|
माहेर हरवलेली सासुरवाशीण
मागच्या काही लिखाणातून मी "माहेर" आणि सासुरवाशिणी च तिच्या माहेराशी असलेलं नातं, आई-वडील, भाऊ -वहिनी, बहिणी मैत्रिणींनी केलेलं कौतुक असं सगळं मला वाटलेलं आणि कवींनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलेलं माहेरच चित्र शब्द बद्ध केलं. संतांनाही आईचा आणि तिच्या ममते ची ओढ लागावी मायेचा आईच्या सावलीचा मोह उत्पन्न व्हावा असं हे सुंदर रेशमी नाजुक नातं आहे माहेर आणि माउलीचे. कुणी विठ्ठलाला माऊली म्हणतात तर कोणी पंढरपूर हे माझं माहेर आहे असं मोठ्या मानानं सांगतात.
" आज माहेराला जाणं झाली झाली हो पहाट
आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट".
बहिणाबाईंच्या या दोन ओळी सासुरवाशिणी च्या मनातल्या भावना अगदी अचूकपणे शब्दात मांडतात.
लग्न होऊन लेक सासरी जाते तीथे रमते फूलते, आपलं म्हणून सासरचे अंगण मुलाबाळांनी फुलविते, त्या अंगणात मायेचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा सडा टाकते. आपल्या सोशिकपण, समजदारी न प्रत्येक नात्याचं हळुवार पण जपते. पण सगळीकडे असं होत नाही .
लग्न होऊन लेख सासरी गेल्यावर त्या घरात 'सून' त्या च्या मुलाची बायको, म्हणजेच नवी लक्ष्मी येते. तीही ह्या नव्या घराला, इथल्या परंपरांना, चालीरीतींना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतच असते, पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कुवत वेगळी, आणि सहनशक्ती ही कमी-जास्त असू शकते. मग घरात लहान-सहान गोष्टींवरून, कामावरून नव्या सुनेच्या आधुनिक विचारसरणीमुळे खटके उडू लागतात. पण घर म्हटलं, कुटुंब म्हटलं की, भांड्याला भांडं लागणारच असं म्हणून कधी सासू जुळवून घेते, तर कधी सूनं नमत घेते, पण काही काही घरात सासु हेकेखोर असते तर कधी सून हट्टी, आणि ज्या घरात अशा हेकेखोर सासू आणि हट्टी सूनेची जोडी असते, तिथे शांती आणि आनंद हे दोन्ही भावंडे पकडापकडीचा खेळ खेळतात.
ज्या घरातली सून हट्टी असते तिथे तर विचारूच नका, ह्या आधुनिक सून बाईंना सासूचं काहीएक ऐकायचं नसतं, सासु म्हणजे दुष्ट, सासर म्हणजे सुनेचा छळ करणार घर असं काहीतरी, किंवा कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीमुक्ती असल्या कल्पनांचं खुळ यांच्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. लग्न होऊन घरात आल्यानंतर त्यांना सासरच्या चालीरीती, परंपरा टाकाऊ वाटतात, आणि नवऱ्याने जरा काही केलं की, यांच्यातली रणरागिनी जागी होते . अश्या सुनांच्या हट्टामुळे आणि आता -ताई स्वभावामुळे घरातले जेष्ठ- श्रेष्ठ सारे गप गुमान मूग गिळून बसतात. मुलाचा संसार, समाजाचा धाक, लोक काय म्हणतील या सामाजिक, भावनिक, मानसिक, दबावाखाली सासू-सासरे आणि इतर मंडळी तोंडातून चकार शब्द काढत नाही. पण ही झाली सुनांची एक तऱ्हा सगळ्या काही अशाच नसतात. काही जवळ वेगळी शस्त्र असतात, डावपेच असतात, त्या नवऱ्याला सासू विषयी काही सांगतही नाही आणि सासुचा काही ऐकतही नाही . प्रत्येक गोष्टीत केवळ हो म्हणायचं पण करायचं मात्र काहीच नाही. याशिवाय काही जवळ गनिमी काव्याचे अनेक मार्ग असतात, नवऱ्याला त्याच्या स्वभावानुसार आणि लहरीनुसार वागून, योग्यवेळी आपल्याला हवं तसं हवं तेव्हा खिंडीत धरून धारातीर्थी पाडायचं, आणि प्रत्येक वेळी आपण मात्र साळसूदपणाचा आव आणायचा. काही जणी फक्त चांगुल पणाचा आव आणतात, नवऱ्यासमोर बाहेरच्या समोर छान छान वागतात आणि शेवटी जे करायचं तेच करतात.
