Love ... Sky is not the limit 25

समीर आज्ञा

Love… sky is not the limit 

पूर्वार्ध :

समीर आणि आज्ञा पावसात भिजल्यामुळे दुसऱ्या दिवशी दोघांनाही ताप आणि सर्दी ने ग्रासलेले असते. म्हणून दोघेही घरीच आराम करतात.   

आज आज्ञा सोबत नसल्यामुळे राज सायलीला पोहाचावयाला तिच्या कॉलेजमध्ये येतो. पण सायली मात्र तो काल समीरला सोडून कुठे गेला, याच विचारात असते. तिला त्याच्यावर डाऊट येतो, म्हणून ती त्याला किती मैत्रिणी वगैरे चौकशी करत असते.

आज्ञाच्या डोक्यात सतत समीर लग्नासाठी मुलीला भेटायला जाणार आहे, हेच सुरू असते. त्याच्यासोबत बोलायचं म्हणून ती त्याचा रूममध्ये जाते. पण तो काहीच ऐकून घेण्याच्या मूड मध्ये नसतो. तो ऐकत नाहीये बघून ती त्याचा गालावर जबरदस्ती किस करते आणि ती बाहेर निघून येते. आज्ञाच्या अशा वागण्याने समीर जास्तीच चिडतो. 

आज्ञाची मैत्रीण प्रिया, तिला एक मुलगा त्रास देत असतो. आज्ञा जोपर्यंत तिच्या सोबत आहे तोपर्यंत प्रिया त्याची होणार नाही, हे समजून तो पुढे काहीतरी करायचा प्लॅन करतो. 

भाग 25

          आज्ञा समीरला असे किस करून गेलेली बघून त्याला तिचा खूप राग आला होता. पण तो काही बोलणार त्या आताच ती तिथून चालली गेली होती. मेडिसिन घेतल्यामुळे स्वतःशीच विचार करता करता त्याला झोप लागली. 

          आज्ञा तिथे आलेली बघून प्रियाला सोडून सचिन पळून गेला होता. पण त्या दोघींनी त्याला सगळ्यांसमोर मारले होते, ते मात्र त्याला खूप अपमानास्पद वाटले होते. मित्रांसोबत बसून यांना झालेल्या अपमानाची अद्दल कशी घडवता येईल याचे प्लॅनिंग करत होते. 

      

          आराम झाल्यामुळे समीरला आता बरे वाटत होते. ताप पण उतरला होता. तो बऱ्यापैकी फ्रेश झाला होता. संध्याकाळी एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे तो विझिटला जात होता, तिथे काही इमर्जन्सी आल्यामुळे तो हॉस्पिटल गेला. तिथले काम आटोपे पर्यंत रात्र झाली होती, रात्रीचे जवळपास 9 - 9.30 वाजत आले होते. तो घरी यायला निघाला. मध्ये थोडा सामसूम रस्ता होता. रहदारी थोडी कमी होती. शांत वातावरण होते. त्याने त्याचा आवडीची काही जुनी गाणी सुरू केली. त्यासोबत गुणगुणत तो गाडी ड्राईव्ह करत येत होता. आणि अचानक एका वळणावर त्याने गाडीला करकचून ब्रेक मारला. 

"मिस ची बाईक?"

     रस्त्याच्या एका कडेला त्याला आज्ञाची बाईक उभी असलेली दिसली. बाईकच्या आजूबाजूला, थोडं इकडे तिकडे बघितले तर कोणी नव्हते. आपल्याला चुकीचा भास तर नाही झाला, म्हणून त्याने बाईकच्या नंबर प्लेटवर लाईट मारून बघितले, तर ती आज्ञाचीच बाईक होती. काहीतरी वाईट घडतेय, असे त्याच्या मनाला वाटून गेले. आधीच सूनसान जागा, त्यात आजूबाजूला काही चिटपाखरू पण नाही. कारच्या बाहेर उतरू की नको? की आज्ञाचाच तर परत काही प्लॅन नाही मला एकट्यात गाठायला? दुपारी तिने जे त्याचा गालावर किस केले होते, आणि जो काय तिचा रवय्या होता, त्यावरून एक हे पण त्याचा डोक्यात डोकावून गेले, तो किस आठवून त्याला तिचा राग यायला लागला होती. पण तरीही त्याने हा डोक्यात आलेला विचार झटकला, ती जागा बघता, त्याला काही negative vibes येत होते. गंमत असेल तर तसा आज्ञाकडून जबाब घेऊच पण आता जर आज्ञा इथे असेल तर तिला इथे एकटे सोडणे ठीक नाही या विचाराने तो गाडीच्या बाहेर आला. 

