Love ... Sky is not the limit 14

Sameer aadnya

भाग १४ 

" मी आता डॉक्टरला प्रपोज करणार , सगळ्यांसमोर .... मला हल्क्यात घेऊ नका... आताचं ट्रेलर बघितले आहेच की तुम्ही ..... नको असेल तर माझी एक शर्त आहे "... आज्ञाने मेसेज केला....

" आताच म्हणे प्यार में सौदा नही..... आणि आताच डील करायला लागली ".... समीर राज जवळ 

" म्हणजे तू मान्य करतोस तर , प्रेम आहे ते ".... राज 

" I don't care ....."... समीरने मेसेज केला...

" बघा मग , म्हणाल आधी सांगितले नाही ...."... आज्ञाने समीरला मेसेज केला..

" , Okay डॉक्टर राज , मी तर आता प्रपोज करणार.... तुम्ही पण तयार रहा , माझ्या नंतर तुमचा टर्न "..... आज्ञा

ते बघून आता राजला टेन्शन आले होते ... 

          आईने समीरच्या आवडीचा शीरा तर आज्ञाला आवडतात म्हणून कांदा - मिरची भजी बनवली होती .. खेळीमेळीच्या वातावरणात दुपारचा सगळ्यांचा नाश्ता सुरू होता ... पण राज मात्र खूप टेन्शन मध्ये आला होता , हिने जर प्रपोज केले तर मी बरबाद होणार ...

" काय ग , तुझे नसतात काय सायली सारखे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे ?".... आई 

" ते या अभ्यासू लोकांसाठी असतात....... "... आज्ञा 

" काही नाही , यांचे पण असतात एक्स्ट्रा क्लासेस.... ही अटेंड करत नाही "... सायली 

" रोजच्या लेक्चर मध्येच तर किती बोर करतात ते .... परत एक्स्ट्रा बोर व्हायला जाऊ....? ".... आज्ञा 

" आणि आपल्याला या मिस बोर करतात , त्याचं काय??.. तेही आपल्याच घरात येऊन ! "..... समीर बीचारासा चेहरा बनवत राज जवळ म्हणाला.  

" किती लकी आहेस तू .... एवढी एंटरटेनिंग देवसेना आहे , अख्खं घर एकत्र हसतय बघ ! काका गेल्या नंतर धर्माधिकारी हाऊस किती शांत झालं होतं , गेल्या महिन्याभऱ्या पासून घरात चैतन्य जाणवत आहे. मनसोक्त खळखळून हसत आहेत बघ सगळे. हेच तर हवे होते ना तुला? त्यांच्या बद्दलचा असलेला तुझा राग , गैरसमज जरा बाजूला ठेऊन बघायचा प्रयत्न कर आज्ञाला ... अख्ख्या घराची मैत्रीण झालिये बघ ती ....! "... राज 

           राजचे बोलणं समीरच्या मनाला स्पर्शून गेले.... राज बोलतोय ते खरंच तर आहे .... बाबा गेल्यापासून सगळेच असे खळखळून हसायला विसरले होते , प्रत्येकजण आपले कर्तव्य करत होते , कोणीच आपल्या कर्तव्यात चुकला नव्हता .पण बाबा गेल्याने प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती . त्यामुळे घरात कुठेतरी एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती. घरामध्ये हा नवीन आलेला वेगळेपणा तर समीरला सुद्धा जाणवत होता . पण आज्ञामुळे हे होते आहे ,हे त्याला accept केल्या जात नव्हते किंवा त्याला ॲक्सेप्ट करायचे नव्हते . तिच्याबद्दल असलेला त्याचा राग त्याला हे सगळं बघू देत नव्हते, जे आता राजने त्याला जाणवून दिले होते . तो पण आता आज्ञाची आणि घरातील मंडळींची सुरू असलेली मस्ती वेगळ्या नजरेने बघायचा प्रयत्न करत होता. 

