Login

लूप होल भाग 2

Suspense Story
भाग 2
अभिज्ञा गोरी गोमटी, थोडीशी नकट्या नाकाची , मोठ्या गहिऱ्या काळ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची , उंचीला थोडी कमी  आणि स्थूल देहाची पंचवीस वर्षांची तरुणी! तिने इतिहास मधून M. A केले होते आणि Ph.D साठीची एन्ट्रन्स दिली होती. तिला औरंगाबाद विद्यापीठाने मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. घोलप यांचा रेफरन्स दिला होता.तिची आज याच संदर्भात डॉ. घोलप यांच्या बरोबर पहिलीच मिटिंग होती आणि तिला नेमका आज उशीर झाला होता मिटिंग अकरा वाजता त्याच्या ऑफिसमध्ये होती. आणि ती निघाली साडे दहा वाजता म्हणूनच ती भरधाव वेगाने तिची स्कुटी दांबटत होती. ती डॉ. घोलप याच्या ऑफिसच्या चौकात पोहचली  आणि तिच्या स्कुटी समोर झेब्रा क्रॉसिंग वरून जाणारा एक तरुण आला. तिने स्कुटीचा ब्रेक करकचून दाबला तरी त्या तरुणाला स्कुटी थोडी धडकली आणि तो तरुण खाली पडला. 



            अभिज्ञा वैतागून स्कुटी वरून उतरली व त्या तरुणाला  रागानेच हात देऊन उठवत म्हणाली.

 
अभिज्ञा,“ काय वो मिस्टर जीव द्यायला माझीच गाडी मिळाली का तुम्हाला?” 

         आणि तो पाठमोरा तरुण उठला आणि त्याचे कपडे झटकत  व त्याचा खरचटलेला हात पाहून तिला बोलू लागला. दोघांची नजरा-नजर झाली आणि अभिज्ञा त्याला भान हरपून पाहतच राहिली. गोरा-गोमटा गाजरा सारखा लाल रंग जो रागाने आणखीन लाल झाला होता, सरळ चाफेकळी नाक, घारे मंत्रमुग्ध करणारे डोळे, सहा फूट उंची आणि शिडशिडीत बांधा! ती त्याला भान हरपून फक्त पाहत होती.तिला त्याच्या टपोऱ्या ओठांची हालचाल दिसत होती पण ऐकू काही येत नव्हते. तो हातवारे करून बोलत होता आणि अभिज्ञा त्याला नुसती पाहत होती. शेवटी त्याने तिच्या समोर चुटकी वाजवली आणि ती भानावर आली. 

 
तरुण,“वो मॅडम मी जीव देत नव्हतो तर तुम्हीच माझा जीव घेतला असता बघा ही झेब्रा क्रॉसिंग आहे.”

 
तो पर्यंत लोक जमा झाले होते आणि त्या तरुणाला लागलेले पाहून पोलिसांना बोलावू  का असे विचारत होते? हे ऐकून अभिज्ञा घाबरली आणि त्या तरुणाला म्हणाली.
 
अभिज्ञा,“ sorry चूक माझीच होती. मी तुम्हांला पैसे देते तुमचा इलाज करून घ्या पण पोलिसात नका जाऊ प्लिज!" ती त्याला विनंती करत  म्हणाली आणि तिने तिच्या पर्स मधून पैसे काढले.
         ते पाहून तो तरुण चिडला आणि तिला म्हणाला.
 
तरुण,“ त्याची काही गरज नाही मॅडम माझा इलाज मी करून घेईन असं ही मला उशीर होतो आहे.” असं म्हणून तो निघून ही गेला आणि अभिज्ञा तिच्या पाठ मोऱ्या आकृती कडे पहात राहिली.
          लगेच भानावर येऊन तिने स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि ती डॉ. घोलपांच्या ऑफिस मध्ये पोहचली. ती जाऊन बसली आणि मघाशी तिच्या स्कुटीला  धडकलेला तरुण ही तिला तिथे बसलेला दिसला. त्या तरुणानी तिला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याचा राग व्यक्त करत होते. आणि अभिज्ञा हा इथे काय करतोय?म्हणून विचार करत होती. डॉ.घोलप लॅपटॉपवर काही तरी करत होते त्यांनी लॅपटॉप बंद केला आणि बोलायला सुरुवात केली. 

