Love ... Sky is not the limit 17

समीर आज्ञा

भाग 17

              फायनली आज्ञाने समीर कडून तिची शर्त मनवून घेतली होती. ती घरी खूप आनंदात उड्या मारत होती. आज तर तिचे पोट सुद्धा भरले होते भूक लागत नव्हती. आपल्याच तालात तिचा गोंधळ सुरू होता. 

              इकडे समीर , आज्ञा आता काय करणार आहे याचा विचार करत बेडवर पडला होता . तो कसा काय तयार झाला याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. 

" बाकी सगळं ठीक आहे , पण मला मिस आज्ञाच्या डोळ्यात पाणी बघून वाईट का वाटत होते ?" , डोक्यात त्याचे विचार सुरू होते आणि अशातच रात्री कधीतरी तो निद्राधीन झाला. 

             उद्या दुपारी समीरला कुठल्या बहाण्याने आज्ञा सांगेल त्या पत्त्यावर पोहचवायचे , त्यात त्याला शॉर्ट्स घालायला पण कसे तयार करायचे , राज याचाच विचार करत झोपी गेला. 

******

(सकाळी पार्क मध्ये )

" Hey doctor , badly missing someone हा?", राज 

" मी , कोणाला आणि का मिस करणार?", समीर 

" चल झुठा ", राज एकदम अक्षय कुमार सारखी इरिटेटिंगवाली बत्तीसी दाखवत म्हणाला . 

" सकाळी सकाळी इरिटेट करू नको , जरा कुठे आज शांती मिळाली आहे ", समीर

" जय हो आज्ञादेवी की ", राज आपले दोन्ही हात जोडत म्हणाला. 

" कुठे आहे? आल्या काय त्या ?" , समीर आजूबाजूला बघत बोलत होता . 

" ही ही ही ", राज 

समीर त्याच्याकडे बघत होता. 

" Someone missing someone !", राज 

" परत ?", समीर

" मग हे काय चाललंय तुझं ? मघापासून बघतोय , एक्सरसाईज कमी आणि इकडे तिकडे , रस्त्यावर नजर तुझी आहे " , राज 

" असं काही नाही आहे " , समीर

" डॉक्टरच मरिज बनायला लागले तर कसं व्हायचं? " , राज 

" राज , फालतूपणा करू नकोस, एक्सरसाईजवर कॉन्सन्ट्रेट करू दे " , समीर , आणि तो रनिंग करायला लागला.  

" पण काय रे समीर आज देवसेना का नसेल आली ? काल तर उड्या मारत गेल्या होत्या. मला तर वाटले रात्रभर झोपल्या नसतील , अन् मध्यरात्रीच इथे आल्या असतील ", राज त्याच्या सोबत पळता पळता त्याला चिडवत होता

" Don't know ?" , समीर 

" आज का नसेल आली देवसेना ? आजपर्यंत कधीच मॉर्निंग वॉकला त्यांनी सुट्टी मारली नाही . एकदा आठवते तुला , त्यांना किती सर्दी होती , बहुतेक ताप पण होता , तरी आल्या होत्या . कुठे गायब झाल्या आज अचानक ? त्यांचा काय प्लॅन असेल ?", राज 

" ये तू फालतू घाबरवू नको " , समीर 

" हीहीही , तू घाबरतो त्यांना ?", राज 

" त्या मिसच्या डोक्याला घाबरतो , कधी काय त्यांच्या डोक्यात येईल आणि आपल्या आयुष्यात भूकंप, माहिती नाही ", समीर 

" आपल्या नाही , तुझ्या ", राज 

" Whatever ! ", समीर 

" हो , तुझ्या प्रेमाचे साईड इफेक्ट आम्हाला झेलावे लागतात " , राज

" तुझ्यातच आगाऊपणा करण्याचा कीडा आहे, नको तिथे आपलं डोकं लावत असतो " , समीर

" काहीही, मी काहीच करत नाही. ते जाऊ दे , आजचा प्लॅन काय?", राज

" आज संडे मिळाला आहे , जाम थकलोय , आज ताणून देईल मस्त ! ", समीर 

" घ्या , याला आजच थकायचं होते . इकडे हा , तिकडे ती देवसेना , दोघं मिळून माझं सँडविच करणार " , राज स्वतःशीच बोलत होता . 

" काय ?", समीर 

"काही नाही ", राज

दोघंही आपलं मॉर्निंग रूटीन पूर्ण करत होते . 

*******

" Sharp 2 o'clock " , आज्ञाने राजला मेसेज करून कुठे यायचं तो पत्ता आणि वेळ पाठवली. 

" Okay ! " , राजने रिप्लाय केला. 