" आज्ञा सारखं एखादं कार्टून लागतंच घरात , त्यामुळे घरात जिवंतपणा टिकून राहतो "..... राज 

" ह्मम , आणि आयुष्यात सुनामी आणतं ".... समीर 

" Oh God , याला आज्ञाच्या चांगल्या गोष्टी सांगतोय , तर हा सुद्धा हट्टी , इतकं पटवतोय पण अजिबात पटत नाही आहे . हे देवा, आता काय करू, आता जर या मॅडमने याला प्रपोज केले तर..... जीव द्यायला कुठे जागा शोधू "..... राज मनातल्या मनात बोलत समीरला आज्ञाची शर्त मानायला कसे पटवायचे , विचार करत होता. 

" एक्स्ट्रा बोर व्हायचं म्हणे, अगं थोडं तर थांबत जा कॉलेज मध्ये ....अगदी वाऱ्यासारखी येते आणि पळते .....".... सायली 

" कॉलेजला जायला मुलांना किती आवडते.... हिचं आपलं वेगळंच असते.... ".... आई 

" अहो काकू माझा काय तिकडे बॉयफ्रेंड नाही .... काय करू तिथे थांबून ? ".... आज्ञा 

आईने डोक्यावर हात मारला.... 

" म्हणजे ?... म्हणायचं काय तुला... आम्ही काय बॉयफ्रेंडसाठी कॉलेजला जातो ? ".... सायली

" तू अभ्यास करायला जाते ग , माझं शोणुल मोनुल... "..... आज्ञा तिचे गाल ओढत बोलली.... 

" मी पण तेच सांगत होते. .. कॉलेज मध्ये दोन टाईपचे लोकं जातात , एक अभ्यास करणारे.... दुसरे lovers ! तर या दोन पैकी माझं कोणीच नाही, काहीच नाही तिथे "..... आज्ञा 

" अरे देवा.... हिचं काय करावं ? बेधडक सांगते पण आहे "..... आजी 

" आजी, आहो आता जे खरं आहे ते खरं आहे .... लपवायचे काय त्यात ? आणि आपलं जीवन खुली किताब हैं, साधं , सरळ आणि सोप्प .... पण पुस्तकी किड्यांना वाचता येत नाही , हीच मोठी शोकांतिका आहे माझ्या आयुष्याची "..... आज्ञा रडकी ॲक्टिंग करत म्हणाली. 

" पुस्तकी किडा .... तुला म्हणतेय "....राज हळूच समीर ला म्हणाला. राजला हसू येत होते. 

" ह्मम , साधं , सोप्प , सरळ आहे म्हणे.... कव्हर पेजच किती भयावह आहे .... ".... समीर 

" Don't judge book by it's cover !! Fancy covers attract eyes only, not the soul...आणि मग म्हणूनच धोका सुद्धा मिळायचे चान्सेस जास्त असतात..... दिखावे पे मत जाओ , अपनी अकल लढाओ " ....... आज्ञा ...आज्ञाने समीर आणि राजचे बोलणे ऐकले होते.... जरी आज्ञा बोलत इकडे होती तरी तिचा एक कान, एक डोळा समिरकडेच होता....

"मध्येच काय बोलतेस , सगळं डोक्यावरून जाते ..."... सायली 

" मिस , काय उच्च विचार आहे तुमचे. ... वाह वाह !! अगदी खरं बोललात, पण लोकांना काय लवकर कळत नाही ..... काय समीर बरोबर ना?".... राज ( राज ने indirectly कॉमेंट सायलीला सुद्धा मारून फेकलेला होता ) 

       समीरने खुन्नस च्या नजरेने राजकडे बघितले तर सायली ने सुद्धा डोळे फिरवले .  

" काय ग , मग आवडते काय तुला कोणी ? म्हणजे तुझा कोणी बॉयफ्रेंड ?? ".....आजी 

" बॉयफ्रेंड तर नाही , पण कोणीतरी खूप आवडतं .... खरंच सांगू काय?"..... आज्ञाचे डोळ्यात चांदण्या चमकत होत्या .... 

            आज्ञा बोलली तशी राजच्या हृदयात धडकी भरली.... त्याने आज्ञाला मेसेज केला.... " नको .... प्लीज " 

" डॉक्टरांना शर्त साठी रेडी करा "... आज्ञाचा रिप्लाय मेसेज राजला आला. 

