Jan 26, 2022
प्रेम

Love ... Sky is not the limit 20

Read Later
Love ... Sky is not the limit 20

 

 

 

 

 

 

 

भाग 20

 

 

"डॉक्टरss" अस्पष्ट असा आवाज आज्ञाच्या ओठातून बाहेर पडला, तिचे डोळे अलगद मिटल्या गेले, तिच्या भावना तिला कंट्रोल होत नव्हत्या, त्याच्या मानेजवळ तिचा हाताची मुठ्ठी घट्ट होत होती, तिच्या बोटांची नखं त्याचा मानेला रुतायला लागली होती. तिची रूतनारी नखं सुद्धा गोड वेदना देऊन जात होत्या. 

 

सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है 

प्यार में तेरे हद से गुज़र जाना है

इतना प्यार किसी पे पहली बार आया है

मोहब्बत बरसा देना तू सावन आया है

तेरे और मेरे मिलने का मौसम आया है

 

 

          थंड पावसात दोघांनाही एकमेकांचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटत होता. समीरने एकदा तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत तिच्या ओठांवर स्थिर केली आणि आता हळूहळू तो तिच्याजवळ झुकत होता. त्याचा श्वासांचा गरम स्पर्श तिला तिच्या मानेवर , गालांवर जाणवू लागला आणि तिने तिचा दुसरा हात त्याचा पाठीवर घट्ट रोवला. 

 

"आई ग ssss !" आज्ञा डोक्याला हात लावत कळवळली . 

 

"ओ ssss आंधळ्यांनो,दिसत नाही काय?आता किस होणार होते ना." आज्ञा आपल्या डोक्याला चोळत ओरडली. बॉल येऊन आज्ञाचा डोक्याला लागला होता आणि तिचं गोड स्वप्न ज्यात आता समीर तिला किस करणार होता ते तुटलं होते .

 

"काय? किस?" एक मुलगा ओरडला.          

         

           आज्ञाचे ते शब्द ऐकून खेळता खेळता सगळे आज्ञाकडे अजब नजरेने बघत होते. समीर सुद्धा कसेतरी नजरेने तिला बघत होता. तिच्या तोंडून 'किस' शब्द ऐकून त्याने तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली. आतापर्यंत त्याला चांगलेच कळले होते की आज्ञा काही पण करू शकते आणि काही पण बोलू शकते.  

 

    'किस' शब्द ऐकून आज्ञा भानावर आली, आणि तिच्या लक्षात आले की ती समीर सोबत स्वप्नात रोमान्स करत होती. 

 

"यार आज्ञा, तुझं तर बॅड लक पण खूप खराब आहे. स्वप्नात पण काही माझ्या प्रेमाची गाडी पुढे जाईना. चल कोई ना, आपण काही लक बिकवर विश्वास नाही ठेवत, करून दाखवण्यात विश्वास ठेवतो. आयेगा आयेगा, एक दिन जरूर आयेगा, ना ना, उसे आणा ही पडेगा और डॉक्टर खुद मुझे किस करेंगे. आज्ञा, तुझा स्वतःशीच हा वादा आहे." आज्ञा स्वतःशीच बोलत होती.  

 

"पण शी यार आज्ञा, डॉक्टरांच्या ओठांचा स्पर्श मला अनुभवायचा होता, कसले गुलाबाच्या पाकळी सारखे त्यांचे लिप्स आहेत. किती भाग्यवान आहेत ही पावसाची थेंब, ज्यांना डॉक्टरांच्या ओठांना स्पर्श करता येत आहे. हाये, किती नशीबवान आहे ही हवा, जिला डॉक्टरला झप्पी देता येते." आज्ञा समीरकडे बघत मनातच बोलत होती.

            डॉक्टर समीर होताच इतका सुंदर आणि हँडसम, त्यात त्याचा तो सालसपणा, शांत पण थोडा लाजाळू स्वभाव, कोणालाही त्याचा मोह व्हावा. पावसात आधीच तो भिजला होता, समीरने त्याचा चष्मा काढून ठेवला होता, त्यामुळे त्याचे ते टपोरे डोळे, डोळ्यांच्या लांब लांब पापण्या, त्यावर अडकलेले पाण्याचे मोती, त्यात पावसाचे ते टपोरे मोती त्याच्या केसांतून खाली ओघळत होते, गालांवरून ओघळत त्याचा ओठांना स्पर्श करून जात होते, त्या पाण्याचा मोत्यांचा सुद्धा आज्ञाला हेवा वाटत होता. 

