लॉकडाउन सहजीवन

Comedy Play
लॉक डाऊन सहजीवन
 नवरा -सून साहेबा सून
प्यार की धुन
मैने तुझे चून लिया
तू भी मुझे चुन चुन चुन......

बायको-चुन-चुन के मारुंगी सबको.

नवरा- (घाबरतच) क....क काय झालं?

बायको-अहो बघा ना घरात किती झुरळं झाली आहेत ते.
तुमचं कशात म्हणजे कशात लक्षचं नसतं मुळी.

नवरा- हुश्श्य ......(घाम पुसत) एवढंच ना.

बायको -एवढंच ना?मग आणखी काय व्हायला हवय.घरात काय वाघ,सिंह,कोल्हे व्हायला हवेत काय?(चिडून म्हणते)

नवरा -(समजुतीच्या सुरात)अगं तसं काही नाही गं.

बायको -(अजुनही रागातच) बरं ते जाऊद्या भांडी नीट घासा आज. काल भांड्यांना साबण तसाच राहिला होता. आणि हो जरा चहा टाका आलं घालून.

नवरा -(बिचारा) हो हो करतो मस्त फक्कड चहा करतो. बरं मी काय म्हणतो आज जेवायला काय करायचं.

बायको - आज ना छान बाजरीची भाकरी,वांग्याची भाजी, वरण- भात असा बेत करा.

नवरा - बर बर करतो करतो.

बायको - आणि हो जरा तुमच्या बंड्याच्या अभ्यासाचं पण
बघा हं.....

नवरा - अग पण भाकरी च काय करायचं मला जमत नाहीत
चांगल्या.

बायको - ठीक आहे पण मी फक्त भाकरी च करणार आहे .
बाकीचं सारं काही तुम्हीच करायचं आहे.

नवरा - हो हो करतो ना, करतो. पण, तू जरा तेवढा केर
काढतेस का? म्हणजे माझं काम जरा लवकर
झालं असतं.

बायको - काऽऽऽय !आधीच मी कित्ती दमलिये.… योगासनं ,
प्राणायाम,ऑनलाईन झुंबा करून.शीऽऽ मी नाही
बाई आता आणखी दमणार. मी आता आराम
करणार आहे.मग मस्त जेवणार, मग नंतर
वामकुक्षी,परत संध्याकाळी ऑनलाईन किटी
नंतर रात्रीचं जेवण आणि मग झोप.

नवरा - अग पण मी माझे कॉल कधी अटेंड करू.त्यापेक्षा
माहेरी गेली असतीस ते परवडलं असतं.

बायको - तेच, तेच म्हणायचय मला. परवा तुम्हीच म्हणत
होता ना सारखं माहेर - माहेर करते म्हणून. मी
माहेरी गेल्यावर असं सगळं मला हातात मिळतं.
म्हणून, मी आता ठरवलं आहे आठ दिवस माहेरी
आलीय असं वागायचं.नाहीतर असं लॉक डाऊन
परत थोडीच येणार आहे. ?

नवरा - हो ना असं लॉक डाऊन परत कधीच नको रे देवा.
ऑफिस मधला तो बॉस परवडला पण घरातील ही
अंबाबाई नको.?

प्रिती महाबळेश्वरकर