Jan 26, 2022
विनोदी

Love ... Sky is not the limit 13

Read Later
Love ... Sky is not the limit 13

 भाग 13

 

 

 

" काकू ssss , मस्त गरम गरम गरम कांदा आणि मिरची भजी बनवा ....." .... आज्ञाने डायनिंग टेबल वर बसली आवाज देत तिची फर्माईश सांगितली.... तसे सगळे तिच्याकडे डोळे मोठे करत बघत होते ... 

 

" काय झालं ? तुम्ही सगळे असे का बघताय ? काही लागलंय का चेहऱ्याला ?".... आज्ञा 

 

" It's unhealthy .... ".... राज 

 

" मला माहिती आहे हे डॉक्टरचं घर आहे ..... मी काय बाहेरून आणायला नाही सांगितले" .... आज्ञा 

 

" It's oily, not good for the heart ....".... राज हसत म्हणाला. 

 

" का , तुम्हाला आवडत नाही ?".... आज्ञा 

 

" दादा ........ दादाला नाही आवडत "...... सायली 

 

" साजूक तुपातला कणकेचा शीरा बनवतेय ....."... आई 

 

" ई sss .... किती गोड "..... आज्ञा 

 

" दादाचा फेवरेट! ".... सायली

 

" हे नाही होत काय oily..... त्यात पण तर तूप असते खूप..... आणि साखर पण "..... आज्ञा 

 

" Still it's healthy "..... राज

 

" अरे राम , देवा किती परीक्षा घेतो ..".... आज्ञा बिचारी 

 

" काय झालं ?"... सायली 

 

" तुझ्या दादाला म्युझियम मध्ये ठेवायला हवे ..".... आज्ञा ,

           ते ऐकून सगळ्यांना हसू येत होते , पण सगळे हसू दाबून ठेवले होते. 

 

" तसा प्लॅन चांगला आहे , पैसे पण खूप मिळेल , आणि रविवारी तसाही तो फ्री असतो ".... राज  

 

" हो , तसाही तुझा दादा ना युनिक पीस आहे .... ".... आज्ञा 

 

" एकदम अँटीक ".... राज 

 

त्यांचं बोलणं ऐकून समीरचे हावभाव बदलत होते....

 

" ये .... कोण त्रास देतय माझ्या छकुल्याला ...."..... आई 

 

 

" छकुला ?"..... आज्ञा डोळे विस्फारून बघत होती.  

 

" दादा ....!"..... सायली 

 

" छकुला ....? ", समीरने डोक्यावर हात मारला... 

 

            समीरला बघून आता मात्र सगळ्यांचं कंट्रोल सुटला आणि सगळे खी खी करत हसायला लागले. 

 

" आज्ञा , भजी पण बनवते .... "..... आई 

 

" Yeah..... काकू I love you "...... आज्ञा आई ला फ्लाइंग किस देत म्हणाली.  

 

" काय ग , गर्मी होतंय काय ?".... आजी आज्ञाला रुमालाने हवा मारताना बघून बोलल्या ..

 

" नाही, तस फार नाही, ही रुमालाची हवा जरा बरी वाटते आहे "...... आज्ञा 

 

" तोफा तोफा तोफा....."..... राज समीरच्या कानात 

 

" काय ?."..... समीर

 

" रुमाल...... तुझा? .....तू दिला ना ?"..... राज 

 

" म्हणूनच थंड हवा घेत आहेत देवसेना .....".... राज 

 

" त्यांच्या चेहऱ्याला माती लागली होती , म्हणून दिला होता .... Nothing else ... आता चूप बसतो काय थोड्या वेळ , मला प्रोजेक्ट ची फाईल बघू दे ... थोड्या वेळाने निघायचं आपल्याला..".... समीर

 

" ह्मम ".... राजने वाकडं तोंड केले , त्याने बाजूला असलेले मॅगझिन उचलले आणि पानं पालटत बसला होता ... 

 

            इकडे आज्ञाची काँटिन्यू बडबड सुरु होती.... काय काय किस्से ती सांगत होती ... घरात नुसता खिडळण्याचा आवाज येत होता ... घरातील सगळेच तिच्यासोबत समरस होऊन जात... 

 

" राज बरोबर बोलतो.... तुफान आहे या ..... घराची सगळी उलथापालथ करून ठेवते.... नेहमी शांत असणारे घर या आल्या की भाजी मार्केट बनून जाते ....."..... समीर पुढे बघत स्वतःशीच विचार करत होता ..

 

" फाईल स्टडी कर , थोड्या वेळाने जायचे आहे ".... राज समिरला आज्ञाकडे बघतोय बघून म्हणाला.  

