इंजेक्शन घेणार नाही, तर मग लवकर बरे कसे काय व्हाल?".. राज समजावनीच्या सुरात म्हणाला. 


"डॉक्टर मला असे लहान मुलांसारखे सांगू नका, मी काय लहान नाहीये."..आज्ञा.


"तेच म्हणतोय, तुम्ही लहान नाही आहात..".. राज हसत म्हणाला. 


"It's not a joke!!"... आज्ञा. तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. 


"इंजेक्शन नाही घेणार तर लवकर कसे बरे होणार? मग लवकर घरी कसे जाणार? इथेच रहावं लागेल."... राज. 


"बेस्ट! तसे पण घरी जायचंय कोणाला. इथून लेफ्ट साईडला कॉर्नर रूम, अपना आशियाना! (समीरची पर्सनल रूम) …"..आज्ञा बेडवर पालखट मांडून मस्त बिनधास्त बसली. तिच्या चेहऱ्यावर एकदम खट्याळ भाव जमा झाले होते. 


"नेहमी चुकीच्या वेळी चुकीचंच कसं काय बोलू शकतो तू?"..समीर राजकडे खाऊ की गिळू नजरेने बघत त्याचाजवळ पुटपुटला. 


"मी तर त्यांना इंजेक्शनसाठी रेडी करत होतो.. त्या मिस नेहमी आपल्या सोयीचा अर्थ घेतात, त्यासाठी मी काय करू शकतो? डोकं एवढं हलले आहे, पण तुझ्यावरचा फोकस मात्र जात नाही..".. राज. 


    त्याचे बोलणं ऐकून समीरला कालचा तिचा मिठीत उचलून घ्या वाला हट्ट आठवला.


"तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत..? तुला जरा डोकं नाही का वापरता येत?"समीर. 


"यार गजब बेज्जती हैं यार…डोक्याच्याच डॉक्टरला तू डोकं वापरत नाही म्हणतोय? किती दुरदुरून माझ्याकडे पेशंट येतात..".. राज. 


"ओह गॉड!"..समीर. 


"पण काही म्हण, या सिक्स्थ फ्लोअरवर जलसा रहेगा."..तो समीरला चिडवत म्हणाला. 


"नर्स.."...समीर राजला इग्नोर करत नर्सला इंजेक्शन दे असा इशारा करत म्हणाला. 


"Stay away from me!"...आज्ञा परत बसल्या जागी आपली कराटेवाली पोझिशन घेत नर्सला उद्देशून म्हणाली. 


"नर्स, इंजेक्शन?…समीर आज्ञाकडे बघत म्हणाला. 


          नर्सने आज्ञाला द्यायचे इंजेक्शन सीरिज घेतली, आणि बॉटल मधून इंजेक्शन भरू लागली. 


"No…no…. हे बघा मी तुम्हा सगळ्यांना इथून जॉब बरून काढून बाहेर करेल."...आज्ञाने बाजूची उशी पकडत कोणी जवळ आले की मारायची पोझिशन घेतली. 


          समीरने आपला हात नर्स पुढे धरला, तसे भरलेले इंजेक्शन तिने समीरच्या हातात ठेवले. राजने तिथे असलेल्या सगळ्या स्टाफला नजरेनेच खुणावत बाहेर जायला सांगितले.


"पण सर, त्या मॅडम खूप डेंजर आहेत."..एक नर्स हळूच म्हणाली.


"Don't worry, he will take care of it.".. राज. 


            राज म्हणाला, तसे सगळे रूम मधून बाहेर पडले. समीर हळूहळू तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याने पायाने कुठलीशी बेड खाली असलेली बटन दाबली, तसे बेड हळूहळू वरती यायला लागला. तो बेड त्याचा उंची पर्यंत त्याने ऍडजस्ट केला. 


"हे बघा डॉक्टर, तुमचं हॉस्पिटल आहे म्हणून मी तुमची मनमानी नाही हा चालू देणार."... आज्ञाची बडबड सुरु झाली. 


