Love ... Sky is not the limit 23

आज्ञा

Love… Sky is not the limit 

आधीच्या भागात: समीर आणि आज्ञा पावसाळी डेटवर गेले होते. म्हणजे आज्ञाने च जबरदस्ती केली होती. 

भाग 23

       आज्ञाचा आजचा दिवस अगदी स्वप्नवत मनासारखा झाला होता. समीरसोबत वेळ घालवण्याचे तिचे स्वप्न आज सत्यात उतरले होते. ती तर आज सातव्या आसमानात होती. आज तिला झोप सुद्धा येत नव्हती, दिवसभर समीर सोबत घालवलेले सगळे क्षण तिच्या डोळ्यांपुढून सरकत होते. त्यात सुद्धा बास्केटबॉल खेळताना ती समीरच्या स्वप्नात हरवली होती, त्याचं असं तिच्या जवळ येणं, ते सगळं आठवून ती स्वत:शीच लाजत होती. दिवसभराच्या आठवणीमध्ये हरवत रात्री कधीतरी तिला झोप लागली. 

        समीरची तर सकाळपासून फजिती सुरू होती. सगळ्यांनी त्याला अगदी इरीटेट करून सोडलं होते, बाहेर आज्ञा तर घरात राज अन् बाकीचे तुटून पडले होते. या एवढ्यात एक गोष्ट त्याचा मनासारखी झाली होती, ती म्हणजे बास्केटबॉल… आज कितीतरी वर्षांनी तो आपल्या आवडीचा खेळ खेळला होता. झोपताना त्याच्या डोळ्यांपुढे सुद्धा दिवसभर घालवलेले क्षण सरकत होते… आज्ञाचा चेहरा सुद्धा वारंवार डोळ्यांपुढे येत होता, नकळतपणे त्याच्या ओठांवर पण हसू आले होते, त्याला सुद्धा ते कळले नाही, पण लगेच तिचं मारामारीचे, त्याला त्रास देणारे रूप समोर आले आणि समीरचे हसू गायब झाले…"नको...ही मुलगी विचारांमध्ये पण खूप डेंजर आहे!" स्वतःशीच पुटपुटला. दिवसभर थकल्याने तो गाढ झोपी गेला. 

       अगदी रोजची सकाळ, सगळे नाष्टासाठी म्हणून एकत्र डायनिंग टेबलवर जमले होते. तेवढयात बाहेर बाईक थांबण्याचा आवाज आला आणि सेकंदात आज्ञा घराच्या दारात आपली बत्तिशी दाखवत उभी. 

"एक दो तीन, चार पांच छह सात आठ नौ दस ग्यारा...बारा तेरा...तेरा करू गिन गिन के मैं इंतजार, आजा सनम आई बहार…."..आज्ञाला दारात बघून नेहमीप्रमाणे राजचे समीरला चिडवणे सुरू झाले. 

"इकडे आड, तिकडे विहीर ! कुठे फसलो मी?"..समीर स्वतःशीच पुटपुटला. 

"तू खरंच डॉक्टर आहेस काय रे?"...समीर इरीटेट एक्स्प्रेशन देत म्हणाला. 

"हो…. डोक्याचा!"... राज अक्षय कुमार सारखी बत्तिशी दाखवत म्हणाला.. समीरने डोळे फिरवले. 

"का? डॉक्टर माधुरी दीक्षितचा फॅन नसू शकतो?"...राज 

"आजा सनम आई बहार…..?"...समीर.

"ही ही ही... तू बघितले नाहीस का..?" राज.

"भाई वो छोड, मॅडमकी स्मायल देख, बहोत राज छुपे दिख रहे इस मुस्कान के पीछे?"... राज. 

"तुला बऱ्या यांच्या छुपलेल्या गोष्टी कळतात?".

समीर.

"मित्रासाठी शिकावं लागते सगळं… त्यातही असा ढम्म मित्र असेल तर काय विचारायलाच नको, किती पापड लाटावे लागतात."... राज. 

