Login

Love ... Sky is not the limit 15

Sameeradnya

भाग 15

" गुणांची खाण आहे आपण .... बहुत सुप्त गुण है अपूनमे... टाइम आनेपर दिखायेंगे ...".... आज्ञा 

" हे खरं आहे ... मॅडम डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवतात.... त्या दिवशी तुझ्या lips पर्यंत पोहचल्या होत्या ..... थोडक्यांत वाचला होता, नाहीतर infected झालाच होता तू ".... राजने परत समीरला चिडवले. 

" तू बाहेर गेला होता ना? .... हेच बघत होता का ?".... समीर 

" ओ पहारा देत होतो जरा तुमच्यासाठीच.... तुमचं काय.... कुठंही सुरू होता.... त्या दिवशी मॉर्निंग वॉकच्या वेळी बघितले होते मी पार्क मध्ये....इथे घरात इतके लोक होते, कोणीही भरकन आले असते म्हणजे......?.... भलाई का तो जमाना नही रहा....".... राज 

" असू दे .... जास्ती उडू नको.....by the way thanks "..... समीर 

" अरे , समीर ... अरे हे मुलींचे काही फोटो आहेत बघ आवडली काय कुठली....?".... आईच्या हातात काही फोटो होते.... झालं ते ऐकून परत आज्ञाचे टेन्शन वाढले .... 

" बघू बघू काकू....".....आज्ञा 

" घ्या बघा .... सांगा कुठली छान आहे?... आपल्या समीरला शोभेल?"..... आई 

       सायली आणि आज्ञा ते फोटो बघण्यात बिझी झाल्या.... 

" आई , ही छान आहे .... ,"....सायलीने एक फोटो पुढे केला... .

" हिचं नाव कसं आहे ... इंदुमती... Old fashion.... ".... आज्ञा

" अगं , तिच्या आजीच होते म्हणे नाव .... ".... आई 

" हो असेल... पण ते कसं वाटते .. समीर इंदुमती....?? .... असं वाटतेय इंदुमती महाराणी.. समीर दास.... इयु.... Rejected rejected ".... आज्ञा..

ते ऐकून सायली , राजला हसू आले.... 

" हो हो ... दादा कसा cool आहे ... तसं पाहिजे काही .. ही कॅन्सल ".... सायली

" हुश्श .....".... आज्ञा

" ही... ही बघ... ही सुंदर पण आहे आणि नाव पण ट्रेण्डी एकदम.... शनाया "..... सायली..

" हो .. ही छान आहे .... "... आई 

" शनाया..? Oh my God ... शनाया म्हणजे शनाया वर गुरुनाथ फ्री .... मग माझ्या बायकोचा नवरा पर्व टू सुरू होईल ... बिचारे डॉक्टर. ..".... आज्ञा 

" हो हो बाई , ती शनाया नकोच बाप्पा.... खरं आहे काय भरोसा नाही या नावाचा, मेल्या त्या गुरुनाथ ने किती त्रास दिला त्या राधिकाला, माझ्या समीरच्या नशिबी नको हे सगळं... झेपणार नाही पोराला ".... आजी 

समीरने डोक्यावर हात मारला...

" ही ही ही ही ..... ही पण कॅन्सल".... सायली

" ही बघा, ही छान आहे .... नाव पण गोड आहे , प्रीती..... ".... आई 

" हो ग आई , सुंदर आहे .. गोरी आहे.... दादाला शोभेल अगदी ".... सायली

" बघू बघू ....."... आज्ञाने हातात फोटो घेतला... 

" हो , सुंदर आहे ....".... आज्ञा 

तिचं ऐकून राज आणि समीर डोळे फाडून तिच्याकडे बघत होते ..

" सौतन .... आवडली .... Congrats buddy ... प्रपोज वाला मॅटर कॅन्सल".... राज 

"पण काकू .... ही किती टिंगी आहे ..... अमिताभ जया भादुरीची जोडी दिसेल..... मग शर्टाच तुटलेले बटन कसं लावणार ती?... आज्ञा

" आज्ञाला किस म्हणायचं आहे, बटन तो बहाणा है! ...प्रत्येक वेळ टेबल घ्यावे लागेल उभ राहायला"..... राज हसत समीर जवळ म्हणाला. 

 समीरने खडूस लूक दिले. 

