भाग 4
राहुल औषधे घेऊन आला. अगम्य अजून ही झोपला होता. अभिज्ञा त्याच्या जवळ स्टुलावर बसून त्याला फक्त पाहत होती. राहुलने औषधे टेबलवर ठेवली आणि तो अभिज्ञाशी बोलू लागला
राहुल औषधे घेऊन आला. अगम्य अजून ही झोपला होता. अभिज्ञा त्याच्या जवळ स्टुलावर बसून त्याला फक्त पाहत होती. राहुलने औषधे टेबलवर ठेवली आणि तो अभिज्ञाशी बोलू लागला
राहुल,“thanks मॅडम तुम्हीं अम्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आणि sorry आमच्या मुळे तुम्हाला त्रास झाला. तुम्ही आता घरी जाऊ शकता. मी आहे अम्या जवळ असं ही आता संध्याकाळ झाली आहे. तुमचे घरचे काळजी करतील” तो नम्रतेने म्हणाला
अभिज्ञा,“ तुम्हीं अगम्यचे कोण? आणि इतके होऊन ही त्याचे आई-वडील हॉस्पिटलमध्ये अजून कसे आले नाहीत?असे कसे आहेत ते? तो नीट जेवतो की नाही हे पण पाहत नाहीत!” ती थोडे आश्चर्य मिश्रीत रागाने म्हणाली.
राहुल खिन्न पणे हसत बोलू लागला.
राहुल,“ आई-वडील असतील तर येतील आणि काळजी घेतील ना मॅडम!” तो म्हणाला
अभिज्ञा,“काय?” आश्चर्याने ओरडली
तिच्या आवाजाने झोपलेला अगम्य थोडासा हलला. हे पाहून राहुलने अभिज्ञाला खून करून बाहेर येण्यास सांगितले. राहुल व अभिज्ञा रूमच्या बाहेर गेले. राहुल आता बोलू लागला.
राहुल,“ अहो मॅडम मी आणि अगम्य औरंगाबादच्या शारदा सदन या अनाथ आश्रमात वाढलो आहोत ”
अभिज्ञा,“ आsss काय सांगतोस काय? मग अगम्यचे देशमुख हे आडनाव !" ती चकित होऊन राहुलला म्हणाली
राहुल,“ तीच तर गंमत आहे मॅडम! अम्याला अनाथ आश्रमात कोणी तरी सोडले खरे पण त्याच्या बरोबर एक चिठ्ठी होती. या मुलाचे नाव अगम्य देशमुख आहे आणि त्याची जन्म तारीख आहे 20 जून! जेंव्हा त्याला आश्रमात सोडण्यात आले तेंव्हा तो अवघ्या पाच दिवसांचा होता. गंमत म्हणजे तो अनाथ असून ही त्याची स्वतःची ओळख आहे.आमच्या अनाथ आश्रमात त्याचा एकट्याचाच खरा वाढदिवस माहीत आम्हाला! तो लहानपणा पासून हुशार आणि राजबिंडे रूप म्हणून अनेक लोकांनी त्याला दत्तक घेण्याचा प्रयत्न ही केला. पण बरोबर असलेल्या चिठ्ठी मुळे लोकांना ही भीती वाटली की उद्या त्याच्यावर हक्क सांगायला त्याचे खरे आई-बाप आले तर! म्हणून तो सनाथ असून अनाथ राहिला आहे. एखाद्या शापित राजकुमारा सारखा कल युगातील कर्णच जणू! त्याची अदब, स्वाभिमानी व करारी स्वभाव, हे राजबिंडे रूप हे सगळं पाहून वाटते की तो कोणी मोठ्या घराण्यातील असावा!” हे सगळं सांगून राहुलने एक दीर्घ श्वास सोडला.
हे सगळं अभिज्ञा अवाक होऊन ऐकत होती. अभिज्ञाने राहुलला विचारले.
हे सगळं अभिज्ञा अवाक होऊन ऐकत होती. अभिज्ञाने राहुलला विचारले.
