Jan 26, 2022
मनोरंजन

Love ... Sky is not the limit 11

Read Later
Love ... Sky is not the limit 11

भाग 11 

 

 

" वाह , धन्य आहो मी , एक हे फकीर आणि एक ते ध्यान . ".... समीर 

 

" ध्यान नाही देवसेना , बघा काय करताय पुढे आता ....", राज हसू लागला. 

 

" तेच.... म्हणून I hate this love , girlfriend and all . ही मुलगी मला पागल करून ठेवेल ", समीर 

 

" आधी तुझं आयुष्य कसं बोर होते, आता रोजची वादळं यायला लागली ", राज 

 

समीरने राजवर एक खडूसवाला चिडका कटाक्ष टाकला. 

 

" दिल के डॉक्टर के लिये दिल का डॉक्टर अरेंज करून ठेवतो हॉस्पिटल मध्ये ", राज 

 

         समीरला काही समजले नाही, तो प्रश्नार्थक नजरेने राज कडे बघत होता. 

 

" आता हे सगळं झाल्यावर दिलच्या डॉक्टरला दिल का दौरा पडेल , तर सोय नको करायला " , राज

 

समीर ने त्याला एक रागीट लूक दिला. 

 

" पुढे, तिकडे बघ ", राज 

 

        आजी , आई सुद्धा ते बघून शॉक झाल्या होत्या. आजोबा मात्र त्या छोट्या छोट्या रोपांना खूप कुतूहलाने हात लाऊन बघत होते .. 

 

" बापरे , इतके झाडं ?", सायली आज्ञाला विचारात होती.

 

" Birthday gift ! ", आज्ञा 

 

" कोणासाठी ?", सायली 

 

" कोणासाठी असेल, guess कर ? , अबे डंबो , आजोबांचा वाढदिवस आहे ना आज , मग त्यांच्यासाठीच असेल ना .", बोलतांना मात्र आज्ञा समीरकडे बघत होती ... 

 

" हुश ..... !! ", समीरने सुटकेचा श्वास सोडला 

 

" हुश.. हुश ...हे पण नाही , म्हणजे प्रपोजचा प्लॅन यापेक्षाही मोठा आहे समीर ", राज रडक्या आवाजाची स्टाईल करत बोलला. 

 

" काय? ".... समीर परत टेन्शन मध्ये 

 

त्या दोघांना असे बघून आज्ञाला हसू येत होते . 

 

" अगं , आजोबांना बाग कामाची खूप आवड आहे ना म्हणून ही काही नवीन रोपटी आणली आहेत ", आज्ञा 

 

" आणि ही इतकी गुलाबाची फुलांची झाडं ?", सायली 

 

" मी म्हटलं आता गुलाब वगैरे काय द्यायचा कोणाला, काही वेळाने तो सुकून जाणार , आणि एक दिवस देऊन काय मज्जा नाही , प्रेमाची आठवण कशी रोज व्हायला हवी, म्हणून ही झाडं.. आता यांना रोज फुलं येणार आणि ही फुलं तुम्हाला मला कधीच विसरू देणार नाहीत ", आज्ञाने बोलता बोलता कोणाचे लक्ष नाही बघत समीरला ओठांनी दुरूनच किसची अँक्शन केली. तिचं ते सगळं बोलणं ऐकून समीरने डोक्यावर हात मारून घेतला. 

 

" अरे वाह आज्ञा , अगदी आवडीचे गिफ्ट आणले तू, खूप खुश झालेत तुमचे आजोबा, काय रे समीर सायली ,तुम्हा दोघांना पण कधी सुचलं नाही असे काही ", आजी 

 

" या दोघांना प्रेम म्हणजे काही माहिती नाही अजून आजी , प्रेमात पडल्यावरच हे असे गुलाब , झाडं , कुंड्या , फुलं , पानं , खत पाणी कळतात ना , पण you don't worry आजी , शिकतील ही दोघं हळूहळू ", राज बोलताबोलता सायलिकडे बघत होता... 

 

 

 

" What do you mean ? आम्हाला नाही कळत म्हणजे काय ? आणि तुम्हाला खूप कळते जसे काही ", सायली डोळे मोठे करत राज कडे बघत होती . सायली चा चेहरा लाल झाला होता. 

 

" व्राँग नंबर लागला राज , लगेच खळवळते बाबा ही. राज तू स्वतःच स्वतःचे कठिण करून बसतो , आता या मॅडमला मनावयाला किती पापड लाटावे लागतील , किती हट्टी आहे, पूर्णच भावावर गेलीय आपल्या ", मनातच बोलत, कोणाचं लक्ष नाही बघून राज आपल्या कानाला एक हात लावत सायली कडे बघत होता. त्याला बघून सायलीने तोंड वाकडं केले.. 

