Love ... Sky is not the limit 16

Sameeradnya

भाग 16

            आज्ञाला रडतांना बघून समीरला वाईट तर वाटले होते , पण हेच तिच्यासाठी योग्य आहे असे त्याचे मत होते. काही दिवस कदाचित त्रास होईल पण नंतर ती विसरून जाईल असा त्याने विचार केला. पण कुठेतरी त्याचा डोक्यात राजचं बोलणं सुद्धा फिरत होते. 

समीर सोबत बोलून राज आज्ञा जवळ गेला..

" आज्ञा , तुम्ही ठीक आहे ?"... राज 

राजच्या आवाजाने ती भानावर आली , तिने दुसरीकडे बघत आपले डोळे पुसले आणि मग राज कडे बघितले .. 

" हो "... ती 

" डोळ्यात पाणी आहे तुमच्या ".... राज 

" काय करणार डॉक्टर , किती समजावले डोळ्यांना , तरी ऐकतच नाही माझं ... अब दिल क्या कसूर ...".... आज्ञा 

" घरी चालले ?".... राज

तिने होकारार्थी मान हलवली...

" मी पोहचवून देतो ".... राज 

" मी जाईल हो ".... आज्ञा बोलता बोलता तिचे लक्ष मागे उभा असणाऱ्या समीरकडे गेले...समीर या दोघांना बघत उभा होता.... आणि ती समीर जवळ आली. राज पण त्यांच्या जवळ आला.

" डॉक्टर राज , thank you , पण तुम्ही वाईट मानून घेऊ नका...पण ते काय आहे ना मी एक व्यक्ती सोडून कोणाच्याही मागे बसणार नाही ... माझ्या गाडीवर बसायचा हक्क फक्त त्या एका स्पेशल व्यक्तीचा आहे ...".... आज्ञा समीरच्या डोळ्यात डोळे बघत बोलत होती. 

" आणि डॉक्टर राज माझ्या डोळ्यांवर जाऊ नका... डोळ्यांच काय आहे , हृदयात दुःखले की ते वाहतात.. पर हम दिल के कमजोर नही हा डॉक्टर ... तसे तर आजपर्यंत कोणाची हिम्मत नव्हती झाली मला तोडायची I mean माझं मन तोडायची... पण डॉक्टरांची गोष्टच निराळी...त्यांना सगळे अधिकार आहे .... ".... आज्ञा 

          आतापर्यंत रडणारी आज्ञाचा आताचा हा जबरदस्त attitude बघून तर राज अवाक् झाला .... समीर सुद्धा तिच्याकडे बघत होता. 

" येह इश्क नही आसान , बस इतना समझ लिजिये मेरी जान

आग का दर्या हैं और डूब जाणा हैं ".... आज्ञा समीरकडे बघत तिच्या नेहमीच्या ठसक्यात म्हणाली .  

" डॉक्टर तुम्ही लग्नासाठी फक्त होकार दिला आहे , लग्न झालं नाहीये... आणि ते होणार नाही याची काळजी मी घेईलच.... So don't worry दिल के डॉक्टर ".... आज्ञाने समीरला एक डोळा मारला.... राजला हसू आले...तो आपली मान पलीकडे फिरवून हसत होता. समीरच्या तर डोक्यावर आट्या पडल्या... 

" By the way , मी बेट जिंकले आहे "..... आज्ञा 

          समीर एक भुवई वरती करत तिच्याकडे बघत होता... आणि राजला परत टेन्शन आले. 

" मिस , तुम्ही त्याला रेड रोज नाही दिले ".... राज 

" भरी मेहफिलमे आपको रुसवा कैसे करते जनाब , आपके साथ साथ आपके नामसे भी तो प्यार है हमे ..."... आज्ञा 

" मग , तुमची बेट पूर्ण नाही झाली ".... राज 

" मी रेड रोज त्यांच्या मेडल समोर ठेवलं आहे ...त्यांच्या कामात त्यांची आत्मा वसते , मला माहिती आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या कामाबद्दल मिळालेल्या ट्रॉफी समोरच रोज ठेवले आहे .....तुम्हाला बघायचं काय.... चला आतमध्ये...आणि डॉक्टर राज आता तुमची टर्न ... "...आज्ञा म्हणत ती घराकडे आतमध्ये जायला वळली. 

" मिस , तुमची शर्त मान्य आहे ".... राजला काही सुचलं नाही आणि तो पटकन बोलून गेला... 

" What ?".... समीर 

" हो.... प्लीज....प्लीज....".... राज समीरला विनवत बोलला. 

" Good decision Doctor Raj !"..... आज्ञा 

" काय शर्त आहे तुमची ?".... राज 

" राज, आपल्याला उशीर होत आहे ...".... समीर 

" हो निघुया , फक्त शर्त काय आहे ते ऐकून घेऊ"... राज

" What?? तुला शर्त काय माहिती नाही, आणि तरी तू मान्य केली ?"..... समीर रागाने राज कडे बघत होता. 

