Jan 26, 2022
कथामालिका

Love ... Sky is not the limit 18

Read Later
Love ... Sky is not the limit 18 भाग 18         समीर आज्ञाच्या गाडीवर तिच्या मागे बसला होता , गाडी हवे सोबत गप्पा करत मंद वेगाने पुढे जात होती . वातावरण खूप मनमोहक झाले होते . समीर त्या वातावरणात हरवू लागला होता . तो डॉक्टर आहे हे सुद्धा विसरला होता . त्याला त्याचे आधीचे, कॉलेजचे दिवस आठवायला लागले होते . तो आणि त्याचे मित्र असेच सुट्टीच्या दिवशी , पावसाळी वातावरण असले की हमखास बाईकची सैर करायला जात असे . तसे तर त्याला बाईक चालवायला खूप आवडत होते , पण जेव्हा पण असा निसर्ग अनुभवायचा असायचा , तो असाच मित्राच्या मागच्या सीटवर बसायचा, जसा आज बसला होता . 


 एव्हाना आता पावसाला सुरुवात होऊ लागली . 


" मिस , पाऊस सुरू झाला आहे ." , समीर 


" काय ? ", आज्ञा 


" पाऊस येतोय ", समीर 


" काय म्हणालात डॉक्टर ? काही ऐकू येत नाही ", आज्ञा 


" मिस , पाऊस येतोय " , समीर थोडा पुढे सरकत तिच्या कानाजवळ जात म्हणाला . समीरचे असे फक्त जवळ आल्यानेच तिला शहारून आले , तरी अजून त्याचा स्पर्श तिला झाला नव्हता . 


" हा , मग काय होतंय ?", आज्ञा 


" भिजतोय आपण " , समीर 


" तेच तर करायचंय " , आज्ञा 


" काय ? तब्येत खराब होईल " , समीर 


" डोन्ट वरी ! मी एका डॉक्टरांना ओळखते , देतील ते आपल्याला औषध . तुम्ही एन्जॉय करा हो , लहान मुलासारखे काय घाबरता आहात ? " ,आज्ञा 


      ' मला माहिती या किती हट्टी आहेत , तरी मी का बोलतो , कळत नाही ' , समीर स्वतःशीच म्हणाला आणि परत थोडा मागे सरकला. 


       आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. आज्ञा आणि समीर भिजायला लागले होते . पुढे चहाची टपरी बघून आज्ञाने बाईक साईडला घेत पार्क केली .            आज्ञा पळतच टपरी जवळच्या एका झाडाच्या शेड खाली जाऊन उभी राहिली . 


" डॉक्टर ssss , या sss " , आज्ञाने आवाज दिला. समीर झाडाखाली तिच्याजवळ गेला. 


" मिस , इथे झाडाखाली उभे राहण्या पेक्षा तिकडे शेड मध्ये बेटर आहे " , समीर 


" हे जास्त रोमँटिक आहे ", आज्ञा 


        ते ऐकून समीर चूप बसला. शांतपणे तो आपल्या कपड्यांवरील पाणी झटकत इकडे तिकडे बघत उभा होता . " एक लडका भिगा भागासा.... 

  सोती रातो में जागासा ..... 


  एक लडका भिगा भागासा.... 

  सोती रातो में जागासा ..... 

  मिला मुझ हसिनासे ....

  कोई आगे ना पीछे ....

  फिर भी क्यू ये मुझसे दूर भागे हैं ... 


          आज्ञा समीरकडे एकटक बघत सिटी वाजवत गाणं म्हणत होती. समीर अजब नजरेने तिला बघत होता . 


       आ बैल मुझे मार वालाच किस्सा सुरू होता , स्वतःहून वाघिणीची सवारी केली होती , आता काय ऐकावेच लागणार होते . 


" डॉक्टर , एक मिनिट, आलेच चहा घेऊन " ,आज्ञा 


" व्हॉट? इट्स व्हेरी अनहायजेनिक आणि दुसरं म्हणजे मी चहा पीत नाही " ,समीर 


" अहो सांगितले ना , मी एका डॉक्टरांना ओळखते , हा म्हणजे ते दिल के डॉक्टर आहेत , पण अशा छोट्या छोट्या कुरबुरींवर पण देतीलच औषध , सो डोन्ट वरी डॉक , आलेच" , आज्ञा म्हणाली आणि चहा आणायला गेली . 


