Jan 26, 2022
कथामालिका

Love ... Sky is not the limit 12

Read Later
Love ... Sky is not the limit 12

भाग 12

 

 

 

" आजोबा, चलो ….रुक्षारोपण करेंगे "..... आज्ञा सायलीच्या घरात उत्साहात पळत आली. 

 

" हे काय , झाले सुद्धा इतक्यात कॉलेज ...? "....आजी 

 

" आजी , अहो असे काय विसरता , आज शनिवार आहे ना , हाफ डे असतो ".....आज्ञा घरात नजर फिरवत बोलत होती 

 

" अच्छा हो , पण मग सायली नाही आली ?".... आजी 

 

" हां , ती होय...?... त्यांचे एक्स्ट्रा क्लास सुरू आहेत "..... आज्ञा 

 

" बरं बरं , आत ये"... आजी

 

" घरात कोणी दिसत नाही आहे ...?".... तेवढया वेळेत तिने पूर्ण घराचा कानोसा घेऊन घेतला होता ...

 

" सीमा आराम करते आहे , समीर हॉस्पिटलला गेला आहे , तुझे आजोबा तयारी करत आहेत "....आजी

 

" बापरे, डॉक्टरांना नसतो हाफ डे वगैरे ?".... आज्ञा 

 

तिचं बोलणं ऐकून आजीला हसू आले...

 

" रविवारी असते त्याला सुट्टी , तसे शनिवारी पण कमी असतात कामं , पण एखादी काही इमर्जंची आली की जातो तो हॉस्पिटल मध्ये .. तसही त्याचसाठी सुट्टी नावसाठीच असते ,त्याचा कुठल्या ना कुठल्या विजिट ठरलेल्या असतात ".... आजी 

 

" अच्छा , पण मग स्वतःच्या आवडीचे काही कधी करतात मग ?".... आज्ञा 

 

" आता त्याचा आयुष्याचा प्रायोरीटिज बदलल्या . आता तर त्याला स्वतःला सुद्धा त्याचा आवडी निवडी आठवत नसेल ".... आजी हसतच बोलली 

 

" बापरे ...आज्ञा , डॉक्टरांना तर वेळच नाही !... खूप मोठा लढा द्यावा लागेल .... कोई गल नही .... अपने हिस्से का टाइम तो अपून लेकरही रहेगा "..... आज्ञा स्वतःच्याच विचारात हरवली. 

 

" काय ग , कुठे हरवली ...?'.... आजी 

 

" हां .... काही नाही .... विचार करत होते , डॉक्टर होणं सोपी नाही (आणि डॉक्टरची बायको होणं त्याहून सोपी नाही .. मनात) ".... आज्ञा 

 

" हो , ते तर आहेच ....".... आजी 

 

" बरं , पण मग काय आवडते डॉक्टरांना ? नाही म्हणजे आधी काय करायचे वेळ असला की?"... आज्ञा

 

" समीरला फिरायला जायला , ट्रेकिंग , बाईकने फिरायला जायला , ते बास्केटबॉल / फुटबॉलखेळायला , असे आवडायचे .... सुट्टी असली की हेच चालायचं त्याचं ".... आजी 

 

" ओह अच्छा .....( कूछ तो सेम है , देवा thank you ) ".... आज्ञा मनोमन खूप खुश झाली होती. 

 

" वाह छान , आजोबा कशाची तयारी करत आहेत ?"....आज्ञा

 

" अगं तुझ्या बाईकच्या आवाजावरून ओळखलं त्यांनी तू आली आहे ते , फ्रेश होऊन येतात आहेत , रोपं लावणार आहात ना तुम्ही दोघं ".... आजी 

 

" हो हो , म्हणून तर आले .... बरं पण मग तुम्ही पण करायचा ना आराम ?".... आज्ञा 

 

" मला कुठे झोप येतेय , बसले होते पुस्तकं वाचत ".....आजी 

 

" बापरे , यांच्याकडे सगळेच किती पुस्तकी किडे आहेत .... बुडापासून शेंड्यापर्यंत सगळे सारखेच .... कसा टिकाव धरणार आज्ञा बाई तुमचा धर्माधिकार्यांकडे , देवा तूच आता माझा तारणहार " ... आज्ञा मनातच देवाचा धावा करत होती. 

 

" चलो , I am ready "..... आजोबा 

 

" चला ..."....आज्ञाने आपली कॉलेज बॅग तिथे सोफ्यावर फेकली आणि आजोबांचा हात पकडत बाहेर जायला निघाली. 