"राज, तू मलाच का भेटला?"... समीर बिचाऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता. 

"डेस्टिनी ब्रो …. डेस्टिनी! भगवानके आगे कभी किसकी चली है?"... राज. 

      समीरने त्याच्याकडे बघून नकारार्थी डोकं हलवले. 

"हॅलो…….. माय लव्ह……." समीरकडे बघत आज्ञा आवाज देत घरात येतच होती, की समीरला जोरदार शिंक आली… तर आज्ञा पुढे बोलायची थांबली. 

"काय झालं?".... आज्ञा समीरचा चेहरा बघून म्हणाली. समीरचा चेहरा गुलाबी लाल झाला होता… सर्दीमुळे वारंवार नाक पुसल्यामुळे नाकाचं समोरच टोक आणि डोळ्यांखाली गालाजवळचा भाग लाल लाल झाला होता..सर्दीमुळे डोळे हलकेसे पाणावलेले दिसत होते. त्या रुपात तर तो तिला भारीच गोड वाटत होता…" मासूम सौंदर्य "..

"अगं, दादाला बरं नाहीये. सर्दी आणि थोडा ताप आलाय."....सायली 

"काय? डॉक्टर सुद्धा बिमार पडतात?"...आज्ञा शॉक झाल्यासारखी ओरडली. 

"का? डॉक्टर माणसं नसतात?"...राज हसत म्हणाला. 

"नाही."...आज्ञा 

"काय?"...सायली राज एकत्र म्हणाले.

"नाही नाही, अहो म्हणजे डॉक्टर डॉक्टर असतात ना…? अन् हे बिमार पडले तर आम्हा पेशंटला कोण तपासेल?"...आज्ञा. 

   

        आज्ञाचा बोलण्याचा अर्थ राज आणि समीरला समाजाला होता, राजला तर हसू येत होते.

"तुला बिमार पडायची सुद्धा परमिशन घ्यावी लागेल पुढे."...राज खी खी करत होता. 

"अग काल तो पावसात भिजला, त्याला पावसाची ॲलर्जी आहे.."...सायली बोलतच उठून किचन मध्ये गेली..  

"यांना सगळ्याच चांगल्या गोष्टींची ॲलर्जी आहे, रे देवा…. "..आज्ञा कपाळावर हात मारत हळूच पुटपुटली. 

"होता है होता है, बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रहती है".. राज

"छोटी नाही, किती मोठी बात आहे ही?"...आज्ञा 

"रेन रोमान्स कसे करू मी?" ...आज्ञा 

"राईट! तुम्ही सोडा याला, ज्याला उन थंडी पाऊस सगळं जमतं, असाच बघा…"..राज

"रोमान्स का क्या है डॉक्टर बाबू, प्यार हो तो कही पर भी रोमान्स कर सकते हैं… "..आज्ञा

"पण तुम्हाला रेन रोमान्स आवडतो, त्याचं काय?'.. राज

"चलो कोई गल ना जी, दिल के डॉक्टरसाठी हम भी रेन ॲलर्जिक होजायेंगे !"..आज्ञा 

"तुम्ही किती फालतू बकवास….. आ ssss आ ssss छी…"...बोलता बोलता परत समीरला शिंक आली. 

"काय रे, अजून बरं नाही वाटत काय? सायली काढा आण."...आजी समीरच्या कपाळाला हात लावत म्हणाल्या. सायलीने समीरच्या हातात काढाचा ग्लास आणून दिला. 

"ही ही ही… मेडिसिनवाले पण काढा घेतात...डॉक्टरांचे औषध डॉक्टरांवर काम नाही करत…."...आज्ञाला त्याचाकडे बघून हसू आले. 

"माझ्या हार्टचा इलाज नाही करत, असच पाहिजे…" आज्ञा

"ब्रो , रिवेंज.."...राज 

"आधी मला ते ब्रो म्हणणं बंद कर, कसं टपोरी वाटतेय ते"... समीर

"कर्म आपले आपले अजून काय…? प्या कडू काढा……" बोलता बोलता आता तिला सुद्धा शिंक आली.. 

