Love ... Sky is not the limit 21

समीर आज्ञा

भाग 21 

                  आज्ञा समीरला जवळच असलेल्या हॉटेल मध्ये घेऊन गेली. तिथे तिने समीरच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले. दोघंही चांगलेच भिजलेले होते, त्यामुळे समीरला थोडी थंडी वाजत होती. आज्ञाने मॅनेजरला सांगून रूम टेंपरेचर थोडे हॉट करायला सांगितले होते.              

                 आधी तर समीर तिथे हॉटेलमध्ये यायला तयार नव्हता, पण आज्ञा मॅडमच त्या , त्यांना नकार देणं पण इतकं सोपी नव्हतं, शेवटी त्याला तिथे यावेच लागले होते. जेवण यायला उशीर होता. आज्ञा गाणं गुणगुणत फक्त समीरला बघत होती. समीरला मात्र खूप अवघडल्यासारखे झाले होते, तो इकडेतिकडे बघत होता .

"डॉक्टर, आलेच मी", म्हणत आज्ञा जागेवरून उठली आणि पुढे एका टेबलजवळ आली. तिथे एक तरुण जोडपं बसलं होतं. तरुणी इकडेतिकडे बघत होती तर तरुण मोबाईल मध्ये काहीतरी करत बसला होता.  

"काय चाललंय?" आज्ञा.  

आज्ञाच्या आवाजाने ती तरुणी भानावर आली. 

"कुठं काय?"....ती तरुणी थोडी अकडतच म्हणाली. 

"कोणाला बघते आहे?"... आज्ञा. 

"माझी मर्जी, मी कोणाला पण बघेल, नाही तर नाही बघेल"... ती. 

"ए सैराटची आर्ची बनायचं भूत चढलय? दोन सेकंद पण लागणार नाही हे भूत उतरवायला."... आज्ञा. 

"दम कोणाला दाखवते ग? माझे डोळे आहेत, मी कोणाला पण बघेल नाही तर टापेल, चल तू जा आपलं काम कर".... ती.

"तेच करतेय, माझ्या सोबत उगाच पंगा नाही घ्यायचा"... आज्ञा.

         त्या दोघींच्या बोलण्याचा आवाज ऐकून तिच्या सोबत असलेल्या तरुणाने मोबाईलमध्धून डोकं वर केले आणि काय सुरू आहे ते बघत होता. त्याला तर कळतच नव्हतं या दोघींचं काय सुरू आहे ते, तो आळीपाळीने दोघींकडे बघत होता.

           समीर आज्ञा बसले होते तिथे पुढल्या टेबलवर बसलेली मुलगी एकटक समीरला बघत होती. समीर पावसाने बराच भिजला होता, त्यामुळे त्याचे शरीर, त्याचे बायसेप्स कपड्यातून उठून दिसत होते. ती मुलगी त्याला सतत बघत असल्यामुळे समीरला तिथे खूप अवघडल्यासारखे झाले होते. आज्ञाने मागे वळून बघितले तर तिला सुद्धा त्या मुलीचा राग आला होता. आणि म्हणून ती तिथे त्या मुलीच्या टेबल जवळ गेली होती. तिकडे दुसऱ्या टेबलवर बसला समीर पण आज्ञाकडे बघत होता.

"काय…? काय करशील तू?"....ती मुलगी अरेरावी करत होती. 

"काय करील?"... म्हणत आज्ञा क्षणार्धात मागे वळली आणि बाजूला असलेल्या एका वेटरच्या गळ्याजवळ जोरदार उलट्या हाताने वार केला. 

तो वेटर आडवातिडवा होत जोरदारपणे खाली पडला. त्याचा हातात असलेला ट्रे सुद्धा जमिनीवर पडला. ट्रे मधील सगळं खाली पडून फुटले होते. त्याचा पडण्याचा जोरदार आवाज झाला होता, तो आवाज ऐकून बाकी सगळे जागीच उठून उभे राहिले. मॅनेजर सुद्धा पळत तिथे आला होता.समीरने मात्र डोक्यावर हात मारून घेतला होता. खरं तर त्याचे लक्ष सुद्धा त्या वेटर कडे होते, तो बोलायला म्हणून उठणार होताच की त्याच्या आधी आज्ञा उठून तिकडे गेली होती. 

           आज्ञाने त्या वेटरच्या कॉलरला पकडून त्याला उठवत परत त्याच्या गालावर आणि कानशिलात जोरात ठेवून दिली. इतक्या जोराने की त्याच्या ओठातून रक्त यायला लागले होते. ती मुलगी ते सगळं बघून आता चांगलीच घाबरली होती.