 
डॉ.घोलप,“ तर अभिज्ञा आई-बाबा कसे आहेत? तुझ्या आईने खूप आग्रह केला होता मला की मीच तुला गाईड करावं आणि मला त्यांचा आग्रह नाही मोडवला.” ते म्हणाले.
 
अभिज्ञा,“ हो सर कारण आईच असं मत आहे की तुम्ही बेस्ट आहात.” ती म्हणाली.
 
डॉ.घोलप,“ बरं तू अगम्य देशमुखचे नाव ऐकले आहेस का?” त्यांनी विचारले.
 
अभिज्ञा,“ हो सर त्याने या वर्षीच्या Ph.D च्या एन्ट्रन्स एक्साम मध्ये टॉप केलय आणि त्याला या वर्षाची औरंगाबाद विद्यापीठाची फेलो शिप माळाली आहे.” ती उत्सुकतेने म्हणाली.

 
डॉ.घोलप,“ तर तो टॉपर अगम्य देशमुख म्हणजे हा आहे. मी स्वतः हुन  याचे मार्गदर्शन करण्यासाठी याला बोलावून घेतले कारण याच्या सारखा हुशार विद्यार्थी मला हवा आहे” ते त्याच्याकडे पाहत म्हणाले.
 
अगम्य,“ काही तरीच काय सर मला तुमच्या सारखा मार्गदर्शक मिळाला  हे माझे भाग्य!" तो नम्रतेने म्हणाला.
 
    अभिज्ञा अगम्यकडे आश्चर्याने पाहत होती कारण ज्या टॉपरची विद्यापीठात चर्चा होती तो हा होता.
 
डॉ.घोलप,“ बरं तुमचे प्रबंधाचे विषय जवळ जवळ सारखेच आहेत त्यामुळे तुम्हाला एकमेकांची खूप मदत होईल by the way मला तुमच्या दोघांच्या प्रबंधाच्या विषयाची थोडक्यात माहिती द्याल!अगम्य तू सांग जरा तू कोणता विषय निवडला आहे ते!” ते म्हणाले
 
 आणि इतका वेळ शांत बसलेला अगम्य आता अगदी आत्मविश्वासाने बोलू लागला.
 
अगम्य,“ सर माझा प्रबंधासाठीचा विषय आहे भारतीय पुरातन मंदिरे त्यांचा इतिहास आणि त्यांच्या बांधणी मागील कारणे!” तो म्हणाला.
 
डॉ.घोलप,“ अगदी उत्तम विषयाची निवड आहे अगम्य आणि अभिज्ञा तुझा काय विषय आहे” ते म्हणाले
 
अभिज्ञा,“ भारतीय मंदिरांची बांधणी आणि त्याचा कालावधी ” ती म्हणाली
 
         डॉ. घोलप काही जाडजूड पण खूप जुनी अशी काही पुस्तके टेबलावर ठेवत त्या दोघांकडे पाहत म्हणाले.
 
डॉ.घोलप,“ बरं! तर ही काही भारतीय पुरातन मंदिरांची माहिती असलेली पुस्तके आहेत हि तुम्ही विभागून घ्या त्यांचा अभ्यास करा नोट्स काढा आणि पंधरा दिवसांनी एकमेकांना एक्सचेंज करा आणि एक महिन्या नंतर तुमच्या तयारी निशी मला भेटा!” ते म्हणाले.
    
        खरं तर अगम्यला अभिज्ञाशी संपर्क ठेवण्यात काही रस नव्हता पण पुस्तके एक्सचेंज करावी लागणार होती म्हणून त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला व स्वतःचा  तिला दिला. पण अभिज्ञा मात्र त्याची ओळख ऐकून इंम्प्रेस होती आणि ती खुश होती कि तिला अगम्य कडून बरंच काही शिकायला मिळेल.
 
हि  भेट अगम्य आणि अभिज्ञाच्या आयुष्यात एक नव्या अध्यायाला सुरवात करणार होती. अगम्य कोण होता? त्याची ओळख पुढच्या भागात!
क्रमशः

🎭 Series Post

View all