"आ ssss आ ssss छू…"...आज्ञा 

"आ ssss आ ssss छी…" समीर 

"आ ssss आ ssss छू…"...आज्ञा 

"दोघं काय लहान मुलांसारखे माझी टर्न माझी टर्न खेळत आहात?"...दोघांकडे बघून आता राजला खूप हसू येत होते. 

"आ ssss आ ssss छी…" समीर 

"अगं, तुला काय झालं? तुला पण बरं नाही का वाटत आहे?".....सायली. 

"भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा? सांग सांग भोलानाथ… पाऊस पडेल काय?"....राज परत आपलं गाणं गुणगुणायला लागला. 

"आ ssss आ ssss छू…"...आज्ञा, शिंक देता देता राजचे गाणे ऐकून आज्ञाला पण हसू येत होते.. 

"डॉक्टर राज, तीन नाही चार...हवेत मला…"..आज्ञा 

"आ ssss आ ssss छी…" समीर.  

"आ ssss आ ssss छू…"...आज्ञा.

"समीर, तो हातातला काढा पी आधी, नाहीतर थंड होईल. सायली इकडे ये, आज्ञा ला पण हा काढा दे."...आई. सायली काढा आणायला आतमध्ये गेली.  

"कर्मा कॉलिंग बॅक!"...राज समीरच्या कानाजवळ खुसपुसला.. समीरला ते ऐकून आज्ञाकडे बघून आता हसू आले होते. 

"आज्ञा, चल हे घे.."...सायलीने तिच्या हातात ग्लास दिला आणि तिच्या कपाळाला हात लावून बघितले. 

" आज्ञा, अगं तुला पण ताप आहे. तू पण कुठे पावसात भिजलेली काय?"...सायली

"काल पावसात बास्केटबॉल खेळले."...आज्ञा

"Viral infection!"... राज 

"What do you mean?".... समीर 

"Weather changed, viral infection..simple !"... राज 

"तुझं सिंपल असतं?"...समीर 

"ही ही ही….ते पण आहे. काल किस किस तर नाही खेळलात?"... राज समीरच्या कानात कुजबुजला. 

"मी काय तुला किस करणारा दिसतो?"...समीर 

"मला नाही, त्या देवसेनेला..."... राज 

"मी असे काही करत नाही."...समीर

"हा पण त्या देवसेनेवर काय भरोसा नाही!".. राज.

"बघतोच तुला …"...समीर 

"तुम्ही आजकालची मुलं पण ना…तुम्हा लोकांना नेहमी वेगळच काही करायचं असते. हिचं ठीक आहे ही लहान आहे, पण हा…? हा तर मोठा आहे, वरून डॉक्टर आहे, तरी काय भिजत बसला… साधं शेडमध्ये उभं राहावं, नाही कळावं याला?"...आई.  

"भान नसेल त्याचं! आजूबाजूची सृष्टी पावसापेक्षा पण जास्त सुंदर असेल..बघत बसला असेल, बिचारा?"... राज 

   ते ऐकून सायलीला हसू आले. 

"तुला काय झालं ग हसायला?"....आई

"काही नाही ग, कोणती सृष्टी दादाला सुंदर दिसली असेल, याचा विचार करत होती."...सायली हसत म्हणाली. राजचे असे पोरकट, मस्तीखोर बोलणं ती पण एन्जॉय करायची, आणि त्याची अशी शब्दांच्या आडून आडून समीरची मस्करी करणं तिला फार आवडायचं. राजच्या सोबत असल्याने समीर सुद्धा अधून मधून मजा मस्करी, मस्ती करायचा, नाहीतर बाकी वेळ काम एके काम हेच चालायचं.   