" मग अमिताभ रेखाकडे जाईल ! ".... आज्ञा मस्करी करत म्हणाली 

" रेखा.... वाह! .....काय सुंदर होती...अजूनही तशीच ....".... आजोबा मध्येच कलमडले

" ती कॅन्सल करा.... रेखाची तर मी तंगडी मोडून ठेवेल....लग्नापासून घुसलिये माझ्या संसारात.".... आजी चिडल्या.

ते ऐकून सायली, राज ,आई ला हसू आवरेना. 

आज्ञा पण गालातल्या गालात हसत होती... झाली ती पण कॅन्सल.. 

" ही , छान आहे.... चेहऱ्यावरूनच सोज्वळ दिसतेय....".... आई 

" नाही हो.... डॉक्टरांना शोभत नाही.... डॉक्टरांचा रुबाब बघा..... ही बघा.... अगदी काकूबाई दिसतेय.... मॉडर्न नाही वाटत.....".... आज्ञा 

" आई , मला मुलगी अजिबात मॉडर्न नको .... सिंपल हवी ..... तू म्हणतेय सोज्वळ वाटतेय तर पुढे जायला काही हरकत नाही....".... समीर 

" खरंच ?".... आई

" हो ..... तसेही मला दिसण्याचे काही नाही.... जी घरी सगळ्यांना आवडेल आणि माझ्या घराला सांभाळून घेईल , अशीच हवी "..... समीर

      समीरचा होकार ऐकून आई, आजी , सायली सगळे खुश झाले.... 

        समीरचे शब्द न शब्द आज्ञाला टोचत होते .... बिचाऱ्या आज्ञाचा हृदयावर कोणी हातोडा मारला असे तिला जाणवले. 

" आ बैल मुझे मार ....गेला तू आता ...".... राजने डोक्यावर हात मारला... 

" कधी ना कधी लग्न करायचं आहे.... आता केले तर कमीत कमी यांचा पिच्छा सुटेल....".... समीर 

" तू खूप चुकीचं करतोय....".... राज

" योग्य आहे ...."... समीर  

" आई , थोड्या वेळाने आम्हाला विजिटला जायचं आहे ..... मी रूम मध्ये आहो ....".... बोलत समीर त्याचा रूम मध्ये निघून आला.... राजने एकदा आज्ञावर नजर टाकली.... तिचा उतरलेला चेहरा बघून त्याला सुद्धा खूप वाईट वाटले.... समीरच्या पाठोपाठ तो सुद्धा वरती रूम मध्ये निघून आला.... 

" का हट्टीपणा करतोय तू...? तू इतका रुड नव्हता कधी ? "..... राज 

" हट्टीपणा मी नाही , त्या मिस करत आहेत.... जे पॉसिबल नाहीये ते उगाच का म्हणून करायचं? ".... समीर 

" तुझं तसही कोणावर प्रेम नाही आहे .... आज्ञाला एक चान्स द्यायला काय हरकत होते? ".... राज 

" त्याने काय होणार होते? माझा निर्णय बदलला नसता ".... समीर 

" नको रे तिचं आयुष्य खराब करू....खरंच प्रेम करते तुझ्यावर ".... राज

" प्रेम नाही , अट्ट्रॅक्शन आहे ते .... खराब नाही तिचं आयुष्य सावरायलाच हा निर्णय घेतला मी.... जितक्या लवकर तिला कळले we are not made for each other ... तेवढ तिच्या फ्युचर साठी चांगलं आहे.... बघितले न सायली काय सांगत होती.... हुशार आहे खूप ... पण कॉलेज मध्ये टिकत नाही .... सतत इकडे हॉस्पिटलकडे असते .... माझ्या मागे असते.... अभ्यासाचं नुकसान होते आहे ना .... आणि त्यांचं हे वय अभ्यासावर फोकस करण्याचे आहे.... एकदा वेळ निघून गेली की काही हाती लागणार नाही .... आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काय लग्न करायचं वय नाही त्यांचं, आपलं भविष्य घडवायचे आहे ....".... समीर 

" तुझं म्हणणं ठीक आहे , तसे तू तिला समजावून सांगायचे होते ना ....?".... राज

" बोललेले समजते त्यांना ?".... समीर 

" हो, हे पण खरं आहे..... बातो से माननेवाले भूत नाही हे "..... राज

" ह्मम ".... समीर 

" पण तरीही माझं sixth sense सांगते ... ती काय मागे हटणारी नाही , तेरे खुशी के लिये अपना प्यार कुर्बान करणारी वैगरे.... तू वाघिणीच्या जबड्यात हात टाकला आहे.... तयार रहा "... राज परत सुरू झाला.

दोघांच्या गप्पा सुरू होत्या.... 

