Love ... Sky is not the limit 24

आज्ञा

Love… sky is not the limit 

भाग 24

"हिला काय झालं? माझ्याकडे अशी का बघतेय?".. राज कार ड्राईव्ह करता करता एखादी नजर सायलीकडे बघत स्वतःशीच विचार करत होता.

         सायली अधून मधून एक तिरपा तिखट कटाक्ष राजवर टाकत होती आणि खिडकीतून बाहेर बघत जात होती. खूप वेळ पासून तिचे हे असेच काहीसे सुरू होते. 

"घरी आतापर्यंत तर ठीक होती. या मुलींचे पण ना काही कळत नाही."...राजने सायलीकडे बघितले, त्याच वेळी सायलीने त्याला एक जबरदस्त तिखट लूक दिला… तो एवढा तिखट होता की एकदम करकचून गाडीचा ब्रेकच दबला. 

"काय?"...राज

"काय?"...सायली 

"तेच विचारतोय काय झालं आहे?"

"कुठे काय झालं? काही नाही"

"मग अशी मारक्या म्हशी सारखी का बघते आहे?" 

"काय? मी मारकी म्हैस? मी तुला म्हैस दिसते आहे?"... सायली चिडक्या नजरेने त्याला बघत होती. 

"बापरे! मॅडम तापल्या… राज नाही तो आगाऊपणा कोण सांगतं करायला? अगदीच खरं खरं बोलायची काय गरज असते? आपल्या जिभेवर कंट्रोल नाही का ठेवता येत?"....तो मनातच बोलत तिच्याकडे बघत होता. 

"नाही ग माझी गोडुली पिल्लुडी, मी तर अशीच गंमत करत होतो."

"गंमत? अशी?"

"किती वेळ झाला, घरून निघाल्यापासून तू काही बोलत नव्हती .. म्हणून असेच आपलं काहीतरी…. बरं ते सोड, काय झालं?"

"मी विचारेल त्याचे अगदी खरं खरं उत्तर देशील?", आता सायली जरा नॉर्मल होत बोलत होती. 

"हो…!"

"तुला किती मैत्रिणी आहेत?"

"अम्….."...तो आठवल्यासारखा करत होता.

ती त्याचे एक एक हावभाव बघत होती. 

"थांब मोजू दे….बऱ्याच आहेत"..तो आपल्या हाताचे बोटांवर एक एक नाव घेत मोजत होता. जसे जसे तो मुलींचे नावं घेत होता, सायलीचा चेहरा लाल होत चालला होता, पण याचं कुठे तिच्याकडे लक्ष, तो आपला मैत्रिणी मोजण्यात गुंग झाला होता.  

"हा सोळा…. दोन बालपणी शेजारच्या होत्या, मग स्कूलच्या चार जणी, मग…..? हा...कोचिंग क्लास मध्ये दोन होत्या, कॉलेजच्या तीन ज्युनिअर….."... राज आठवून आठवून तिला सांगत होता. 

"तू आणि दादा काल सोबत नव्हते, राईट?"

"काल आजी मध्ये एसीपी प्रद्युम्न घुसला होता, आज हिच्यामध्ये दया घुसला आहे...नक्कीच हात पाय तोडायचा विचार दिसत आहे हीचा. काय करू, खरं पण तर नाही सांगू शकत…" .. तो विचार करत होता.

"तू दादा सोबत नव्हता ना?"...तिचा परत प्रश्न आला. 

"मी समीर सोबतच होतो.. मला थोडं काम आले म्हणून मी दुसरीकडे एका ठिकाणी गेलो होतो…" 

"मग दादाला का सोबत नाही घेऊन गेला? असे कोणते इतके पर्सनल काम होते की तुझ्यासोबत दादा नव्हता येऊ शकत?"

"हा?" 

"जा आपला वेळ नको घालवू इथे, तुझ्या कोणी ज्युनिअर सीनिअर तुझी वाट बघत बसल्या असतील."...म्हणतच ती रागारागात कारच्या बाहेर आली. तो पण दुसऱ्या बाजूने बाहेर आला.