 

 

"कंट्रोल आज्ञा कंट्रोल, या मुलांना तर बघतेच," म्हणत ती त्यांच्या जवळ गेली . 

 

"काय रे, तुम्ही कुठल्या धुंदीत खेळत होता, दिसत नाही काय?"आज्ञा ओरडली. 

 

"तुझ्यामुळे गेम हरतो आहे." एक मुलगा म्हणाला. 

 

"ये ss" आज्ञा आपल्या ड्रेसच्या बाह्या वरती फोल्ड करत बोलतच होती की दुसरा मुलगा पुढे बोलला. 

"आधी तू सांग, तू कुठल्या धुंदीत होती? आणि ते किस काय होते?" दुसरा मुलगा म्हणाला. 

 

"किस? किस काय मी किक म्हणाले होते. लक्ष ठेऊन किक नाही करता येत काय म्हणत होते."आज्ञाने विषय सांभाळला.  

 

"ये ताई, तू काय स्वप्नात रोमान्स करते आहे, इथे हे सर आपल्या टीमला हरवत आहेत." एक मुलगा म्हणाला. 

 

      त्यांचे ते बोलणे ऐकून समीरला हसू आले, तो ओठ दाबत गालातच हसत इकडेतिकडे बघत होता. 

 

"असे बोलायचे तुझं वय तरी आहे काय? आणि मी जे स्वप्न बघते ते पूर्ण करण्याची हिम्मत ठेवते."आज्ञा, समीर तिच्यावर हसतो आहे बघून ती म्हणाली. 

 

        तिचे बोलणे ऐकून समीरच्या ओठांवरील हसू कुठल्या कुठे गायब झाले, कारण त्याला माहिती होते, ती जे बोलते ते खरं करून दाखवण्याची हिम्मत ठेवते.   

 

"२० वर्षाचा आहो मॅडम." त्या मुलाने उत्तर दिले.

 

"ओह गॉड, हा तर माझ्यापेक्षा पण मोठा आहे. आज्ञा, खाल्ली माती डॉक्टर समोरच, माझ्या सोबत आज हे काय होत आहे, का?" आज्ञा मनातच बोलत होती . 

 

"खेळता येत नाही, मग हरणार नाही तर काय? जा खेळा तुम्हीच, मला नाही खेळायचे."म्हणत आज्ञा तिथून निघून पुढे गेली. 

 

"हुश्श !" समीरने सुटकेचा श्वास सोडला.  

 

" लेट्स गो, विल फिनिश द गेम" समीर सगळ्यांना म्हणाला आणि सगळे परत गेम खेळायला लागले. समीर खेळण्यात परत दंग झाला. 

 

      आज्ञा जरी स्वप्न बघत असली तरी ते खूप गोड आणि तिला हवेहवेसे असे होते, त्यामुळे ती परत परत तेच तेच आठवत होती. तिच्या डोळ्यांसमोर तेच सिन येत होते. ती अजूनही समीरच्या मिठीत आहे, तिला असाच भास होत होता. सगळं आठवत ती आपल्याच तालात चालत होती. तेवढयात तिथे तिला पाण्याच्या डबक्यात काही लहान मुलं खेळताना, उड्या मारताना दिसली. ती सुद्धा त्या मुलांमध्ये शामिल होत उड्या मारत त्यांच्यासोबत खेळू लागली. 

 

       बॉल खेळता खेळता सहज समीरचे लक्ष पुढे गेले तर त्याला आज्ञा लहान मुलांसोबत पाण्यात उड्या मारताना दिसली. 

 

" गाईज, कंटिण्यु यूअर गेम, आय नीड टू गो." बोलून समीर गेम मधून बाहेर पडला आणि थोडा पुढे जात आज्ञा दिसेल अशा ठिकाणी शेडमध्ये उभा होता. त्याने जेव्हा आज्ञाला मुलांसोबत खेळताना बघितले, तो तिला बघतच राहिला, पहिल्यांदा तो आज्ञाचे हे वेगळे , बालिश असे रूप बघत होता. नाहीतर ती नेहमी रफटफ स्टाईल मध्येच असायची, बोल्ड वाटायची. आता मात्र ती त्याला एकदम निरागस भासत होती. पहिल्यांदा तो एक वेगळी आज्ञा बघत होता. पहिल्यांदा त्याला तिला बघत रहावे वाटत होते. आणि त्याचा नकळतपणे त्याने त्याचा आवडता गेम सोडला होता फक्त आणि फक्त आज्ञाल बघायला, त्याला स्वतःला कळलं नव्हते तो असा का वागतोय. 