" तू काळजी का करतो, मी आहे ना तुझ्यासोबत ".... राज 

" ह्मम "....समीर आपल्याच विचारात 

" No doctor Raj .... फक्त दिल के डॉक्टर "..... आज्ञा

" No ".... समीर 

" Real gentleman never break their promise".... आज्ञा

" मी कधी केले promise ?".... समीर

" आताच तर ह्मम म्हणाले होते..."... आज्ञा 

" कुठे फसवले या राजने ".....समीर कसानुसा चेहरा करत आळीपाळीने कधी राज तर कधी आज्ञा कडे बघत होता...

" डॉक्टर , don't worry , लग्न नाही करणार आहे .... सिंपल गोष्ट आहे , आवडेल तुम्हाला कदाचित .... मी मेसेज करते काय आहे तर , भेटूया लवकरच ".... फ्लायिंग किस करत ती तिथून पळाली. 

            समीर राजला काही बोलणार तेवढयात त्याला फोन आला.... 

" तुला तर नंतर बघतो...".... फोनवर बोलत समीर कार आणायला निघून आला...

" वाचलो "..... राजने सुटकेचा श्वास सोडला. 

*******

          इकडे समीरने लग्नासाठी त्या मुलीला होकार दिला होता...त्यामुळे समीरच्या आईने महाराजांना त्या मुलीची सवित्सर माहिती आणि समीरची सुद्धा पत्रिका वगैरे पाठवून दिली. 

*******

            समीर आणि राज ची मीटिंग होती, काही आधुनिक उपकरणांविषयी ती मीटिंग होती. समीरला त्याचा हॉस्पिटल मध्ये बेस्ट सोयी उपलब्ध करून द्यायच्या होत्या त्यामुळे अधूनमधून त्याचा अशा मीटिंग सुरू असायचा. मीटिंग आटोपून दोघंही अनाथ आश्रम मध्ये गेले... तिथे काही फ्री चेकअप कॅम्प अरेंज करायचा होता.... ते सगळं डिस्कशन करायला ते तिथे गेले होते. 

              समीरच्या प्रत्येक कामात राज त्याला बरोबरीने मदत करायचा. राज जरी थोडा फनी स्वभावाचा असला तरी तो एक जबाबदार डॉक्टर आणि खूप चांगला व्यक्ती होता.समीरचे स्वप्न आता राजचे सुद्धा स्वप्न बनले होते. . मस्तीच्या वेळी मस्ती...पण कामाच्या वेळी तो आपले पूर्ण शंभर टक्के द्यायचा. समीरचा तो खूप जुना मित्र, समीरचा त्याचावर पूर्ण विश्वास होता , राज कधीच समीरचे वाईट चिंतनार नाही हे समीरला माहिती होते. आणि त्यांचं बाँडींग सुद्धा तसेच घट्ट होते, भांडतील, एकमेकांना त्रास देतील पण एकमेकांवर आपला जीव ओवाळून टाकतील...आणि हेच कारण होते की राज सायली वर प्रेम करतो हे समीरला सांगणे त्याला भीती वाटत होती... 

*********

              आज्ञा तिच्या फ्लॅट वर निघून आली. समीरने लग्नाला होकार दिल्यामुळे तिला थोडा त्रास झाला होता... पण नंतर त्याने तिची शर्त मानली म्हणून ती खूप खुश सुद्धा होती. थोड्या वेळाने तिने सायलीला फोन करून ती ठीक असल्याचे कळवले. आज्ञा अशी अचानक निघून आल्यामुळे सगळ्यांना काळजी वाटली असेल लक्षात घेत तिने सायलीला फोन केला होता. 

" मला त्या मुलीचे सगळे डिटेल्स हवे "... आज्ञाने राजला मेसेज केले. 

" कोण मुलगी ?".... राज मेसेज

" डॉक्टरनी लग्नासाठी जिला आज पसंत केली , ती".... आज्ञा 

" No ... ते त्याचं पर्सनल आहे " ... राज 

" Okay , मला कठीण नाही तिची माहिती मिळवणे ".... आज्ञा 

" काय करणार आहे तुम्ही ? तिला त्रास देणार?".. राज 

" नाही डॉक्टर राज , पण हे लग्न नाही ठरू देणार "... आज्ञा

" समीरला माहिती पडले तर तो कच्च खाईल मला ".... राज 

" नाही माहिती पडणार "... आज्ञा

" ओके , बघतो ....".... राज

" Good ... बरं उद्या डॉक्टरांना लंच नंतर मी अड्रेस देते तिथे पाठवा ".... आज्ञा

" त्यालाच सांगा ".... राज

" नको , रात्रभर ते न येण्याचे वेगवेगळे बहाणे शोधतील, तुम्हीच पाठवा किंवा पोहचवून द्या".... आज्ञा

" Okay".... राज 

" आणि हो शॉर्ट्स मध्ये, नो फॉर्मल ".... आज्ञा

" काय प्लॅन आहे ".... राज

" घाबरु नका हो , काही करणार नाही डॉक्टरांना.... It's surprise".... आज्ञा 

" Hope , चांगल सरप्राइज असेल... ".... राज

" येस ".... आज्ञा.

*******

क्रमशः 

🎭 Series Post

View all