Jan 26, 2022
मनोरंजन

Love ... Sky is not the limit 10

Read Later
Love ... Sky is not the limit 10

 

भाग 10

 

 

           आज्ञाचे सायलीच्या कारणाने समीरच्या घरी येणेजाणे वाढले होते. आता ती त्यांच्या घरी चांगलीच मिक्स झाली होती. समीर एक कारण तर होतेच, पण तिला घरातील बाकी सगळे लोकं सुद्धा खूप आवडले होते , सगळे अगदी साधे सिंपल लोकं होते, प्रेमाने आपुलकीने जीव लावणारे होते. घरातील वातावरण मोकळं होते, घरात गेले की खूप प्रसन्न वाटायचे , एक positive energy मिळायची , आज्ञाला समीरचे घर आपल्या घरा सारखे वाटू लागले होते , घरातील सगळेच तिला हवेहवेसे वाटू लागले होते. आज्ञाची आई लहानपणीच गेली होती, वडिलांनी दुसरे लग्न केले होते, नाही म्हटले तरी दुसऱ्या आईने फार काही माया लावली नव्हती, आणि वडील , राजकारणी असल्युळे ते सतत कामानिमित्त बाहेर असायचे , त्यामुळे आज्ञाला असे घरपण काही मिळाले नव्हते . त्यामुळे पण असेल ती समीरच्या घरच्यांकडे, त्यांच्या आपुलकी कडे आकर्षित होत होती . आणि आता आज्ञाचे पण धर्माधिकारी परिवारासोबत छान बाँडींग झाले होते. 

 

..........

 

 

" समीर ...... रेड रोज ! " , राज समोरून येणाऱ्या आज्ञा आणि तिच्या हातात असणाऱ्या रेड रोज कडे इशारा करत बोलला. 

 

            आज्ञाच्या हातात रेड रोज बघून समीर चांगलाच गोंधळाला. " आता ही घरात सगळ्यांसमोर हातातील लाल गुलाब देते की काय ".... तो भारीच टेन्शन मध्ये आला होता. 

 

" तुम्ही दोघांनी मला हार्ट अटॅक आणायचा पक्का प्लॅन बनवून ठेवला आहे.....", समीर 

 

" मी ...? ... मी काय केले ?", राज , जसेकाही मी काही केलेच नाही या आविर्भावात बोलला. 

 

" त्या दिवशी लायब्ररी मध्ये तूच केला ना आगाऊपणा ", समीर 

 

" मी तर तुझ्या फायदा साठीच बोललो, हरल्या तर त्या तुझा पिच्छा सोडणार आहे , त्या असे काही करणार नाही असे मला वाटले ", राज अगदी केविलवाणा चेहरा करत बोलला.  

 

" नाटकी दोघंही , तुला माहिती आहे ना त्या मिस डोक्याने कशा आहेत ते ", समीर

 

 

" मला कसे माहिती असणार , मी त्यांच्यासोबत इतका कुठं वेळ घालवला आहे ", राज 

 

" म्हणजे म्हणायचं काय तुला, मी रोज वेळ घालवतो त्यांच्या बरोबर ?" , समीर

 

" हा ... म्हणजे अल्मोस्ट रोजच भेटत असता तुम्ही , तर माझ्या पेक्षा तूच जास्ती ओळखतो ना त्यांना ", राज हसत मस्करीच्या सुरात बोलला. 

 

" तुला तर ना , मी नंतर बघतो ", समीर , आज्ञाला जवळ येताना बघून समीरचे हार्ट बिट्स खूप वाढले होते . 

 

" Good Morning आजोबा ", आज्ञा सकाळी सायलीकडे आली होती. 

 

" Good morning बेटा , ये आतमध्ये ", आजोबा पेपर वाचत बोलले. 

 

           आज्ञाने आपले शूज काढले आणि डायनिंग टेबल कडे येत होती. जशी जशी ती जवळ येत होती समीरचे तर डोकेच काम करायचे बंद करत होते . तो चोरून आज्ञाकडे बघत होता , आज्ञा काय करतेय याकडे त्याचे लक्ष लागून होते. 