"हे बघा मिस, आम्हाला आमचा पेशंट लवकरात लवकर बरा व्हायला हवा असतो. तो लवकरात लवकर ठीक व्हावा, हेच आमचे ध्येय असते. आणि मग त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो.."...बोलता बोलता तिच्या डोळ्यात बघत समीरने तिचा हात आपल्या हातात पकडला. "म्हणजे? काहीही म्हणजे?".... आज्ञा. त्याने तिचा हात आपल्या हातात पकडल्यामुळे त्याचा होणाऱ्या स्पर्शाने आता तिचं डोकं हळूहळू बधीर होतेय असे तिला वाटू लागले. 


"काहीही म्हणजे, अगदी पेशंटचे हातपाय बांधूनही आम्ही ट्रीटमेंट, म्हणजे इंजेक्शन देऊ शकतो."...तिच्याकडे बघत एका हाताने तिच्या ड्रेसच्या स्लीवस् तो हळूहळू वरती फोल्ड करत होता. तिचं हृदय तर इतक्या जोराने धडधडत होते की असं वाटत होते आता ते कधीही बाहेर उडी घेईल. आज्ञा मात्र आता पूर्णपणे त्याचा डोळ्यात कैद झाली होती.


     राजला तिला बघून हसू येत होते. 


      समीरने हळूच स्पिरीटचा कापसाचा बोळा तिच्या हातावर रब केला. आणि दुसऱ्या हातातील सिरीज घेत हळूवारपणे इंजेक्शन दिले. 


"Done!".... समीर परत एक कापसाचा बोळा तिच्या हातावर घट्ट पकडत म्हणाला


"काय?"....आज्ञा. 


"झालं!"...समीर. 


"झालं पण?"....


"हो. आता दिवसातून चार इंजेक्शन घ्यायचे आहे, होप यू विल कोऑपरेट!" समीर तिला असे त्याच्यात हरवलेले बघून हसत म्हणाला. 


"काय? डॉक्टर पागल असतात काय? दुसरं काय ट्रीटमेंट नाही काय, फक्त काय इंजेक्शनच टोचत असतात काय?" …आज्ञा. 


"आज्ञा, तुम्ही लकी आहात, तुम्हाला खुद डॉक्टर समीरने इंजेक्शन दिले आहे. नाहीतर डॉक्टर समीर असे छोटे छोटे कामं नाही करत… डायरेक्ट चिडफाड करतात.".. राज.


"काय? चिडफाड?"....आज्ञा टेन्शनमध्ये येत बघत म्हणाली. 


"ऑपरेशन!"... राज. 


"राज….?".समीर.


"ओके!"... राज.


"बरं, आता तुम्ही आराम करा. आज संध्याकाळपर्यंत बघुया. आणि सगळं ठीक असेल तर उद्या सुट्टी देऊया."...समीर बोलत बोलत रूम मधून बाहेर पडू लागला. 


"आज्ञा, घराचा फोन नंबर दे, तुझ्या घरी कळवू."... राज. 


"कोणी नाहीये घरी."...आज्ञा. आज्ञा बोलली तसा समीर रूमच्या बाहेर पडता पडता दारातच थांबला.


"म्हणजे?".. राज. 


"डैड, तो आपल्या मंत्री संत्रीच्या कामाने टूर वर असेल, आणि सावत्र आई आहे, मी मेली तरी तिला काय फरक पडत नाही."... आज्ञा बेडला पाठीमागे डोकं टेकवत, झोपत म्हणाली.


        राज प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. त्याला पुढे काय बोलावं काही कळत नव्हते.


"माझ्यासाठी मी पुरेशी आहे डॉक्टर.. डोन्ट वरी!"..आज्ञा.        तेवढयात दारात थांबलेला समीर तिच्या जवळ आला. 