"अरे लागले डोहाळे ,सांगे शेतातली माती
माहेरचं गुणगान गाया लेक येणारे पोटी"
डोहाळे लागलेल्या नवविवाहितेच्या मनातल्या भावना बहिणाबाईंनी अगदी तंतोतंत शब्दबद्ध केल्या आहेत त्या नवविवाहितेला मला मुलगीच व्हावी असं वाटते आहे, कारण मुलगीच आपल्या माहेरचा गुणगान करते आणि सासरच्या चालीरिती सांभाळून दोन्ही घरांचा वारसा जपते.
पण कधीकधी मोठ्या कुटुंबात चार-पाच भावंडात आईची जबाबदारी किंवा वडिलांच आजारपण सगळ्यात लहान मुलावर येतं पण त्याची बायको एवढी चतुर असते की स्वतःची नोकरी मुलं-बाळं यांचा कारण देऊन ती अंगावर ची जबाबदारी झटकते. नाईलाजास्तव आईचं किंवा वडिलांचं म्हातारपणा चा सांभाळ परिस्थितीनुसार भावंड आतल्या बहिणीला किंवा मुलीलाच करावा लागतो.
अजुन एक उदाहरण आई-वडील आणि बहिण भाऊ असं चौकोनी कुटुंब पण काही कारणास्तव आईचं निधन होतं भाऊ परदेशात नोकरीला असतो आणि त्याची बायको एका मोठ्या महानगरात नोकरी करत असते त्यामुळे आपल्या नोकरीचं कारण देऊन सासर्याची जबाबदारी झटकते किंवा गावाकडचं त्यांचं घर त्यांनी विकून हिच्या नवऱ्याच्या नावे म्हणजेच त्यांच्या मुलाच्या नावे करावं असा तगादा सासऱ्याच्या मागे लावते. आणि जेव्हा तेव्हा ह्या सुनेला माहेरी जायचं असतं तेव्हा ती सासर्याला त्यांच्या मुलीकडे म्हणजेच स्वतःच्या नदे कडे रवाना करते.
वरील दोन्ही उदाहरणात कुटुंबात भाऊ आहे पण त्यांचा म्हाताऱ्या, आजारी आई-वडिलांना काडीचाही उपयोग झालेला नाही, तरीही आपल्या समाजात अजूनही सगळ्यांना वंशाच्या दिव्या साठी मुलगाच हवा आहे.
आणखी शेवटचे एक उदाहरण दोघेही नवरा बायको उच्चविद्याविभूषित सासरची मंडळी सुसंस्कृत आणि सुशिक्षित, त्यात बायकोला दिवस गेलेले सातव्या महिन्याच्या डोहाळे जेवणा करता तिची आई आली तर, सासू म्हणाली नवव्या महिन्यात न्या, आणि नवरा त्याच शहरात बायकोच्या डिलिव्हरीसाठी हटून बसलेला, शिवाय नवर्याच्या वडिलांनी म्हणजेच सासऱ्यांनीआठव्या महिन्यात एकदमच पवित्रा बदलला आणि हीला माहेरी घेऊन जा असा तगादा लावला. त्याच गावात त्या सुनेची वहिनी असूनही उपयोग नव्हता, कारण तिची वहिनी तिचं बाळंतपण करायला तयार नव्हती. या सगळ्या गोंधळामध्ये बिचाऱ्या सुनेचे बीपी वाढलं, पोटातल्या मुलाचे ठोके वाढले, तिची म्हातारी आई धावत पळत त्या शहरात आली आणि स्वतःच्या मुलगा सुनेचे घर असूनही दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये आपल्या मुलीला घेऊन बाळंतपणासाठी भाड्याने राहिली.
अजून एक अनुभव नवीन लग्न होऊन सासरी आलेली मोठ्या घरची बडे बाप की बेटी तिला सासू म्हणजे नेहमी दुष्ट वाटायची, सासरी गेल्यावर सासूने जराशी नंदीची तारीफ केली, कौतुक केलं की, ह्या सून बाईंचा ळफळाट व्हायचा. "आमचे एवढं मोठं घराणं पण आमच्या घरी नाही अशी रीत" हीच पालुपद सुरु व्हायचं. आणि मग एक दिवस हिन नणंदेची खोली आवरली, तिचं सामान सासूच्या खोलीत नेऊन ठेवलं, आणि ती खोली चक्क स्टोअर रूम केली. आणि सासूला निक्षून सांगितलं "आता ननंद बाईचं घर नाही हे माझं घर आहे. त्यांचं सामान वाटलं तर तुमच्याकडे ठेवा नाहीतर, त्यांच्या घरी पाठवून द्या, आता काय त्या इथे फक्त चार दिवसांच्या पाहुण्या"
ही काही वानगीदाखल उदाहरणे दिली आहेत. यात मुलींच्या मनात माहेरा बद्दल ओढ आहे, प्रेम आहे, पण परिस्थितीनुसार त्यांच्या संपर्कातील वा नात्यातल्या व्यक्तींच्या स्वभावानुसार त्या माहेराला पारख्या झालेल्या आहेत.
