लॉकडाऊन आणि बदललेला तो
नमिता आणि अभय दोघेही नोकरी करणारे,त्यांना दोन मुली एक दहा वर्षाची पाचवीत आणि एक दोन वर्षाची ,दोन्ही मुली गोंडस ,दोघे जॉब करणारे,त्यामुळे मुलींना सांभाळायला फुलटाइम मावशी होत्या ,त्या जेवण बनवण्याची तयारी देखील करायच्या , दुस-या कामांसाठी वेगळी बाई ,बायकांच्या जिवावर छान चाललं होतं. त्यात मार्च मध्ये कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि लॉकडाउन सुरू झालं,आता सगळे घरातच होते ,पण घरात लहान मुलगी असल्याने बायकांना सुट्टी देऊन टाकली. अभयला कधीच घरातले कोणते काम करायची सवय नव्हती ,तो खाली जाऊन सगळं सामान आणून देत असे ,पण ते सगळं साफ करणं ,सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणे,त्यात वॉशिंग मशीन बंद पडली ,कोरोनामुळे कुणी दुरुस्तीला यायला तयार नाही मग काय,सगळी घरातली कामे करून ऑफीसची कामे करायची,म्हणजे रात्रीचे बारा वाजायचे,त्यातल्या त्यात सगळेच घरात ,त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करणे आणि मग त्यामागे सगळा पसारा ,भांडी सगळेच आले ,ती खूप थकून जायची ,स्वत:साठी तर बिलकुल वेळ मिळत नव्हता. ऑफिसच काम चालू असताना मुलीला शी आली ,सु आली तरी तिनेच करायचं ,दूध द्यायचं ,ती सगळं करत होती ,पण दोन तीन महिने झाले,तशी तिची चिडचिड खूप वाढली होती. एक दिवस तर भांडी घासताना ,भांडी आदळल्याचा आवाज येत होता .
अभय-तुला एवढं काय झालय्ं
तसं ती भांडी घासता घासता ,काही नाही म्हणाली ,पण तिचा आवाज जड झाला आहे ,असं त्याला जाणवलं,पण त्याने दुर्लक्ष केलं,आता तर तिला असं वाटायला लागलं की ,ती या घरातली मोलकरीणच आहे .
परत दुस-या दिवशी सकाळी,जेवण बनवताना भांड्यांचा आवाज ऐकू येतो.
अभय-माझ्यासाठी नको बनवू जेवण ,मी माझं बनवून काहितरी खाईल.
आता मात्र तिचा पारा चढला होता,ती रागात बाहेर आली,तू फक्त तुझ्या स्वतः साठी बनवणार का ?
अभय-हो ,मग काय करणार तुला त्रास होतो ना माझ्यासाठी बनवायचा
ती-ठिक आहे बनवं ,पोरींनाही काहितरी बनवून दे ,मला काही नसलं तरी चालेल ,निदान त्यांना तरी बनवून दे
अभय -तू दे बनवून,तुझं काम आहे ते आणि तू जगावेगळं असं काय करतेस ,सगळयाच बायका घरातली काम करतात ,तशी तू करते ,त्यात एवढं त्रागा करण्यासारखं काय आहे ,याआधी तू तर माझ्या कडून कसलीच अपेक्षा ठेवत नव्हती.
ती-हो नव्हते ठेवत ,कारण त्या वेळची परिस्थीतीत आणि आताच्या परिस्थीतीत खूप फरक आहे ,आधी ऑफीसची काम करताना मला कोणताही त्रास होत नव्हता ,कारण तेव्हा मुलींची जबाबदारी मावशी घ्यायच्या ,बाकीची कामे दुस-या मावशी करून जायच्या ,म्हणून मी कधी अपेक्षा ठेवली नाही .
पण तू सांग ,संसार काय माझा एकटीचा आहे का ,सध्या दोन्ही मावशांची कामे ,त्याव्यतिरीक्त ऑफिसचं काम यामुळे मी आता डीपरेशन मध्ये जाईल की काय ,असं वाटायला लागलं आहे. तू न जेवल्यामुळे हे सगळे प्रोब्लेम सुटणार नाही,मला निदान मुलांसाठी आणि माझ्या स्वत:साठी बनवाव्ं लागणारच आहे,मग तुझ्यासाठी नाही बनवणार असं कशाला ,तुला मेन प्रोब्लेम काय आहे ,तो समजत नाही का,असं बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं,ते पाहून त्याला जाणवतं की ,तिला खरचं त्रास होत आहे.