*******

              समीर सोबत दिवस घालवण्याचा आज्ञाने प्लॅन केला होता. एक्साईटमेंटमुळे रात्रभर तिला झोप लागली नव्हती , पहाटे कधीतरी झोप लागली होती, त्यामुळे ती सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाऊ शकली नव्हती. पूर्ण दिवस समीर सोबत घालवायचा , फ्रेश राहायला हवे म्हणून ती सकाळी उशिरानेच उठली होती. 

" आज्ञा , किती पसारा करून ठेवला आहे .. रूम मध्ये पाय ठेवायला जागा नाही की बेडवर बसायला जागा नाही ", प्रिया 

" काय घालू काही कळत नाही आहे", आज्ञा कपाटात घुसून एक एक कपडा स्वतःला लावून बघत, कसे दिसते ते चेक करत फेकत होती . 

" तुला कधीपासून असे बायकी प्रश्न पडायला लागले ?" , प्रिया 

" प्रेम पुरुषावर करते आहे , तर असे बायकीच प्रश्न पडणार ना आणि फालतू बकवास करू नको , Let me concentrate ! ", आज्ञा 

" आज्ञा , तो हॉट पँट , सुपर हॉट दिसते तू त्यात , डॉक्टर फ्लॅटच होतील तुला बघून . मग बघ कसे दूर जातात ते " , प्रिया 

" असं म्हणते ! ", आज्ञा ते कपडे स्वतःला लावून आरशामध्ये बघत होती . 

" Yes , you are looking Super dash dash dash ! ", प्रिया 

" आ sss , नको ss , मला असे बघून तर ते आणखी दूर जातील. नको नको ", आज्ञाने हातातील ड्रेस बाजूला फेकला. 

" अगं का ? हीच तर ट्रेण्ड आहे आता. आजकाल मुलांना अशाच , एकदम मॉडर्न कपडे घालणाऱ्या मुली आवडतात ", प्रिया 

" मला फक्त गर्लफ्रेंड नाही बनायचं , मला डॉक्टरांची बायको बनायचंय , त्यादिवशी बघितले , त्यांना ती आजीबाई सारखी असणाऱ्या मुलीचा फोटो आवडला होता . नको बाबा , रिस्क नको आणि हे डॉक्टर समीर आहे ,स्पेशल आहेत , दुसऱ्या मुलांसारखे नाही की बॉडी , फिगर बघून ऍटरेक्ट होतील ", आज्ञा.

दोघींच्या गप्पा सुरू होत्या , आज्ञा आपल्या तयारी मध्ये लागले होती. 

*********

" समीर ssss , देवसेना ssss , पुढे ssss " , राज 

            राजने समीरला कसेबसे रेडी करत आज्ञाने दिलेल्या पत्त्यावर आणले होते. कार पुढे जात होतीच की समोर रस्त्यावर आडवी बाईक, त्यावर बसलेली आज्ञा , यांची वाट बघत होती. ती एवढी डॅशिंग दिसत होती की कोणाचीही सहज नजर तिच्याकडे वळेल , पण मॅडमची नजर मात्र एकाच व्यक्तीवर खिळली होती . राजने एका साइडला कार पार्क केली आणि दोघंही कार मधून बाहेर उतरले. 

          समीर पण काही कमी हँडसम दिसत नव्हता , राजने त्याला शॉर्ट्स घालायला तयार केले होतेच . त्याने व्हाइट टीशर्ट , शॉर्ट्स , स्पोर्ट शूज , रिस्ट वॉच , डोळ्यांवर काळा गॉगल , आज्ञा तर त्याला बघून तशीच क्लीन बोल्ड झाली होती. 

" She is looking so hot ! आज तुझं काही खरं नाही .आज नाही तुझी तपस्या भंग झाली तर नाव बदल ", राज 

" म्हणून तू मला झोपू दिले नाही , हे होते तर ते सरप्राइज , त्यात मी असा शॉर्ट्स मध्ये ? " , समीर 

" You are looking so hot baby ! देवसेनेची शर्त ! ", राज 

" Huh ! तुम्ही दोघंही पागल करून सोडाल मला ", समीर

" नवीन काय बोल रे , हे जुनं झालंय आता . प्लीज आजचा एकच दिवस , नंतर मी असे काहीच घोळ घालणार नाही आणि आता आला आहेसच तर जरा हा खडूस समीर बाजूला ठेव थोडा नॉर्मल वागून बघ , तुला पण बरं वाटेल ", राज 

" प्लॅन काय आहे ?", समीर 

" माहिती नाही " , राज 

" राज , तुला तर बघतोच ", समीर चिडत म्हणाला. 

" आज तिलाच बघ रे , नंतर दुसरं काही बघायची तुझी इच्छाच होणार नाही ", राज आपली बत्तीसी दाखवत म्हणाला. 