"ताप तर कमी झाला आहे ना, चेक करू.."...म्हणत त्याने परत तिच्या हातचे मनगट आपल्या हातात पकडले. थोड्या वेळ काहीतरी मोजत बसला. नंतर थोड्या वेळाने तिच्या गालाजवळ मानेला आपला पालथा हात लावत परत ताप बघत होता. त्याने तिच्या गळ्याला स्पर्श केला, त्याच्या स्पर्शाने आपोआप तिचे डोळे मिटल्या गेले आणि तिने आपली मान पलीकडे फिरवली. तरी सुद्धा तिच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या पापण्या त्याने अचूक टिपल्या होत्या आणि आपोआपच त्याचा हात तिच्या डोक्यावर गेला. डोक्यावर अगदी दोनदा हळूवार पणे थोपटत तो बाहेर पडला. 


"टेक केअर आज्ञा!"... म्हणत राज समीरच्या पाठोपाठ रूमच्या बाहेर पडला. 


"डॉक्टर?"... राजने समीरच्या खांद्यावर हात ठेवला. 


"याच्या सुपीक डोक्यात परत काहीतरी उगवले.."..समीर स्वतःशीच बोलत मागे वळला. 

"काय?"...समीर. "कोणता डॉक्टर असे मानेला हात लाऊन ताप चेक करतो?"... राज मस्करी करत म्हणाला. 


समीर अजब नजरेने त्याचाकडे बघत होता. 


"बोल?"... राज आपल्या भुवया उडवत त्याचाकडे बघत होता. 


"Excuse me!"...म्हणत समीरने त्याचा वाजणारा फोन पीक अप केला आणि बोलत बोलत पुढे निघून गेला. 


"ती एकटी आहे ऐकून, बुरा तो तुम्ही भी लगा भाई…म्हणूनच गेला होता परत तिला काळजीचा मायेचा स्पर्श करायला…"..राज त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनातच बोलत होता. 


"तू पण हट्टी आहेस… ती पण हट्टी… एक नंबरचे आगाऊ आहात दोघंही. भगवानजी आखिर आपका प्लॅन क्या है? गॉड नोज!"...


******


"आज्ञा, जाम भारी हा…डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये एन्ट्री?"...रीता. 


"हा हा हा, दिल नही तो सही दिल के डॉक्टर का हॉस्पिटल ही सही…"... प्रिया हसत म्हणाली. 


"खूप भारी दिसतात यार डॉक्टर..त्या सर्जरीच्या, डॉक्टरच्या गेटअपमध्ये… काय तो attitude, काय तो आत्मविश्वास, पेशंटच्या नातेवाईकांशी न चिडता आपुलकीने, नम्रतेने बोलणे, त्यांच्या प्रश्नांची सयंम ठेवत शांततेने उत्तरं देणें … यार सुपर किलर.. म्हणूनच डॉक्टर सगळ्यांच्या एवढया आवडीचे आहेत"...आज्ञा. 


"वाह, इथे बसून हेच काम चालले दिसतेय…"..शिला. 


"मग, डॉक्टर आजूबाजूला असताना मी काय हे ऐरेगैरे बघणार आहे होय?"...आज्ञा एक डोळा मारत म्हणाली. 


"ग्रेट!"... शिला. "प्रिया त्या सचिनने परत काही त्रास तर नाही दिला?"...आज्ञा. 


"नाही ग, काल पासून परत आता दिसला नाही. समजला बहुतेक, आता तो त्रास नाही देणार "..प्रिया. 


"हम्म्म.. असच असू दे.."... आज्ञा. 


"बरं, आता कसे वहहे?"..प्रिया. 


"काल पेक्षा बरंय."...आज्ञा. 


"काल जर डॉक्टर वेळेत तिथे पोहचले नसते तर माहिती ना काही पण होऊ शकले असते? कशाला रात्रीची एकटी बाहेर पडत असते?"..रीता. 


"देख यार, जब जो होना है, तब वो तो होकर ही रहेगा, उससे क्या डरना? घरी राहूनही वाईट गोष्टी घडतंच असतात."...आज्ञा.


"हा, पण म्हणून काय असे हिंडत राहायचे?"..शिला. 


"म्हणून काय घाबरून मी घरात बसून रहायचे?"...आज्ञा. 