        समीर आपल्या हातांवर हात घासत आजूबाजूचे न्याहाळत होता .पाऊस पडत होता , लोकं आडोशाला थांबली होती . त्यात लग्न झालेले जोडपं होतं , त्यांच्यात काही कुरबुर सुरू असलेले जाणवत होते , तर काही प्रेमीयुगुल होते , ते एकमेकांत हरवले , लाजत होते . काही बायका त्यांचं आपलं घरातील गाऱ्हाणी , घरी जायला उशीर होतोय, कामं पडलीत , मुलं वाट बघत आहेत असे म्हणत पावसाला शिव्या घालणं सुरू होते . काही पुरुष मंडळी पावसाच्या थंड गारव्यात सिगरेटचा धूर उडवत बिनधास्त गप्पा करत होते . लहान मुलं पावसात जाऊ बघत होती , तर त्यांच्या आया त्यांचे हात ओढत त्यांना पकडून ठेवत होत्या , तर कुठे कोणी भोंगा पसरला होता . एकंदरीत प्रत्येकासाठी तो पाऊस वेगळा होता . कुणासाठी आवडता तर कोणासाठी नावडता , कोणासाठी सुखद , तर कुणाला वेदना देणारा. समीर प्रत्येकाचे चेहऱ्यावरील वरील भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता . आज त्याला स्वतःला पण तो खूप निवांत वाटत होता. तिकडे जबाबदारीने वेढलेला असायचा , सतत दुसऱ्यांच्या विचारात असायचा , पण इथे तो लोकांना आता वेगळ्या नजरेने बघत होता . त्यांच्या गमती जमती बघत होता . काही काही बघून तर त्याला हसायला सुद्धा येत होते .  


" ढन्टण्यान sss ! गरमा गरम चहा ! " , आज्ञाने त्याच्या पुढे चहाचा प्याला धरला .तिच्या आवाजाने त्याचं चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठे गायब झाले आणि तो तिच्याकडे बघत होता . 


" अहो , घ्या हो डॉक्टर , काही होणार नाही . या पावसात हा चहा , बघा अमृतासारखा वाटतो की नाही . चहा आणि पाऊस , सुपर रोमँटिक कॉम्बिनेशन आहे " , आज्ञा


       समीरने तिच्या हातातील ग्लास घेतला. 


" हे असे पकडायचे असते दोन्ही हातात " , ती दोन्ही हातांनी चहाचा ग्लास पकडत त्याला दाखवत होती . 

 " पावसामुळे गारठलेल्या हातांना ऊब मिळेल. नाही म्हणजे असं हातात हात घेतला तर जास्त उब मिळते, पण तुम्ही माझा हात हातात घेणार नाही , मला पण नाही आवडत जबरदस्ती करायला , तर या गरम चहाच्या ग्लासनेच भागवून घ्या " 


         समीरने तिने सांगितल्याप्रमाणे चहाचा ग्लास पकडला. तो पण तिने सांगितल्याप्रमाणे अनुभवत होता आणि तो हळूहळू एक एक चहाचा घुट पित होता . आज्ञा पण त्याच्याकडे बघतच चहा पीत होती , पिणं कमी आणि तिचे त्याला टापणेच जास्त सुरू होते . 


"ओह गॉड ! डॉक्टर , भिजल्यावर कसले dash dash dash दिसत आहेत तुम्ही , तुमच्यावरून जरा पण नजर हटवावी वाटत नाही. " , आज्ञा 


" तुमच्या मागच्याची पण नजर हटत नाहीये तुमच्या वरून " , समीर 


" तुम्ही त्याला माराल आता ? मूव्हीमध्ये दाखवतात तसे , तुमच्या हिरोईनला तो छेडतोय तर ? " , आज्ञा 


" नाही , मला माहिती तुम्ही यात चांगल्याच पारंगत आहात " , समीर 


" How sweet ! ते पण आहेच की ! तुम्ही मला किती ओळखता ना . तो इकडेच बघतोय काय ?" , आज्ञा 


" हो " , समीर 


             जसे समीर हो म्हणाला ,कोणाला काही कळायच्या आतच आज्ञा सरकन मागे वळली आणि तिच्या हातातला तो गरम उकळता चहा तिने त्या मुलाच्या चेहऱ्यावर फेकला. चेहरा भाजल्याने तो मुलगा चांगलाच कळवळला . त्याच्या डोळ्यात सुद्धा चहाचे काही थेंब उडाले होते , तो आरडाओरडा करत होता . आज्ञाने त्याच्या पोटात एक लाथ देऊन मारली , तसा तो खाली जमिनीवर पडला . ते बघून आजूबाजूची लोकं सुद्धा तिथे जमली. 