 

सगळ्यांनाच आज्ञाचे कौतुक वाटत होते ... 

 

" अगं , पण इतके का आणले ? उगाच तुला त्रास ", आई 

 

" अहो काकू , आमच्याकडे झाडांची nursery सुद्धा आहे , इकडे शहरात विकायला येतच असतात , मग त्यातले थोडे इकडे आणायला सांगितले . त्रास कुठला, आणि आजोबा किती खुश झाले . दुसरं काही आणल असते तर त्यांनी घेतले सुद्धा नसते ! ", आज्ञा 

 

" आज्ञा , सगळीच झाडं आवडीची आहे . चला आता ती आपल्या गार्डन मध्ये लाऊन घ्यावे म्हणतो मी ", आजोबा खूप उत्साहात होते.. 

 

" आजोबा , एकटे नका करू , Saturday ला येते मी , दोघं मिळून करूया . ", आज्ञा 

 

" बरं ठीक आहे !", आजोबा 

 

" सही है बॉस , हेड ऑफ द डिपार्टमेंटच आपल्या नावावर करून घ्यायचा प्लॅन दिसतोय ! तुफान घरात घुसलं, आता सगळ्यांच्या दिलात पण घुसतया , very tough for you ", राज समीरच्या कानात बोलला. 

 

" इथे मित्रच दुश्मन बनलेत , दुष्मन कडून तरी काय अपेक्षा करणार ?", समीर राज कडे बघत वाकडं तोंड करत बोलला.  

 

समीर आणि राजची खुसुरपुसुर सुरू होती. 

 

सगळे आनंदाने घरात निघून आले.. 

 

                हॉस्पिटलला जायची तयारी करण्यासाठी समीर वरती त्याच्या रूम मध्ये निघून आला. सायली सोबत उगाचच राजने गडबड केली होती , पंगा घेतला होता , सायली त्याला खुन्नस देत होती, तर तो पण समीरच्या मागे मागे निघून गेला. या गडबडीत बराच वेळ झाल्याने नाश्ता राहिला होता , सायली आईला मदत करायला किचन मध्ये गेली. 

 

" आज्ञा , वरती रूम मधून माझी कॉलेज सॅक आणशील ग , मी आईला मदत करते , नाहीतर कॉलेजला उशीर होईल आपल्याला ", सायली किचन मधुन ओरडली

 

" हो , आणते ", म्हणत आज्ञा वरती सायलीच्या रूम मध्ये जात होती. सायलीच्या रूमच्या अलीकडे समीरची रूम होती. आज्ञाचे लक्ष समीरच्या रूम मध्ये गेले तर समीर आरसापुढे उभा स्वतःची तयारी करत होता . राज सोफ्यावर बसला मोबाईल मध्ये काही करत होता . 

 

        समीर फॉर्मल गेटअप मध्ये होता , भारीच हँडसम दिसत होता . आज्ञा तर तशीच समीरसाठी वेडी होती, त्याचा प्रत्येक रूपाने ती नेहमीच मोहित व्हायची. आता पण त्याला बघून तिची तशीच हालत झाली होती.  

 

" हॅलो बॉईज !", आज्ञाने समीरच्या रूमचे दार नॉक केले . समीरने तिच्याकडे बघून न बघितलेल्या सारखे केले आणि परत आपल्या तयारीत लागला.. 

 

" Wow , काय सुंदर रूम आहे , आवडली बाबा आपल्याला आपली रूम ", बोलतच ती आतमध्ये गेली. 

 

" बालकनी बघा , ती पण तुम्हाला खूप आवडेल ", राज आपली बत्तिशी दाखवत बोलला. 

 

" डॉक्टरांचं आहे म्हणाल्या वर सगळंच बेस्ट असेल . पण सध्या फक्त डॉक्टरांना बघायचा मूड आहे ...", म्हणतच ती समीरच्या जवळ जात उभी राहिली . समीर आपल्या शर्टच्या बाह्यांचा बटन लावत होता ... 

 

" Okay , मी बाहेर आहो ", आज्ञा समीर जवळ बघून राज बोलला आणि उठून बाहेर जाऊ लागला . 

 

" राज , बस इथेच ", समीर बाजूला ठेवलेला टाय उचलत आपल्या गळ्या भोवती घेत बोलला. 