"हे भगवान!"..शिला. 


"यार, मी असे घाबरून नाही जगू शकत. मी माझ्या मनाची राणी आहे. मला आवडते तेच मी करते.."...आज्ञा. 


"अरे काय तुम्ही तिच्या सोबत वाद घालत बसला आहात? माहिती आहे ना ती कोणाच्या बापाचं ऐकत नाही. "... प्रिया.


"आम्हाला काळजी वाटते ग!"...शिला. 


"डोन्ट वरी बेबी…आय एम सफिशिएंट फॉर मायसेल्फ…सो जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय ईच मोमेंट ऑफ द लाईफ!"...आज्ञा. 


"बरं, हे एवढे लागले कसे?"... रीता.


      आज्ञा त्यांना काल रात्री जे जे घडले ते सविस्तर सांगत होती. 


"मग डॉक्टरांनी त्या गुंडासोबत भारी फाईट केली असे ना? ढीश् ढीश् ढीश्ssss"...शिला. 


"अरे काय भारी… हॉटी हॉट विथ ब्रेन आहेत..एका पंचमध्ये लोळवले, ते पण एका हाताने.."...आज्ञा.


"दुसऱ्या हाताने दुसऱ्याला का"...रीता. 


"दुसऱ्या हाताने मला घट्ट पकडून ठेवले होते..मी अल्मोस्ट खाली पडत होते. माझी एनर्जी पूर्णच ड्रेन आऊट झाली होती. ते वेळेत नसते आले तर काल माझं राम नाम सत्य झालेच होते."..आज्ञा. 


"काही काय बोलते? तुला काही होणार नाही…उगाच फालतू काय काय बडबडत असते..".... प्रिया. 


"तुम्हाला माहिती काल डॉक्टरांनी मला आज्ञा म्हणून हाक मारली होती, आणि जेव्हा ते गुंड मला टच करणार होते, तेव्हा त्यांनी मला आपल्या जवळ आणखी घट्ट पकडून ठेवले, आणि काय भारी चिडले होते, एकदम अँग्री यंग मॅन लूक….हाये…."..आज्ञा स्वप्नवत बोलत होती. 


"कठीण आहेस तू… त्यात पण तू डॉक्टरांनाच बघत होती…"...शिला. 


"आणि त्यांनी मला आपल्या मिठीत सुद्धा उचलून घेतले.."...आज्ञा. 


"Impossible!"... प्रिया. 


"नाही ग, ते खूप स्ट्राँग आहेत… मी पुढे चाललेच नाही. तर त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता उरला."...आज्ञा. 


प्रियाने डोक्यावर हात मारून घेतला. 


"बिचारे.."... रीता.


"घरमें आगये, गोदमे भी आगये, आता तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा… बस अब दिल में आणा बाकी हैं. आता ते पण लवकरच होईल…"... आज्ञा. 


"प्रेमात पार वेडी झालीय ही…. बरं मी बाहेर चौकशी केली, उद्या सुट्टी देतील म्हणाले."... प्रिया. 


"व्हॉट? एवढया लवकर..? मी नाही येणार"... आज्ञा. 


"काय?".... प्रिया.


"यार डॉक्टरांना आता अजिबात सोडायची इच्छा होत नाही."...आज्ञा. 


"हो पण ट्रीटमेंट पूर्ण झालीय. हे काय आपलं घर नाहीये, जे इथे राहता येणार आहे."... प्रिया.


"पाय, हात , डोकं तर दुखू शकतेच."...आज्ञा आपली बत्तिशी दाखवत म्हणाली. 


"देवा..!"... प्रिया. 


        आज्ञाच्या मैत्रिणी आज्ञा हॉस्पिटलमध्ये भरती आहे कळताच तिला भेटायला आल्या होत्या. त्यांच्याच गप्पा सुरू होत्या. आज्ञा तर हॉस्पिटलमध्ये खूप जास्त एक्सायटेड होती. 


   तेवढयात डोअर नॉक झाल्याचा आवाज आला. सगळ्या शांत झाल्या. 