हा सगळा झाला सुनांचा मामला, पण काही काही सासवा ही दुष्ट असतात. त्यांना सून म्हणजे त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडणारी, घरात भांडण लावणारी, घर फोडणारी, घरातला आपला मान आणि संपत्ती हिस करणारी वाटते, मग ह्या सासवा सुनांना नाना तऱ्हेने त्रास देतात, कधीकधी त्या सुनेच्या रूपाचा, शिक्षणाचा, माहेराचा येता-जाता उद्धार करतात, तर कधी आपल्याच मुलाला सुने विषयी खोटं खोटं सांगून, त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करतात. तर काही ही सासवा ह्या अत्यंत मुत्सद्दी असतात, मोठं कुटुंब असेल तर, मोठ्या सुनेला आणि लहान नीला वेगवेगळ्या पद्धतीने वागवतात, कधी मोठी चा लाड तर लहानी चा उद्धार. कधी मोठी ला प्रेमळ समज तर धाकटी ला मोठ्यांच्या मानाचा धाक दाखवतात. कधी मुलीला म्हणजेच सुनेच्या नंदेला तर कधी मुलाला हाताशी घेऊन स्वतःचे वर्चस्व गाजवत राहतात. "लेकी बोले सुने लागे" ही म्हण त्या सर्वस्वी खरी करून दाखवतात.
काही सास वांचा संसारात एवढा जीव असतो की, कोणताही सण असो असो अगदी नवविवाहिते सारख्या जिकडेतिकडे वावरतात. त्यांना सुनेचं काहीच पटत नाही, त्या फक्त तिला ओझ्याचा बैल करून ठेवतात. त्यांच्या हाताखालची काम करण्यासाठी, मदत करणारी मदतनीस एवढीच सुनेची भूमी का मर्यादित करतात. तू नवी आहेस तुला जमणार नाही, तुला कळणार नाही, तुला समजणार नाही, असंच सारखं पालुपद त्यांचं सुरू असत.
काही सास वांना परिस्थिती मुळे, माहेरच्या काही अडचणींमुळे शिक्षण घेता आलेलं नसतं. सासरीही नंदा -जावा -सासू ह्या तिड्यात त्या सापडतात, आणि हा सासर -माहेर चा आयुष्यभराचा राग त्या आपल्या शिकलेल्या सुनेवर काढतात." तू खूप शिकलेली आहे पण मला शिकवू नको", " तुझं पुस्तकी ज्ञान तुझ्याजवळ ठेव" किंवा, मग नोकरी करणारी सून असेल तर, " तुला बरं बाई रोज बाहेर जायला, मनासारखं घालायला- करायला -वागायला मिळत, आम्हाला तर उंबरा ओलांडायची कोजागरी नव्हती. घराबाहेर गेलो ते केवळ हळदी-कुंकू किंवा लग्न- मुंजी हा करताच बर का" " तुझ्या सासऱ्यांना कधी कोणता आर्थिक व्यवहार मला सांगितलं नाही आणि कधी माझ्याशी मसलत ही केली नाही" ' तुझं बरं आहे बाई, सगळं अगदी मनाप्रमाणे करतेस आमचा "शिवाही" तुला एका शब्दानं बोलत नाही, असे संवाद वारंवार ऐकविले जातात.
सासू-सून हे नातं चिरंतन आहे अगदी तसंच जसं आई आणि मुलगी किंवा, पती-पत्नी पण जर समजदारी असेल तर प्रत्येक घराचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी एक आठवण सांगावीशी वाटते एका घरात वडील वारले त्यांना मुलगा नव्हताच, चारी दिशातून मुली आपल्या मुलाबाळांसह सोबत आलेल्या, सगळे सोपस्कार झाले तेव्हा नातेवाईक आतली एक वयस्कर, जाणती आजी म्हणाली "बाई मुलगी झाली की सगळ्यांचे तोंड उतरतात सगळ्यांना मुलगाच हवा असतो," पण अखेरच्या दिवशी "मुली पाहिजे रडायला आणि जावई पाहिजे न्यायला" , म्हणजे मुलगा सून त्यांचे कर्तव्य करतातच पण आईवडिलांसाठी एका मुलीचं मन जेवढे तुटतं तेवढं इतर कुणाचा तुटत नाही बहिणाबाईंच्या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी सांगितल्याशिवाय मन राहावत नाही, आहे त्या जोग याला म्हणतात,
"एक अरे जोग्या ध्यान देऊन काय मी सांगते,
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"
|
ReplyForward