 

 

" Good morning आज्ञा ".... सायली समीरच्या शेजारी डायनिंग टेबल वर बसली होती , आज्ञाला जवळ आलेले बघून म्हणाली. 

 

          आज्ञाने सायलीला झप्पी मारली, सायली समीर राज ला पाठमोरी होती, आज्ञाचा चेहरा समीर आणि राजकडे होता .." Beautiful morning darling ".... ती ओठांचा किस सारखा चंबू करत समीर कडे बघत बोलली आणि त्याला एक डोळा मारला..

 

" हे रेड रोज ?"... सायली तिच्या हातातील रेड रोज बघून बोलली. 

 

" This is for my love ❤️"... आज्ञा 

 

" Love ? कोण ?"..... सायली 

 

" आहे इथेच ".... आज्ञा 

 

" इथेच? कोण ?" , सायली राज कडे संशयी नजरेने बघत होती. 

 

" माझ्यावर का डाऊट घेते आहे , मी नाही ", या आविर्भावात राज ने डोळे आणि डोकं हलवले ..

 

तेवढयात आजी , आई पण बाहेर आल्या....

 

" आहे, खूप स्पेशल आहे , आज मी रेड रोज देणार आहे सगळ्यांसमोर ", आज्ञा 

 

         ते ऐकून समीरला तर उच्क्या लागायला लागल्या . राजला पण घाम फुटला .... 

 

" फुल प्लॅनिंगने आलेल्या दिसत आहेत मॅडम , जर या आज जिंकल्या ना तर तुझ्या प्रेमाचं राम नाम सत्य होईल , या करून घेतील प्रपोज समीर ला , पण तुझं काय , तू जर करशील सायली ला सगळ्यांसमोर प्रपोज , तर जोडे मारून बाहेर हाकलतील सगळे, आणि सगळ्यात आधी सायली "...." राज तू स्वतःहून पायावर कुऱ्हाड, नाही नाही कुऱ्हाडी वर पाय मारला ".... राज मनातल्या मनात बोलत समोर काय घडत आहे ते बघत होता... 

 

" कोण ग ?".... आई 

 

" मी येतो , मला उशीर होतो आहे हॉस्पिटलला जायला ....", समीर जागेवरून उठत बोलला आणि आपल्या रूमकडे जायला निघाला... 

 

"डॉक्टर ......", आज्ञाने आवाज दिला..

 

" आता हार्ट फेल होते माझं ", आज्ञाचा आवाज ऐकून तो जागीच खिळला, बाकी सगळे पण तिच्याकडे अवाक् होत बघत होते..

 

" राज, समीर तुझी चटणी कोशिंबीर सगळच बनावल्याशिवाय सोडणार नाही "राज मनातच बोलत फूल टेन्शन मध्ये आज्ञाकडे बघत होता, अधून मधून सायलीकडे बघत होता, सायली पण खाऊ की गिळू नजरेने त्याला बघत होती . 

 

          समीरसाठी तर ती वेळच थांबलेली त्याला भासत होती, आपण वेळेत अडकलो आहे , काहीच करू शकत नाही आहे, असे त्याला वाटत होते ... 

 

" डॉक्टर , अहो कुठे चाललात, थांबा थोडे "... आज्ञा 

 

" Happy Birthday आजोबा ", म्हणत ती आजोबांजवळ जात त्यांच्यासमोर खाली गुडघ्यांवर बसत आजोबंपुढे रोज पकडले ... 

 

" अरे वाह , तुला माहिती होते आज यांचा वाढदिवस आहे ते ", आजी

 

 

" हो मग , माझे आजोबा आहेत ते , मी कसे विसरणार ", ती हसत बोलली , आजोबांनी पण हसत तिच्या हातून फुल घेतले . " Thank you बेटा ".... 

 

         ते ऐकून समीरच्या जीवात जीव आला. राजला तर त्याचे प्राण परत आल्यासारखे वाटत होते ... 