 

" अगं , आताच आली ना कॉलेज मधून , थोडं काही खाऊन घे "....आजी

 

" नको ssss ".... आज्ञा

 

" चहा , कॉफी काही ?"..... आजी 

 

" सायली आली की घेऊया "..... आज्ञा 

 

         आज्ञा आणि आजोबा दोघांचा उत्साह बघून आजी गालात हसली... परत आपले पुस्तक वाचत बसल्या. 

 

          त्या दिवशी ठरल्याप्रमाणे , शनिवारी आजोबांना बागकाम मध्ये मदत करण्यासाठी म्हणून आज्ञा घरी आली होती आणि तसेही तिला धर्माधिकारी हाऊस ला येण्यासाठी काही ना काही कारण लागायचेच. 

 

 

 

           आज शनिवार होता , तसे तर समीर अर्धा वेळच हॉस्पिटल मध्ये असायचा ..पण एक इमर्जन्सी केस असल्यामुळे तो हॉस्पिटल मध्ये थांबला होता... कामं आटोपून तो घरी आला... थोड्या वेळात सायली सुद्धा घरी आली होती. 

 

" समीर , जा नाश्ता कॉफी करतेय, आजोबा आणि आज्ञाला आवाज देऊन ये ".... आई 

 

" आज्ञा ?".... नाव ऐकूनच त्याला टेन्शन आले

 

" हो , ते दोघं तिकडे बागीच्या मध्ये आहेत , बराच वेळचे काम करत आहे , आज्ञा कॉलेज मधून डायरेक्ट इकडे घरीच आली , काही खाल्ले पण नाही तिने , जा बोलवून आन त्यांना ".... आई 

 

" सायली ला पाठव "...... समीर

 

" अरे ती फ्रेश होतेय , जा आवाज दे आणि बघून पण घे तुझ्या आवडीप्रमाणे लागली आहेत की नाही झाडं "..... आई 

 

            समीरचा नाईलाज झाला.... गपचुप तो बाहेर बगीच्याकडे गेला.... 

समोरचं दृश्य बघून जरा दूरच थांबला...

 

         आज्ञा आणि आबा मस्तपैकी बागकाम करण्यात रममाण झाले होते .... दोघांकडे बघून अजिबात वाटत नव्हते की काही दिवसांपूर्वीची यांची ओळख आहे ... समीरला सुद्धा ते बघून नवल वाटले , त्याचे आजोबा असे सहजा सहजी कोणासोबत इतके फ्री नसे होत , त्यात आज्ञा .... समीरच्या हिशोबाने त्याचासाठी ती हट्टी , वाया गेलेली स्वार्थी मुलगी .... हे दोन्ही कॉम्बिनेशन त्याला अजबच वाटले... आणि त्या दोघांना बघून त्याचा ओठांवर हसू उमलले... 

 

             आज्ञा तिथे जमिनीवर अगदी घरात बसावे तशी पालखट मांडून बसली होती... मातीने भरलेले हात , अधूनमधून चेहऱ्यावर येणारे केस , उलट्या हाताने ते मागे सारण्याचा तिचा प्रयत्न , गालांवर लागलेली माती ,ते सुद्धा तिच्या गोऱ्या गालांवर नक्षी काढल्या सारखी दिसत होती ....आणि आजोबांसोबत चाललेली तिची मजा मस्करी , आणि ओठांवराचे हसू....... समीर त्याचाही नकळत तिला बघत उभा होता... 

 

 

दिल खो गया हो गया किसीका 

अब रस्ता मिल गया, ख़ुशी का 

आँखों में है ख्वाब सा किसी का 

अब रास्ता मिल गया, ख़ुशी का

रस्ता नया रब्बा 

दिल छू रहा है 

खींचे मुझे कोई डोर तेरी ओर

तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा

तेरी ओर तेरी ओर तेरी ओर...... राज नुकताच बाहेरून आला होता , समीरला स्टेच्यु झालेले बघून त्याचा कानात जात गाणं म्हणून लागला. 

 

राज समीरच्या कानात येऊन म्हणत होता.... आतापर्यंत स्वतःच्याच तंद्रीत असलेला समीर राजच्या आवाजाने दकचकला.....

 

" What ?"..... राज भुवया उडवत बोलला

" What ?"..... समीर 

 

" What म्हणजे काय ! " , राज आपली बत्तिशी दाखवत बोलला. 