" Wait ".... राजचा मेसेज 

" Okay ".... आज्ञा 

" उच्च विचार ना..... घे आता....".... समीर 

" समीर , अरे प्लिज तिची कोणती शर्त आहे ती मान ना यार .... ".... राज 

" का? मी का मानायची? .... मी कोणाला नाही घाबरत ".... समीर 

" बघ ना घर किती छान मस्त वाटतेय.... उगाच त्या सगळ्यांसमोर काही बोलतील.... गैरसमज होईल सगळ्यांना ... तेवढी पण वाईट नाही देवसेना "..... राज 

" Raj , No blackmailing ".... समीर 

" कधीतरी ऐक रे मित्राचं.... ती तर प्रपोज करेल .. पण मग मी काय करू..."..... राज ( रडकी अक्टिंग करत) 

" कोणी सांगितली होती माती खायला ? ".... समीर 

" तुझ्यासाठी खाल्ली होती "..... राज 

" मग कर प्रपोज ".... समीर

" कोणाला ? तुझ्याशिवाय कोणीच नाही ..... , तुला प्रपोज केले तर ती मिस कच्च खाईल ".... राज 

" पागल झाला तू ".... समीर

" मग , तयार हो ना ....".... राज 

राजचे समीरला शर्त साठी तयार करणे सुरू होते... अन् समीरचे नकार देणे सुरू होते.... 

इकडे आज्ञा, आजी, सायलीच्या गप्पा सुरू होत्या ..

" कोण आवडते सांग??"... आजी 

" खरंच ??"....आज्ञा समीरकडे बघत म्हणाली , राज मात्र नो नो असा इशारा करत होता .. 

" तुम्ही.....I love you आजी ".... आज्ञा

आणि राजने सुटकेचा श्वास घेतला ... 

" मी होय... मला वाटलं कोणी मुलगा".... आजी 

" आजी , तो तयार झाला ना, तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल हा , आफ्टर ऑल तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड आहात आता .. ".... आज्ञा 

" आजी , कोण नाही हीचं... एक टवाळकं फ्रेंड सर्कल आहे बस.. तशी आज्ञा खूप हुशार आहे . थोडासा अभ्यास केला ना तिने तर कॉलेज टॉप करू शकते...पण मॅडम मनावर घेत नाही ".... सायली

" ये बाई , माझी बेइज्जती नको करू....".... आज्ञा

" बेइज्जती?? अगं मी चांगलंच तर सांगतेय "..... सायली

" ते हुशार अँड ऑल...."... आज्ञा 

" खरंच तू हुशार आहे , त्या दिवशी बघितले होते मी तुला.. तुमच्या प्रोफेसरला सुद्धा नाही आलं ते प्रॉब्लेम तू सॉल्व केले होते ...ते पण एका झटक्यात....".... सायली

" ते होय , ते प्रोफेसर उगाच खुन्नस देत डोकं खात होते म्हणून . नाहीतर उगाच मी हे असले कामं करत नसते.....".... आज्ञा 

" मग कर थोडं ..... Atleast तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तरी सांगायला हवे ना बायकोचे गुण "..... सायली 

" गुणांची खाण आहे आपण .... बहुत सुप्त गुण है अपूनमे... टाइम आनेपर दिखायेंगे ...".... आज्ञा 

" हे खरं आहे ... मॅडम डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवतात.... त्या दिवशी तुझ्या lips पर्यंत पोहचल्या होत्या ..... थोडक्यांत वाचला होता, नाहीतर infected झालाच होता तू ".... राजने परत समीरला चिडवले. 

" तू बाहेर गेला होता ना? .... हेच बघत होता का ?".... समीर 

" ओ पहारा देत होतो जरा तुमच्यासाठीच.... तुमचं काय.... कुठंही सुरू होता.... त्या दिवशी मॉर्निंग वॉकच्या वेळी बघितले होते मी पार्क मध्ये....इथे घरात इतके लोक होते, कोणीही भरकन आले असते म्हणजे......?.... भलाई का तो जमाना नही रहा....".... राज 

" असू दे .... जास्ती उडू नको.....by the way thanks "..... समीर 

" समीर ... अरे हे मुलींचे काही फोटो आहेत, बघ आवडली काय कुठली....?".... आईच्या हातात काही फोटो होते....

 झालं ते ऐकून परत आज्ञाचे टेन्शन वाढले .... 

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all