 

भीगे भीगे तेरे लब मुझको कुछ कहते हैं 

दिल है ख़ुश मेरा की ख्याल एक जैसे हैं

रोको ना अब खुदको यूँ 

सुन लो दिल की बात को 

ढल जाने दो शाम और 

आ जाने दो रात को

कितना हसीं ये लम्हा है 

किस्मत से मैंने चुराया है

आज की रात ना जाना तू सावन आया है 

तेरे और मेरे मिलने का मौसम आया है 

सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है

इतना प्यार किसी पे पहली बार आया है

 

        कुठूनतरी गाण्याचा आवाज येत होता. समीर हात फोल्ड करून, झाडाला टेकून उभा आज्ञाला बघत होता आणि सोबतच आपोआप गाण्याचे बोल गुणगुणत स्वतःतच मग्न झाला. त्यालाच कळत नव्हते हे काय घडते आहे, पण तो हे सगळं एन्जॉय करत होता.  

 

" सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है

इतना प्यार किसी पे पहली बार आया है " , आज्ञा समीर पुढे हातात मोबाईल घेऊन समीरच्या आवाजात आपला आवाज मिसळत गाणं गुणगुणत उभी होती. 

 

       अचानक आज्ञाचा आवाज आल्यामुळे समीरची तंद्री भंग झाली . 

 

"मी पण तेच म्हणत होते." आज्ञा समीरकडे बघत मिश्कीलपणे हसत म्हणाली. 

 

"काय ?" आज्ञाला समोर बघून समीर थोडा दचकला. 

 

 

"मोहब्बत बरसा देना तू सावन आया है

तेरे और मेरे मिलने का मौसम आया है.. "आज्ञाने समीरला एक डोळा मारला. 

 

"डॉक्टर समीर, परत माती खाल्ली तुम्ही या मिस पुढे." समीर मनातच बोलला. 

 

"तुम्ही, हे काय करत आहात?" समीर तिच्या हातातल्या मोबाईलकडे इशारा करत म्हणाला. 

 

"अंगाई गीत!" आज्ञा.

 

"काय ? तुम्ही पागल झालात." समीर.  

 

"वेगळं काही सांगा हो डॉक्टर? हे मला माहिती आहे." आज्ञा आपली बत्तिसी दाखवत म्हणाली. 

 

समीर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता . 

 

"म्हणजे, मी कशी दिसते? माझं नाक कसं? माझे डोळे कसे? असे काहीतरी सांगा?"

आज्ञा परत हसत म्हणाली.

 

"You are ma......." बोलता बोलता समीर चूप झाला आणि इकडे तिकडे बघू लागला. 

 

"डॉक्टर , तुम्हाला माहिती हा आवाज ना जगातील सगळ्यात गोड आवाज आहे, अगदी माझ्या फेवरेट अरिजित सिंग पेक्षा पण गोड. अब मेरी सुबह आपकी आवाजसे और अंतभी आपके ही आवाजसे. थँक यू हा, तुम्ही मला जगातले सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिले."

 "मोहब्बत बरसा देना तू सावन आया है" आज्ञा परत तेच तेच गाणं गुणगुणत होती. समीरने मात्र डोक्यावर हात मारून घेतला. 

 

      आज्ञा समीरला जवळच असलेल्या हॉटेल मध्ये घेऊन गेली. तिथे तिने समीरच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले. दोघंही चांगलेच भिजलेले होते, त्यामुळे समीरला थोडी थंडी वाजत होती. आज्ञाने मॅनेजरला सांगून टेंपरेचर थोडे गरम करायला सांगितले होते. आधी तर समीर तिथे हॉटेलमध्ये यायला तयार नव्हता, पण आज्ञा मॅडमच त्या, त्यांना नकार देणे पण इतकं सोपी नव्हतं. शेवटी त्याला तिथे यावेच लागले होते. जेवण यायला उशीर होता. आज्ञा गाणं गुणगुणत फक्त समीरला बघत होती. समीरला मात्र खूप अवघडल्यासारखे झाले होते, तो इकडेतिकडे बघत होता.

 

"डॉक्टर, आलेच मी" म्हणत आज्ञा जागेवरून उठली आणि चालत पुढे गेली.  

 

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️