 

" फालतू जोक होता !", समीर 

 

" तुला तर आता सगळंच फालतू दिसते . गुपचुप गुपचुप ?".... राज 

 

" काय गुपचूप ?"..... समीर 

 

" हेच , आता जे सुरू होते ?"... राज 

 

" काय ? ".... समीर 

 

" येडा बनून पेड गावला जातोय तू .... तुला काय वाटते , मला कळणार नाही ..... देवसेने नंतर माझीच नजर आहे तुझ्या वर "..... राज हसत अगदी इरीटेतींग असे हावभाव करत म्हणाला. 

 

" आईने आजोबाला नाश्त्यासाठी आतमध्ये बोलावले आहे , आवाज द्यायला आलो होतो ".... समीर 

 

"मला नाही वाटत तुझा आवाज निघेल , आवाज द्यायला .... "... राज 

 

          समीर प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होता ... 

 

" सुंदर ते ध्यान .... सुंदर ते ध्यान .... नारायण नारायण "..... राज भजन करण्यासारखी अक्टिंग करत बोलला.  

 

" पागलखाना काढवाच लागेल आता .... "... समीर 

 

" वाह ! टक लाऊन तू बघणार, आणि मला पागलखाण्यात टाकणार ..... बहुत नाईंसाफी हुई येह तो ! ".... राज 

 

" आहे ना तुला कंपनी .... डोन्ट वरी ".... समीर आज्ञाकडे इशारा करत बोलला .... 

 

" बेड वाढवून ठेव मग ".... राज 

 

" म्हणजे ?"..... समीर 

 

" तुला पण लागणार ना...... देवसेना तिथे एकटी राहील , असं वाटतंय का तुला "..... राज 

 

" Oh God , seriously तुम्ही दोघं मला पागल करून ठेवाल... तुम्ही दोघं आसपास असलात ना अजिबात वाटत नाही , मी डॉक्टर आहे ते ..... ".. समीर 

 

" डॉक्टर पागल नाही होऊ शकत काय "..... राज एकही चिडवायचे चान्स सोडत नव्हता. 

 

" मी चाललो ".... समीर वैतागला

 

" अरे आवाज द्यायला आला होता ना ?, ते तर काम कर पूर्ण ...नाही म्हणजे तुझे काम तू गपचुप केलेय , पण जे करायला आला होता ते पण कर ".... राज 

 

" आजोबा , आई बोलावते आहे आतमध्ये ".... समीरने आवाज दिला... 

 

" डॉक्टर ❤️"..... आज्ञा त्याचा आवाज ऐकून धाडकन उभी राहिली आणि त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला ... जसे आइस क्रीम वाल्याची घंटी ऐकून लहान मुलांचे होते , तसेच ....

 

" जमलं …! ".... राजला आज्ञाला बघून हसू आले. 

 

समीरने त्याचाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले... 

 

" एन्टरटेन्मेंट शो , तो पण फ्री !"..... राज 

 

 समीर चिडक्या नजरेने राजकडे बघत होता. 

 

" अरे , तुम्ही आलात ....बस थोडेसेच राहिले आहे , येतोच "... आजोबा 

 

" आजोबा , तुम्ही जा , रोपट्यांना पाणीच घालायचं राहिले आहे , मी करते ते आणि येते मी आतमध्ये ..."... आज्ञा 

 

" बरं ...."... आबा घरात पुढे निघून आले .. त्यांच्या मागे मागे समीर सुद्धा घरात जायला वळला . 

 

" डॉक्टर डॉक्टर दिल के डॉक्टर ..... "..... आज्ञा

 

समीरने मागे वळून बघितले ... आणि काय म्हणून डोळ्यांनीच विचारले. 

 

" हाय रे …. आँखो ही आँखो मे इशारा होगया, बैठे बैठे जिने का सहारा मिल गया ".... आज्ञा 

 

राजला गालात हसू येत होते... 

 

" बोला , मिस ".... समीर 

 

" आज्ञा ".... आज्ञा 

 

" काय काम आहे ?"... समीर 

 

" पाणी कोण घालणार हातावर? ....".... आज्ञा आपले माती भरले हात त्याच्या पुढे करत आनंदाने बोलली... तिच्या डोळ्यात जशी चांदणी चमकत होती..

 

" राज , मिसच्या हातांवर पाणी घाल "..... समीर मागे बघत बोलला..तर तिथे कोणीच नव्हते... त्यानं गोल फिरून बघितले तर राज गायब होता.. 