अभिज्ञा,“पण हा पंधरा दिवसां पासून उपाशी कसा आणि तुम्ही राहता कुठे खाता काय?" ती म्हणाली
राहुल,“ अठरा वर्षे पूर्ण झाली की आमच्या सारख्या मुलांचा आश्रमाचा ही आश्रय सुटतो. आमची बारावी झाली की आमचं आश्रम सुटले. आश्रमात काम करणाऱ्या एका काकांच्या मदतीने आम्हा दोघांना एका फर्म मध्ये पार्ट टाईम जॉब मिळाला. आम्ही तेथेच जॉब करतो आणि शिक्षण ही घेत आहोत. एक रुम भाड्याने घेऊन गेल्या काही वर्षां पासून तेथेच राहत आहोत. मेसचा डबा खातो. पण गेल्या काही दिवसां पासून तुमच्या रिसर्च मुळे अम्याचा आणि मेसच्या डब्याचा टाईम मॅच होत नाही. तो सकाळी नऊ वाजता निघतो रूम वरून आणि मेसचा डबा अकरा वाजता येतो.परत आल्यावर त्याला जॉबला चार वाजता जावे लागते तो रात्री बारा वाजता येतो. त्यामुळे रात्री ही मग तो कधी जेवतो तर कधी न जेवता थकून तसाच झोपतो! तब्बेतिची अशी हेळसांड केल्यावर शरीर तर किती दिवस साथ देणार ना!” तो म्हणाला.
हे सर्व ऐकून अभिज्ञा तिथेच एका खुर्चीवर स्तब्ध होऊन बसली. राहुल अगम्य जवळ जाऊन बसला. थोड्या वेळाने आगम्य उठला. राहुलने अभिज्ञाला हाक मारून बोलावून घेतले. अगम्य डोळे उघडून इकडे तिकडे पाहत होता. अभिज्ञा त्याच्या जवळ आली आणि राहुल डॉक्टरला बोलवायला गेला. अगम्य अभिज्ञाला पाहून म्हणाला.
अगम्य,“ sorry अभिज्ञा! माझ्यामुळे तुला त्रास झाला.” तो म्हणाला.
डॉक्टर आणि राहुल आले.डॉक्टर अगम्यला तपासत त्याला म्हणाले.
डॉक्टर,“ कसं वाटतंय तुला आता?"
अगम्य,“ मी ठीक आहे डॉक्टर! मी आता घरी जाऊ शकतो का?" त्याने विचारले
डॉक्टर,“ अजिबात नाही तुला अजून तीन दिवस मी घरी जायची परवानगी देऊ शकत नाही. तू आराम कर!” डॉक्टर उत्तरले.
आणि राहुलला बाहेर येण्यासाठी खुणावून ते निघून गेले. राहून त्यांच्या मागोमाग गेला.आता अभिज्ञा अगम्यला बोलू लागली.
आणि राहुलला बाहेर येण्यासाठी खुणावून ते निघून गेले. राहून त्यांच्या मागोमाग गेला.आता अभिज्ञा अगम्यला बोलू लागली.
अभिज्ञा,“ असं वाटतंय तुला आता?”
अगम्य,“ मला बरं वाटतय आता! माझ्या मुळे तुला खूप त्रास झाला.”तो म्हणाला
अभिज्ञा,“ हो ना तू खूप त्रास दिला मला! तू पडलास बेशुद्ध आणि त्या निर्जंन टेकडीवर मी एकटीच तुला इथं पर्यंत कसं आणले मलाच माहीत!” ती जरा रागानेच म्हणाली.
अगम्य,“ सॉरी ” तो तोंड पाडून म्हणाला
अभिज्ञा,“ सॉरी काय सॉरी! तुला मला खोटं बोलताना जरा पण लाज नाही वाटली का? आता मलाच गिल्टी वाटतंय इतके दिवस मी तुझ्या समोर जेवत होते. तुला स्वाभिमान जपायचा आहे तुझा जप की! पण हे असं विचित्र वागून आणि स्वतःच्या तब्बेतिची हेळसांड करून!” ती रागाने बोलत होती.
अगम्य,“ सोड ना मी ठीक आहे आता! तू जा घरी तुझ्या घरचे काळजी करतील!” तो म्हणाला
अभिज्ञा,“ जास्त बोलशील ना तर एक ठोसा देईन तुझ्या तोंडावर! मूर्ख कुठला? जागा झाला की लगेच डॉक्टरला विचारतोय मी घरी जाऊ का?” इतका वेळ दाबून ठेवलेला राग उफाळून आला अभिज्ञाचा
मागून आलेला राहुल हे सगळं ऐकत होता आणि तोंडावर हात ठेऊन फिदीफिदी हसत होता. हे अगम्यने पाहिले आणि तो राहुल कडे रागाने पाहत होता.
