शब्दरुप आले मुक्या भावनांना... lockdown वालं प्रेम..(भाग ३) repost

भाग २...... ...... आणि स्वप्न असेल तर मला झोपेतून अजिबात उठवू नकोस.... ही मूवी मला हवी होती अगदी तशीच आहे

Reposting...

भाग ......

...... आणि स्वप्न असेल तर मला झोपेतून अजिबात उठवू नकोस.... ही  मूवी मला हवी होती अगदी तशीच  आहे,  आता यात ब्रेक नको की जाहिरात पण नको"....मनातल्या मनात देवाला आळवून प्रार्थना केली... 

---------------------------------------------------------------------------

आता पुढे.... 

ध्रुव ने मस्त खिचडी भात... वर साजूक तुपाची धार... तळलेला पापड....प्लेट मधे काढून आणलं.... ध्रीती प्लेट कडे पाहतच राहिली.. तिला जेवण्याचंही भान राहिलं नाही... तेवढ्यात  दुरुन कुठूनतरी तिला ध्रुव चा आवाज येऊ लागला ..... 

"ध्रीती... ध्रीतीssss.... ध्रीती sssssssss..." ध्रुव ने तिला हलवून तंद्रीतुन बाहेर काढलं. 
"अग किती वेळचा आवाज देतोय.. लक्ष कुठाय तुझं.... " 

"अय्या तुम्ही खरंच मला आवाज देत होतात... !

"म्हणजे?.... " -ध्रुव 

"नाही... काही नाही... चला जेवूया... " -ध्रीती 

ध्रीती ने चमच्यानं पाहिला घास घेतला.. पण कोपरातुन हात वाकवता येइना.. 
"थांब मी भरवतो तुला " ध्रुव म्हणाला तसं  ती "नाही नको.... मी जेवते हळूहळू... तुमचं जेवण थंड होईल... " म्हणाली.. खरं तर तिची सुद्धा हीच इच्छा होती की आताही त्यानेच भरवावं... पण लगेच 'हो' कसं म्हणणार ना.... तसं बघायला गेलं तर ती डाव्या हाताने जेवू शकली असती... पण मिळतंय attention तर कशाला  सोडावं.... नाही का? ... मग तिनं पुन्हा एकदा उजव्याच हाताने घास घेण्याचा प्रयत्न केला आणि हात दुखावल्यानं कळवळली.. आता मात्र ध्रुव ने तिच्या हातातून चमचा काढून घेतला आणि स्वतःच तिला भरवू लागला... 

"अहो काय टेस्टी आहे खिचडी...छान जेवण बनवता येतं की तुम्हाला.... आधी माहित असतं तर तुमच्याकडून शिकले असते की..."-ध्रीती 

"उगाच झाडावर कशाला चढवते... फार नाही पण २-३ पदार्थ जमतात मला... हॉस्टेल वर मीच करायचो ना... आता तू २ दिवस आराम कर.. रोज एक पदार्थ खाऊ घालतो... "-ध्रुव 

तिचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.... अजून २ दिवस... हा आराम.... हे लाड.... वा..... मनातल्या मनात बोलताना शेवटचा 'वा' जरा जास्तच लाऊड झाला आणि ओठांवर  आला ...आणि तिनं पटकन जीभ चावली... 

 "काय वा? " -ध्रुव... 

"अं... नाही काही नाही.. मी जेवणाची तारीफ करत होते " -ध्रीती.

 "परत!"-ध्रुव. 

 "अं... हो,  नाही... म्हणजे.... हो.. म्हणजे ते... खुप छ...छा... छान झालंय ना... म्हणून मी ते आपलं.... ते.... " काय बोलावं सुचेचना तिला.. मान खाली घालून जेवू लागली... 

त्यानेही तिची उडालेली धांदल पाहुन जास्त काही विचारलं नाही.. आणि जेवणं उरकली... 