 

       आज्ञाने आधीच राजला इशारा करत तिथून गायब व्हायला सांगितले होते . राज बिचारा , आज्ञाने त्याचा दुखरी नस वर हात ठेवला होता ... तिचा इशारा झाला तसा तो तिथून पळला होता . 

 

"हा कुठे गेला .. आताच तर इथे होता ? "... समीर स्वतःचीच विचार करत होता . 

 

" घालताय ना ?".... आज्ञा 

 

        समीरने कसा तरी चेहरा केला ... आणि बाजूचा नळ ओपन करत पाईपने तिच्या हातावर पाणी घालत होता ..... 

 

" Wow !", आज्ञा 

समीर तिच्या जवळ उभा होता , ती त्याला बघण्यात गुंगली होती . 

 

" मिस ".... समीर 

 

" डॉक्टर, तुमचं नाक किती क्यूट आहे हो .....".... आज्ञा 

 

" मिस , गालाकडे बघा .... ".... समीर 

 

" हो , तेच तर बघतेय ".... आज्ञा

 

" माझ्या नाही , तुमच्या ".... समीर 

 

" माझं तुमचं काय वेगळं आहे काय डॉक्टर "..... आज्ञा 

 

" कुठं फसवले .....".... समीरने मनातच बोलत डोळे फिरवले 

 

" माती लागलीय तिथे ".... समीर 

 

" दिसत नाहीये डॉक्टर .....".... आज्ञा

 

" इकडे बघा ...."... समीर तिच्या गालाकडे इशारा करत होता.. 

 

" डॉक्टर , तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला काही कळेना ".... आज्ञा

 

समीर प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता .

 

" स्वतःच्याच गालाला स्वतःला बघता येते काय ? .... मला माहिती मी खूप सुंदर आहे , म्हणून मग काय तुम्ही सगळं विसरून जावं की काय.... ? म्हणजे तसे तुम्ही स्वतःला विसरलात तरी चालेल ... पण डॉक्टर नको विसरायला ... म्हणून म्हणते "..... बोलत तिने तिचा गाल त्याचा पुढे केला .. 

 

" काय ? "..... समीर 

 

" किस तर तुम्ही करणार नाही "..... आज्ञा प्रेमळ नजरेने त्याला बघत होती. 

 

     समीरने तिच्या गालाला हात लावला आणि त्यावरील माती काढायला लागला..... 

 

" समीर , हे काय होतंय ... कितीदा तर फिमेल पेशंटला तपासताना हात लावलाय तू , तेव्हा तुला असे फील होत नाही , मग हे आता का वेगळंच काही होतंय.... काही बदलतंय काय ? ".... तो स्वत:शीच विचार करत होता , काहीच कळत नव्हते , त्याला खूप वैतागल्यासारखे होत होते .. 

 

" त्या दिवशी किती चिडला होता डॉक्टर... उगाच सगळ्यांना तुम्ही रुड , खडूस वाटलात ना ... पण तुम्ही किती स्वीट आहात... मला माहिती ना ..... उगाच असे रागवत नको जावा , भयंकर dash dash dash दिसता तुम्ही , रागात तुमचं लाल झालेले हे क्यूटसे नाक , माझा जीव घेतो , त्या दिवशी सोडले तुम्हाला ... परत नाही सोडणार हा डॉक्टर "...... आज्ञा 

 

 

         त्या दिवशीचे विसरलेले प्रकरण , आज्ञाने त्याला परत आठवून दिले होते ( आज्ञा समीर च्या रूम मध्ये गेली होती , आणि किस करता करता थांबली होती ते ) , समीर झालेल्या गोष्टी धरून बसनाऱ्यातला नव्हता , तो लवकरच विसरून जात ,पण आता परत आज्ञाने त्याची चिडकी नस दाबली होती. 

 

" I can't do this ! ".... म्हणत त्याने त्याचा खिशातून रुमाल काढला आणि तिच्या हातात ठेवत तिथून पळाला... आज्ञाला त्याला असे अवघडलेल्या सारखे झालेले बघून हसू आले.... 

 

आज्ञा बागीचाचे काम आवरत आतमध्ये आली....

 

" तोफा तोफा .... मिला मिला ....

प्यार का तोफा तेरा , बना है जीवन मेरा....."... आज्ञा गुणगुणतच आतमध्ये आली... 

 

" काय दिलं ? " ..... राज 

 

" राज , नॉट अगैन ....".... समीर 

 

         तसा राज शांत बसला .... तसेही समोर सायली होती.... तो आपल्या नजरा चुकवत तिला बघत होता.... 