"अरे हो समीर, त्या मुलीच्या घरी माझं कालच बोलणं झालं. तर आम्ही पुढल्या रविवारी तुम्हा दोघांचं भेटायचं ठरवले आहे. तिच्या पालकांचं आणि आमचं पण मत असे पडले की, आधी तुम्ही एकमेकांना भेटून घ्या. तुम्ही एकमेकांना पसंत पडले की मग आम्ही पुढले ठरवू. कांद्या पोह्याचा कार्यक्रम उगाच नको वाटतो."...आई 

"हो, चालेल."...समीर एकदा आज्ञाकडे बघत आईला म्हणाला. 

"आ ssss आ ssss छू…!"...आज्ञा.  

"आ ssss आ ssss छी…" समीर.  

"दोघंही सारखे, अगदी बहीण भाऊ वाटता."...आजी. 

आजीचे बोलणे ऐकून काढा पित असताना जोरदार ठसका लागला. 

"अगं हळू!"...सायली तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. 

"आजी, अहो असे काय म्हणता? कुठे हे, कुठे मी? यांना भजी नाही आवडत, मला किती आवडतात. हे पुस्तकी किडे….हे असे खडूस म्हणजे शांत, यांना तर हसता पण येत नाही."....आज्ञा भारीच टेन्शन मध्ये आली होती. 

"हो ना, आणि हसायचा थांबत नाही."... राज हसत म्हणाला. 

"तेच तर, आम्ही एकमेकांच्या किती opposite आहोत. ही हो सायलीच शोभते यांची बहीण. डॉक्टर अँटिक, ही पण अँटिक "..आज्ञा. 

"तसं बरोबर आहे तुझं पण म्हणणं…"...आजी 

"हुश्श!...."आ ssss आ ssss छू…!"...आज्ञा. 

"देवसेनाला आता हार्ट अटॅक येत होता.."... राज.

"ही आजी पण ना….."....समीर डोक्यावर हात ठेवत म्हणाला. 

"तुला पण नाही आवडले ना, त्यांना तुझी बहीण बनवलेले? मी बघितले होते तुझे एक्स्प्रेशन"... राज. 

"तुझं आजकाल फालतू गोष्टींकडे जास्त लक्ष असते असे नाही का वाटत तुला?"..समीर जागेवरून उठत म्हणाला.

"नाही!"... राज. 

"आ ssss आ ssss छी…" समीर.  

"समीर, तुला ताप आहे, आज आराम कर.."...राज. 

"नको, ठीक आहे.'...समीर. 

"समीर, एक दिवस काम नाही केले तर काही होणार नाही."...आई 

"अगं आई डॉक्टरांना असे नाही चालत."...समीर

"Wait wait….?"...म्हणत राजने आपला फोन काढला आणि कोणासोबत तरी फोनवर बोलला. 

"समीर, आज तुझ्या खूप इंपॉर्टन्ट ॲपॉइंमेंट्स नाहीत. आणि जे regular पेशंट आहेत, त्या पोस्टपोन करू शकतो. बाकी हॉस्पिटल मधले मी सांभाळून घेईल. तू आज आराम कर."... राज.

"तसे पण viral infection आहे, पसरायचे चान्सेस जास्त आहेत"...राज त्याला हळूच एक डोळा मारत म्हणाला. 

समीर डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होता.

"आ ssss आ ssss छू…!"...आज्ञा.

 "आज्ञा, तुला पण ताप आहे, तू पण आराम कर…तापामध्ये गाडी नको चालवू" ...सायली

"मी काय एवढी नाजूक नाही.. I am very much strongest strong!".. आज्ञा

" नखरे नकोत, तसे पण कॉलेजला तू नावसाठीच येते", सायली. 

"फ्लॅटमध्ये मला एकटीला बोर होते यार सायली. ती प्रिया पण नसणार आहे, आणि मला झोप पण येत नाही. चल काही नाही, आपण जाऊया कॉलेजला."...आज्ञा

"उनाडक्या करायला हव्यात तुला फक्त!"...सायली.