" कसं आहे , आज मी तुला जिवंत नव्हती सोडत , पण आजचा माझा दिवस खूप चांगला आहे , तो मला खराब करायचा नाही , पण परत असं काही वागायच्या आधी हा दिवस लक्षात ठेवायचा " , आज्ञा त्याला चेतावणी देत मागे फिरली. 


" तुम्ही जास्तच नाही मारले त्याला ? त्याचा डोळ्याला काहीही होऊ शकतं " , समीर 


" होऊ देत , तसेही अशी मुलं धर्तीवर ओझंच आहेत " , आज्ञा 


" थोड्या वेळे पूर्वी तुम्ही पण तेच करत होता , जे तो करत होता " , समीर 


" त्याच्या नजरेत वासना होती " , आज्ञा 


" आणि तुमच्या ?", समीर 


" माझ्या नजरेत ... Leave it ! तुम्हाला बघण्याचा माझा हक्क आहे " , आज्ञा


" आणि तो कोणी दिला ?", समीर 


" तुम्हीच " , आज्ञ


" कधी ?", समीर 


" आताच नाही का , मी तुम्हाला म्हणाले मी तुमची हिरोईन आहे " , आज्ञा 


" मी कधी हो म्हणालो ?", समीर 


" नाही पण नाही म्हणालेत ना , ओर हम पॉझिटिव बाते ही लेते है " , आज्ञा 


" जेव्हा ते दोघांच्या मर्जीने होते , त्याला प्रेम म्हणतात . एकतर्फी जे असते , ती वासनाच असते ", समीर थोडा तिच्या जवळ जात, तिच्या डोळ्यात आपली नजर रोखत म्हणाला . 


" शरीरावर वाईट नजर असणे म्हणजे वासना असते . डॉक्टर , मला तुमचं शरीरच मिळवायचं असते तर ते मी कधीच मिळवले असते , उगाच तुमच्या मागे पुढे केले नसते . माझ्या बोटांच्या एका इशाऱ्यावर तुम्ही माझ्या बेडवर असता. माझ्या प्रेमाला वासनेचे नाव देऊ नका . प्रेमात आणि युद्धात सगळं जायज असतं , कुछ कुछ होता है डॉक्टर , जल्द ही समझोगे " , आज्ञा आवेगाने समीर जवळ जात , त्याचा टीशर्टला पकडत त्याला स्वतःकडे झुकवत म्हणाली . 


" प्रेमाची पुढली पायरी से....", बोलता बोलता समीरने एक पॉझ घेतला . 

" तुमच्या पिढीसाठी physical relationship म्हणजेच प्रेम असते , एकदा काय शरीर मिळालं , त्यासोबत खेळून झालं की बस , तुमचं प्रेम संपुष्टात येतं . प्रेमाचा बाजार मांडून ठेवला आहे , प्रेमाची ती पवित्र भावना मोडीत काढलीय , हे असलं प्रेम बघून प्रेम नकोसे झाले आहे " , समीर थोडा रागातच बोलत होता. 


" डॉक्टर , बाकीच्यांचे मला माहिती नाही , आणि कोण काय करताय, त्याचाशी माझं काही घेणदेणं नाही . पण माझ्या मनाला आणि शरीराला जर कोणाचा स्पर्श होईल तर तो फक्त तुमचाच असेल , नाहीतर कोणाचा नाही . तसे तर कोणाच्या बापाची हिम्मत नाही आहे मला हात लावायची , पण तरी चुकूनही दुसऱ्या कोणाचा स्पर्श झालाच , तर मी तुम्हाला आपलं तोंड कधीच दाखवणार नाही, तुमच्या आयुष्यातून कायमची निघुन जाईल , हे आज्ञाचे प्रॉमिस आहे आणि मी आपले शब्द पाळते " , आज्ञाने त्याची कॉलर पकडत त्याला आपल्याकडे खेचले , आपल्या प्रत्येक शब्दांवर जोर देत ती बोलत होती. तिच्या बोलण्यात निर्धार दिसत होता , एक वेगळाच आत्मविश्वास होता . समीर सुद्धा ते ऐकून थोड्या वेळसाठी थक्क झाला होता . 


*******


क्रमशः 


  


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️