 

 

" काकू ssss , मस्त गरम गरम गरम कांदा आणि मिरची भजी बनवा ....." .... आज्ञाने डायनिंग टेबल वर बसली आवाज देत तिची फर्माईश सांगितली.... तसे सगळे तिच्याकडे डोळे मोठे करत बघत होते ... 

 

" काय झालं ? तुम्ही सगळे असे का बघताय ? काही लागलंय का चेहऱ्याला ?".... आज्ञा 

 

" It's unhealthy .... ".... राज 

 

" मला माहिती आहे हे डॉक्टरचं घर आहे ..... मी काय बाहेरून आणायला नाही सांगितले" .... आज्ञा 

 

" It's oily, not good for the heart ....".... राज हसत म्हणाला. 

 

" का , तुम्हाला आवडत नाही ?".... आज्ञा 

 

" दादा ........ दादाला नाही आवडत "...... सायली 

 

" साजूक तुपातला कणकेचा शीरा बनवतेय ....."... आई 

 

" ई sss .... किती गोड "..... आज्ञा 

 

" दादाचा फेवरेट! ".... सायली

 

" हे नाही होत काय oily..... त्यात पण तर तूप असते खूप..... आणि साखर पण "..... आज्ञा 

 

" Still it's healthy "..... राज

 

" अरे राम , देवा किती परीक्षा घेतो ..".... आज्ञा बिचारी 

 

" काय झालं ?"... सायली 

 

" तुझ्या दादाला म्युझियम मध्ये ठेवायला हवे ..".... आज्ञा ,

           ते ऐकून सगळ्यांना हसू येत होते , पण सगळे हसू दाबून ठेवले होते. 

 

" तसा प्लॅन चांगला आहे , पैसे पण खूप मिळेल , आणि रविवारी तसाही तो फ्री असतो ".... राज  

 

" हो , तसाही तुझा दादा ना युनिक पीस आहे .... ".... आज्ञा 

 

" एकदम अँटीक ".... राज 

 

त्यांचं बोलणं ऐकून समीरचे हावभाव बदलत होते....

 

" ये .... कोण त्रास देतय माझ्या छकुल्याला ...."..... आई 

 

 

" छकुला ?"..... आज्ञा डोळे विस्फारून बघत होती.  

 

" दादा ....!"..... सायली 

 

" छकुला ....? ", समीरने डोक्यावर हात मारला... 

 

            समीरला बघून आता मात्र सगळ्यांचं कंट्रोल सुटला आणि सगळे खी खी करत हसायला लागले. 

 

" आज्ञा , भजी पण बनवते .... "..... आई 

 

" Yeah..... काकू I love you "...... आज्ञा आई ला फ्लाइंग किस देत म्हणाली.  

 

" काय ग , गर्मी होतंय काय ?".... आजी आज्ञाला रुमालाने हवा मारताना बघून बोलल्या ..

 

" नाही, तस फार नाही, ही रुमालाची हवा जरा बरी वाटते आहे "...... आज्ञा 

 

" तोफा तोफा तोफा....."..... राज समीरच्या कानात 

 

" काय ?."..... समीर

 

" रुमाल...... तुझा? .....तू दिला ना ?"..... राज 

 

" म्हणूनच थंड हवा घेत आहेत देवसेना .....".... राज 

 

" त्यांच्या चेहऱ्याला माती लागली होती , म्हणून दिला होता .... Nothing else ... आता चूप बसतो काय थोड्या वेळ , मला प्रोजेक्ट ची फाईल बघू दे ... थोड्या वेळाने निघायचं आपल्याला..".... समीर

 

" ह्मम ".... राजने वाकडं तोंड केले , त्याने बाजूला असलेले मॅगझिन उचलले आणि पानं पालटत बसला होता ... 

 

            इकडे आज्ञाची काँटिन्यू बडबड सुरु होती.... काय काय किस्से ती सांगत होती ... घरात नुसता खिडळण्याचा आवाज येत होता ... घरातील सगळेच तिच्यासोबत समरस होऊन जात... 

 

" राज बरोबर बोलतो.... तुफान आहे या ..... घराची सगळी उलथापालथ करून ठेवते.... नेहमी शांत असणारे घर या आल्या की भाजी मार्केट बनून जाते ....."..... समीर पुढे आज्ञाला बघत स्वतःशीच विचार करत होता ..

 

***** 

 

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️