 

"I know ! ".... समीर

 

" मी फक्त रीमाईंड केले.... Nothing else "... राज 

 

" काय ग बाई आज्ञा , जरा मुलीसारखं काही घालत जा , हे काय जेव्हा बघावं तेव्हा आपली शर्ट पँट मध्ये असते ......".... आजी 

 

" अगं आजी , मग ती बाईक कशी चालवणार ?".... सायली 

 

" आणि कोणाला मारायचं असले तर नाही जमणार ना ".... राज समीरच्या कानात

 

"Right, Full time मारामारी अन् दादागिरी करायची असते ...."....समीर राज जवळ हळू आवाजात 

 

" जरा मुलीसारखं वागत जा , लग्नासाठी मुलगा बघायचं तर काय बघून पसंत करावं त्याने तुला...? ".... आजी 

 

" आजी , एका महापुरुषाने म्हटलंय , कोई प्यार करे तो तुमसे करे , तुम जैसे हो वैसे करे ... कोई तुमको बदल के प्यार करे तो वो प्यार नाही सौदा करे .... ओर साहेबा प्यार में सौदा नही होता ... ".... आज्ञा अगदी फिल्मी स्टाईलने बोलत होती...

 

" शाहरुख? .....महापुरुष? ".... राज हसत होता 

ते ऐकून समीर ला सुद्धा हसू आले..  

 

" त्यांच्यासाठी तोच महापुरुष आहे ..... चला पण काहीतर GK माहिती ".... समीर 

 

" GK ?... तुस्सी वी बडे मजाकियां हो ".... राज खी खी करत होता. 

 

" होतं होतं कधी कधी .... चौफेर पागल राहतील तर असच होतं कधी कधी ".... समीर 

 

" ये ..... तो मोहबते मधला डायलॉग आहे ".... सायली 

 

" ते असू दे ग .... आजी पण बरोबर आहे की नाही ?"..... आज्ञा

 

" हो .... बरोबर आहे ".... आजी 

 

" हां , मग ..... तेच तर म्हणत होते मी. कसं आहे कोण म्हणाले ,ते महत्वाचं नाही.... काय म्हणाले , ते महत्वाचं आहे "..... आज्ञा

 

" बरं , जेवण तरी बनवता येते ना ?".... आजी 

 

" आजी हे बघा कसं आहे , मी काही बनवायला शिकायची मेहनत घेणार .... आणि असं डॉक्टर सारखं कोणी असणार... याची ॲलर्जी ते unhealthy....".....

 

Doctor शब्द ऐकून समीरला उचक्याच लागायला लागल्या..... 

 

" मग गेली मेहनत वाया .... ".... आज्ञा 

 

" हा मिस आज्ञा , बात मे पॉइंट तो हैं ...".... राज 

 

" हो ना , मग मी विचार केला की लग्न झाल्यावर त्यांच्याच आवडीचे बनवायला शिकेल".... आज्ञा 

 

" अरे देवा पोरी ... तुला काहीच येत नाही काय ? कसं व्हायचं देवा हीचं ?".... आजी 

 

" येते ना..आणि ते पण एकदम फास्ट करता येते ".... आज्ञा 

 

" काय ? ".... आजी, सायली , राजची नजर आज्ञावर होती... ते सगळे खूप आशेने तिच्याकडे बघत होते . 

 

" काय असेल रे.....?फास्ट बनते असे ?".... राज समीरच्या कानाजवळ जात खुस्पुसला. 

 

" रेस्टॉरंट मधून आणत असेल ".... समीर 

 

" नाही नाही , खूप कॉन्फिडन्सने सांगत आहे .... भजी असतील.... खूप आवडते म्हणाल्या... आणि फास्ट पण होतात...."....राज 

 

" Who knows ??? मला नाही वाटत काही येत असेल.... नौटंकी करत आहे , इंप्रेस करण्यासाठी ".... समीर 

 

" हा ते पण असू शकते , हेड ऑफ द डिपार्टमेंट कधीच पटले , आता नेक ऑफ डिपार्टमेंट पटवत आहेत ", राज हसत म्हणाला. समीरने त्याला एक हार्ड लूक दिले. 

 

          समीर आणि राजचे आज्ञाला काय बनवता येत असेल यावर विचारविनिमय सुरू होता. असणारच ना , विषय पण तेवढा गहन होता . 

 

 

" मॅगी sssss ...."...... आज्ञा खूप proud फील करत अभिमानाने म्हणाली... 

 

          ते ऐकून राजच्या हातातले मॅगझिन खाली पडले.... 

 

" I told you ! "..... समीर ला खूप हसू येत होते. 