 

" हो हो डॉक्टर राज, मला तुमचा कधीच प्रॉब्लेम नसतो , तुम्ही बसा इथेच !", म्हणतच आज्ञा समीरच्या अगदी पुढे उभी त्याचा जवळ जात त्याच्या शर्टच्या वरच्या बटन लावायला गेली.. तसा तो मागे सरकला..

 

" Mis , behave yourself ! ", समीर 

 

          समीरचे बोलणे ऐकून न ऐकल्यासरखे करत तिने परत त्याचा जवळ जात शर्ट ची बटन लावायला लागली. 

 

" मिस , हा काय आगाऊपणा आहे ? तुम्हाला एकदा सांगितलेले समजत नाही काय ?", समीर , तरी तिचे आपले तेच काम सुरू होते . 

 

" मिस , माझं तुमच्यावर प्रेम वैगरे नाही आहे ", समीर 

 

" काही घाई नाही , होईल आरामात ", आज्ञा त्याची टाय शर्टाच्या कॉलर मध्ये नीट adjust करत होती. ते करता करता तिचा हाताचा स्पर्श त्याच्या मानेला होत होता . कधीच कुठली मुलगी त्याचा कॉलर पर्यंत , त्याच्या मानेपर्यंत पोहचली नव्हती, आज्ञाचा हा स्पर्श त्याचासाठी नवीन होता. तिच्या त्या स्पर्शाने समीरला वेगळ्याच फिलिंग येत होत्या . थोड्या वेळसाठी त्याला काय बोलावं काही सुचत नव्हते ..पण थोड्या वेळातच त्याने स्वतःला कंट्रोल केले आणि आज्ञा त्याची टाय बांधत होती तिच्या त्या हाताचे मनगट त्याने आपल्या हातात घट्ट पकडले..

 

" तुम्हाला मी काय बोललो ते कळत नाही आहे काय ? माझं तुमच्यावर प्रेम नाही , प्रेम तर दूर आहे मला तुम्ही आवडत सुद्धा नाही ", समीर तिच्या डोळ्यांमध्ये आपली नजर रोखत बोलला 

 

" मला तुम्ही आवडता , आणि माझं तुमच्यावर प्रेम सुद्धा आहे ", आज्ञा 

 

" याला प्रेम म्हणत नाही ... ", समीर

 

" मग कशाला म्हणतात?", आज्ञा 

 

" हे जे काही आहे ते एकतर्फी आहे . प्रेमात जबरदस्ती करता येत नाही , जबरदस्तीने प्रेम मिळत नाही ... ", समीर 

 

" काळजी नका करू , लवकरच दुतर्फा सुद्धा होईल ", आज्ञा 

 

" मी कधीच तुम्हाला कशाचीच कमिटमेंट देणार नाही , तुम्ही तुमचं भविष्य आणि वेळ वाया घालवू नका ", समीर चिडत बोलत होता . 

 

            समीर जनरली त्याचे पेशन्स सोडत नाही, तो शांत स्वभावाचा होता , पण आज तो खरंच रागात दिसत होता आणि आज्ञा सुद्धा त्याला तेवढीच टक्कर देत होती , दोघांना त्यांचं sort out करू द्यावे , लक्षात घेत राज रूमच्या बाहेर निघून आला. 

 

" तुम्हीच माझे भविष्य आहात , मी तर तुमच्यासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकते , हे वेळ बिळ काय आहे ", आज्ञा 

 

" मिस sss ", समीरचा आवाज थोडा चढला. आज्ञाला तो थोडा रागात दिसत होता . ती त्याचा कडे बघत होती... 

 

" ही विकृत मानसिकता आहे तुमची , आणि हे काय, खाली काय करत होता तुम्ही?? रेड रोज , बेट अँड ऑल .... ? हा पोरकट खेळ बंद करा आता . सायलीची मैत्रीण आहात , तिची मैत्रीण बनून राहा . जास्ती काही बनण्याचे स्वप्न बघू नका . you are not my type girl ", समीर रागात बोलत होता ..

 

" Then what is your type ? ", आज्ञाने झटक्यात समीरच्या मानेला आणि डोक्याला आपल्या दोन्ही हातात पकडत , त्याच्या नजरेला नजर देत बोलली. 

