लोकमान्य टिळक आणि कोसळलेल आभाळ

टिळकांची एक सुंदर कथा


आपणा सगळ्यांना लोकमान्य टिळकांची ती प्रसिद्ध गोष्ट शेंगाच्या टरफलाची गोष्ट माहिती असतेच. कारण प्रत्येक टिळक जयंतीला सर्व मुलं मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफल उचलणार नाही ही गोष्ट सांगतातच सांगतात. पुन्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं आपणा सगळ्यांना माहित असतं.

आज मी तुम्हाला याच लोकमान्य टिळकांच्या दुर्दम्य आत्मविश्वास दर्शवणारी एक गोष्ट सांगणार आहे.

एकदा वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले की मुलांनो समजा तुमच्या वर जर आभाळ कोसळले तर तुम्ही काय कराल.

वर्गातली सगळी मुलं तर घाबरूनच गेली. आभाळ कोसळणं किती भयंकर गोष्ट. हे आकाशातले मोठं मोठे ग्रह तारे जमिनीवर पडले तर सगळं संपूनच जाईल ना. कुठं पळायचं, कुठं लपायच. कोणाला काहीच सुचेना.

अशा वेळी, लोकमान्य टिळक उभे राहिले आणि ताठ मानेने म्हणाले, गुरुजी जर आभाळ कोसळून पडलं ना तर मी त्यातले चंद्र, सूर्य, तारे जमा करून घेईन. आणि त्यांचा माझ्या देशासाठी वापर करेन.

असं आभाळ कोसळलं असताना ज्यांच्या मनात चंद्र, सूर्य, तारे वेचण्याचा विचार तात्काळ निर्माण होतो त्या लोकमान्य टिळकांचा दुर्दम्य आत्मविश्वास या गोष्टीतून दिसतो.

यांचं टिळकांनी शरीर सुधृढ व्हावं म्हणून विध्यार्थीदशेत एक वर्ष व्यायाम करण्यासाठी घालवलं होतं ही पण अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे.