Jan 26, 2022
प्रेम

Love ... Sky is not the limit 19

Read Later
Love ... Sky is not the limit 19

भाग 19

 

"डॉक्टर, बाकीच्यांचे मला माहिती नाही, आणि कोण काय करताय, त्याचाशी माझं काही घेणंदेणं नाही, पण माझ्या मनाला आणि शरीराला जर कोणाचा स्पर्श होईल तर तो फक्त तुमचाच असेल , नाहीतर कोणाचा नाही . तसे तर कोणाच्या बापाची हिम्मत नाही आहे मला हात लावायची , पण तरी चुकूनही दुसऱ्या कोणाचा स्पर्श झालाच , तर तुम्हाला आपलं तोंड दाखवणार नाही, तुमच्या आयुष्यातून कायमची निघुन जाईल , हे आज्ञाचे प्रॉमिस आहे आणि मी आपले शब्द पाळते." आज्ञा त्याची कॉलर पकडत आपल्या प्रत्येक शब्दांवर जोर देत बोलत होती. तिच्या बोलण्यात निर्धार दिसत होता, एक वेगळाच कॉन्फिडन्स होता. समीर सुद्धा ते ऐकून थोड्या वेळसाठी थक्क झाला होता आणि एकटक प्रश्नार्थक नजरेने आज्ञाकडे बघत होता. 

 

"आज्ञा, अरे हे काय , हे सगळं संभाषण भलतीकडेच चाललंय. प्रेम , वासना अन् काय काय बापरे ! डॉक्टरांचं काय , त्यांना कसाही दिवस घालवायचा आहे , पण मला ही वेळ वाया नाही घालवायची, रोमँटिक करायची , जगायची आहे, फोकस आज्ञा फोकस ! ",आज्ञा समीरकडे बघत स्वतःशीच विचार करत होती. 

 

"ओह डॉक्टर, मी काय ते बालिश नाही, २-४ बॉयफ्रेंड पकडायचे सोडायचे काम नाही करत, मोठी आहे मी, विचारपूर्वक कामं करत असते."आज्ञा.

 

"मोठी?" समीर अजब नजरेने तिच्याकडे बघत होता. 

 

"हो मोठीच ! ते काय आहे ना, मोठ्या , नाही नाही समजदार व्यक्तीच्या प्रेमात पडले आहे ना मी, तर मी पण मोठी आणि समजदार झाली ना?"आज्ञा. 

 

      समीर न कळल्यासारखा तिच्याकडे बघत होता. 

 

"अहो डॉक्टर , तुम्ही मोठे, समजदार , तुम्ही थोडी सारखा सारखा ब्रेकअप करणार आहात, तर माझा पण ब्रेकअप होणे अशक्य. मग दुसरा बॉयफ्रेंड कशाला लागतोय मला, अपना तो लिंकअप , टायअप , सब आपके साथ ही !", आज्ञा लाजत आपली बत्तीसी दाखवत म्हणाली.

 

            आज्ञाचे ते बोलणे ऐकून त्याला हसू येत होते, पण त्याने ते ओठांतच दाबले. 

 

"ओह गॉड ! या मिस कधी सुधारतील? " मनातच बोलत नकारार्थी मान हलवत समीर इकडे तिकडे बघत होता आणि आज्ञा त्याला बघत होती. 

 

       

         अधून मधून हवेची झुळूक येत होती. समीर पावसाने भिजला असल्याने , हवा त्याला स्पर्शून गेली की त्याला थंडी वाजायची. आज्ञा पण भिजली होती , पण समीर डोळ्यांपुढे असल्यावर तिला कुठे थंडी , गर्मी , भूक लागत होती. ती तर त्याच्यातच तल्लीन झाली होती. 

 

"डॉक्टर, चला गर्मी वाढवुया. "आज्ञा.

 

"व्हॉट?" समीर शॉक होत तिच्याकडे बघत होता. 

 

"अहो, तुम्हाला थंडी वाटते आहे ना, म्हणून म्हणाले बॉडी हॉट करूया. "आज्ञा.

 

" ओह मिस, हे फालतूपणा काय बोलताय तुम्ही , मी तुमची शर्त मानून इथपर्यंत आलो म्हणजे मी काहीही करेल असे वाटले काय तुम्हाला?" समीर.  

 

 

"ही ही ही ही, एकदा काय डोक्यात चुकीची गोष्ट गेली ना तर बाहेर काढणं लय अवघड बाबा, अन् जोपर्यंत ती डोक्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत तर तेच तेच सुचते आणि तेच दिसते. डॉक्टर डॉक्टर दिल के डॉक्टर, जरा खुल्या डोक्याने विचार करा हो." आज्ञा दात दाखवत हसत म्हणली. 

 

 

"तुमच्या डोक्यात काय येईल , त्याचा काहीच नेम नाही." समीर.  

 

"एकदा विश्वास ठेऊन बघा हो, जीव देईल पण तुमचा विश्वास तुटू देणार नाही." आज्ञा.  

 

    ते ऐकून समीरने नकारार्थी मान हलवत डोळे फिरवले. 

 

"हा म्हणजे तुमच्या बाबतीत मी बेशरम आहे. म्हणजे आपके इश्क में हम सब हदे पार कर सकते हैं, पण इथे खुल्लमखुल्ला? नो नो ! शिव शिव शिव शिव !" आज्ञा मिश्कीलपणे आपल्या कानाला हात लावत म्हणाली. 

 

समीरने डोक्यावर हात मारून घेतला.  

 

"घाबरु नका हो, या आता." आज्ञा. 

 

          आज्ञा बाईकवर जाऊन बसली. समीर पण तिच्या मागे जाऊन बसला . पावसाचं बरसनं सुरूच होतं. आज्ञाने बाईक एका प्ले ग्राउंड जवळ पार्क केली. तिथे आज्ञाच्याच वयाची काही मुलं मुली बास्केटबॉल खेळत होती.  

 

 

"हे म्हणत होते मी, तुमचं तर आपलं भलतंच खूळ डोक्यात."आज्ञा समीरला चिडवत म्हणाली. 

 

"तुफान आहेत या मिस, देवा मदत कर!" समीर. 

 

 

"खेळतांना बॉडी मधली हीट वाढते !"आज्ञाची बत्तीसी कंटिण्यू होती. 

 

"हे खेळायचे? ते पण आता ? "समीर. 

 

"पावसातच तर खेळण्याची मजा आहे डॉक्टर!"आज्ञा.

 

"सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड आणि या पावसात तर अजिबात नाही." समीर.  

 

"अहो चला, खरंच खूप मजा येईल, आवडेल तुम्हाला." आज्ञा. 

 

"नो , इट्स अनहेल्थी !" समीर. 

 

"आय हेट दिज अनहेल्थी वर्ड. काय करू मी यांचं ?"आज्ञा मनातच म्हणाली.  

 

"तुम्ही हराल म्हणून घाबरता, हो ना? येह ऑफकोर्स! तुम्हाला जिंकायची सवय, ट्रॉफी बघितल्या आहे घरी , आता या सगळ्या यंग मुलांपुढे हरायची भीती वाटत आहे तुम्हाला? "आज्ञा.  

 

"मी म्हातारा दिसतोय ?"समीर.  

 

"असं कुठे म्हटलंय मी? तुम्ही तर सुपर हॉट , हँडसम, कूल, डॅश डॅश डॅश दिसत आहात. (आज्ञा फ्लायिंग किस करत म्हणाली).

 

 "बरं असू देत, तसेही मला जबरदस्ती (जबरदस्ती शब्दावर जोर देत ) करायला नाही आवडत , तुम्ही ते तिकडे शेड मध्ये बसा ,मला तर बाबा जाम आवडतं खेळायला अन् पावसात खेळायची मजाच न्यारी. "आज्ञा त्याला शेडकडे इशारा करत म्हणाली.  

 

"हे यंगस्टर्स, मी पण खेळणार." आज्ञा आपले जॅकेट काढत कंबरेभोवती बांधत , स्पोर्टी कडक आवाजात ओरडली आणि त्यांच्यात सामील सुद्धा झाली. बघता बघता ती खेळात चांगलीच रमली.  

 

         ती मुलं एकदम जबरदस्त खेळत होती. त्यांचा खेळ बघून समीर सुद्धा बसल्या जागी स्वतःशीच कॉमेंट्री करत होता. कितीही नाही म्हटले तरी त्याचा सुद्धा तो आवडता खेळ होता , पण आज्ञा होती म्हणून त्याने उगाच नकार दिला होता. 

 

         आज्ञा इकडे खेळत होती तरी एक नजर मात्र तिची समीरवरच होती. खेळ चांगलाच रंगला होता, पण आता आज्ञाचा पुढल्या टीमच्या चुका होऊ लागल्या आणि त्यामुळे आज्ञा गोल वर गोल करू लागली. समीर ओरडून चुका सांगत होता, पण कोणाचं त्याचाकडे लक्ष नव्हते. शेवटी तो उठून त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना त्यांचा चुका लक्षात आणून देत गोल कसा करायचं सांगू लागला, तरी सुद्धा त्यांना कळत नव्हते. 

 

"ओह सर, काय सांगत आहात काही कळत नाही आहे. एक तर इथे हरतोय, त्याचं जाम टेन्शन आले आहे, त्यात तुम्ही काय बोलत आहात काहीच कळत नाही आहे. " त्यातला एक मुलगा म्हणाला. 

 

"सर, हरतोय आम्ही. तिथून सांगणे सोपे आहे, इथे येऊन खेळून दाखवा की."त्यातला दुसरा म्हणाला.  

 

               झालं, त्यांनी बोलवायचीच वाट होती, तसेही त्यांचा गेम आणि उत्साह बघून समीरचे हात सुद्धा बॉलला घ्यायला आसुसले होते. थोडाही वेळ न घालवता तो गेममध्ये घुसला आणि त्याने हातात बॉल घेतला.  

 

"येस ssss! " आज्ञाने समीरला खेळत बघून पलीकडल्या मुलाला डोळा मारत बाजूच्या मुलीला हाय फाय दिले. (आज्ञाचा प्लॅन सक्सेस झाला होता.) 

 

         समीर आज्ञाच्या ओप्पोझिट टीममध्ये खेळत होता. समीर जोमाने खेळायला लागला. बॉल ट्याप करत समीरने दोन गोल केले. त्याची टीम भारीच आनंदली आणि ते आज्ञाला चिडवायला लागले. समीरला पण खूप उत्साह चढला. झालं आज्ञाला हेच हवे होते. समीर खेळण्यात इतका मग्न झाला होता की आज्ञाला पूर्णपणे विसरला होता, म्हणजे ती त्याचा मागे लागली आहे वैगरे त्याच्या डोक्यातून गेले होते. तो तिला आता फक्त एक प्रतिस्पर्धीच्या रुपात बघत होता. आधी दोन गोलच्या वेळेस आज्ञा समीरच्या थोडी दूर होती. पण आता , ती पण गेम मध्ये घुसली. तिचा आवडता खेळाडू (प्रतिस्पर्धी) , तिचा आवडता खेळ , आकाशातून पडणारा आवडता पाऊस आणखी काय हवे,एकदम परफेक्ट असे सगळे घडत होते. 

 

           खेळता खेळता आज्ञाने काही इशारा केला तसे हळू हळू बाकीचे मुलं गायब होऊ लागली. पण समीर खेळण्यात इतका तल्लीन झाला होता की त्याचं लक्ष फक्त बॉल वर होते. सगळेच गायब झाले होते. आता फक्त आज्ञा आणि समीर खेळत होते. 