 

     ' तू माझ्या टाईपची मुलगी नाही ', असे त्याचे शब्द तिच्या खूप जिव्हारी लागले होते . कुठल्या शब्दात त्याला समजावू की तू फक्त माझा आहेस , पण तिचे शब्द तर त्याला कळत नाही. आज्ञा च्या डोक्यात सुरू होते . आज्ञाने त्याचा चेहऱ्यावरून आपली नजर फिरवत त्याचा ओठांवर स्थिर केली .ती त्याचा इतक्या जवळ आली होती की तिच्या शरीराचा स्पर्श त्याला व्हायला लागला होता . तिच्या नजरेत त्याला थोडासा राग दिसत होता. तिने आपल्या टाचा उंचावल्या आणि ओठांना किस करायला म्हणून त्याचा ओठांजवळ जात होती . तिला इतकं जवळ बघून त्याचं डोकं सुद्धा ब्लँक झाले होते . त्याला तिचे सुरू असलेल्या गोष्टींना प्रतिकार करायचा होता , पण त्याला ते जमत नव्हते . तो फक्त तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता . आज्ञा त्याच्या ओठांजवळ पोहचली होती. ती त्याचा ओठांवर ओठ टेकवनार तेवढयात त्याने आपले डोळे मिटून घेतले. 

 

" प्रेमात जबरदस्ती करता येत नाही ", त्याचे बोलले शब्द तिला आठवले आणि क्षणात तिने त्याला किस करण्याचे कॅन्सल केले . 

 

" माझं प्रेम, माझं आयुष्य, माझा श्वास , सगळं तुम्ही आहात आणि तुम्हाला मी मिळवणारच, त्यासाठी मला काहीही म्हणजे काहीही करावं लागले तरी चालेल.... ", आज्ञा बोलली तसे त्याने डोळे उघडत तिच्याकडे बघत होता .  

 

" I hate you ! ", म्हणत समीरने तिचा हात आपल्या माने खालून काढत तिच्या दूर झाला ..

 

" But I love you doctor❤️ , इसका और इसका ( त्याचा हृदयावर बोट ठेवत नंतर आपल्या हृदयावर बोट ठेवत ) कनेक्शन तो बनकर ही रहेगा आणि इतकं खोल कनेक्शन होणार ना की तुम्ही मला जवळ घेण्यासाठी तडपणार. It's my promise to you Doctor ", आज्ञा खूप आत्मविश्वासाने म्हणाली . 

 

" Your look is just killing me today ", म्हणत तिने त्याचा डोक्यातून हात फिरवत त्याचे केस विस्कटवले आणि बाहेर गेली, तर तिथे राज उभा होता .... 

 

" आणि बेट तर मी जिंकणारच , आज्ञाला हरणे काय असते माहिती नाही ....", राजला म्हणत एकदा रूम मध्ये डोकावत समीरला फ्लायिंग किस देत राजला डोळा मारत सायलीच्या रूम मध्ये पळाली. राज आतमध्ये आला... 

 

" She is very dangerous ! ", समीर 

 

" But you missed your first lip kiss yaar !! , नाश्ता करायची गरज नसती पडली तुला .. ", राज सेम आपली बत्तीशी काँटिणू करत बोलला. 

 

" Yuck , हे असे लीप किस करणं मुळात कोणाला आवडते कसे , मला तर हेच कळत नाही . Germs , viruses , diseases ची देवाणघेवाण . किती unhealthy आहे ते..".... समीर कसातरी चेहरा करत बोलला. त्याचे बोलणे ऐकून राजने डोक्यावर हात मारला. 

 

" तुझ्यासाठी आपण healthy किस तयार करू हा ! ", राज

 

" It's not a joke !", समीर 

 

" I am also serious !", राज 

 

" What do you mean ...?", समीर

 

" जेव्हा प्रेमात पडशील ना , तेव्हा तुझे हे जे सगळे फंडे आहेत ना व्हायरस, unhealthy वगैरे, सगळं विसरशील तू . त्या एका स्पर्शासाठी तुझं मन आसुसले राहील आणि त्याशिवाय तुला दुसरे काहीच गोड वाटणार नाही ", राज स्वप्नवत बोलत होता.

 

" Come on Raj , we are doctors and well matured too ! ", समीर 

 

"डॉक्टरांनी लीप किस करायचं नसतं , असे कुठे लिहिले आहे काय ? अन् असे असते ना तर कुठला मुलगा डॉक्टरच नसता झाला ( राज ला खूप हसायला येत होते ) बरं झालं डॉक्टरांसाठी असा काही रुल नाही बनवला, अन् बरे झाले तू तेव्हा नव्हता जेव्हा रुल्स बनवले , नाहीतर सगळ्यांची वाट लावली असती तू, अरसिक ", राज समीरची मस्करी करत होता. 

 

" बस झालं , चला उशीर होईल ?", समीर...

 

" हो हो चला, देवसेना खाली वाट बघत असेल", राज 

 

समीर ने एक रागीट लूक दिला, अन् राज ला त्याला असे त्रासलेले बघून जाम गंमत वाटत होती. 

 

********

 

क्रमशः 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️