ध्रीती ला रात्रीचा औषधांचा डोस देऊन ध्रुव किचन आवरायला निघून गेला. ध्रीती ला खुप भारी वाटत होतं... आपल्या नवऱ्याचं हे रुप तिच्यासाठी नविन होतं...मनाला तिच्या सुखावत होतं... सुरवंटाचं जणु फुलपाखरू झालं होतं... 

अचानक तिला आठवलं आज ना आईला कॉल केला ना आईंना... "अरे देवा त्या वाट बघत असतील दोघी..आपण असं कसं विसरलो".. lock down सुरु झाल्यापासून ती रोज एक तरी विडिओ कॉल त्यांना करायचीच.. तसं ती नेहमीच करायची अगदी आधीपासून.. पण आताशा रोजच करत होती न चुकता...ध्रुव ही करायचा अधून मधून कॉल... पण फक्त आईला.. त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळं सासूबाईंना कधी स्वतःहून कॉल नाही करायचा तो... केला तरी एक दोन वाक्यात त्यांच बोलणं संपायचं... स्वतःच्या आईशी छान गप्पा मारायचा पण... कधी कधी ध्रीती ला प्रश्न पडायचा.... इतकं बोलतात हे आणि आपल्याशी बोलताना एवढं काय विचार करतात....

ध्रुव ची आई स्वभावाने खुप प्रेमळ होती...आणि फ्री सुद्धा... सासूपेक्षा मैत्रीण जास्त वाटायच्या....रोज तिची मस्करी करायच्या... ध्रुव च्या नावानं तिला चिडवायच्या.... ध्रीती ला तर कधीकधी वाटायचं या दोघांच्या स्वभावात किती तफावत आहे... आई किती मनमोकळ्या आणि ध्रुव.. 

तिनं आधी आईंना कॉल लावला...कॉल लावता लावता ध्रुव ला सांगितलं "अहो आईंना कॉल लावतेय तुम्ही येताय का बोलायला... आज तुमचाही कॉल नाही झाला"

"हो,  तू चालू कर मी आलोच ...."-ध्रुव 

तेवढ्यात कॉल कनेक्ट झाला पलीकडून आईंचा प्रेमळ आवाज आला... "काय ग आज इतका उशीर... मला वाटलं विसरली आज.... "

"अहो नाही आई,  विसरेन कसं.. थोडं लेट झालं तसं.... सॉरी "

"असुदे... मला वाटलं आज तुम्हा नवरा बायकोचं काही स्पेशल असेल.. म्हणून विसरलीस... " आईनी डोळे मिचकावत विचारलं... तशी ती लाजली.. 

"आहे  कुठे नवरा तुझा.. त्याला पण आज वेळ नाही वाटतं ..त्यानं पण नाही केला आज कॉल" -आई 

"अहो किचन आवरत आहेत...." ध्रीती म्हणाली आणि एकदम तिच्या लक्षात आलं "अरे देवा...  हे काय बोलून बसलो आपण"

तेवढ्यात ध्रुव किचन मधूनच आवाज देत 'आलो' म्हणाला...."हं बोल आई". 

"काय रे काय करत होतास किचन मध्ये... आज काय तुझी ड्युटी होती का.. ".

ध्रीती ला मेल्याहून मेल्यासारखं झालं.. काय बोलावं कळेना.. 

"अगं नाही ग तुझ्या लाडक्या सुनेनं हात पाय सुजवून घेतलेत... म्हणून म्हटलं थोडी मदत करावी "....-ध्रुव 

"म्हणजे? "-आई 

"अगं पडली दुपारी स्टूलावरून... हाताला आणि पायाला मुका मार लागलाय.. सुजलेत चांगलेच... "

"अरे देवा!...फार लागलंय का ग? .. डॉक्टर ला दाखवलं का? ... काय म्हणाले? आणि अशी कशी पडलीस?  लक्ष कुठे होतं ग? आणि तू का चढली होतीस?  याला सांगायचं ना.... "-आई 

"अहो आई... हो... हो.. किती प्रश्न... मी बरी आहे... आणि छान आराम चालू आहे... यांनी काही करू दिलं नाही आज... सगळं ते स्वतःच करत आहेत"-ध्रीती 