 

" खूप ओळखायला लागला रे तिला ".... राज 

 

 

" तुझं future unhealthy दिसतंय मला .... खूप healthy healthy करत असतो ना , घ्या बोंबला आता "..... राजला हसू कंट्रोल होत नव्हते. 

 

       त्याचा वाक्याने समीरचे हसूच बंद झाले, त्याने परत राजाला एक रागीट लूक दिला. 

 

" जानू , breakfast मे क्या है ? .... मॅगी 

जानू लंच मे क्या है ? .... वेज मॅगी 

जानू डिनर मे क्या है ?..... स्टीम मॅगी ".... राज 

 

ते ऐकून समीरचा चेहरा एकदम लाल झाला … 

 

" जोक होता ".... राज बत्तिशी दाखवत म्हणाला. 

 

" फालतू जोक होता ".... समीर , समीर राज आपापसात बोलत होते... बोलत काय राज चिडवत होता, समीर चिडत होता....

 

" अहो , आजी एकदम फास्ट दोन मिनिटात होते ..."... आज्ञा 

 

ते ऐकून आजीने तर डोक्यावर हात मारला.... 

 

" मला तर बाई हीची फारच काळजी लागलेली.... कसं व्हायचं हीचं?".... आई 

 

" आज्ञा, अगं दादाला सुद्धा छान स्वयंपाक येतो करता ..... अन् तुला काहीच येत नाही ....".... सायली

 

" एकाला आला तरी चालेल...मग त्यांच्याशीच लग्न करेल.....no tension .".... आज्ञा 

 

ते ऐकून तर समीरला जोरदार ठसका लागला..... 

 

" काय ?"...सायली 

 

" अगं म्हणजे मी ज्याला स्वयंपाक येतो , त्याचा सोबत लग्न करेल.... Great idea ना !" ... आज्ञा

 

" धन्य आहेस बाई तू , दादा पाणी घे..."..... सायली

 

" सीमा , हिला शिकव ग स्वयंपाक, थोडा तरी यायला हवा..... नाही म्हणजे तू मुलगी आहे म्हणून नाही म्हणत होते, पण अडीअडअचानीच्या वेळी आपलं पोट भरता येईल एवढं तरी यायला हवे.... "... आजी , आजीला माहिती होते पोरीला आई नाही , सावत्र आई फार जीव लावत नाही... त्यामुळे आज्ञाचा यात काही दोष नाही...

 

" हो आई "... सीमा.

 

         सगळे गरमा गरम नाश्ता करायला बसले .... तसा समीर आणि राजच्या फोन मध्ये मेसेज बिप झाला...

 

" मी आता डॉक्टरला प्रपोज करणार , सगळ्यांसमोर .... मला हल्क्यात घेऊ नका... आताचं ट्रेलर बघितले आहेच..... नको असेल तर माझी एक शर्त आहे "... आज्ञाचा मेसेज होता . 

 

" आताच म्हणे प्यार में सौदा नही..... आणि आताच डील करायला लागल्या ".... समीर राज जवळ मेसेज बघून म्हणाला. 

 

" म्हणजे तू मान्य करतोस तर , प्रेम आहे ते ".... राज 

 

" I don't care .....!"... समीरने मेसेज केला...

 

" बघा मग , म्हणाल आधी सांगितले नाही ...."... आज्ञाने समीरला मेसेज केला..

 

" Okay डॉक्टर राज , मी तर आता प्रपोज करणार.... तुम्ही पण तयार रहा , माझ्या नंतर तुमचा टर्न "..... आज्ञा

 

ती मेसेज बघून आता राजला टेन्शन आले…. 

 

*******

समीर आज्ञाची शर्त पूर्ण करतो काय? राज समीर ला शर्त साठी तयार करतो काय? 

की आज्ञा समीरला प्रपोज करते? 

काय असेल आज्ञाची शर्त? 

बघुया पुढल्या भागात....????

 

 

क्रमशः 

 

 

********

 

हॅलो फ्रेंड्स 

लाईक्स, कॉमेंट्स साठी खूप खूप thank you .... 

 

           आधीच्या भागात समीर सगळ्यांना रुड वाटला , I hate you म्हणाला न आज्ञाला , पण त्याला समजून घ्या हो.... एखादी मुलगी त्याचा कॉलर पर्यंत पोहचली, त्याचा अल्मोस्ट ओठांपर्यंत पोहचली होती... त्या बिचाऱ्या ने काय करावं , तसा तो खुप sweet आहे बरं ❤️

 

कथेत पुढे थोडेफार असे फनी पार्टस येतील.... मग कथा भावनिक वळणे घेत पुढे जाईल.. 

 

हसत रहा आणि फक्त हसत रहा....

हसायला पैसे नाही पडत ,..... 

????

 

धन्यवाद !! 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️