" काय , आज तुमची डान्स प्रॅक्टिस नाहीये काय?".... आई 

" आहे , आम्ही आता घरीच करायची ठरवली आहे.... म्हणजे उगाच जास्त वेळ कॉलेज थांबायला नको ".... सायली

" हे बर केले .... म्हणजे आम्हाला पण काळजी नाही .....पण मला आश्चर्य वाटते एकही मुलीसारखं गुण नसलेली आज्ञा नाच करते ?.".... आजी 

" अगं आजी , खूप सुपर डान्स करते ती .... कितीतरी वेगवेगळे प्रकार येतात तिला .... मनावर घेतले ना तिने तर अव्वल दर्जाची डान्सर होऊ शकते ती...".... सायली 

आजी , आई, सायली बोलत होत्या पण आज्ञाचं मन मात्र लागत नव्हते.....

" हो का , विश्वास नाही बसत ...".... आई 

" आज्ञा ... एक डान्स कर ना ... आजी आईला बघायचं"..... सायली

" आता ?".... आज्ञा 

" हो , कर ना .. तसे पण आज मस्त दिवस आहे.... दादा लग्नासाठी तयार झाला ... प्लीज कर ना .... Happiness celebrate करूया....".... सायली 

" हो कर आज्ञा.... तेवढच आम्हाला कळेल तुला काय येतं ते ".... आजी 

" बरं.... "..... आज्ञा , आज्ञाच मन तर नव्हते पण सगळे आनंदात बघून तिला त्यांचा उत्साह कमी करावासा वाटला नाही आणि म्हणून ती तयार झाली.... 

" आज्ञा prop dance ".... सायली 

" बरं , कुठलं prop घेऊ?"..... आज्ञा 

        सायलिने इकडे तिकडे बघितले.... " गुलाबचं फुल , तसेही आज घरात फुलं खूप आहेत .. आणि हो हीपहॉप स्टाईल"... सायली.

" ठीक आहे, play music "..... आज्ञाने हातात एक रेड रोज घेतले आणि पोझिशन घेतली...सायली गाणं लावले.... 

" वाह काय नशीब माझं .... डॉक्टरांसाठी राखून ठेवलेले गाणे.... आजच दुख्खावर मीठ चोळनार..."..... आज्ञा मनोमन विचार करत.... आज्ञाने त्यावर बिट्स पकडले.... शिताफीने फुलाला सांभाळत ती डान्स करत होती . 

देखा तुमको जबसे, बस देखा तुमको यारा

तुमसे कोई अच्छा है, ना तुमसे कोई प्यारा

यूँ नज़रें ना फेरो तुम, मेरे हो मेरे तुम

कह दो ना, कह दो ना

यू आर माय सोनिया

देखा तुमको जबसे, बस देखा तुमको यारा

तुमसे कोई अच्छा है ना, तुमसे कोई प्यारा

यूँ नज़रें ना फेरो तुम, मेरे हो मेरे तुम

कह दिया, कह दिया

यू आर माय सोनिया

          आजीला तर त्या स्टेप्स काय समजत नव्हत्या ....पण आई आणि सायली मंत्रमुग्ध होत डान्स बघत होत्या .... बाहेर जायचं म्हणून समीर आणि राज रूमच्या बाहेर आले ... तर त्यांना आज्ञा डान्स करतांना दिसली...

" Wow ..amazing .....".... राज समीरच्या कानात बोलला आणि खाली येत होता ....समीर पण तिचा डांस बघत राजच्या पाठी खाली येत होता. 

हे पागल बनाया है तेरी अदाओं ने

मुझको तो है तेरा नशा

मैंने भी पलकों में तुमको छुपाया है

तू मेरे ख्वाबों में बसा

बेताबी कहती मेरी, आजा बाहों मे भर लूँ

जीना है तेरी हो के, मिल के ये वादा कर लूँ

दोनो ने कसमें ली हैं, प्यार कभी ना कम होगा

कह दो ना, कह दो ना...

              डान्स मध्ये डिस्टर्ब नको म्हणून मधातून न जाता राज आणि समीर तिथेच उभे होते .. आज्ञा अगदी तिथेच डान्स करत होती ..

आज्ञाचे नाचता नाचता पायाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या समीरकडे लक्ष गेले आणि तिला त्याने लग्नासाठी दिलेला होकार आठवला.... तिचं डान्स वरचे कन्संट्रेशन हलले आणि तिचा तोल गेला.....ती जोरदार खाली पडणार की राजने तिला सावरायला हात पुढे केलाच होता की त्या आधीच समीरने तिला सावरले होते. ती त्याच्या मिठीत होती..... 