"Excuse me mam, काय झाले? काही प्रोब्लेम?"...मॅनेजर सुरू असलेला प्रकार बघून धावतच तिथे आला.

"ही कशी लोकं तुम्ही कामावर ठेवता? तुमच्या हॉटेलमध्ये मुली, बायका, लहान मुलं सगळे येत असतात, तुमची काही जबाबदारी आहे की नाही? या वेटरची वाईट नजर होती या मॅडम वर…. घाण नजरेने बघत होता तो. मला हॉटेल ओनरचा नंबर द्या, नाहीतर मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल.".... आज्ञा रागाने लाल झाली होती. 

      मॅनेजरला तर काय बोलावं काही कळत नव्हते. पण आज्ञाच्या चिडण्याचे कारण ही त्याला चांगलेच कळले होते. आता जर तिने कंप्लेंट केली तर नोकरी जायचा चांगलाच योग होता.  

"Sorry Madam! आम्ही बघतो सगळं, त्याला लगेच कामावरून काढतो, आणि पुढे पण लक्ष ठेवू"....मॅनेजर हात जोडत बोलत होता. सिक्युरिटीला आवाज देत त्याने त्या वेटरला आतमध्ये न्यायला सांगितले. कसे तरी हातपाय जोडून त्याने आज्ञाची आणि परीने त्या मुलीची माफी सुद्धा मागितली. आज्ञा तर आता तिथे जेवायला सुद्धा तयार नव्हती, पण मॅनेजरने तिची माफी मागून तिला तिथे जेवायला रिक्वेस्ट केली होती. कारण ती जर गेली तिथून तर बाकीचे कस्टमर सुद्धा उठून जातील, हॉटेलचे नाव खराब होईल, म्हणून त्याने आज्ञाला विनंती केली होती. आज्ञाने सेपरेट VIP जेवायची केबिन सांगितले, त्यांनी लगेच तिला अरेंज करून दिली. बाकी सगळ्यांची सुद्धा माफी मागून मॅनेजर तिथले वातावरण शांत करत तिथून चालला गेला. आज्ञा सुद्धा आपल्या जागेवर जायला निघाली, तसे परत काहीतरी आठवून परत फिरली. 

"दुसऱ्यांकडे बघायच्या आधी स्वतःकडे बघ. आपल्या सोबत काय घडत आहे त्याकडे आधी लक्ष द्यायला हवे, खास करून मुलीच्या जातीने जास्त सतर्क राहायला हवे, एवढी अक्कल नाही का तुला? "... आज्ञा.

" त…..तसे…….का…...का……"... ती मुलगी अडखळत बोलत होती. 

"अन् तू ग एक सोबत असताना, दुसऱ्यावर नजर ठेवते? Time pass करता नुसते. तुमच्या सारख्या लोकांमुळेच प्रेमवरचा विश्वास उडत चालला आहे लोकांचा"....आज्ञा. 

"न…..ना…...नाही".... ती 

"ते डॉक्टर, फक्त माझे आहेत, कळलं काय? परत जर बघितले तर डोळे काढून हातात देईल. आणि मी फक्त बोलत नाही, तर करून दाखवते…. !".... आज्ञा.

        आज्ञाच्या बोलण्याने ती मुलगी एवढी घाबरली की तिला काहीच बोलल्या जात नव्हते, तिने बॅग उचलली आणि ती सरळ हॉटेलच्या बाहेर पळाली. आज्ञाला तिला एवढे घाबरलेले बघून हसू आले. 

"अन् तू परश्या, पाप्याचा पितर, मुलगी सोबत घेऊन फिरतो ना, मग तिच्या सुरक्षतेची जबाबदारी कोणाची असते? मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलाय, कोणी उचलून नेले तरी समजणार नाही आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही."... आज्ञा.  

"Sorry Madam !"... तो 

"काही वाईट घडलं तर सॉरी ने ठीक होणार आहे काय? तिची सुरक्षा करता येत असेल तर सोबत घेऊन फिर, नाहीतर घरात बसा!".... आज्ञा 

        त्याने पण घाबरून होकारार्थी मान हलवली आणि तिथून पळाला. आज्ञा समीरजवळ येऊन बसली. 

"बोलून पण समजावता आले असते.".... समीर आज्ञाला म्हणाला.

"लातोंके भूत बातोंसे नही मानते ….. काही काही ठिकाणी हातपायांचा वापर करावाच लागतो."... आज्ञा

"मी पण कोणाला समजवतोय ".... समीरने डोळे फिरवले.  

"लोकांना शब्दांचा अर्थ खरंच कळते काय हो डॉक्टर?"... आज्ञा त्याला एक डोळा मारत म्हणाली.