"तू नकोस काळजी करू... मी आहे ना... तुझ्या सूनेला नीट सांभाळेल... बरं का..."-ध्रुव 

"अरे गधड्या.... पण तिला का चढू दिलं स्टुलावर... तू कुठं होतास? ".-आई 

"आई.... अगं पण.. मला कुणी सांगायला हवं ना.. काय करायचं  ते... स्वतःच्या मनाचे कारभार सगळे.. "-ध्रुव 

"आई.. अहो.. छोटंसं काम होतं हो... उतरताना थोडासा गोंधळ झाला... आता बरी आहे मी.. "-ध्रीती 

"दाखव मला आधी किती आणि कुठं लागलंय.. "-आई 

"अहो नाही जास्त लागलं... खरंच... "-ध्रीती 

"ते मी ठरवेल.. तू दाखव... ध्रुव.... दाखव मला काय आणि कुठं लागलंय.. "-आई 

ध्रुव ने मोबाईल हातात घेऊन  रिअर कॅमेरा ऑन केला आणि तिच्या  हातावर फोकस केला... हातावरची सुज अजूनही स्पष्ट दिसत होती... 

"अरे काय रे हे... किती लागलंय... आणि काही नाही म्हणता? डॉक्टर कडे नेलं होतं की नाही "... -आई जरा चिडलीच. 

"अगं आज बंद होतं क्लिनिक...डॉक्टरशी बोलून उद्याची अपॉइंटमेंट घेतलीये मी... सोसायटी मधले डॉक्टर येऊन चेक करुन गेलेत... मुका मार आहे म्हणालेत... औषधं पण दिली आहेत"-ध्रुव 

"एवढं सगळं होऊन गेलंय आणि आता सांगता होय रे... बाकी मला काही माहित नाही... आता तिला अजिबात काम करु देऊ नकोस... आराम करु दे... आणि तू ग... जर याने कामाला लावलं तर मला सांग... मी बघते त्याच्याकडे.... "--आई 

"आई अहो नका  काळजी करु.. मी ठीक आहे...आणि खरंच आज यांनी मला काही करु  नाही दिलं.. सगळी कामं यांनीच केलीत.मी मस्त बसुन आराम करतेय आणि आयते खातेय. "

"हम्म,  मग  ठीक आहे. बरे आईला कॉल केलास का.. तिला सांगितलं का? "-आई 

"नाही अजुन,  आता करेल तिला कॉल. "-ध्रीती 

"बरं,  आता ठेवते मी... ध्रुव काळजी घे तिची नीट. चला बाय. गुड नाईट."-आई 
आईला गुड नाईट करुन कॉल बंद केला. आणि आईला कॉल लावला. ध्रुव उठून बेड लावायला आणि फ्रेश व्हायला गेला.  

"काय ग ध्रीती.. आज इतका लेट.. मी करणारच होते आता तुला. "-आई 

"अगं हो थोडासा उशीरच झाला... जेवणं झाली का तुमची? "-ध्रीती 

आईशी नॉर्मल गप्पा मारून उद्या परत कॉल करते म्हणत तिनं फोन ठेवला... लागल्याचं तिला काहीही सांगितलं नाही.. उगाच तिला टेन्शन.. 

पण आता तिला आईची खूप आठवण येत होती... अशावेळी आईशिवाय दुसरं काहीच नको असतं... नाही का?... तिला आता  फक्त आई हवी होती.... तिच्या  मांडीवर डोकं ठेवून पडायचं होतं....तिच्या डोळ्यांतुन अश्रूंच्या धारा सुरु झाल्या.. तिनं सावरण्याचा प्रयत्न केला पण मन काही शांत होईना....तेवढ्यात ध्रुव फ्रेश होऊन बाहेर आला.... त्याला येताना पाहताच ध्रीती ने पटकन डोळे पुसले आणि त्याला स्माईल दिली......खरं सांगायचं तर हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला... पण तिचा चेहरा पाहूनच ध्रुव समजुन गेला काय झाले असेल ते..... 
---------------------------

क्रमशः..... 

🎭 Series Post

View all