"मिस... मिस….".. तिला आवाज देत शोधत होता. पण काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. आता मात्र तो थोडा घाबरला. थोडा थोडा पुढे जात होता. थोडे पुढे गेल्यावर त्याला समोर एका वळणाजवळ आज्ञा आणि चार लोकं दिसली. त्यांच्यामध्ये काही मारामारी होते आहे हे त्याचा लक्षात आले. त्याने आपली चालण्याची गती वाढवली. चालता चालता खिशातला फोन काढला आणि पोलीसकॉल केला. आधी तर दोन तीनदा फोन एंगेज टोनच देत होता. थोडाही वेळ न घालवता त्याने एक त्याचा ओळखीच्या पोलिसाला फोन केला आणि सुरू असलेल्या गोष्टींची आयडिया दिली. आणि आज्ञाच्या दिशेने पळत येऊ लागला. 

      आज्ञा त्या चौघांचा प्रतिकार करत होती. बऱ्यापैकी ती त्यांना लोळावत होती. पण थोड्या वेळाने तिची त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती संपत आली होती. आज दिवसभर तापामुळे तिला अशक्तपणा खूप जाणवत होता. त्यामुळे आता ती थकायला आली होती. तिला आता बराच मार लागला होता. ती खाली पडणार तेवढयात समीर तिथे पोहचला होता. त्याने ती खाली पडायच्या आधीच तिच्या कंबरेमध्ये पकडत तिला स्वतःजवळ ओढले, आणि तिला घट्ट पकडुन ठेवले. 

"डॉऽऽऽ…क्टर….!"आज्ञा. आज्ञाचा एकदम खूप थकल्यासारखा आवाज होता. त्याच्याकडे बघत तिने त्याचे नाव घेतले आणि एक स्मायल तिच्या ओठांवर खुलली. त्याचाकडे बघून गोड हसली आणि अशक्तपणामुळे तिचे डोकं त्याच्या खांद्यावर पडलं. 

      तिला खूप लागलेले दिसत होते. चेहऱ्यावर कपळवर, ओठातून, नाकातून रक्त येत होते. केस विस्कटलेले, कपडे पण काही काही ठिकाणांवरून फाटलेले दिसत होते. रावडी आज्ञाचे हे रूप बघून त्याला थोडं वाईट वाटले. तो तिच्या जखमा बघत होता. 

"ऐ कौन है तू? लडकी को इधर दे, और निकल ले "... त्या गुंडांपैकी एक म्हणाला. 

"नाही!"... समीर त्यांच्यावर नजर रोखत म्हणाला. 

"ए चिकने, जान प्यारी होगी तो छोड उसे, और कटले यहासे."...दुसरा गुंड आज्ञाजवळ येत तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. 

"डोन्ट टच हर !"...समीर. 

"तेरी माशुका लगती क्या? अबे ए … ये पनोती है पनोती… अपणी लाईफ की वाट लगानी है क्या? ".... एक गुंड. 

        गुंडांच्या शब्दांमुळे समीरला खूप राग येऊ लागला होता. पण तो शांत उभा होता. जसेजसे त्यांचे अपशब्दांचा मार सुरू होता, तशी तशी समीरची आज्ञा भोवती असलेली पकड घट्ट होऊ लागली होती. आज्ञाने तर 

"चल ए देख, तेरसे हमारी कोई प्रॉब्लेम नही हैं… छोकरी को छोड, और चुपचाप चला. नही तो फालतू मे अपनी जान खो बैठेगा."....दुसरा गुंड म्हणाला आणि आज्ञाला हात लावायला गेला. तो जसा आज्ञाला हात लावणार तेवढयात समीरने आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या मानेजवळ जोरदार वार केला, तसा तो गुंड बाजूला जाऊन पडला. 

"I said don't touch her !"... म्हणत त्याने दुसरा जो त्याच्यावर वार करायला येत होता, त्याच्या पोटावर एक लात मारली. तो पण खाली पडला. 

         हे बघून आता मात्र ते गुंड चांगलेच चिडले. आणि ते चवताळून सगळे एकसाथ समीरवर चालून आले. ते समीरला मारणार तेवढयात पोलीसच्या गाडीचा आवाज ऐकू आला. 