"आज्ञा, नको… तुझं अंग चांगलच तापले आहे. तू इथेच सायलीच्या रूममध्ये आराम कर."...आई.

"अगं पण तू एकटी कॉलेजला .."...

"मी सायलीला कॉलेजमध्ये सोडतो, आणि पीकअप पण करेल. तुम्ही दोघं रेस्ट घ्या.".. राज. 

"बरं, असय… चालेल.."..आज्ञा बिचारा चेहरा करत म्हणाली. राजला मात्र कळले होते ती त्याला चिडवत आहे ते. 

        सगळे आपापल्या कामाला निघून गेले. राज पण सायलीला कॉलेजला पोहचवायला निघून गेला. समीर आपल्या रूममध्ये आराम करायला निघून आला. आज्ञा पण सायलीच्या रूममध्ये आली. बेडवर आराम करायला म्हणून पडली, पण तिच्या डोक्यात सतत समीर पुढल्या रविवारी त्या मुलीला भेटायला जाणार आहे, हेच घोळत होते. आणि जर सगळं नीट झाले तर लवकरच लग्न होईल, या विचारांनीच सायलीचा ताप आणखीच वाढत होता. 

         मुलीसारखी मुलगी असते, अगदीच सगळे नाही पण जर थोडे जरी विचार जुळले तर लग्नासाठी त्या मुलीला होकार देऊ, असेच समीरने सुद्धा ठरवले. 

******

      समीर नेहमीच प्रेम, गर्लफ्रेंड या गोष्टींपासून दूर होता. अभ्यास, वडिलांचे स्वप्न, आणि आपला परिवार एवढेच माहिती होते. त्याला त्याचा भावना आज्ञासाठी काय आहेत या अजून तरी कळल्या नव्हत्या. त्यात आज्ञा त्याचा एकदम विरुद्ध होती, त्यामुळे तिचं वागणं त्याला इरिटेट करत..अगदी एक दोनदा त्याला त्याचा हार्टबिट्स वाढल्या सारख्या वाटल्या होत्या..पण ते येडू, आज्ञाचे प्रेम त्याला समजत नव्हते, अजूनही त्याला तिचं त्याचाप्रती अट्ट्रॅक्शन आहे असेच वाटत होते. त्यात आज्ञा आणि त्याचामध्ये सात आठ वर्षाचं अंतर होते, तिच्या कामगिरी जरी मोठमोठ्या होत्या, तरी त्याला ती लहानच वाटत होती. तिचं वय बघता तिने आपल्या अभ्यासावर, करिअरवर फोकस करावे, असे त्याला वाटत होते. कारण एकदा काय वेळ हातातून निघून गेलं, तर आयुष्याचं खूप मोठं नुकसान होते, त्यामुळे आताचा एक एक दिवस खूप महत्वाचा आहे असे त्याचे स्पष्ट मत होते. आयुष्य असे प्रेमाच्या मागे वाया घालवण्यासाठी नाही असे त्याचे स्ट्राँग मत होते. लोकं हे प्रेमाच्या मागे आपले आयुष्य खराब करून बसतात असे त्याने आपल्या आजूबाजूला बघितले होते. त्यामुळे कदाचित तो तिच्या दूर राहत होता. पण त्याला काय माहिती होते, त्याचे हे विचार भविष्यात पूर्णपणे बदलणार होते… तो पण प्रेमात तडपणार होता…. 

*********

क्रमशः 

       

तुम्हीच टेडी तुम्हीच भालू

भोळे भाबडे गोलू मोलू 

तुम्हीच माझे पिंकी पोलू

गोड गोडूले झोलू मोलू 

या इरा परिवाराची शान तुम्ही

आमच्या लेखणीची जान तुम्ही

कुपीत कसले उण्यादुण्याचे

गुपित तुम्ही आमच्या हसण्याचे…

Thanks a lot….❤️

Happy Teddy Day ! 

Stay safe , stay happy …. 

🎭 Series Post

View all