 

" बरं माझ्याजवळ एक सरप्राइज आहे ", आज्ञा 

 

" Surprise , परत ! ", परत समीरची स्थिती आधीसारखी झाली. 

 

" एक झालं नाही की दुसरं टेन्शन मानेवर बसलं आहेच ?", राज समीर जवळ जात कानात खुस्पुसला.

 

" सगळं तुझ्यामुळे , तुला सोडणार नाही मी ", समीर 

 

" ते नंतर, पण आता काय आहे ? ", राज 

 

दोघंही परत आज्ञाकडे बघत होते

 

" काय ग , काय सरप्राइज आहे ?", सायली 

 

" बाहेर चला ".... आज्ञा 

 

" यांनी तर आपल्याला आधीच घराबाहेर काढायची सोय केली , माझा तर आहे फ्लॅट , तू तर रस्त्यावर आला समीर", राज 

 

" मी तुलाही रस्त्यावर आणेल ", समीर 

 

" अरे इथेच बोलणार काय , सगळे बाहेर चला ना , आजी , आजोबा या बघू "... आज्ञा , आज्ञा आजोबांचा हात पकडत बाहेर घेऊन गेली , बाकी सगळे तिच्या मागे आले. 

 

 

" समीर, बगीचा , गुलाबाचा ", राज परत समीरला घाबरवत बोलला. 

 

            समीर पण शॉक होत बाहेरील अंगणातील दृश्य बघत होता. बाहेर खूपसारे झाडांची रोपं ठेवली होती, त्यात गुलाबाची खूप होती , त्यांना छान रंगीबिरंगी टवटवीत फुले फुलली होती. 

 

" आपण पण किती मूर्ख , या आज्ञा मॅडम आहेत हे विसरलोच , त्यांचं लव्ह स्पेशल असणार आहे , एका फुलाने काय होणार यांचं .. l love you म्हणून थोडी मोकळ्या होतील या , आपली विचार करण्याची शक्ती जिथे संपते तिथून यांची थिंकिंग सुरू होते . काय करतील रे त्या आता ?".... राज 

 

 

" कोणी सांगितला होता तुला आगाऊपणा करायला ? आणि एक मिनिट , तू हरणार हे तर पक्के , तू कोणाला प्रपोज करणार आहे ? ", समीर त्याचाकडे संशयित नजरेने बघत होता ... 

 

" ओह गॉड , आता याचे पण डोकं चालायला लागले, आता काय उत्तर देऊ ".... राजला टेन्शन आले, तो रडका चेहऱ्याने समीर कडे बघत होता. 

 

" कोण काय , कोणीच नाही , असती तर तुला माहिती असते ना .... ", राज 

 

" मग त्या मिस अश्या का बोलल्या ?" ... समीर

 

" अरे , ती प्रपोजची बेट, मग प्रपोज असेल ना…..सिंपल आहे , आता प्रेम करावं लागेल कोणावर तरी ", राज 

 

" वाह , धन्य आहो मी , एक हे फकीर आणि एक ते ध्यान . ".... समीर 

 

" ध्यान नाही देवसेना , बघा काय करताय पुढे आता ....", राज हसू लागला. 

 

" तेच.... म्हणून I hate this love , girlfriend and all . ही मुलगी मला पागल करून ठेवेल ", समीर 

 

" आधी तुझं आयुष्य कसं बोर होते, आता रोजची वादळं यायला लागली ", राज 

 

समीरने राजवर एक खडूसवाला चिडका कटाक्ष टाकला. 

 

" दिल के डॉक्टर के लिये दिल का डॉक्टर अरेंज करून ठेवतो हॉस्पिटल मध्ये ", राज 

 

         समीरला काही समजले नाही, तो प्रश्नार्थक नजरेने राज कडे बघत होता. 

 

" आता हे सगळं झाल्यावर दिलच्या डॉक्टरला दिल का दौरा पडेल , तर सोय नको करायला " , राज

 

समीर ने त्याला एक रागीट लूक दिला. 

 

" पुढे , समोर बघ !", राज समीर ला खुणावत होता . 

 

 

क्रमशः 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️