"अगं हे काय बोलते आहे?".... त्याच्या बाजूने एक मुलगी हसून त्याला हाय करत गेली… त्याने पण सायलीसोबाय बोलता बोलता तिला स्मायल दिले. 

"ती तुझ्या ओळखीची होती?"

"नाही."

"मग तिला स्मायल का दिले?"

"तिने हसत हाय केले, म्हणून!"

"ओळखीची नव्हती ना, मग काय गरज होती?"

"अगं माझ्या गोडुल्या, तिने स्मायल दिली तर आपण पण बॅक रिप्लाय द्यायला नको का? नाहीतर ते किती बॅड जेश्चर दिसले असते? मी खडूस नाही का वाटलो असतो तिला?" 

आता तर सायली चिडून पूर्णच लाल झाली होती. 

"जा तू तुझं जेश्चर सांभाळत बस… बाय."... चिडत बोलत सायली पुढे आपल्या कॉलेजकडे जायला निघाली. 

"अगं सयु….? अगं तुला काय झालं, ते तर सांग?"

"मुलं डंब, डफर असतात…..".. ती स्वतःशीच बडबडत चालत होती. 

"देवा तू मुलींना इतकं कंपलिकॅटेड का बनवलं? एटलिस्ट हिचे characteristics लिहायच्या वेळी तू थोडं मला विचारून घेतले असते? डोक्याचा डॉक्टर आहो, शांत डोकं बनवायचे थोडे दिले असते की टीप्स..".. राज स्वतःशीच बडबड करत तिला आवाज देत होता. 

"सयू….सये…. अगं ये..".

"मला संध्याकाळी घ्यायला येण्याची काही गरज नाही, माझी मी येऊ शकते"

"मला माहिती ते… पण तो तुझा खडूस भाऊ, माझा जीव घेईल त्याचं काय? ते काही नाही, मी येयीपर्यांत अजिबात जायचं नाही." 

"खडूस कोणाला म्हणाला?".... ती मागे फिरत परत त्याचा पुढ्यात येऊन उभी होत त्याच्या चेहऱ्यासमोर एक बोट पॉइंट करत त्याला जाब विचारायला लागली. 

"खडूस भावाची खडूस बहीण!" 

"तू तर फारच चांगला ना?"

"Yes… I am always super fantastic, man!"..."ohh sorry, my darling woman.." 

"You….."..."घ्यायला आला तरी तुझ्या कारमध्ये बसणार नाही."... ती परत जायला वळली. 

"दुसऱ्याची कार आणतो." 

"तुझ्या गाडीत बसणार नाही."

"भारीच की…. मग बाईक घेऊन येतो."... तो अजून तिला चिडवत हसत म्हणाला.

"राज…."..ती चिडून म्हणाली. 

"Yess Darling….!"

ती उत्तर न देता आपल्या कॉलेजकडे जायला निघाली. 

"कितने भी तू करले सितम, हसहस के सहेंगे हम…"...

      सायली पुढे जात होती तर कॉलेजच्या काही मुली राजला बघत असलेल्या तिला दिसल्या… तिने एकदा परत त्याला तिखट लूक दिला...आणि कॉलेजमध्ये चालली गेली. 

"यार, अब मै इतना हँडसम हू, इसमे मेरा क्या कुसुर……?"..तो आपल्या केसातून हात फिरवत आपल्या कारमध्ये जाऊन बसला. सायली दिसेनाशी होईपर्यंत कारमध्ये बसून तिला बघत होता. 

"यार ही चिडली की आणखीच गोड दिसते...मेरी मैना तुम ऐसेही बडी चटपटी पाणीपुरी की तरह दिखती हो! मैं नहीं मनाने वाला..".. त्याने कार स्टार्ट केली आणि हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. 

********

        इकडे घरी, दुपारचे जेवण आटोपून सगळे आपापल्या रूममध्ये निघून आले. आज्ञा सुद्बा सायलीच्या रूममध्ये आली. जेवतांना पण आज्ञाची इंडिरेक्टली समीर सोबत फ्लर्टिंग सुरू होते, जे कोणाला नाही पण समीरला कळत होते. कधी इग्नोर कर तर कधी हार्ड लूक दे, असं काय ते त्याचं सुरू होते. 