"Hello all!"...म्हणत स्मायली फेस करत समीर रूममध्ये आला. बाकीच्यांनी पण त्याला हसून हाय केले. 


"How are you feeling now?"... समीर तिथे साईड टेबलवर ठेवलेली फाईल चेक करत आज्ञासोबत बोलत होता. 


"आता तुम्हाला बघितले, आता बरंय.".. आज्ञा.


       

    समीर फाईल चेक करत असल्यामुळे त्यांना पाठमोरा होता. ते ऐकून आपोआप समीरचे डोळे गच्च बंद झाले, आणि त्याच्या चेहऱ्यावर कसेतरी अजब भाव पसरले. "तर मिस सगळं ठीक आहे, उद्या सुटी मिळेल."..बोलत बोलत तो मागे वळला तर आज्ञ शिवाय तिथे कोणीच नव्हते.              आज्ञाने बोलता बोलता तिने मैत्रिणींना काही इशारा केला, तसे एक एक करत तिघी जणी समीरच्याही नकळत रूम मधून पसार झाल्या.  


"या सगळ्या कुठे…?."...


"काम होतं त्यांना काही…"...


"Okay! मी आज पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. ती लोकं…."


"माणिकची गुंड होती.".... आज्ञा शांतपणे म्हणाली. 


"ओह, तुम्हाला माहिती तर….?"..


"तुमची पोलीस यंत्रणा जेवढे फास्ट काम नाही करत, तेवढे फास्ट काम माझी माणसं करतात.".. 


"पोलिसांनी त्यांना पकडले आहे.".


"थोड्या वेळाने सुटून जातील."...आज्ञा हसत म्हणाली. 


समीर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता. 


"डॉक्टर, इतकं सरळ राहून नसते चालत हो. चांगल्या लोकांचा जमाना नाहीये आता.. इतकं प्रामाणिकपणे आता कोणी काम करत नाही. स्वार्थी आणि पैशाचे हपापलेले आहे जग आता. तो माणिक त्या गुंडांना आता दोन तासात बाहेर काढेल."...


"माझ्यामुळे तो तुमच्या मागे लागला आहे. का उगाच पडत असतात नसत्या भानगडीत?".


"तुमच्या नखाला सुद्धा धक्का लागलेला मला चालणार नाही. हा माणिक काय, मी तर कोणाशीही लढू शकते अगदी भूत प्रेत आत्मा…कोणाशीही"...आज्ञा. 


"गाढवा पुढे वाचली गीता …"...तो स्वतःशीच पुटपुटला. 


"डॉक्टर, डरडरकर जिनेमे कोइ मजा नही. मी कोणाला घाबरत नाही आणि जे पाहिजे ते मिळावतेच."..


"इतका ओव्हरकॉन्फिडन्स बरा नाही." 


"ओव्हरकॉन्फिडन्स नाही, याला स्वतःवर विश्वास असे म्हणतात. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी जीव द्यावा लागला तरी मागेपुढे बघत नाही. प्रेमात पडले की कळेल तुम्हाला, डॉक्टर!"


"Take a rest!"... बोलून समीर बाहेर निघून आला. 


*******

"या आयटेमला तुम्ही कसं काय झेलता?"..

राजच्या फोनची बीप वाजली.


"जसे तुम्ही तिच्या भावाला झेलता."

आज्ञाच्या फोनची बीप वाजली."ते किती स्वीट आहे.".

राजच्या फोनची बीप वाजली."ती खूप क्यूट आहे."

आज्ञाच्या फोनची बीप वाजली."मग माझं पार्सल आणून सोडा इथे, आणि आपलं पार्सल घेऊन जा,खूप वैतागून सोडले आहे."

राजच्या फोनची बीप वाजली.


     ते मेसेजेस वाचून राजला खूप हसू आले होते. तो आपले काम आटोपून आज्ञाच्या रूममध्ये गेला. तिथला नजरा बघून त्याने डोक्यावर हात मारला. 


*****

क्रमशः 🎭 Series Post

View all