लॉक डाऊन सहजीवन

नवरा बायकोच्या नात्यातील काही धम्माल क्षण .आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपले अभिप्राय कळवा. धन्

लॉक डाऊन सहजीवन

नवरा -सून साहेबा सून
            प्यार की धुन
            मैने तुझे चून लिया
            तू भी मुझे चुन चुन चुन......

बायको-चुन-चुन के मारुंगी सबको.

नवरा- (घाबरतच) क....क काय झालं?

बायको-अहो बघा ना घरात किती झुरळं झाली आहेत ते.                       
            तुमचं कशात म्हणजे कशात लक्षचं नसतं मुळी.

नवरा- हुश्श्य ......(घाम पुसत) एवढंच ना.

बायको -एवढंच ना?मग आणखी काय व्हायला हवय.घरात        काय वाघ,सिंह,कोल्हे व्हायला हवेत काय?(चिडून म्हणते)

नवरा -(समजुतीच्या सुरात)अगं तसं काही नाही गं.

बायको -(अजुनही रागातच) बरं ते जाऊद्या भांडी नीट घासा आज. काल भांड्यांना साबण तसाच राहिला होता. आणि हो जरा चहा टाका आलं घालून.

नवरा -(बिचारा) हो हो करतो मस्त फक्कड चहा करतो. बरं मी काय म्हणतो आज जेवायला काय करायचं.

बायको - आज ना छान बाजरीची भाकरी,वांग्याची भाजी,           वरण- भात असा बेत करा.

नवरा - बर बर करतो करतो.

बायको - आणि हो जरा तुमच्या बंड्याच्या अभ्यासाचं पण       
              बघा हं.....

नवरा - अग पण भाकरी च काय करायचं मला जमत नाहीत     
           चांगल्या.

बायको - ठीक आहे पण मी फक्त भाकरी च करणार आहे .
             बाकीचं सारं काही तुम्हीच करायचं आहे.

 नवरा - हो हो करतो ना, करतो. पण, तू जरा तेवढा केर 
            काढतेस का? म्हणजे माझं काम जरा लवकर 
            झालं असतं.

बायको - काऽऽऽय !आधीच मी कित्ती दमलिये.… योगासनं ,
             प्राणायाम,ऑनलाईन झुंबा करून.शीऽऽ मी नाही 
             बाई आता आणखी दमणार. मी आता आराम 
             करणार आहे.मग मस्त जेवणार, मग नंतर 
             वामकुक्षी,परत संध्याकाळी ऑनलाईन किटी
             नंतर रात्रीचं जेवण आणि मग झोप.

 नवरा - अग पण मी माझे कॉल कधी अटेंड करू.त्यापेक्षा 
             माहेरी गेली असतीस ते परवडलं असतं.

 बायको - तेच, तेच म्हणायचय मला. परवा तुम्हीच म्हणत 
              होता ना सारखं माहेर - माहेर करते म्हणून.  मी 
              माहेरी गेल्यावर असं सगळं मला हातात मिळतं. 
              म्हणून, मी आता ठरवलं आहे आठ दिवस माहेरी 
              आलीय असं वागायचं.नाहीतर असं लॉक डाऊन
              परत थोडीच येणार आहे. ????
 
नवरा - हो ना असं लॉक डाऊन परत कधीच नको रे देवा.
            ऑफिस मधला तो बॉस परवडला पण घरातील ही 
            अंबाबाई नको.????

                                       प्रिती महाबळेश्वरकर