"मिस ला पण ताप आहे, मेडिसिन द्यायला हवे..पण स्वतःहून नेऊन दिले तर मॅडम परत...सुरू होतील"...तिच्या रूममध्ये औषध द्यायला जाऊ की नको तो संभ्रमात पडला होता. शेवटी त्याचातला डॉक्टर जागा झाला, आणि तो तिला औषध द्यायला बाहेर पडला तर आई होती. 

"देवालाच काळजी असते! Huh!".... त्याने आई जवळ आज्ञासाठी औषध दिले आणि आपल्या रूममध्ये परत आला. 

      आज्ञाला अजिबात झोप येत नव्हती. तिच्या डोक्यात सतत समीरच्या लग्नाबद्दल सुरू होते. 

"आज्ञा काही कर? नाहीतर खरंच तू डॉक्टरांच्या लग्नात करवली बनून राहशील… "

"आज्ञा तुला करवली नाही, डॉक्टरची डॉक्टरनी बनायचं आहे…" 

"डॉक्टरनी? Oh it's sounds so weird! आणि डॉक्टरनी बनायला किती अभ्यास करावा लागेल? परत बारावी पासून सुरुवात करावी लागेल… no no no no...very dangerous plan…need to change it." 

"डॉक्टरांच्या दिलाची राणी, या घराची बहुरानी!" 

        आज्ञाचे स्वतःचेच काय काय इम्याजिनेशन सुरू होते. समीर सोबत बोलायलाच हवे म्हणून ती जागेवरून उठली आणि तडक समीरच्या रूममध्ये जाणार तोच… 

"मला माझ्या रूममध्ये असे नॉक न करता आलेले आवडत नाही"... तिला समीरचा आवाज आला आणि ती दारातच थांबली. 

      ती जे तनतन करत येत होती, ते त्याला त्याच्या डोअरच्या समोर असलेल्या आरसा मधून दिसले होते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव वरून ती काय बोलायला आली असेल याचा त्याला अंदाज आला होता. 

"दार बंद असेल तर नॉक केल्या जाते, आणि मी येईल, कधी पण येईल, नॉक न करता येईल. या रूमवर माझा हक्क आहे." ती त्याच्या बेडच्या पुढ्यात येऊन दोन्ही हात आपल्या कंबरेवर ठेवत उभी होती. तो काहीतरी मॅगझिन हातात पकडत बेडवर मागे टेकून बसला होता. 

"कोणी दिला हक्क?" त्याने आपल्या हातातील मॅगझिन थोडे चेहऱ्यासमोरून खाली केले. 

"मी!"

"तुम्ही कोण?" 

"मी कोण ते तर कळेलच."

"उगाच वाद नका घालू. तुम्हाला बरं नाही आहे, आराम करा." 

"तुम्ही त्या मुलीला नकार द्या, मी जाते आराम करायला." 

"नाही." 

"हे बघा डॉक्टर मी तुम्हाला खूप प्रेमाने समजावत आहे… त्या मुलीला नकार द्या."

"Why?" 

"Because I love you!"

"Just shut up! Now go back to your room, and take a rest."

"डॉक्टर, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि मी दुसऱ्या कुठल्या मुलीला तुमच्यासोबत बघू नाही शकत.".... ती थोडी त्याचाजवळ जात उभी राहिली. 

"मुलीला नकार द्या म्हणे.. मुलगी म्हणजे तुम्हाला खेळणं वाटले आहे काय? पाहिजे तेव्हा होकार द्या, आपल्याच मनाने नकार द्या? आम्ही भेटू, आमचं टुंनिंग जुळले, त्यांना मी आवडलो तर या लग्नाला माझ्याकडून संमती असणार आहे. "... तो बेडवरून उठत तिच्या पुढे उभा होत थोड्या कडक आवाजात म्हणाला. 

"मी तुम्हाला प्रेमाने समजावते आहे तर तुम्हाला समजत नाही आहे. इट्स ओके डॉक्टर, तुम्ही विसरत आहात मी माझे प्रॉब्लेम्स माझ्या पद्धतीने सोडवू शकते. So now wait and watch!".... ती आणखी त्याच्या जवळ जात म्हणाली. तिला असे आपल्या इतक्या जवळ आलेले बघून तो थोडा मागे सरकला.  