"तेरको बाद में देखते…. छोडेंगे नही"...म्हणत ते गुंड आपल्या गाडीत जाऊन बसत तिथून पळाले. समीरने वेळेचे गांभीर्य राखत लगेच खिशातून मोबाईल काढला आणि गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो क्लिक केला.  

"मिस….. मिस....?"...आपल्याजवळ एका हाताने पकडून ठेवलेल्या आज्ञाला समीर आवाज देत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. पण ती उठत नव्हती. 

"मिस…..".... " आ…... आ…. आज्ञा…"... तो तिच्या एका गालावर थोपटत म्हणाला. 

              आज पहिल्यांदा त्याने आज्ञाचे नाव उच्चारले होते. आज्ञा नाव ऐकून तिने डोळे किलकीले करत त्याचाकडे हसून बघितले, परत डोळे बंद केले.

"मिस, थोडं कोओपरेट करा, थोडं गाडीपर्यंत चला."... समीर.

"ना…..ना...ही... जमत…."..आज्ञा.

"मी तुम्हाला पकडले आहे, तुम्ही पडणार नाही. थोडा चालण्याचा प्रयत्न करा."...समीर तिला जमिनीवर नीट उभं करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. 

तिने नकारार्थी मान हळूहळू हलवली.

आता काय करावं तो विचार करत होता. 

"उचलून न्या!"...आज्ञा.

"What?"... समीर.

"मी चालणार नाही. तुमच्या कुशीत उचलून घ्या."....आज्ञा. 

          तिचं बोलणं ऐकून त्याने एक हात आपल्या डोळ्यांवर ठेवत नकारार्थी मान हलवली.

"मी तुम्हाला सलमान खान दिसतोय?"...समीर. 

"ना….. तुम्ही तर सगळ्यात ऑसम आहात."...आज्ञा. 

"मला नाही उचलता येत. मला जमणार नाही, तुम्ही थोडं चालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चालू शकता"....समीर

"ठीक आहे, मग सोडा मला इथेच. येईल कोणी वाटसरू, करेल मदत. नाहीतर इथेच शहीद होईल.."... आज्ञा. 

"शहीद? अशी कोणती लढाई लढलात? शहीद व्हायला पण भाग्य लागतं."....तो

"तुमच्या प्रेमात शहीद!"...ती

"Ohh God! नाही तिथे नको तो हट्ट!"....तो स्वतःशीच म्हणाला. 

"तुम्हाला काही झालेले नाहीये. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यात की परत मारामारी करायला तुम्ही एकदम फिट व्हाल. एक स्टेप पुढे टाका, पकडले आहे मी तुम्हाला."...तो. 

"नाही."...ती.

"समीर, तू कसा विसरला, या हट्टी, आगाऊ मिस आज्ञा आहेत. इतकं लागलं आहे, तरी आपला आगाऊपणा सोडणार नाही."...समीर तिच्याकडे बिचाऱ्या नजरेने बघत स्वत:शीच मनात बोलत होता. 

"एकदा तुम्ही तुमचा हिटलरपणा बाजूला ठेवून बघा. घ्या ना एकदा मिठीत.. जर हे माझे शेवटचे श्वास असतील तर? माझं आवडतं मरण मला माझ्या आवडत्या जागी मिळू देत… "...आज्ञा. 

"ह?"...समीर तर तिचे बोलणे ऐकून शॉक झाला.

"तुमची मिठी...माझी आवडती जागा…माझी शेवटची इच्छा...मग भूत झाल्यावर किती पण हग केले तरी काही स्पर्श नाही जाणवत.."...आज्ञा.

"काय?"....समीरने कसातरी अजब चेहरा केला.

"ते मुव्ही मध्ये नाही बघितले का तुम्ही? हा तुम्ही डॉक्टर आहात...तुम्ही कसे बघाल ना मूव्ही वगैरे…?"..आज्ञा. नीट बोलता तर येत नव्हते, तरी ती आपले डायलॉग्ज मारत होती. 

ते सगळं ऐकून त्याने तर डोक्यावर हात मारला. 

"एवढया पेन मध्ये पण एवढं फालतूचं डोकं कसे काम करू शकते? किती मनमानी करतात...जसे काही राणी व्हिक्टोरिया!"...तो विचार करत होता. ती मात्र बिनधास्त त्याच्या खांद्यावर विसावली होती. तिचे तर असे भाव होते की आता मरण जरी आलं तरी 'कोई गम नही '...