मागून आलेला राहुल हे सगळं ऐकत होता आणि तोंडावर हात ठेऊन फिदीफिदी हसत होता. हे अगम्यने पाहिले आणि तो राहुल कडे रागाने पाहत होता.
अगम्य,“ तू तर दादागिरी करायला लागलीस की माझ्यावर!” तो कुसनुस हसून म्हणाला.
अभिज्ञा,“वेळ आल्यावर मारू ही शकते हा मी! माझ्या पासून सावध राहा! आधीच तू माझं डोकं फिरवलं आहेस! माझे बाबा तुमच्या दोघांसाठी डबा घेऊन येत आहेत. ते आल्यावर जाईन मी त्यांच्या बरोबर!” ती म्हणाली.
अगम्य,“ त्यांना अजून आमच्यासाठी त्रास कशाला दिलास?”तो वैतागून म्हणाला
अभिज्ञा,“ आता तोंड बंद कर तुझं आणि आराम कर गप्प! तीन दिवस मी दोन टाईम आणत जाईन डबा दोघांना ही! तुमच्या नाष्ट्याचे तेव्हढे बघ रे बाबा राहुल! आणि अजून एक आपण जो पर्यंत रिसर्च करत आहोत ना तो पर्यंत मी तुझ्यासाठी पण डबा घेऊन येत जाईन अगम्य! ” ती म्हणाली
अगम्य,“ पण तू कशाला त्रास घेत आहेस एवढा!”तो वैतागून म्हणाला
अभिज्ञा,“ या अशा त्रास पेक्षा तो त्रास परवडला मला! नाय तर तू परत चक्कर येऊन पडायचा आणि मला अन या राहुलला फुकटचा त्रास! वाटले तर मेस लावली असं समज माझ्याकडे समजले का?” ती दर्डावून अगम्यला म्हणाली.
अगम्य,“ हो माझी आई! पण हे असं मला दम देणं बंद करा आधी! आजारी माणसाशी असं बोलत का कोणी?” तो तोंड बारीक करून म्हणाला.
हे ऐकून राहुल आणि अभिज्ञा हसायला लागले.अगम्य मात्र रडकुंडीला आला होता. या आधी कोणीच त्याच्यावर असा हक्क गाजवला नव्हता. अभिज्ञाच्या असं त्याच्यावर हक्क गाजवण्याने तो मनोमन कोठे तरी सुखावला होता.
अभिज्ञाचे बाबा डबा घेऊन आले. अभिज्ञाने अगम्य आणि राहुलची ओळख करून दिली. ते दोघे जेवले आणि अभिज्ञा तिच्या बाबां बरोबर निघाली पण जाताना राहुलला म्हणाली
अभिज्ञा,“ राहुल या अगम्यने जर काही केलं! जर घरी जाऊ म्हणाला तर मला फोन कर. माझा नंबर फीड करून घे!” असं म्हणून तिने राहुलला तिचा नंबर दिला आणि अगम्यला पाहत म्हणाली
राहुल,“ ठीक आहे मॅडम!” तो म्हणाला
अभिज्ञा,“ ये माझं नाव अभिज्ञा आहे मॅडम नाही” असं म्हणून ती गोड हसली.
अगम्यच्या जवळ जात त्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत ती अगम्यला म्हणाली.
अगम्यच्या जवळ जात त्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत ती अगम्यला म्हणाली.
अभिज्ञा,“ अगम्य हे बघ तू आता फक्त आराम कर बाकी विचार करू नकोस आणि काळजी घे स्वतःची! मी उद्या येईन पुन्हा! आराम कर!” ती प्रेमाने म्हणाली.
अगम्यने नुसती होकारार्थी मान हलवली. तो असा प्रेमळ आणि मायेचा स्पर्श पहिल्यांदाच अनुभवत होता.
अभिज्ञा आणि अगम्यची ही प्रेमळ मैत्रीची सुरवात आता कोणते नवे वळण घेणार होती? अभिज्ञाचा जीव अगम्य वर जडला होता का?
क्रमशः
क्रमशः
टीप -सर्व लेखाचे अधिकार लेखकाच्या सुपूर्द