अभय -बोल, मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे
ती-माझी अपेक्षा आहे,म्हणून करू नकोस ,तुला खरचं वाटत असेल तर कर
अभय -ठिक आहे ,सध्यातरी मी सगळ्यांसाठी मसालेभात बनवत आहे
ती-किचन ओटा व्यवस्थित ठेव ,नाहीतर माझं काम वाढवून ठेवशील.
अभय-ओके ,मैडम ,तसं तिला खुदकन हसू आलं
त्याने मसालेभात बनवला,तिने भांडी घासली,त्याने झोपताना काही तरी विचार केला आणि झोपला.
सकाळी उठल्यानंतर तिला म्हणाला ,तू झाडू मार मी ,मॉपने लादी पुसतो,तिने झाडू मारला ,तो लादी पुसे पर्यंत तिने नाश्ता बनवला ,त्यांनी नाश्ता केला ,मग तिने जेवणाची प्राथमिक तयारी करून ठेवली होती,तोवर तो नाश्ता झाल्यावर ,खालून दूध आणि सामान घेऊन आला ,सगळं सामान स्वच्छ करून बाजुला ठेवलं आणि नंतर स्वत: आंघोळ केली,तिने कपडे धुतले आणि स्वत: आंघोळ केली. कपडे सुकत घालून तीही तिच ऑफिसचं काम करायला दहा वाजता बसली ,जे तिला इतर वेळी बारा वाजता बसावं लागायचं,ज्याची मिटींग असेल ,त्यावेळी मुलीची जबाबदारी दुस-याने घ्यायची ,तो आता हळू हळू कंटाळा आला की,तिलाही चहा करून द्यायचा ,ती बिझी असेल तर मुलीची शीही तिची वाट न बघता ,धुऊन टाकायचा,ती एक वाजता उठून दुपारचे जेवण बनवायची ,जेवल्यावर भांडी घासायची ,संध्याकाळी चहा ,ज्याला वेळ असेल तो बनवायचा,रात्रीची भांडी देखील आता तो घासू लागला. दोघे मिळून काम करु लागले ,त्यामुळे ऑफिसची कामे तिला रात्री जागून पूर्ण करावी लागायची ती बंद झाली.
तिलाही थोडा आराम मिळू लागला ,तिची चिड चिड कमी झाली . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आता सगळ्यांना अभिमानाने सांगू लागली,की हे मला मदत करतात.
अजुनही लॉक डाऊन चालुच आहे ,पण आता तो तिच्या बरोबर आहे ,प्रत्येक गोष्टीत त्यामुळे ती निर्धास्त आहे आणि येणा-या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.
ख-या अर्थाने ते एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार म्हणून सिध्द झाले आहेत,लॉकडाऊनने त्याच्यात हा बदल घडवला आहे की ,जो तिच्यासाठी संस्मरणीय आहे.
अभय- जॉबच काही खरं नाही ,असं वाटतंय ,कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं
ती-नका टेन्शन घेऊ,जे व्हायचं असेल ते होऊ द्या ,आपण एकत्र मिळून पर्याय काढू काहीतरी आणि या गोष्टीवर विश्वास ठेवा,जे होईल ते चांगल्यासाठी ,आपल्या कडून वेगळं काही तरी घडायचं असेल ,ज्याचा आपण कधीही विचार केला नसेल ,सगळ्या गोष्टी वेळेवर सोडून द्या आणि एक लक्षात ठेवा,काही झालं तरी मी मात्र सदैव तुमच्या सोबत आहे .
अभय -ते तर मला माहित आहे,काही म्हण कोरोनाने मला जगायला शिकवले आणि सगळ्यांना जीवनाची किंमत कळाली, आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यायला सर्वांना शिकवलं.
सत्यकथा आहे ,आवडली तर नावासहित नक्की शेअर करा.
वाचत रहा, हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.