         तेवढयात तिथे पोलिसांची गाडी पोहचली. दोन पोलिस आले आणि विचारपूस करू लागले.. 

"Sir, पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट नोंदवावी लागेल."..एक पोलिस म्हणाला. 

"आज्ञाला आता हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे."...समीर. 

"तुम्ही यांना ओळखता?"..पोलीस.

"हो."...समीर.

"पण तरीही….आणि आम्हाला आपल्या दोघांचे बयान नोंदवावे लागेल. "....पोलीस. 

"मी उद्या पोलीस स्टेशनला येतो.".. म्हणत समीरने त्यांना काय घडले ते सांगितले. गाडीचा नंबर आणि फोटो पण दिला.

"ठीक आहे sir."... पोलीस.  

"चला आम्ही मदत करतो यांना उचलायला."...एक पोलिस समोर येत म्हणाला. 

"न…..नाही नको. मी घेतो."...समीर एकदम म्हणाला. 

"आर यू शुअर सर?"...पोलीस

"हो हो ……"..म्हणत त्याने आज्ञाला आपल्या थोडं पुढे आणले, आणि तिला हळूवारपणे आपल्या हातांवर उचलून घेत कुशीत घेतले. आज्ञाने पण तिचे दोन्ही हात त्याच्या माने भोवती घट्ट पकडून घेतले. तो समोर कारकडे बघत चालत होता, तर ती मात्र त्याचा चेहरा न्याहाळत होती. त्याला बघता बघता तिचे डोळे अलगद मिटल्या गेले. अंग पण चांगलच गरम झाले होते. तिची आता शुद्ध हरपली आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकले. 

      पोलिसाने कारचे मागचे दार उघडले, समीरने आज्ञाला नीट मागच्या सीटवर झोपवले आणि समोर ड्रायव्हिंग सिटवर येऊन बसला. एक पोलिस पण त्याच्या बाजूला बसला. आज्ञाची गाडी पोलीस स्टेशन मधून कलेक्ट करायला सांगितले. आणि समीरने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. कार चालवता चालवताच त्याने हॉस्पिटलमध्ये फोन करून सगळी कल्पना देऊन ठेवली. जसे गाडी हॉस्पिटलच्या आवारात येत मेन डोअरला आली, तिथे स्ट्रेचर, नर्स, वॉर्ड बॉय, डॉक्टर तयारच होते. पटकन त्यांनी तिला हॉस्पिटलच्या आतमध्ये नेले. 

   

       समीरने घरी फोन करून इमर्जन्सी असल्याने हॉस्पिटल मध्येच थांबतो आहे हे कळवले. घरचे खूप काळजी करतील म्हणून आज्ञाबद्दल त्याने काही सांगितले नव्हते. समीरच्या हॉस्पिटलमध्ये त्याने त्याची एक पर्सनल रूम पण बनवली होती. बरेचदा रात्रीची काही इमर्जन्सी असली की तो तिथेच थांबत असे. त्यामुळे घरचे पण बिनधास्त असत. त्यांना त्याचं हे नेहमीच आहे माहिती असायचे. 

        आज्ञाचे सगळे नीट चेकप करून, तिची सगळी नीट मलमपट्टी झाली होती. तिला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. ती बेडवर शांत झोपली होती. तिचा चेहरा मात्र खूप मलून दिसत होता. 

       समीर तिथेच समोर असलेल्या सोफ्यावर बऱ्याच वेळ बसून होता. ती लोकं कोण होती? का आज्ञा मारत होती? असे बरेच प्रश्न त्याचा डोक्यात सुरू होते. मारामारी करण्यामुळे तिचे कितीतरी शत्रू निर्माण झाले होते.

          

          थोड्यावेळ तिथे आज्ञाजवळ बसला होता. ती अजूनही झोपली होती. नर्स लोकांना काही इन्स्ट्रक्शन देऊन तो आपल्या रूममध्ये निघून आला. 

*******

सकाळी…. 

     राज हॉस्पिटलमध्ये आला, त्याला आज्ञा बद्दल माहिती पडले. तिला बघायला म्हणून तो तिच्या रूमजवळ आला, तर नर्सची धावपळ सुरू होती.

"डॉक्टर राज, मॅडम?" …. एक नर्स रूमच्या बाहेर येत राजला समोर बघून म्हणाली. 

"Call Dr Sameer!"... राज. 

नर्स समीरला बोलवायला निघून गेली.

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all