" आज्ञा , बाळा .... ठीक आहेस ना? लागलं नाही ना कुठे ?".... आई जागेवरून उठत काळजीने बोलली... त्यांच्या पाठोपाठ सायली आणि आजी सुद्धा विचारपूस करत होत्या . पण आज्ञाला काहीच ऐकू जात नव्हते.... तिच्या डोक्यात फक्त समीरचे शब्द फिरत होते .. त्याने लग्नासाठी दिलेल्या होकराचे..हृदय तर कधीच रडायला लागले होते तिचे ..

        आज्ञा समीरच्या इतकी जवळ होती की तिच्या वाढलेल्या हार्ट बिट त्याला स्पष्टपणे जाणवत होत्या. तिच्या वाढलेल्या हार्ट बिट्स मुळे त्याला सुद्धा थोडं restless झाल्यासारखे वाटले...

" Are you okay ?".... आज्ञा काही बोलत नाहीये बघून समीर त्याच्या मिठीत असणाऱ्या आज्ञाला बोलला .... त्याचा या शब्दाने तिच्या डोळ्यात असावांनी गर्दी करायला सुरुवात केली...तिने डोळे वर करत त्याच्या नजरेत बघितले ...... त्याला बघितले आणि तिच्या डोळ्यातील एक अश्रू तिच्या गालांवर ओघळला.... आता तिला तिथे थांबणे खूप जड झाले होते ..... 

" सायली , मला खूप महत्वाचं काम आहे".... कशीबशी बोलत ती समीरच्या मिठीतुन दूर झाली आणि बाजूला सोफ्यावर पडलेली आपली सॅक उचलली आणि बाहेर जायला लागली. दारात पोहचली की तिला तिच्या हातात असलेले गुलाबाच्या फुलाची आठवण झाली.... ती परत मागे वळली... बाजूला साईड टेबल वर असलेल्या समीरच्या ट्रॉफी जवळ तिने ते फुल ठेवले आणि काहीच न बोलता तिथून पळाली.. 

" आज्ञाला काय झालं अचानक? लागला तर नाही ना रे समीर तिला ?".... आई 

" नाही ....".... समीर , मला फोन करायचा म्हणत तो बाहेर अंगणात आला....

" अगं आई काळजी नको करू ... येतात तिला असेच मध्येच कुठल्या कामाची आठवण.... ".... सायली 

" Hmmm , फोन करून विचारून घेशील तिला "... आई

" हो...."... सायली 

         आज्ञाच्या डोळ्यातील अश्रू बघून समीरला कळले नव्हते त्याला काय होतंय ... ती ठीक आहे की नाही बघायला म्हणून समीर फोनचा बहाणा करत बाहेर आला होता .... आज्ञा रडतच बाईक वर जाऊन बसली , तिने डोक्यावर हेल्मेट चढवले.... गाडीची किल्ली मात्र तीच्याने नीट फिरवल्या सुद्धा जाईना .... दोन तीनदा तिने प्रयत्न केला , गाडी स्टार्ट होत नव्हती.... तिने गाडी वर जोरदार मुठी मारली... हेल्मेट काढून handle ला लटकवले.... आणि आपल्या एका हाताने डोळ्यातील पाणी पुसत होती..... ती वारंवार डोळे पुसत होती पण डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नव्हते..... 

" नाही बघावल्या जात आहे ना .... ? मग का देतो आहे तिला त्रास?"...राज समीरच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. 

" Raj , give me a favor ?"..... समीर 

" ह्मम , बोल "..... राज 

" ती बाईक चालवण्याचा हालत मध्ये नाही आहे.... तिला तिच्या घरी पोहचवून दे ".... समीर 

" तू जा, तुझी गरज आहे तिला "..... राज 

" नाही .... please ..... ".... समीर

" Anyways .... She won the bet .... सगळ्यांसमोर तिने तुला रेड रोज दिला आहे..... तुझ्या मिठीत असताना तिचे डोळे तुला love you बोलले आहेत, तुझ्या फॅमिली समोर ..... आणि सगळ्यांसमोर तुझा respect सुद्धा सांभाळला आहे.... लग्नासाठी तू होकार तर दिला आहेसच ... तिची छोटीशी शर्त, काय इच्छा होती , शेवटची समजून पूर्ण करून दे.... "... बोलत राज आज्ञा जवळ निघून आला..... 

********