" त्या मुलीला जर काही झाले, तिला थोडं जरी खरचटलं, तर मग माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल आहे." तो थोडा मोठ्यानेच चिडत बोलला. 

"आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही माझे आहात आणि माझेच असणार आहेत."

"यू आर मेंटली सिक, कंट्रोल युरसेल्फ." 

"हे क्यूट नाक ….माझं आहे"...ती त्याच्या नाकाला आपल्या बोटाने स्पर्श करत म्हणाली…. तिने त्याला स्पर्श केला तसे त्याने तिचा हात बाजूला झटकला.

"हे स्वीट लिप्स….हे….. फक्त... अन् फक्त...माझे ..."... ती परत त्याचा ओठांना स्पर्श करणार तेवढयात त्याने तिचा हात झटकत तिच्या मानेला केसांमध्ये मागून पकडले आणि तिचा चेहरा वर केला….आणि तिच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला ..

"Don't dare to touch me….stay in your limits!".... तो रागावला होता. ती त्याच्याकडे बघत होती. तेवढयात तिचा फोन वाजला, त्या आवाजाने त्याने तिला सोडले आणि आपल्या पासून थोडे दूर फेकाल्यासारखे केले. 

"हो… आलेच!"...फोनवर बोलून तिने फोन कट केला. 

"डॉक्टर, इमर्जन्सी आली आहे म्हणून जातेय, नाहीतर मी तुम्हाला कुठे कुठे टच करू शकते, सांगितले असते. तरी तुम्हाला एक छोटं प्रॅक्टिकल देतेच"...म्हणत ती झटक्यात त्याच्या जवळ जात, त्याच्या गालावर एक छोटंसं किस केले आणि घाईघाईने बाहेर पळाली.

          तिच्या अशा वागण्याने रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला आता आज्ञाचा चांगलाच राग आला होता. त्याची मुठी आपोआप आवळली गेली आणि त्याने एक जोरदार पंच भिंतीवर मारला...

********

"हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाही, मी तुला आधीच सांगितले आहे. माझा रस्ता सोड."... प्रिया

"तुला एकदाचं सांगितलेले कळत नाही का?" …. तो प्रियाचा हात पकडत म्हणाला. 

"तुझ्यात एवढी हिम्मत, की तू माझा हात पकडला?"...म्हणत प्रियाने त्याचा गालावर एक जोरदार ठेऊन दिली.  

           कॉलेजच्या थोड्या पुढल्या आवारात आज्ञाची मैत्रीण प्रिया हिला एक मुलगा नेहमी तिच्यावर प्रेम करतो म्हणून मागे येत होता. त्याला समजावून सुद्धा तो तिच्या मागे येणे सोडत नव्हता. आज तर त्याने हद्दच केली, सगळ्यांसमोर त्याने तिचा हात पकडला होता. तिने त्याला सगळ्यांसमोर मारल्यामुळे त्याचा राग सातव्या आसमानात गेला होता. आणि आता तो तिच्यासोबत जबरदस्ती करत गैरवर्तन करत होता. प्रकरण आवाक्याच्या बाहेर जात आहे बघून एका मैत्रिणीने आज्ञाला फोन करून सगळं कळवले होते. 

"ये तू? स्वतःला काय समजते? तुला एकदा सांगितलेले समजत नाही का? तू माझी नाही तर कोणाची नाही"...तो, तेवढयात त्याच्या कानाशिलावर एक जोरदार हात पडला, आणि एक लात त्याच्या पोटावर… तो पलीकडे जाऊन जोरदार खाली पडला. आज्ञा जवळ येणार तोच तो उठून तिथून पळाला. 

*****

"आज्ञा जोपर्यंत सोबत आहे, वहिनी तुझ्या हाती नाही लागायची"... सच्याचा मित्र

"आज तिने सगळ्यांसमोर मोठी insult केली. आज्ञाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल." ... सचिन 

   चार पाच टवाळ मुलांचा ग्रुप दारू पीत काहीतरी प्लॅन करत होते. 

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all