 

        आज्ञा खेळात चांगलीच हुशार होती. ती शिताफीने समीरकडील बॉल घेऊन पळायची , समीरचा सुद्धा तिच्या कडून बॉल घेण्याचा प्रयत्न सुरू असायचा.दोघंही एकेमकांकडून बॉल घेत गोल करत होते. 

 

           पावसाची मधुर धून, त्यात बॉलचा टप टप आवाज, पावसानं ओलीचिंब भिजलेली ती दोघं, त्यात खेळून खेळून उत्साहाने सळसळणारे रक्त. आज्ञाकडे बॉल होता, तिच्याकडून बॉल घ्यायचा म्हणून समीर तिच्या पाठीमागून येत, बॉल ट्याप करत घेण्याचा प्रयत्न करू लागला, त्यामुळे आता त्याचा स्पर्श आज्ञाला व्हायला लागला, कधी हातांना, कधी कंबरेला, कधी पाठीला तर कधी मानेला, आज्ञाचे तर आता बॉल वरून लक्षच उडाले होते. खेळायच्या निमित्ताने का असेना, आज तो तिच्या इतक्या जवळ होता. तिच्या पाठीमागून पुढे आलेला तो, ती तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला बघत होती, त्याच्या केसांतून ओघळणारे पावसाचे पाणी, कपाळावरून गालांवर ओघळत, तर कधी ते त्याचा ओठांना स्पर्शून जाई, आणि जेव्हा ते त्याच्या ओठांना स्पर्शून जात तर आज्ञाच्या हृदयाची धडधड वाढत. ती तर त्याला स्वप्नवत बघत गुंग झाली होती. 

 

           आज्ञाचा खेळ आता मंदावला होता. तिच्या चित्तचोरने तिचं चित्त चोरले होते. तिच्याकडून आता गोल काही होत नव्हता. तिचा एक गोल म्हणजे दोघांचेही स्कोर सेम सेम होणार होते. 

              आज्ञा कडून गोल जात नव्हता, पण तरीही तिचा प्रयत्न सुरू होता. गोल करण्याची तिची सुरू असणारी धडपड बघून समीरच्या मनात काय आले माहित नाही. तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या कंबरेला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडले आणि तिला वरती उचलले. ती मात्र त्याच्या असे करण्याने पुरतीच बावरली होती. समीरने स्वतःहून तिला पकडले होते, जगताला नववे आश्चर्य, असे काही घडले होते. ती तर डोळे विस्फारून खाली त्याच्याकडे बघत होती. 

 

"गोल कर!" समीर तिला म्हणाला तेव्हा ती भानावर आली आणि तिने बास्केट मध्ये बॉल टाकला.  

 

 

"मी सुद्धा जिंकावं, म्हणून डॉक्टरांनी मला उचललं. मी जिंकावं त्यांना मनापासून वाटले? " तिच्या डोक्यात विचार डोकावला आणि ती मनोमन खूप खुश झाली. आधीच त्याच्या मजबूत हातांवर ती होती, त्यात हे गोड विचार, सगळंच कसे पहिल्यांदा घडत होते. अगदी समीरने स्वतःहून तिला उचलले होते, तिच्या ओठांवर हसू पसरले, ती थोडीशी लाजल्यासारखी सुद्धा वाटत होती. हसतच तिने खाली समीरकडे बघितले आणि तिचे ते गोड हसू, तिच्या डोळ्यांतील आनंद बघून समीर स्वतःलाच विसरला. तिचे ते मधाळ हसू बघून आपोआप तिला बघून त्याचे ओठ सुद्धा रुंदावले. तो हळूहळू तिला खाली उतरवत होता, त्यामुळे होणारा तिचा तो रेशमी स्पर्श आता तो सुद्धा अनुभवायला लागला होता. त्याने तिला खाली उतरवले होते, पण अजूनही त्याने तिला पकडून ठेवले होते. खाली उतरतांना तिला तिचा तोल जातोय असे वाटले आणि तिने सुद्धा त्याचा मानेजवळ, त्याचा टीशर्टला आपल्या मुठीत घट्ट आवळून ठेवले होते. समीर तिचा चेहरा न्याहाळत होता. त्याला तिच्या नजरेत आज काहीतरी वेगळं जाणवत होते, खूप निरागस असे काहीतरी, तिच्या डोळ्यांतील भाव खरे वाटत होते. इतके दिवस त्याने स्वतःला तिच्यापासून दूर ठेवले होते, पण आज कोणास ठाऊक कसा त्याचा तोल गेला. ती सुद्धा त्याचा नजरेत कैद झाली होती. त्याची नजर तिच्या हृदयाला घायाळ करत होती , तिच्या हृदयाच्या धडधडण्याची गती वाढली होती. तिच्या भावना तिला सांभाळता येत नव्हत्या. तिच्या बावऱ्या झालेल्या भावना आता तिच्या चेहऱ्यावर उमटू लागल्या होत्या. तिचे ओठ थरथरत होते, त्यात वरतून येणारे पावसाचे पाणी, तिच्या चेहऱ्यावर येत होते, तिची ती मोत्यासारखी कांती पावसांच्या थेंबाने आणखीच चमकत टवटवीत वाटत होती. चेहऱ्यावर ओघळणारे पाणी तिच्या ओठांना स्पर्श करत होते, ते टिपून घ्यावे असा हट्ट धरत होते, त्यामुळे तिचे ते गुलाबी ओठ आणखीच मधाळ दिसत होते. तिच्या ओल्या केसांच्या काही चुकार बटा तिच्या गालांना बिलगून बसल्या होत्या, त्यातलेच काही चार पाच केसं तिच्या ओठांचा ताबा घेऊ बघत होते. त्याला तिचे डोळे, तिचा चेहरा वाचायचा मोह झाला आणि आपसूकच त्याचा हात तिच्या चेहऱ्याजवळ गेला. त्याचा दोन बोटांनी तो तिच्या चेहऱ्यावर चीपकलेले तिचे केस बाजूला सारायचा प्रयत्न करत होता. हळूहळू त्याचे बोट तिच्या ओठांकडे येऊ लागले, तिथे चीपकलेले केस तो सारायचा प्रयत्न करत होता, पण ते ओले असल्यामुळे लवकर सरकत नव्हते. वारंवार त्याचा हाताचा मुलायम स्पर्श तिच्या ओठांजवळ होत होता. 

 

 

" डॉक्टर !" अस्पष्ट असा आवाज आज्ञाचा ओठातून बाहेर पडला आणि तिचे डोळे अलगद मिटल्या गेले, तिच्या भावना तिला कंट्रोल होत नव्हत्या. त्याच्या मानेजवळ तिचा हाताची मुठ्ठी घट्ट होत होती, तिच्या बोटांची नखं त्याचा मानेला रूतायला लागली होती. तिची रूतनारी नखं सुद्धा गोड वेदना देऊन जात होत्या. 

 

सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है 

प्यार में तेरे हद से गुज़र जाना है

इतना प्यार किसी पे पहली बार आया है

मोहब्बत बरसा देना तू सावन आया है

तेरे और मेरे मिलने का मौसम आया है

 

 

          थंड पावसात दोघांनाही एकमेकांचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटत होता. समीरने एकदा तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत तिच्या ओठांवर स्थिर केली आणि आता हळूहळू तो तिच्याजवळ झुकत होता. त्याचा श्वासांचा गरम स्पर्श तिला तिच्या मानेवर, गालांवर जाणवू लागला आणि तिने तिचा दुसरा हात त्याचा पाठीवर घट्ट रोवला. 

 

 

********

क्रमशः 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️