समीरने परत नकारार्थी मान हलवली. 

वेटरने जेवण आणले. 

"प्रेमाचा, I love you चा अर्थ कळत नाही हो सगळ्यांनाच…. बोलून नाही कृतीतून दाखवावा लागेल आता".... आज्ञा हसत म्हणाली. 

"भूक ….."...समीर मुद्दाम टॉपिक बदलण्यासाठी म्हणून म्हणाला. आता ही परत काय करणार, हे विचारचक्र त्याचा डोक्यात सुरू झाले होते. 

" काय?"

"भूक लागली , असे म्हणालो"

" हो हो, मला पण, मी तर काल रात्रीपासून नाही जेवलेय"

"म्हणजे?"

"अहो डॉक्टर, तुम्ही भेटायला येणार, तुमच्या होकारानेच माझे पोट भरले होते." 

"म्हणजे तुमचा प्लॅन काल रात्रीच….. "

"राज , I kill you "... समीर मनातच बोलत होता.

"डॉक्टर, जेवताय ना….?"

       समीर चुपचाप जेवायला लागला. आज्ञा तर त्याला बघत बघतच जेवत होती. 

    आज्ञा समीरचे जेवण आटोपले होते. संध्याकाळ झाली होती, सूर्य नजरे आड व्हायला लागला होता,तांबड पसरले होते, थोड्या वेळात अंधार पडणार होता. आता पाऊस सुद्धा थांबला होता. आज्ञा आणि समीर एकत्र दिवस घालवून आता परतीच्या वाटेला लागले होते. आज्ञाचा दिवस खूप छान अगदी तिच्या मनाप्रमाणे गेला होता , समीर सोबत. जवळपास ४-६ तास ती दोघं सोबत होती, समीर तिच्या सोबत होता , तिच्या डोळ्यांपुढे. तिच्या या आनंदपुढे तिला तर आभाळ पण ठेंगणे वाटू लागले होते. स्वर्ग जर कुठे असावा, तर तो बस समीरच्या सानिध्यात होता. ती त्याचा सोबतीने खूप मोहून गेली होती. 

     परत आज्ञाची गाडी रस्त्यावरील सगळे खड्डे कव्हर करत पुढे जात होती. समीर तिची ड्रायव्हिंग बघून भयंकर हैराण झाला होता. 

"मिस, गाडी जरा साइडला घ्या"

"काय झालं? काही हवे आहे का?"... म्हणत आज्ञाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. 

"मिस, मी चालवू गाडी?"

"हा…?".... आज्ञाला तर त्याचा शब्दांवर विश्र्वासच बसत नव्हता, ती आश्चर्याचा नजरेने त्याला बघत होती. 

"तुम्ही थकल्या असाल, मी गाडी चालवतो "

"इतकी माझी काळजी डॉक्टर? I like it!".... आज्ञा अगदी प्रेमळ नजरेने त्याला बघत म्हणाली.

"यार, माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेण्यात या मिस खूप माहीर झाल्या आहेत".. समीर कसेतरी तोंड करत तिच्याकडे बघत विचार करत होता. 

"नाही असे काही नाही, तुम्ही मागे बसा, मी चालवतो आता" 

"हाये हाये…. नेकी और पूछ पूछ! अहो विचारता काय…. तुमचा हक्क आहे गाडीवर आणि…..माझ्यावर पण!" …. आज्ञा अगदी स्वप्नवत बोलत होती. 

समीरने चावीसाठी हात पुढे केला. 

"तुमच्या हातात हात द्यायला तो हम कबसे तयार बैठे है दिल के डॉक्टर "... म्हणतच आज्ञा समीरच्या हातात आपला हात देत होती. 

"Keys?"... आज्ञाचा हात त्याचा हातावर यायच्या आधीच तो म्हणाला.

"चलो कोई ना डॉक्टर, तुम्ही असेच हात पुढे कराल माझा हात हातात घेण्यासाठी… येह आज्ञाका वादा है अपने दिल के डॉक्टरसे".... आज्ञा त्याचा हातात चाबी देत म्हणाली. 

     समीर एकदम स्टाईलमध्ये (म्हणजे तो नॉर्मलच पाय टाकून बसला, पण आज्ञाला उगाच तो स्टाईलमध्ये वाटला) गाडीवर जाऊन बसला. 

" हायी Hottie.."... समीरला बघून आज्ञा एक हात आपल्या डोळ्यांवर तर एक हात आपल्या हृदयावर ठेवत आपले वाढलेले हार्ट बिट्स कंट्रोल करत म्हणाली. 

        समीर गाडीला चावी लावत गाडी स्टार्ट करत आज्ञाकडे बघत होता.

"ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगी 

तुमको मैं चुरा लूँगी तुमसे, दिल में छुपा लूंगी " …नेहमीप्रमाणे आज्ञाचा सिंगिंग मोड ऑन झाला होता.

"मिस, बसतात आहात ना?"....आज्ञा स्वप्नवत त्याला बघत आहे बघून समीर म्हणाला. 

"डॉक्टर, तुमच्या मागे नेहमी मीच बसणार बघा…. आयुष्यभर".... म्हणत ती गाडीवर त्याचा मागे बसली. 

        समीरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी पुढे घेतली. आज्ञाची त्याचा मागे बसून सतत बडबड सुरू होती. त्याचसोबत तिचे फ्लर्ट करणे सुरू होते. आता रस्त्याने बरेच दचके बसायला लागले होते. आज्ञा आपल्याच तालात असल्यामुळे, दचक्यांमुळे ती थोडी खाली घसरल्या सारखी झाली. पडायच्या भीतीने तिच्याही नकळत तिने एकदम समीरच्या कंबरेला पकडले. 

"बघा किती खड्डे आहेत रस्त्यावर, लोकं उगाच आमच्यावर डाऊट घेत होते."... आज्ञाचे परत बडबड सुरू झाली. समीरला मात्र तिचा एकही शब्द ऐकू जात नव्हता. तिने त्याचा कंबरेला इतके टाईट पकडले होते, की त्याचे सगळे लक्ष तिच्या त्या स्पर्शात हरवले होते. गाडी चालवता चालवता तो वारंवार त्याचा कंबरेला पकडलेल्या तिच्या हातांकडेच बघत होता. आजपर्यंत कधीच कोणती मुलगी त्याला असे पकडून बसली नव्हती. इंफेक्ट आई आणि सायली सोडून दुसरी कुठली मुलगी त्याच्या गाडीवर बसली नव्हती. त्या पण त्याला खांद्यावर पकडून बसत, असे कंबरेत हात घालून तर या पहिल्याच मॅडम बसल्या होत्या. 

"हा म्हणजे काही खड्डे मी मुद्दाम कव्हर केले होते, पण आता तर देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की आपण जवळ असावे, एक असावे. देवाच्या इच्छे विरुद्ध जाऊ नये डॉक्टर"... आज्ञा 

"रस्ते देवाने नाही माणसाने बनवले आहेत"... समीर 

"ही ही ही " 

        बोलता बोलता तिच्या लक्षात आले की समीर काहीच बोलत नाहीये, फक्त बघतोय... तिचं लक्ष तिने समीरला पकडलेल्या हातांकडे गेले आणि तिच्या लक्षात आले, तिला स्वतःशीच हसू आले होते. 

"मी तर पकडून बसणार, मला पडायचं नाही खाली… मला सिंगल पिसमध्ये माझ्या राजाच्या घरी I mean माझ्या डॉक्टरांच्या आयुष्यात जायचं आहे"...म्हणत ती आणखी थोडी पुढे सरकत त्याला नीट पकडून बसली. 

         तिच्या एवढे जवळ येण्याने समीरला तर काहीच सुचत नव्हते, बोलल्या पण जात नव्हते आणि काय बोलायचे काही कळत पण नव्हते. त्याला आतापर्यंत आज्ञा चांगलीच कळली होती, तिला ' नको करू ' म्हणाले तर ती ते हमखास करेल… तिला दूर बस, पकडू नको जर म्हंटले तर ती काय माहिती पुढे मांडीवर येऊन बसेल…. आणि म्हणूनच तो चूपचाप गाडी चालवत होता. त्याला आता फक्त घरी लवकरात लवकर पोहचायचे होते. त्याने परत आपले लक्ष ड्रायव्हिंग वर कन्संत्रेट केले. 

          आज्ञाची सततची बडबड सुरु होतीच. त्याला ऐकू जावे म्हणून ती आपला चेहरा त्याच्या उजव्या साईडच्या खांद्यावर घेत त्याचा कानाजवळ बोलत होती. अधूनमधून त्याचा होणाऱ्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. आता तिची बडबड कमी होऊ लागली आणि तिचं डोकं त्याच्या खांद्याजवळ पाठीवर पडले. 

******

क्रमशः 

****

हॅलो फ्रेंड्स …. 

गेले काही दिवस Covid मुळे तब्बेत थोडी डाऊन होती, म्हणून भाग पोस्ट करण्यास उशीर झाला. 

 लाईक्स, कॉमेंट्स साठी खूप खूप thank you! 

कथा आवडत असल्यास नक्की लाईक करा. 

काळजी घ्या ! Stay safe. 

❤️

🎭 Series Post

View all