" Hey boys , Good morning !", आज्ञा समीरला बघून फ्लायिंग किस करत , त्या दोघांकडे येत बोलली .

" Miss , it's afternoon ! ", राज 

" हमारी तो सुबह डॉक्टर को देख कर ही होती है , Looking so Cool दिल के doctor ! दिन बन गया अपना तो ", आज्ञा 

" ठीक आहे मग , जातो आम्ही", राज 

" आम्ही नाही, फक्त तुम्ही डॉक्टर राज , बाय", आज्ञा 

" समीरला आज तुमच्या सुपूर्द करतो आहे, त्रास देऊ नका माझ्या मित्राला ", राज 

" Excuse me ! मी काय वस्तू आहे काय? " समीर डोळे वर करत म्हणाला. 

" आप तो हमारी जान हो ! अँड डोन्ट वरी डॉक्टर राज , मी असताना त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ", आज्ञा 

" यांचा लागेल , त्याचं काय ? ", समीर हळूच स्वतःशीच बोलला, राज ते ऐकून हसायला लागला. 

" Okay ! उशीर होतोय ", आज्ञा

" कुठे जात आहात ?", राज 

" स्वर्गात !", आज्ञा 

" व्हॉट ? " , समीर आणि राज एकत्र ओरडले. 

" अहो म्हणजे धरतीवरील स्वर्ग ! ", आज्ञा 

   ते ऐकून समीर , राज दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला.

राज दोघांना बाय करून निघून गेला.  

" मेरी मैना , आज तो तेरे नसिब खुल गये ! ", आपल्या बाईकला फ्लायिंग किस करत आज्ञाने तिची बाईक स्टार्ट केली .  

" नौटंकी ! ", समीरने डोळे फिरवले.

" हॉटी , तुम्हाला नौटंकी वाटेल, पण आज पहिल्यांदा कोणी मुलगा , तो पण माझा आवडता , माय लाईफ , माझ्या बाईकवर बसतोय. माझा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत आहे ", आज्ञा 

" बसा डॉक्टर ".आज्ञा

           समीर आज्ञाच्या मागे तिच्या बाईकवर बसला , तो दोन हात अंतर ठेऊनच बसला होता. आज्ञाला हसू आले आणि तिने तिची बाईक रस्त्याने पुढे घेतली. 

" मिस , रस्ता बघून ", समीर 

" मी काय करू , रस्ता आहेच तसा . मी थोडी पाडले खड्डे त्यात ", आज्ञा 

            आज्ञा रस्त्यावरचे सगळे खड्डे , स्पीडब्रेकर कव्हर करत गाडी चालवत होती. त्यामुळे समीर एक दोनदा तिच्यावर आदळला होता. 

" मी पण कोणाला सांगतोय , मुद्दाम केल्या जाणाऱ्या गोष्टी बोलून थोडी थांबणार आहेत ", समीर मनातच बोलत होता. 

" डॉक्टर , तुम्ही मला पकडून बसा , तुम्ही पडले वगैरे तर तुमचा मित्र मलाच रागवेल ", आज्ञा

" It's fine ! "समीर 

" किती घाबरता हो डॉक्टर , मी काय खाणार नाही आहे तुम्हाला म्हणजे तसा अजून हक्क तुम्ही मला दिला नाही आहे , आणि तुम्हाला तर माहितीच , मला जबरदस्ती करायला अजिबात आवडत नाही ", आज्ञा

     ते ऐकून समीरने डोक्यावर हात मारून घेतला. 

             आता ते गावाच्या बाहेर आले होते, रस्त्याने वर्दळ कमी होती. गाडी वळणे घेत वरती जात होती . आभाळ दाटून यायला लागले होते , थंड गार हवा अंगाला स्पर्शून जात होती. दुतर्फा हिरवी मोठमोठी झाडे , आजूबाजूला हिरवागार परिसर , खूप मनमोहक वातावरण झाले होते , समीरला नेहमीच आवडते होते तसे, तो मित्रांसोबत बाईकवर भटकायला जायचा अगदी तसेच. समीर आता हळूहळू त्या वातावरणात हरवू लागला होता . त्याला खूप मोकळं वाटत होते , डोक्यातील विचार कधीच मागे पडले होते , त्यात आता हवे सोबत उडणारे आज्ञाचे केसं त्याच्या चेहऱ्या सोबत खेळू लागले होते . त्या मऊशार केसांचा स्पर्श त्याला वेडावत होता. 

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा

हाय श्वासातही ऐकू ये मारवा

तार छेडी कुणी रोमरोमातुनी

गीत झंकारले आज माझ्या मनी

सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा

ऐकू ये मारवा 

*********

क्रमशः 

🎭 Series Post

View all